स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 18 Pradnya Jadhav द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 18

सकाळी नेहमी प्रमाणे विराज त्याच्या वेळेत उठला.. डोळे उघडले तर अगदी त्याच्या चेहऱ्या जवळच तिचा चेहरा होता....तो जरा मागे झाला लगेच , तिच्या चेहऱ्याकडे तो खूप वेळ पाहत होता....


रात्री दोन टोकांना झोपलेले दोघेही सकाळी एकमेकांच्या कुशीत होते!!


हे जेव्हा तिला कळेल तेव्हा तिची काय प्रतिक्रिया असेल हे इमॅजिन करूनच त्याला हसू येत होत.


दिसायला तशी ती होतीच सुंदर.....आता त्याला सुद्धा सवय झालेली झोपेतून उठल्यावर तिचा चेहरा पाहायची...!! आपण फक्त मीरा साठी हिच्याशी लग्न केल आहे..?? मी तिच्या सोबत चुकीचं तर वागत नाही ना..??
हे प्रश्न त्याला सारखाच पडत होता...


मी फक्त तिच्याशीच का लग्न केल? हा प्रश्न तिला कधी पडला नाही का....लग्ना नंतर तिची कोणतीच तक्रार नाही... ना माझ्याकडून ना माझ्या फॅमिली कडुन , इतकं सगळं ती कस सांभाळून घेतेय? मीरा सोबत पण खूप लवकरच attached झाली..


घरात इतके मेड असुन सुद्धा हिला काम करण्यात कसली मज्जा येते..? हिच्या जागी दुसरी असती तर आरामात जीवन जगत असती.


पण याला काय ठाऊक... मिष्टीला या घरात आल्या पासून थोड का होईना पण फॅमिलीच जे सुख अनुभवायला मिळतंय ते आता पर्यंत कधीच मिळालं नाही... ती सगळं आवडीने करते आणि तिला ते आवडतंय ही....!!


विराज बऱ्याच वेळ विचार करत होता... अचानक मिष्टीची हालचाल बघून तो पटकन बेड वरून उठून निघून गेला.....!!

मिष्टी झोपलेलीच होती अजून पण....


बऱ्याच वेळ्या नंतर मिष्टीला जाग आली तिने उठून बाजूला पहिलं तर विराज तिच्या बाजूला नव्हता.....


किती झोपतो आपण? आपला नवरा आपल्या आधी उठतो हे जाणवलं आणि ओशाळल्या सारखं झालं...!! तिने समोर पाहिलं तर विराज मिरर समोर त्याची टाय बांधत होता...... फॉर्मल लूक मध्ये तो जबरदस्त सेक्सी दिसत होता.... त्यात त्याने त्याचे केस सुद्धा सेट नव्हते केले... मेस्सी हेअर त्याचे जास्त attractive वाटत होते तिला.....


किती नशीबवान आहोत आपण आपला नवरा जामच हँडसम आहे....यांना पाहून कोणी म्हणणार पण नाही कि यांना एक मुलगी पण आहे...!!

ती कंटिन्यू त्याला पाहत होती त्याने मिरर मधून तिला पहिलं तर ती त्यालाच पाहत होती..... त्याला थोडं ते वेगळंच वाटलं .


"माझ्याकडे पाहून झालं असेल तर , उठ आता 7 वाजलेत... तुला अजून मीराला पण स्कुल साठी रेडी करायचं आहे....!!" तशी ती त्याच्या विचारातून पटकन बाहेर आली आणि घाबरून धावतच बाथरूम मध्ये पळाली....

त्याला थोडं हसायलाच आल... किती घाबरते ही , तो सुद्धा त्याच आवरून खाली आला...


" मिष्टी कुठे आहे?? " आई ने त्याला एकट्यालाच खाली आलेल पाहून लगेच प्रश्न केला....

" ती आत्ताच उठलीये.....येईल आवरून." विराज...


" ठीक आहे... " आई

सगळे नाश्ता करायला बसले , आज शेफ ने नाश्ता बनवला होता... त्यामुळे विराज ला ते खायची इच्छा होत नव्हती असं का होत होत हे त्याला सुद्धा समजलं नाही...

भलेही त्याने मिष्टीला सांगितल होत की रोजच जेवण तूच बनवायचं पण ती येण्याआधी तो शेफच्याच हातचं खात होता पण आता ते ही नकोस झाल होत त्याला!

कदाचित तिने बनवलेल खायची सवय झालेली...पण हे बोलून कोण दाखवणार???

कसेबसे दोन खास खाऊन तो ऑफिससाठी निघाला.

आज ती लेट उठली म्हणून तिला काही बनवता आलच नाही.... मिष्टी तीच आवरून डायरेक्ट मीरा च्या रूम मध्ये गेली....


मिरा ऑलरेडी उठून बसली होती आणि मेड ने तिला मिष्टी यायच्या आधीच रेडी केलेलं... त्यामुळे मिष्टीला पण बर वाटलं..


" अरे माझं पिल्लू आज मी यायच्या आधीच रेडी झालं..." मिष्टी तिच्या गालावर किस करत म्हणाली....


" येस आंटी.... " मिरा सुद्धा मिष्टीला गालावर किस करत म्हणाली......


दोघी पण तयार होऊन खाली आल्या.... तिने पाहिलं सगळ्यांचा नाश्ता ऑलरेडी झाला होता आणि विराज सुद्धा निघून गेला होता.....!!


मिष्टी आणि मिराने मग नाश्ता केला आणि मिष्टी ने मिराला ड्रायव्हर सोबत तिच्या स्कूलला पाठवलं...


तिने शेफला तयारी करून ठेवायला सांगितली कारण थोड्याच वेळात तिला सुद्धा ऑफिस साठी निघायचं होत सोबतच विराज आणि तिचा सुद्धा टिफिन रेडी करून न्यायचा होता....!! त्यामुळे तिने लगेच स्वयंपाक करायला घेतला.

तिच्यामुळे कोणी उपाशी राहिलेलं तिला मुळीच चाललं नसत आणि तिचा नवरा असेल तर नाहीच!!

डबे भरून ती पटकन ऑफिस साठी निघाली.

.
..
....

आपण जर विराजच्या कंपनी सोबत प्रोजेक्ट्स केले तर त्याच्या ऑफिस मध्ये येणं जाण सुद्धा वाढेल आणि मला माझी किट्टू सुद्धा भेटेल...!! त्याच कारणाने तिच्या जवळ तरी राहता येईल मला....


सागर प्रत्येक गोष्टी चा विचार करत होता.. पण तो ज्या मुलीच्या शोधात होता ती खरच मिष्टी होती का..???


सागर च्या बाबांनी इंडियाच्या ब्रांच मध्ये त्याला CEO या पदावर ठेवलं होत...!! त्यामुळे बऱ्याच मिटींग्स अटेंड करणं त्याला भाग होत... इंडिया मध्ये आल्या पासून ऑफिस मध्ये त्याची बरीच चर्चा चालू असायची... नवीन बॉस आणि ते पण इतका यंग..


त्यामुळे जो तो त्याला इम्प्रेस करण्या साठी मेहनतीने काम करत होता...!! पण या सगळी कडे त्याच लक्षच नव्हत तो फक्त आणि फक्त किट्टूच्याच विचारात असायचा....


आज परत सागर किट्टूच्या फोटो समोर एकटाच बडबडत होता.....


त्याला लांबून पाहणाऱ्या एका नोकराने हळूच बॉडी गार्ड ला प्रश्न केला...

" तुला नाही वाटत का? हा जरा सायकोच आहे... एका मुलीच्या प्रेमात इतकं कोण दिवान होत...."


" आय डोन्ट नो...... त्या मुलीच लग्न पण झालाय आणि तरीही बॉस ना ती हविच आहे....." तो गार्ड सागर कडे पाहत म्हणाला.....

....
........
..........

मिष्टी ऑफिस मध्ये आली... तिने एका पियुन ला विराज बद्दल विचारलं तर ते म्हणाले... सर ऑफिसला येऊन मिटिंग साठी बाहेर गेलेत आणि यायला उशीर होईल कदाचित....


" oh.... बर ठीक आहे." मिष्टीला आता प्रश्न पडला या टिफिनच काय? यांनी काही सांगितलं पण नाही कि टिफिन वैगेरे नको काही....असो

तो उपाशी नको राहायला म्हणून डबा त्याच्या केबिन मध्ये ठेवावा म्हणून ती डायरेक्ट त्याच्या केबिनमध्ये गेली आणि तिथे टिफिन ठेवून निघाली.... तोच तिची टक्कर एका मुलीशी झाली....


" उम्म्म... I'm sorry " असं बोलत मिष्टी बाजूला जाऊ लागली...


" hey wait... तू विराज सरांच्या केबिन मध्ये काय करतेयस? ते पण सर नसताना.. " ती...


" ते actually मी ऑफिस मध्ये येत होते तर त्यांच्या ड्रायव्हर ने मला हे त्यांच्या केबिन मध्ये ठेवायला सांगितलं... तर मी तेच ठेवायला आलेले... पण तुम्ही का मला विचारत आहात?? " मिष्टी जे तोंडात येईल ते बोलू लागली....


" मी त्यांची... पर्सनल सेक्रेटरी आहे....परवाच जॉईन झाले.. So " ती...


" oh.. " मिष्टी...


" वेट मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही... मला तो पहिले टिफिन चेक करू दे... " असं बोलत ती आत गेली आणि टिफिन ओपन केला...


" अहं... हे काय डाल अँड चावलं सिरीयसली?? आणि हे काय रोटी आणि वांग्याची भाजी..... मला नाही वाटत विराज सर हे खात असतील त्यांची पर्सनॅलिटी पाहत ते नक्कीच डाएट फॉल्लो करत असतील.... प्लिज तू हे घेऊन जा मी त्यांना दुसरं ऑर्डर करेल....ते अस काही खाणार नाहीत. " ती मुलगी जरा तुच्छतेने बघत म्हणाली.


" पण का..? हे तर त्यांच्या घरूनच आल आहे आणि मी... " मिष्टी बोलता बोलता थांबली..


" तुला खूप माहित आहे ग बॉस बद्दल.... जास्त शहाणं पणा नको करू आणि हे घेऊन जा "... ती ने तो टिफिन मिष्टीच्या हातात दिला आणि तिला बाहेर जायला सांगितलं......


मिष्टीला यावर काहीच बोलता आल नाही... ती गप्प पणे तो टिफिन घेऊन निघून गेली आपल्या केबिनमध्ये , तिचा मूड ही आता खराब झालेला....


" ही कोण आहे जी मलाच माझ्या नवऱ्याबद्दल प्रतिप्रश्न करते आणि ह्यांनी पण मला काही सांगितल नाही. हे उपाशी राहू नयेत म्हणून एवढा डबा बनवून आणला तर त्याच काहीच नाही....." मिष्टी तोंड पाडून म्हणाली.
.
..
...
.....

विराजला मीटिंग वरून यायला खूप उशीर झाला तरीही तो डायरेक्ट ऑफिसलाच आला.

त्याला आता मिष्टीला भेटायचं होत....तिच्या बांगड्यांची किणकिण ऐकायची होती.

त्याने लगेच पियूनला निरोप देऊन पाठवलं.

" सर मिष्टी मॅम तर मगाशीच घरी गेल्या." पियून म्हणाला.


" काय ??..... बर ठीक आहे." विराजचा सगळा मूडच बिघडला.

तिला पहायचं होत !!


****************************


मिष्टीला घ्यायला गाडी आल्यामुळे ती घरी चालली होती.....रुद्र ला भेटायचं म्हणून आज ऑफिसमधून ही ती लवकर निघाली होती.

रुद्रने आल्या आल्या तिला मिठी मारली.

" दी..... आय मिस्ड यू."

तिनेही त्याला मायेने जवळ घेतल.

" मी पण खूप मिस केलं तुला." मिष्टी.

खूप दिवसांनी भेटल्यामुळे भावाबहिणींच्या चांगल्याच गप्पा रंगल्या.


मीरा यायची वेळ झाली तशी ती तिथून निघाली.

खाली आली तर गाडी होतीच.

पण ती गाडीत बसणार तेवढ्यात तिचा हात कोणीतरी मागून धरला.



क्रमशः......