पश्चाताप
एका सखाराम नावाच्या व्यक्तीला तीन मुलं होती. तिघंही तरुण होताच फार मेहनत करीत असत व मजेने घरी राहात असत.
ते तीन भाऊ. तिघंही एक पान वाटून खाणारे. त्यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं आणि तिघांजवळही शेती होती. शेती भरपूर होती. त्यात भरपूर धनधान्य पीकत होतं. तशी परीवाराला झड नव्हतीच. ते शेतात राब राब राबत. परंतु परीवार हा शेतात राबत नव्हता. तो उधळपट्टीच करीत होता.
ते तिघंही भाऊ. शेती चांगली पीकत असल्यानं त्यांना फरक पडला नाही. शिवाय शेती जास्त असल्यानं शेतात नोकर चाकरही होते. शिवाय त्यांच्याजवळ मोठी इमारत होती. ती इमारत त्यांच्याच वडीलांनी बांधली होती. कुटूंब ऐनचैनीत जगत होतं. असं वाटत होतं त्यांच्याकडे पाहून की ते किती सुखी असतील. तसे ते सुखीच होते. जेव्हापर्यंत शेती पीकत होती. परंतु दुर्दैव असं की वेळ पालटली. कोरडा दुष्काळ पडला शेतीत. मग बिचाऱ्यांना कर्ज घ्यावं लागलं.
तिघांवरही कर्ज होतं. परंतु ते कर्ज असलं तरी ते जगाच्या डोळ्यासमोर नव्हतं तर ते झाकोळलं गेलं होतं. शिवाय वाढलेली शान व दिखावूपणानं अंगात लाज भिनली होती. परंतु दुर्दैवच ते. दुर्दैवापुढं सत्य परिस्थिती कुठं लपवता येईल. त्यातच खोटी शान. त्या खोट्या शानसमोर परिस्थितीशी लढता लढता पैसा पुरत नव्हता. मग काय खायचेही वांदे होत होते. उपासमार होत होती.
त्या तिनही भावांना परिस्थितीची जाणीव होती. ते परिस्थिती पाहून वागत होते. परंतु त्यांचा परीवार....... तो परीवार परिस्थिती पाहून वागेल, तेव्हा ना. त्यांना त्यांनी कितीही वेळा समजावून सांगीतलं परंतु तो काही ऐकायला तयार नव्हता. त्यांना तशी सवयच पडली होती. शेवटी त्यांनी ठरवलं. आपण विष घेवून हे जीवन संपवावं. मग कळेल परीवाराला, किती त्रास होतोय ते. तेव्हाच सुधरतील ते. असा विचार करुन ते आत्महत्येचा विचार करु लागले. परंतु आत्महत्याही करणार कशी? त्याची तर भीती वाटत होती.
त्यांचा एक मित्रही होता. आनंद नाव होतं त्याचं. त्यांच्या सर्व गोष्टी आनंदला माहीत असायच्या. सततची नापिकी व सततचा कोरडा दुष्काळ. आज तिघांनीही ठरवलं की जहर प्यायचं. परंतु जहर प्यायची हिंमत करायची कशी? विचार केला. मग ती कल्पना त्या तिघांनीही आपल्या मित्राला बोलून दाखवली. तसा मित्र म्हणाला,
"का बरं आत्महत्या करण्याचा विचार करता आहात?"
ते मित्राचं बोलणं. त्यावर उत्तर देत ते भाऊ म्हणाले,
"काय करावं? परिस्थितीच आमची. शिवाय आम्ही कितीही सांगीतलं तरी परीवारांचे डोळे उघडत नाहीत. म्हणूनच हा उपाय."
ते उत्तर भावांनी दिलं. परंतु मित्र तयार होईना. तेव्हा त्या तिघांनी त्याला वचनात गुंफलं व म्हटलं की आम्ही स्वखुशीनं तयार आहोत ना मरायला. तू एक माध्यम आहेस. तू तर आम्हाला दुःखातून मुक्ती देत आहेस. तुला पुण्यच मिळेल. पाप नाही.
मित्रानं त्यावर बराच विचार केला. त्यानंतर मित्राला ती गोष्ट मान्य झाली व तो मित्र त्यांना विष कसं द्यावं? त्यासाठी कोणते उपाय करावे यावर विचार करु लागला. विचारांती त्याला कळलं की जर जेवनात विष मिसळून दिल्या गेलं तर आपल्यावर नावंही येणार नाही व त्यांना दुःखातून मुक्तीही देता येईल. शिवाय त्यांना मारणं ही पुण्याचीच गोष्ट असून त्यातून त्यांची चिंताही दूर होईल.
तो विचार करु लागला त्यांना विष देण्याचा. त्यातच त्याला त्याच्या मित्रांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. मित्र सांगत होते त्यांच्या पारीवारीक गोष्टी. ज्यात त्यांच्यावर संकट असूनही त्यांच्या परीवारांना काहीच समस्या नाहीत. शेवटी मित्रानं पोळ्या बनवल्या. त्यात विष मिसळून ती पोळी त्यांना खायला दिली तर तो तेथून निघून गेला.
त्या तिनही भावांनी त्या पोळ्या खाल्ल्या. तशी पोळी खाल्यानंतर त्यांचा जीव मळमळायला लागला. ते ओकाऱ्या करु लागले. त्यातच काही वेळाने त्यांचा जीवही गेला.
सायंकाळ झाली होती. बराच वेळ झाला होता. परंतु तीन भावांपैकी कोणीही घरी आलं नव्हतं. तसा बराच वेळ झाल्यामुळं घरची मंडळी शेतावर गेली. टार्चच्या उजेडात पाहू लागली. त्यातच त्यांना शेतातच एका कडेला तीनही प्रेतं दिसली. शिवाय त्या प्रत्येक प्रेताजवळ एक चिठ्ठी होती. ती चिठ्ठी प्रत्येकानं आपल्याच हस्ताक्षरात लिहिली होती. त्यात लिहिलं होतं. 'घरावर दुष्काळानं फार मोठं संकट कोसळलं होतं. घरात उपासमार होत होती आणि घरची मंडळी सुधारायला तयार नव्हती. ती अजुनही शान शौकत मध्ये जगत होती. आम्ही ते उघड्या डोळ्यानं पाहात होतो. ते आम्हाला सहन होत नव्हतं. आम्ही तरी कुठून पैसा आणणार? आणलेल्या पैशानं किती लाड पुरविणार परीवारांचे. शिवाय त्या पैशानं शेतात पीक पिकविणार की घरातील व्यक्तींचे लाड पुरवणार.'
ती चिठ्ठी. ती चिठ्ठी त्या परीवारानं वाचली. मग विचार आला व विचारांती पश्चाताप झाला व विचार आला की जर आपण सुधारलो असतो तर........ तर आज आपल्या परीवारातील जबाबदार व्यक्ती मरण पावले नसते. आतातरी आपण सुधारायला हवं.
परीवारानं तसा विचार करताच त्या घटनेनंतर सर्व परीवार सुधरला. आता ना कोणी परीवारातील व्यक्ती शानशौकत करीत होतं. ना कोणी उधळपट्टी होतं.
आज परिस्थिती सुधरली होती. परीवार सुखी झाला होता. तो परीवार सुधरला होता. आता तो परीवार शाननं नाही तर परिस्थितीनं वागू लागला होता. परंतु ते तीन भाऊ जगात नव्हते. याबाबत पश्चाताप नेहमी मनात होता.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०