वस्तू स्वस्त व्हाव्यात? Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वस्तू स्वस्त व्हाव्यात?

वस्तू स्वस्त व्हाव्यात?

सध्याचा काळ पाहिल्यास बऱ्याच वस्तू ह्या महाग झालेल्या आहेत. ज्यात तेल, साखरच नाही तर स्वयंपाकाचा गॅसही महाग झालेला आहे. टिव्ही, मोबाईल रिचार्जचे दर वाढलेले आहेत. ज्याची सामान्य माणसांना जाणीवही नाही.
मोबाईल रिचार्ज ही आजच्या काळातील माणसांची महत्वपुर्ण गरज ठरलेली आहे. जर मोबाईलमध्ये पैसे नसतील तर आपल्याला घरी करमतच नाही अशी आपली अवस्था बनलेली आहे. त्यातच कधीकधी पुर्वीचा काळ आठवतो. पुर्वी दहा रुपयाचा रिचार्ज मारावा लागायचा व त्या दहा रुपयात मिसकॉल दिला जायचा व मिसकॉल देताच पुढील व्यक्तीला गरज असेल तर तो जेवढं बोलायचं, तेवढं बोलून घेत असे. त्या रिचार्ज पद्धतीत पती पत्नींना बराच फायदा होता. तसाच फायदा होता मुलांनाही. तेही आपल्या आईची वा वडीलांशी बोलतांना मिसकॉल द्यायचे आणि जेवढं बोलायचं तेवढं बोलून टाकायचे. मात्र एक मिसकॉल द्यावा लागायचा. परंतु आज तसं नाही. आज मोबाईल रिचार्जही महाग झाले आहेत. शिवाय मोबाईल नसेल तर सिलेंडरचा नंबरही लावता येत नाही. तशीच ऑनलाईन शॉपींग करतांना मोबाईल गरजेचा झाला आहे.
मोबाईल रिचार्जबद्दल एका व्यक्तीशी संभाषण केलं असता तो म्हणाला,
"अहो, आज मोबाईल रिचार्जबद्दल तुम्ही बोलताय की तो महाग झालाय. परंतु तो महाग नाही तर तो स्वस्त आहे. किती बोलता येतं त्यातून."
त्या व्यक्तीचं बोलणं बरोबर होतं. परंतु फायदा कुणाचा झाला त्या मोबाईल रिचार्जच्या महाग होण्यानं. फायदा उद्योगपतींचा झाला . त्यांनाच वेळोवेळी काम पडत असतं बोलायचं. त्यांनाच शेकडो मेसेज पाठवावे लागतात. शिवाय त्यांनाच व्यवहार करतांना नेटही जास्तच लागतं. सामान्य माणसांचं काय? ते दिवसातून दोन तीन कॉल मारतात, तेही दोन चार मिनीटांचे आणि दररोज दररोज बोलणार किती ते.
मोबाईल रिचार्जबद्दल सांगायचं झाल्यास एअरटेल या कंपनीचा टाकटाईम रिचार्ज एकशे पंचावन पासून सुरु आहे. कमीतकमी रक्कम एकशे पंचावन्न. मी मोबाईलमध्ये एका मोबाईलनं शंभर रुपयाचा रिचार्ज केला. त्यानंतर फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु फोनवर ऐकायला येत होतं की रिचार्ज करा. त्यानंतर दहा रुपयाचा रिचार्ज केला. परत तोच मेसेज. मग संभ्रम वाटला व मी दुकानात गेलो. तेव्हा दुकानदारानं सांगीतलं की साहेब, यात एकशे पंचावन्नचा रिचार्ज मारावा लागतो. तरच बोलता येतं. नाहीतर नाही. मग मी विचारलं की ते एकशे दहा रुपये? तू एकशे दहा रुपये गेले काय? त्यावर बाजूलाच उभा असलेला एक व्यक्ती म्हणाला, "साहाब, वो भूल जाव." याचाच अर्थ असा की ज्या काही गोष्टी सामान्यांना माहीत नसतात. त्याची गत अशी होते. एकशे दहा रुपये गेल्यासारखी. आता यात एक गोष्ट महत्वाची की मोबाईल मध्ये रिचार्ज म्हणून टाकलेले एकशे दहा रुपये जातात. ते परत येत नाहीत. यावरुन आजच्या मोबाईल कंपन्यांना गरीबांचे पैसा झाडावरच लागल्यासारखे वाटतात असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. यावरुन जी गत माझी झाली. तीच गत इतर बर्‍याच जणांची होत नसेल कशावरून? मग खरंच मोबाईल कंपन्या फायद्यात आहेत की तोट्यात? यांचा अंदाज येतो.
मोबाईल ही चैनेची वस्तू आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. मोबाईल, टिव्ही यांचे रिचार्ज वाढवायलाच हवेत. परंतु ज्या वस्तू सर्वसामान्यांच्या उपयोगाच्या आहेत. त्या वस्तूंचे दर वाढवू नयेत. जसे तेल, साखर आणि स्वयंपाकाचा गॅस.
बऱ्याचशा कुटूंबात जेवन बनवायला लागणारा सिलेंडर घरी येतच नाही भरुन. त्याचं कारण आहे पैसे नसणं. सिलेंडरची किंमतच एवढी वाढलेली आहे की तेवढे पैसे नसतातच परीवारांकडे. शिवाय ती एक नाजूक गरज आहे. तो नसेल तर सारंच अडतं. कधी प्रसंगी व्यक्ती तरण पुरण खाण्याऐवजी एखाद्यावेळेस चटणीच बनवून खावून वेळ मारुन नेतात. परंतु सिलेंडर जर नसेल, तर वेळेवर चूल फुंकणं आलं व चुलीवर स्वयंपाक करणं आलंच. त्यासाठी लाकडं चोरणं आलंच. शिवाय चुलीवर स्वयंपाक करुन डोळ्यात धुवा जात असल्यानं डोळे चोळणं आलंच. त्यातच डोळ्याचे आजार आलेच. कधीकधी घरी येणारा बहुतांश महिलेचा पती दिवसभराच्या कामाच्या थकव्यानं थोडीशी दारु पिवून व चकना खावून येतो. त्याला वेळप्रसंगी सायंकाळचं जेवन लागत नाही व दारुच्या नशेत त्याला परीवाराचीही चिंता वाटत नाही. परंतु जी घरातील गृहिणी असते, तिला स्वतःच्या व लेकरांच्या पोटाची चिंता असते.
वस्तू स्वस्त व्हाव्यात. सर्वच वस्तू स्वस्त व्हाव्यात असं मी तरी म्हणणार नाही. परंतु ज्या वस्तूंची सर्वसामान्य लोकांना गरज असते नव्हे तर गरज पडते. त्या वस्तू स्वस्त व्हाव्यात. ज्यात स्वयंपाकघरातील सर्व पदार्थ. जसे, तेल, तिखट, मसाल्याचे पदार्थ, सिलेंडर, गहू, तांदूळ, डाळी व भाजीपाला इत्यादी. व्यवहारीक पदार्थ. ज्यात औषधी, जी लहान बाळ व गरीबांच्याही रोगांवर कामात येते. डिझेल, ज्यानं प्रवास करता येतो. शिक्षण, ज्यातून मुलांचं भविष्य उज्ज्वल बनवता येतं. शिक्षणासाठी लागणाऱ्या इतर सर्वच वस्तू, जसे, वह्या, पुस्तके, पेन्सिल, पेन, खोडरबर इत्यादी. शिवाय आजची निकड असलेला मोबाईल रिचार्ज व मोबाईल. तोही स्वस्त करायला हवा. हं, वस्तू जर महाग करायच्या असतील तर त्या वस्तू महाग कराव्यात. ज्यात विदेशी दारु, विमान प्रवास, महागडे कपडे, खेळण्याच्या वस्तू, टिव्हीचे रिचार्ज, कॉम्प्युटर, सिगारेट वा नशेच्या सर्वच वस्तू, पेट्रोल, गाड्या, चारचाकी, दोनचाकी, बांधकामासाठी लागणारे सर्वच साहित्य. शिवाय धनीक वापरतात व सर्वसामान्य लोकं ज्या वस्तू वापरत नाहीत. त्या त्या सर्वच वस्तू सरकारनं महाग करायला हव्यात. परंतु सरकार यापैकी ज्या आवश्यक वस्तू आहेत. ज्याची गरज सर्वसामान्य लोकांना भासते. त्या वस्तू कधीकधी महाग करीत असते व ज्यांची गरज गर्भश्रीमंतांना असते. त्या वस्तू कधीकधी स्वस्त करीत असते.
आज सिलेंडरचे भाव गगणाला पोहोचले आहेत. पेट्रोल, डिझेल वाढलेलं आहे. ज्यातून वहन खर्च वाढतो व सर्वच वस्तू महाग होत असतात. परंतु विचार हा करायला हवा की गरीब जगेल तरच देश जगेल. देशात केवळ धनीकच राहून चालणार नाही तर देशाला गरीब लोकांचीही गरज आहे. गरीब लोकं देशात नसतील तर उद्योगधंद्याच्या ठिकाणी काम कोण करणार? गरीब लोकं नसतील तर श्रीमंतांची घरं कोण बांधणार आणि गरीब लोकं जर देशात नसतील तर शेती कोण पिकविणार व शेतातील कामं कोण करणार? हा प्रश्न आहे. म्हणूनच गरीब जगायला हवा आणि त्यासाठी गरीबांच्या जगण्यासाठी आवश्यक असणारी संसाधने तुर्तास तरी स्वस्त होणे तेवढेच गरजेचे आहे. जरी बाकीच्या चैनीच्या वस्तू महाग झाल्या तरी........
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०