ही अनोखी गाठ - भाग 4 Pallavi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ही अनोखी गाठ - भाग 4


भाग -4


" शिवम हर्षाचं ॲडमिशनचं बघ "शरदराव

"ओके " शिवम


चल मॉम मी जातो.... कुसुमला मिठी मारत शिवम निघून जातो....पुढे ......


नाश्ता करून आदिती हर्षाला सगळं घर दाखवू लागली.... हर्षा एक न एक गोष्ट न्याहाळत सर्व कुतुहलाने पाहत होती सगळं बघून झाल्यावर आदीती तिला टेरेस वर घेऊन गेली........ते टेरेस कमी तर गार्डन च जास्त वाटत होतं... कारण सगळीकडे शो चे प्लान्टस, फुलांचे झाडं सगळ्या प्रकारचे फुलझाडे तिथे लावली होती आणि त्यावर फुलपाखरे भिरभिरत होती साइडला रंगीबेरंगी पक्षी होते तेही आनंदाने आपले पंख फडफडवत इकडून तिकडे उडत होते ......

नंतर दोघीजणी खाली आल्या.....आदितीला तिच्या मैत्रिणीचा कॉल आल्यामुळे आदिती हर्षाला सांगून तिच्या रूम मध्ये निघून गेली....हर्षा तिथून आजीच्या रुममध्ये गेली....

सुशिला बाई त्यांच्या रुममध्ये पुस्तक वाचत होत्या

" आजी आत येऊ का " हर्षा दरवाज्यात उभी राहुनच म्हणाली..

" अगं विचारते काय येना तुझच घर आहे..." सुशिला बाई हसत तिला म्हणाल्या....

हर्षा आणि सुशिला बाईं गप्पा मारत बसल्या तेवढ्यात कुसुम आणि राधा काकू आल्या राधा काकूंच्या हातात जेवणाचं ताट होतं...

"आई जेवण करून घ्या तुम्हाला मेडिसिन घ्यायचेत मी येतेच नंतर...हर्षा तु चल जेवण करायला....."कुसुम

" हो आई.....आजी तुम्ही जेवण करा मी येईन नंतर " हर्षा


"हो बाळा घ्या तुम्ही पण जेवण करून" सुशिला बाईं


कुसुम आणि हर्षा निघून गेल्या राधा काकु सुशिला बाईं कडे त्यांना काय हवं त्यासाठी तिथं थांबल्या.....

सगळ्यांची जेवणं आटोपतात.....सगळे आपापल्या रुम मध्ये निघून जातात... हर्षा तिच्या रुममध्ये येते तिला खुपच बोर होत असते ती तिचा फोन घेऊन माधवी ला कॉल करते....

"हॅलो मम्मी काय करतेय" हर्षा

" अगं सोनू आताच जेवण केलं आणि बसले तेवढ्यात तुझाच फोन आला... कशी आहेस आणि आज काही गोड केलंस की नाही आज तुझा तुझा किचनमध्ये पहिला दिवस म्हटलं तर" माधवी

" हो मम्मी तु शिकवलेली शेवयांची खीर केलती सगळ्यांना खुप आवडली...." हर्षा आनंदाने माधवीला सगळ्यांच्या प्रतिक्रिया सांगत होती

माधवी कौतुकाने एकत होती.....नंतर दोघी थोडंफार बोलून फोन ठेवून देतात....

हर्षा बेडवर पडून तशीच झोपी गेली......


****************************

" शिवम तु मला न सांगता लग्नं कसं करु शकतोस.......काय पाहिलंस तु त्या so called मुलीत......तुला नाही माहीत का माझं तुझ्यावर वर किती प्रेम आहे काय कमी आहे माझ्यात......मी थोडे दिवस इंग्लंड ला गेले तु डायरेक्ट लग्न करुन बसलास आणि मला खबर पण नाही......." ईशा रागातच शिवमला बोलु लागली...

" What are you talking about Isha... I never had any love feelings for you I just consider you as a good friend but I have no love feelings for you at all... you have misunderstood something... forget it and live your life" ( हे तु काय बोलतेय ईशा... माझ्या मनात कधीच तुझ्याबद्दल प्रेमाच्या फिलिंग्स नव्हत्या मी फक्त तुला एक चांगली मैत्रीण मानतो.......तुला काहीतर गैरसमज झाला आहे......तु पण हे विसरुन तुझं आयुष्य जग ) शिवम चकित होत म्हणाला

ईशाच्या पायाच्या खालची जमिनच सरकते......ती ताडकन रागातच तिथून निघून जाते....

शिवम एक सुस्कारा सोडत कोणाला तरी कॉल करतो...


( ईशा पाटीलने शिवमला एका बिझनेस अवॉर्ड फंक्शन मध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं आणि ती त्या क्षणीच त्याच्या प्रेमात आंधळी झालती.... ईशा तिच्या वडिलांचाही मोठा बिझनेस होता.......ईशाने शिवमशी ओळख करुन त्याच्याशी तेव्हाच एक बिझनेस डिलही साईन केलती.....तेव्हापासून ईशाची आणि शिवमची ओळख झालेली आणि तेव्हापासून ती शिवमला जास्तच अटॅच झालेली आणि ती शिवमला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होती........ती तिच्या वडिलांची आणि भावाची खुप लाडकी होती लहानपणापासून तिला कशाचीही कमी नव्हती तिला जे हवं ते तिला सगळ मिळून जायचं......तसं शिवमलाही आपल्या प्रेमात पाडून त्याच्याशी लग्न करु असे तिने ठरवलं होतं तसं त्याला तिच्याबद्दल प्रेमाची भावना कधीच नव्हती पण तिला वाटत होते की शिवम ही आपल्यावर प्रेम करतो असं......ती बिझनेस निम्मित तिच्या भावासोबत काही दिवस इंग्लंडला गेली होती त्यामुळे तिला शिवमच्या लग्नाची खबरही नव्हती...आज ती इंडिया मध्ये आली होती आणि तिला शिवमच्या लग्नाची गोष्ट माहित पडली आणि तिने त्या दोघांच्या लगनाचे फोटोस पण पाहिले तिची तळपायाची आग मस्तकात गेली म्हणून ती सरळ रागातच शिवमला त्याच्या ऑफिसमधये भेटायला आली होती)

******************************

शरदराव दुपारी घरी जरा लवकरच येतात.......

सुशिला बाई कुसुम अनिता सगळे हॉल मध्ये गप्पा मारत बसल्या होत्या..... शरदराव ही त्यांच्या मैफिलीत जाऊन बसले...इकडे हर्षाला जाग येते ती दचकुनच उठते......ती तशीच घाईत बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन खाली जाते...‌....

तिला सगळे हॉलमध्ये बसलेले दिसतात....

" ये बस हर्षा.....झोप नीट झाली ना " तिच्या डोक्यावरून हात फिरवत कुसुम तिला विचारते

हर्षा कुसुमच्या शेजारी बसुन हो म्हणते......शरदराव ही हर्षाकडे बघून हसुन त्यांच्या रुमकडे निघून जातात...... नंतर अनिता ही थोडं बोलुन निघून जाते तिथे....

थोड्या वेळाने शिवम घरी आला.....

त्यानी सर्वांकडे एक नजर टाकत त्याच्या रुममध्ये निघुन गेला....... नंतर आदीती आणि हर्षा दोघी गार्डन मध्ये चक्कर मारायला गेल्या.... कुसुमही नंतर किचनमध्ये निघून गेली

फ्रेश होऊन शिवम खाली हॉलमध्ये आला आणि सुशिला बाईंच्या जवळ जाऊन बसला......

" आलास "सुशिला बाईं त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाल्या....
तसंच आजी नातवाच्या गप्पा चालू झाल्या

नंतर सगळ्यांनी जेवणं आटोपली आणि रुममध्ये निघुन गेले

हर्षा आदिती च्या रुममध्ये होती तिला तिच्या रुममध्ये जायची भिती वाटत होती.....

" वहीनी तुला आज झोप नाही का येत......."आदिती जांभई देत हर्षाला म्हणाली....

हो येतेय ना चल मी जाते......असं म्हणत हर्षा तिच्या रूमकडे निघाली...

आतून दरवाजा लॉक असल्याने हर्षाने हळुच दरवाजा नॉक केला......
शिवम ने दरवाजा उघडला आणि बेडवर जाऊन मोबाईल बघत बसला...

हर्षाने दरवाजा लॉक केला.....आणि ती गॅलरीत गेली...... तिला आता झोप आली होती....नंतर ती आत मध्ये गेली.....

ती सोफ्याकडे जायला निघते तसं शिवम ने एक नजर तिच्यावर टाकली

" तु बेडवर झोपू शकते " तो मोबाईल मध्येच पाहून म्हणाला...

ती थोडी घाबरली त्याच्यासोबत बेडवर झोपयचं म्हणजे तिला धडधडायला लागलं...

ना...नाही मी झोपते सोफ्यावर..... हर्षा

सोफ्यावर नीट झोप नाही येणार......तो निर्विकार चेहरा ठेवून मोबाईल मध्येच पाहत म्हणाला.....

तिला आता काय ऑप्शन नव्हता

ती बेडवर जाऊन झोपली आणि त्याच्या विरुद्ध दिशेने तोंड करून अंगावर ब्लानकेट घेऊन झोपली........


**********************
क्रमशः

©® ~ पल्लवी