पति पत्नी वाद Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पति पत्नी वाद

पती पत्नी वादातील हेही एक कारण?

आज आपण पाहतो की पती पत्नीची फारच भांडणं वाढलेली आहेत. नवऱ्याला त्याच्या पत्नीचं पटत नाही व पत्नीला त्याच्या पतीचं पटत नाही. मग वाद उत्पन्न होतात. त्यानंतर वाद एवढा मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतो की ते वाद चव्हाट्यावर येतात. पुढं न्यायालयात जातात. त्यानंतर ते वाद न्यायालयात गेल्यावर त्यात आरोपाच्या फैरी झडत असतात. भांडणारी मंडळी एकमेकांवर असे गंभीर आरोप लावत असतात की त्यानंतर तसे आरोप न्यायालयात ऐकणंही होत नाही.
*पती पत्नीतील वाद कसे उत्पन्न होतात?*
पती पत्नीतील वाद उत्पन्न होण्यामागील महत्वपुर्ण कारण म्हणजे स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याची भावना. पत्नीला वाटत असते की तिच्या सासरची सर्व मंडळी माझ्याच इशाऱ्यावर चालायला हवी. त्यात तिचा पतीच नाही तर तिच्या सासरकडील सासू सासरे, ननंद, दीर या सर्व मंडळींचा समावेश होतो. ते जर तिच्या मतानुसार वागत असतील तर तिच्यासाठी सासरकडील मंडळी चांगले असतात, अन्यथा नाही. त्यापैकी एखादं जर वाकड्यात चालत असेल तर तिला ते खपत नाही. मग ती आपल्या पतीकडे त्याबाबत तकादा लावते. यात जर तिचा पती तिचं ऐकत नसेल तर तिच्यात साऱ्या देव्या संचारतात. त्यातच पतीसह इतरांवर खोट्या स्वरुपाच्या आरोपाच्या फैरी झडत असतात ज्यातून अंशी वर्षाच्या पलिकडील म्हणजेच ज्यांचे वय नव्वदच्याही वर आहे. ज्याला नीट बसताही येत नाही. अशीही मंडळी तिच्या कहरातून सुटत नाहीत. एवढा तिचा प्रकोप होतो. सर्वांवर आरोप लागतात व ती सर्व मंडळी न्यायालयात कटघऱ्यात उभी ठाकतात. खटला बनतो व हा खटला दिर्घकाळ चालत असतो. तो एवढे दिवस चालत असतो की उभी हयात निघून जाते. ती गंधर्व विवाह करुन मोकळीही होते. कारण तिचं विवाहानंतर आडनाव चालत नाही. फक्त पतीचंच नाव चालत. त्यामुळंच ती सुरक्षीत असते. शिवाय दिर्घकालीन खटला जरी चालला, तरी न्याय ती महिला असल्यानं शंभर प्रतिशत तिच्याच बाजूनं लागतो आणि ती कमावत जरी असली तरी तिचा खाजगी जाब असल्यानं ती कमवत नाही असा ठपका ठेवून तिच्या पतीकडून जबरन एक निश्चित रक्कम वसूल केली जाते. जिला खावटी म्हणतात. ही झाली एक बाजू. या बाजूनुसार पुरुष असलेल्या पतीकडील सर्वच मंडळी न्यायालयात जात असतात. जरी त्यांचा गुन्हा नसला तरीही.
दुसरी बाजू अशी आहे की पतीपत्नी म्हणून विवाहीत झालेली मंडळी ते विवाहीत झाले की पतीला वाटते, तिनं माझंच शंभर प्रतिशत ऐकायचं. परंतु आज मात्र तसं शक्य नाही. आज मात्र पतीच्या बरोबरीनं मुलगीही शिकत असते ती मानाच्या जागा पटकावीत असते. असं असतांना ती त्या पतीच्या म्हणण्यानुसार कसं वागेल? मग भांडणं होतात. ज्यातून त्यानं जे म्हटलं नाही. तेही त्याची पत्नी म्हणते. तिनं जेही म्हटलं नाही. ते सगळं तिचा पती म्हणतो. मग वादाला तोंड फुटतं व ज्यातून एकमेकांविषयी द्वेष निर्माण होतात. त्याची परियंती ताटातूट, घटस्फोट आणि इतर बर्‍याच गोष्टीत.
विशेष सांगायचं झाल्यास पती पत्नीचा वाद. त्या वादाची इतर कोणतीही कारणं असली तरी स्वतःला श्रेष्ठ समजण्याची भावना हेही एक महत्वपूर्ण कारण आहे. ज्या कारणावरून थोरांनाही त्रासच होत असतो. चःक कोणाची असते ही शेवटपर्यंत कळत नाही. परंतु एखाद्या शुल्लक कारणावरून वाद वाढत जातो. त्याची परियंती म्हणजे संसार तुटतो. तिचा आणि त्याचाही.
मुख्य म्हणजे पती पत्नींनी एकमेकांवर आगपाखड न करण्याऐवजी एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे व तीच जमेची बाजूही आहे. परंतु आजच्या काळात कोणीही तसा प्रयत्न करीत नाहीत व कोणीही एकमेकांना समजून घेत नाही. घटस्फोटाचे जर प्रमाण टक्केवारीत काढले तर असे दिसून येईल की यात सुशिक्षित वर्गाचेच प्रमाण जास्त आहे. ज्यातून तशा स्वरुपाचा घटस्फोट सहन न झाल्यानं वा पत्नीला पतीचा व पतीला पत्नीचा वाद सहन न झाल्यानं आत्महत्याच घडत असतात. यात नुकसान पतीचं वा पत्नीचं होत नाही. नुकसान होतं ते त्यांच्या पोटी जन्मास आलेल्या अपत्याचं. त्यांच्यापैकी कोणाला कधी बाप मिळतो तर कधी कोणाला त्यापैकी आई. एकाच्या निधनानंतर वाचलेला व्यक्ती आपला दुसरा विवाह उरकवून टाकते. मग मुलांना आई बापाचं प्रेम मिळत नाही व ती मुलं गुन्हेगारी जगताकडेही वळत असतात. शिवाय याच घटनांतून ज्या वयोवृद्धांचा दोष नसतो. त्यांनाही यातना भोगाव्या लागतात. हेही तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४६०