पृथ्वी सुखी करुया. तापमान घटवूया Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पृथ्वी सुखी करुया. तापमान घटवूया

पृथ्वीला सुखी करुया? तापमान घटवूया

पैसे हे जीवन आहे असं सर्वजण म्हणतात तसंच पैसे वाचवा असंही सर्वजण म्हणतात. कारण पैसा नसेल तर कोणतीही कामं होत नाही.
पैशाच्या बद्दल सांगायचं झाल्यास पैसा माणसानं कमवावा. तो तेवढाच कमवावा की जेवढा आपल्याला आवश्यक असतो. कारण कोणाजवळ कितीही पैसा असला तरी कोणताही व्यक्ती तो पैसा मृत्यूनंतर आपल्यासोबत नेत नाही. तसंच पर्यावरणाचंही आहे.
पाणी हे जीवन आहे असे सर्वजण म्हणतात. तसंच पाणी वाचवा असं सर्वजण म्हणतात आणि तसं म्हणावंच लागतं. पाणीच नाही तर पर्यावरणाचंही संरक्षण करायलाच हवं. पर्यावरणात वनस्पती, प्राणी, माणसं, नैसर्गिक संसाधनं, खनिज संपत्ती, लहानमोठे जीवजंतू, अंतराळ आणि इतर सर्व गोष्टींचा समावेश होत असतो. या सर्वांचं संरक्षण व्हायलाच हवं. त्याचं जर आज संरक्षण झालं नाही तर कालांतरानं त्या सर्वच वस्तू संपतील. त्याचबरोबर आपणही संपू हे तेवढंच खरं आहे.
पर्यावरणाच्या संरक्षणात मुख्य गोष्ट येते ती पाणी. पाणी वाचवायलाच हवं. कारण पाणी जर नसेल तर कोणताच जीवजंतू जीवंत राहू शकणार नाही एवढं पाण्याचं महत्व निर्माण झालं आहे. आज पाण्याची गरज आहे. परंतु अलिकडील काळात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे नव्हे तर होत आहे. याला जबाबदार आहोत आपणच.
जुनी मंडळी म्हणत नसत की झाडं लावा आणि ते झाडंही लावत नसत. तरीही पर्यावरण संतुलीत राहायचं. त्याचं कारण होतं लोकसंख्या. त्या काळात लोकसंख्या कमी होती.
लोकसंख्या कमी? आता यावर लोकं म्हणतील की लोकसंख्या त्या काळात कमी कशी राहील! एका एका परीवाराला दहाच्या वर लेकरं राहायची. मग त्या काळातील लोकसंख्या कमी कशी राहणार? तसं पाहिल्यास तेही म्हणणं खरं. एका एका व्यक्तीला त्या काळात दहा दहाच मुलं असायची. मग तरीही लोकसंख्या कमी असायची. त्याचं कारण होतं साथीचे रोग. गावागावात एखाद्या रोगाची साथ यायची व त्या साथीत गावचे गावं ओस पडायचे. एवढे लोकं मरण पावायचे की पुर्णतः गावच संपून जात असे. मग लोकसंख्या कमी व्हायची. असे ओस पडलेले गावं देशादेशात भरपूर आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास दुर्गाबाईचा रिठ किंवा इतर अनेक गावातील काही जागांना रिठ हा शब्द आलेला आहे. त्यातून लोकसंख्या कमी झालेली दिसून येते.
लोकसंख्या अशा आजारानंतर कमी होत असे. कारण त्यावर कोणतीच उपाययोजना नव्हती व आताच्या काळात जी रुग्णालये उघडली आहेत. ती रुग्णालये नव्हती आणि रोगांवर वा रोग्यांवर जसा उपचार अलिकडील काळात करता येतो. तसा करता येत नसे. म्हणूनच लोकसंख्या सिमीत असायची. म्हणूनच पर्यावरण संतुलनाचा प्रश्न नसायचा.
आज मात्र पर्यावरण संतुलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जरी लोकसंख्या सिमीत असली तरी. कारण आरोग्यमान व आयुष्यमान वाढलेले आहे. आज माणसं आजारी जरी पडली असली तरी त्या आजारावर मात करण्यासाठी रुग्णालये आहेत व या रुग्णालयात अनेक घनिष्ठ व गंभीर आजारावरही मात करता येते. म्हणूनच लोकसंख्या उपज जरी कमी असली तरी लोकसंख्या वाढली. कारण मृत्यूदर घटला आहे.
आज मृत्यूदर घटला आहे. कारण आरोग्यासाठी असलेल्या सुविधा. त्या सुविधेनुसार मृत्युदर कमी झाला आहे. परंतु ते जरी खरं असलं तरी आजच्या काळात लोकांचं आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचं कारण म्हणजे लाकुडकटाई आणि शहरीकरण. निव्वळ शहरीकरणच नाही तर शहरात जे सिमेंटीकरण करण्यात आलं. त्यानं तापमान वाढ झाली आहे. शिवाय वाढत्या तापमानानं ऋतू बदलले आहेत. पाण्याची पातळी कमी झाली आहे. एकंदरीत सांगायचं झाल्यास आजच्या काळात कोणता हिवाळा, कोणता उन्हाळा व कोणता पावसाळा हे ओळखायलाच येत नाही. दरदिवशी हे तीनही ऋतू सुरु असतात. महत्वपुर्ण बाब ही की आता आपली वाढती लोकसंख्या आता कुटूंब नियोजनानं मर्यादीत स्वरुपाची जरी असली तरी आपण जंगलकटाई केल्यानं, सिमेंटचे शहरात रस्ते बांधकाम केल्यानं, अवाढव्य कारखाने उभारल्यानं, वातावरणात कारखान्यातील सांडपाणी व धूर मिसळत असल्यानं, याचाच अर्थ निसर्गाला छेडल्यामुळं निसर्गाचा समतोल ढासळला व त्याची परीयंती ऋतूमानाच्या बदलात झाली. त्यामुळंच तापमान वाढले. ऋतू बदलले व संपुर्ण मानवजात नष्ट होण्याच्या कगारवर आहे.
आज आपण चंद्रावर तर पोहोचलो. सुर्यावरही जात आहोत. परंतु पृथ्वी आपली सुखी नाही आणि त्या पृथ्वीवर राहणारे आपण जीवही सुखी नाही. याचं एकमेव कारण आहे आपलं वागणं. जोपर्यंत आपण आपलं वागणं सुधरविणार नाही. तोपर्यंत पृथ्वी सुखी होणार नाही. म्हणूनच आधी आपण आपलं वागणं सुधारावं. एकतरी झाड लावावं. मगच देशाचा विकास करावा. सिमेंट रस्ते बांधावे. परंतु जमीनीतही पाणी मुरायला जागा ठेवावी. हवेत कारखान्यातील धूर अवश्य मिसळवावा. परंतु मधामधात वातावरण शुद्ध करणारी पावडर धुरळावी. सांडपाणी जमीनीवर अवश्य पसरु द्यावे. परंतु ते सांडपाणी जिथं उपजाऊ जमीन आहे, तिथं पसरु देवू नये. ज्यातून पर्यावरण समतोलता राखता येईल व आपण सुखी होवू. त्याचबरोबर आपली पृथ्वीही सुखी होईल. त्याचबरोबर पृथ्वीवर राहणारे संपुर्ण जीव सुखी होतील यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०