ही अनोखी गाठ - भाग 2 Pallavi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ही अनोखी गाठ - भाग 2

भाग - २" दि किती सुंदर घर आहे हे मी थोडं फार फिरून आले आदिती आणि मानसीने मला दाखवलं आजून तर काहीच नाही मी अर्धच पाहिलं खुप मोठ घर आहे वॉव दि तुझी तर मज्जाच मज्जा "

दिशाचं वेडपण पाहून हर्षा नी तर कपाळावर हातच मारुन घेतला

" जा आधी फ्रेश हो मी पण दुसरी साडी घालते सकाळी लवकर उठायचं आहे आवर पटकन....." हर्षा

पुढे........सकाळी सहाच्या दरम्यान माधवीने हर्षाला कॉल केला.....हर्षा डोळे चोळत उठून बसली आणि फोन उचलला

" हॅलो सोनू उठलीस का नाही??? आवर पटकन तुला मी कालच सुचना देऊन ठेवली होती ना उठ पटकन आवर बाळा तिथले नियम वगैरे असतीन अजून तु झोपलीच आहेस......,

"अगं मम्मी आताशीक फक्त 6 वाजले आहेत काही उशीर नाही झाला अजुन सगळेच झोपलेले असतील ना "हर्षा

"काही काय बोलते जा आवर पटकन "माधवी

हर्षा वैतागूनच कपाळाला हात मारुन घेते....फोन ठेवून हर्षा बाथरूम फ्रेश व्हायला जाते...मेन तिला गरम पाण्याचा नळ कोणता आहे हेच समजत नाही ती खुपच confuse होते..... तीला समजत नाही काय करावे म्हणुन तेवढ्यात दारावर थाप पडली
हर्षा अजूनच घाबरली"अरे यार मम्मी जे म्हणत होती तेच खरं होतं मला उठायला खुपच उशीर झाला का आता काय करु.....ती बाथरुममधून बाहेर आली.....तीने पदर नीट सावरत घाबरतच दरवाजा उघडला... समोर कुसुम उभी होती
" ते..ते आई माझं अजून आवरलं नाही ते मला गरम पाण्याचा नळ कोणता आहे ते माहित नाही" हर्षा खाली मान घालूनच बोल्ली...

" अगं मी तेच सांगायला आली आहे चल तुला नीट समजावून सांगते ..... आणि घाबरु नकोस सावकाश ये घाई करू नकोस आणि ही घे साडी आणि हे दागिने घाल " कुसूम तिच्या हातात देऊन तिला सगळ नीट सांगून निघून जातात....

तसं हर्षा सगळं आवरते आणि दिशा तिला मदत करत असते

आदिती आणि मानसी रुममध्ये हर्षाला खाली न्यायला येतात

आदिती : Woww!!! Vahini you are looking so beautiful just looking likee woww..!!

मानसी: खरच वहिनी किती सुंदर दिसतेस कोणाची नजर नको लागायला..
तसं हर्षा लाजून त्यांना Thanks म्हणते..

चौघीजणी बाहेर येतात ....पुजेची तयारी झालेलीच होती..

तेवढ्यात शिवम ही खाली येऊन पाटावर बसला
"हर्षा ये बाळा " कुसुम तिला बोलवत म्हणते..
हर्षा जरा घाबरतच त्याच्या शेजारच्या पाटावर जाऊन बसते...

पुजा वगैरे संपते .... सगळे पाहूणे ही जेवण आटोपून निघून जातात....

त्यांच्यानंतर त्या दोघांना शेजारी बसवुन... त्यांच्यासमोर एक परात ठेवतात त्या परातीमधी दुध आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकतात ...


छाया: हे बघा दोघांनी ( त्या एक अंगठी हातात घेऊन दोघांसमोर धरतात) ही अंगठी ज्याला सापडेल ते जिंकेल आणि ती व्यक्ती राज करेल

तसं शिवमला खुप राग येत होता त्याला हा सगळा timepass वाटत होता.....पण सगळ्यांच्या इच्छेखातिर त्याने त्याचा ego बाजूला ठेवला
तसं छायानी अंगठी दुधात फिरवली ....चला चालू करा

हर्षा ने घाबरतच हात दुधात ठेवला...शिवम ने ही दुधात हात घातला...दोघे जण हात फिरवत अंगठी सापडत होते..... हर्षाचा हात शिवमच्या हाताला लागला तसं तिने हात दुसरीकडे फिरवला..... हर्षाने अंगठी दुधातून काढून समोर धरली....


"Wowwww दी जिंकली".... दिशा उत्साहाने म्हणाली
तसं आदिती आणि मानसी बारीक चेहरा करुन शिवम कडे पाहू लागल्या....
तसं त्याने एक सुस्कारा सोडला.....
"मॉम किती वेळ अजून..." तो चिडतच कुसुमला म्हणाला
" हो झालं आता फक्त हातातले हळकुंड सोडा.... हर्षा तु दोन्ही हातानी आणि शिवम तु एकाच हाताने वापर करा"
त्याने कपाळावर आठ्या पाडतच हळकुंडाची गाठ काढली...
हर्षानेही घाबरतच गाठ काढली ....
तेवढ्यात शिवम लगेच उठून त्याच्या रुममध्ये निघुन गेला...

"हर्षा बाळा जा तु पण आराम कर काही लागलं तर हाक मार तसं तुम्हाला उद्या माहेरी जावं लागेल ठिके ५-६ दिवसांत तुला आम्ही घ्यायला येऊ...." कुसुम
तसं हर्षा आणि दिशा गेस्ट रुम मध्ये गेल्या...

***********************

दुसऱ्या दिवशी हर्षा आणि दिशा सकाळी लवकर उठतात माहेरी जायची घाई म्हणून हर्षा लवकरच आवरुन तयार होते छानशी साडी नेसून त्यावर छोटे दागिने घालून ती आणि दिशा बाहेर येतात....

खुप छान दिसतेयस बाळा.... कुसुम तिच्या मानेला तीट लावतात
हर्षा हसून सर्वांच्या पाया पडते....हर्षा ड्रायव्हर तुम्हाला घरी सोडेल ५-६ दिवसांनी आम्ही तुला घ्यायला येऊ ठीके....

तसं हर्षा आणि दिशा गाडीत बसून सर्वांचा निरोप घेऊन निघून जातात.

********************************

पुणे:


दारावरची बेल वाजली...
समृद्धी दरवाजा उघडते. हर्षा आणि दिशा बाहेर उभ्या होत्या...
मम्मी दी आली तसं म्हणत समृद्धी हर्षाला मिठी मारते.....हर्षा आत जाते माधवी घाईतच येऊन हर्षाला मिठी मारते....हिरवी कलरची पैठणी गळ्यांमध्ये नाजूक छोटे दागिने.....लक्ष्मीचे रुप घेऊन आल्यासारखी दिसत होती... माधवीचे तर तिला पाहून मन भरुन आले होते....

"मम्मी पप्पा कुठे आहे"हर्षा

"अगं सोनू पप्पा बॅंकेत गेले आहे आता येवढ्यात येतीलच...जा तू चेंज करून ये.. आणि दिशू तु पण फ्रेश हो बाळा मी जेवणाची तयारी करते

हर्षा तिच्या रुममध्ये जाते तिला आज खुप relax वाटत होते...कोणतच दडपण मनावर नव्हते....ती फ्रेश होऊन किचन मध्ये जाते आणि माधवीला मिठी मारते ....

"अगं सोनू थांब लागेल मला" माधवी हसत म्हणाली

तेवढ्यात दाराची बेल वाजली हर्षाने पळतच जाऊन दरवाजा उघडला आणि विजयरावांना मिठी मारली त्यांनीही तिला जवळ घेतले....
"अगं सोनू त्यांना आत तर येऊ दे दमले असतील ते" माधवी म्हणाली
हर्षा ला पाहून विजयरावांच ही मन भरुन आलं होतं.....

" नाही माझ्या परीला पाहून माझा आख्खा थकवा निघून गेला..." विजय राव

समृध्दी लटक्या रागातच विजयरावांकडे पाहू लागली.....
विजयरावांनी समृध्दीला जवळ बोलावून तिलाही एका हाताने मिठीत घेतलं...
" माझ्या दोन्ही लेकी मला सारख्याच आहे समू..." विजय राव
तसं समृद्धी हसायला लागली आज सगळेच खूप खुष होते...

थोड्या वेळात किशोर माधवीचा भाउ येतो...नंतर सर्व जण जेवण आटोपून हॉल मध्ये गप्पा मारत बसतात...
" ताई चल जातो मी येईन पुन्हा कधीतरी असं म्हणत किशोर दिशा ला घेऊन निघून जातो....."


***************************************

क्रमशः

©® ~ पल्लवी

स्टोरी कशी वाटली ते नक्की सांगा...😊

( Waiting for your comments❤️)