नातं विश्वासाचं असावं Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नातं विश्वासाचं असावं

नातं विश्वासाचं असावं?

विश्वास ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. विश्वास जर नसेल तर मोठमोठे अपराध घडून येतात. म्हणूनच विश्वास हवा. विश्वासाचं एक उदाहरण देतो. कथा फेसबुकवरील आहे. उदाहरण पती पत्नीचं आहे. एका घरी त्याची पत्नी कामावर गेली की एक स्री त्याच्या घरी येत असे. त्याचं कारण होतं त्याचं आजारीपण. तो आजार फक्त त्याच व्यक्तीला माहीत होता. शिवाय ती त्याला काही औषधी देवून लवकरच निघून जात असे. तसं पाहिल्यास तिचं त्याचेसोबत लपडं गिफडं असं काहीच नव्हतं.
तिला गंभीर आजार माहीत होता व ती त्याची फारच काळजी घेत असे एक डॉक्टर म्हणून. ती डॉक्टर नमस्कार तो पेशंट एवढंच त्यांचं नातं होतं. तसाच तोही तो आजार आपल्या पत्नीला सांगू शकत नव्हता. कारण त्याला भीती वाटत होती की जर त्यानं तो आजार आपल्या पत्नीला सांगीतला तर तो ती त्याला चक्कं सोडून देईल. मात्र हे किती दिवस लपणार.
ती त्याची पत्नी गेल्यावर रोजच त्याचे घरी येते हे वस्तीतील आजुबाजूच्या लोकांना माहीत होतं. परंतु ती नेमकी त्याच्या घरी का येते. हे मात्र लोकांना माहीत नव्हतं. शेवटी त्याच लोकांनी तिला त्या गोष्टीची माहीती हवी म्हणून तिला सांगीतलं व ते माहीत होताच तिनं त्यावर पाळत ठेवली व तिला आपल्या गेल्यानंतर कोणीतरी महिला आपल्या पश्चात या घरी येते. असा संशयच नाही तर ती वास्तविकता वाटली. तिनं त्या प्रकरणाची शहानिशा न करता मनातल्या मनात संशय बांधला आणि ठरवलं, आपण अशा लबाड माणसाजवळ राहायचं नाही. मग तीच त्याला सोडून गेली व तिनं,त्याला लागलीच घटस्फोटाची नोटीस पाठवली शिवाय खावटीही व ती केसही जिंकली. तिला खावटी मंजूर झाली. तसा तो त्याच्या जीवनातील शेवटचाच दिवस होता. तो काही जास्त जगणार नव्हता.
त्याची पत्नी जशी केस जिंकली आणि त्याचेजवळ आली. तसा तिनं एक कागद त्याचेसमोर केला आणि म्हणाली,
"तू व्याभीचारी निघाला नसतास, तर मी तुझ्यावर केसही टाकली नसती आणि खावटीही मागीतली नसती."
ते तिचं बोलणं. त्यावर विचार न करता व न बोलता तो चूप बसला. तशी तीच म्हणाली,
"आता बोल ना. आता का बोबडी वळली. आता बोल ना, देणार की नाही खावटी?"
ते तिचे शब्द. ते तिचे शब्द ऐकताच त्यानं एक फोन लावला. त्या एका फोनवर वकील व डॉक्टर सोबतच आले व वकीलानं एका कागदावर त्याची स्वाक्षरी घेतली. ज्यात लिहिलं होतं की मी काही जास्त दिवसाचा पाहूणा नसल्यानं ही संपूर्ण मालमत्ता आजपासून तुझीच असून या संपूर्ण मालमत्तेचा यथायोग्य वापर कर. त्यानंतर त्यानं वकीलाकरवी स्वतःचा स्वाक्षरी केलेला कागद तिच्याजवळ दिला व सोबत चाबीही. त्यानंतर तिनं कागद वाचला. त्या कागदावर लिहिलेला मजकूर वाचला आणि विचारलं की आपण खरोखरच आजारी आहात का? त्यावर तो म्हणाला,
"मी मी खरोखरच आजारी आहे व मी दोन चार दिवसानं मरणारच आहे. मग ही मालमत्ता मी माझ्या नावावर ठेवून काय करु? ही मालमत्ता तुझीच आहे व तू या मालमत्तेचा योग्य सांभाळ कर."
"मग ती कोण? जी दररोज आपल्या घरी येत होती."
"ती डॉक्टर आहे. ती रोज मलाच तपासायला येत होती."
"मग ती लपूनछपून का येत होती तुम्हाला तपासायला?"
"मीच सांगीतलं होतं तिला की ही गोष्ट तुला माहीत होवू नये म्हणून."
"का? काय ती गोष्ट मला माहीत केली नाही?"
"मला वाटत होतं की तू मला सोडून जाशील हा आजार माहीत झाल्यावर आणि शेवटी तू सोडून गेलीसच. आता हे सारं तुझंच आहे. मी फक्त दोन चार दिवसाचाच सोबती आहे."
ती घटना....... ती घटना ह्रृदयाला स्पर्श करणारी आहे. अविश्वासाचं मुर्तीमंत उदाहरण आहे. कधीकधी आपण जे डोळ्यानं पाहतोय ना. तेही वास्तविकपणे खरं नसतंच. शिवाजी महाराजांवर संबंध मावळ्यांचा विश्वास होता व मावळ्यांचा शिवरायांवर. काही लोकं म्हणतात की त्यात विश्वास कसा काय? परंतु त्यात विश्वास नाही तर काय. अहो, शिवा काशिदनं अगदी विश्वास ठेवून शिवराय बनायचं ठरवलं व तो बलिदानास तयार झाला. अहो, मदारी मेहतरनं विश्वास करुन आग्र्यातून महाराजांचे पलायन केले. या दोन्ही घटनेत समजा मदारी मेहतरनं शिवरायांसोबत दगाबाजी केली असती तर चित्र काहीसं वेगळं असतं. बादशाहानं शिवाजीला पुन्हा पकडलं असतं व शिवरायांची दगाबाजी केली म्हणून संभाजीसारखी मानच कापून टाकली असती आणि मदारी मेहतरला दरबारात मानाची जागा दिली असती. बादशाहात ती ताकद होती की त्या बादशाहानं गुरु गोविंद सिंहाचे वडील गुरु तेगबहाद्दूर सिंह यांचीही हत्या केली होती. परंतु बादशाहा समजून होता की जर शिवाजी महाराजांची हत्या त्यानं केली तर अख्खा मुस्लीम समाज चिडेल व तो औरंगजेब बादशाहाचं शासनच उलथून टाकेल. म्हणूनच पन्हाळा असो की आग्रा, शिवाजी महाराज कैदेत सापडूनही त्यांची हत्या त्याला करता आली नाही. याला विश्वासच म्हणता येईल मदारी मेहतर आणि शिवा काशिदचा आणि त्याचबरोबर विश्वास होता शिवरायांचा मुस्लीम समाजावर. म्हणूनच संपुर्ण आरमारांचा प्रमुख दौलतखानाला बनवलं व संपुर्ण तोफखान्याचा प्रमुख इब्राहीम खानाला बनवलं आणि आपले काही अंगरक्षकही मुस्लीमच बनवले होते.
विश्वास....... विश्वास फार मोठी गोष्ट असते. याच विश्वासासाठी स्वतःचा हातही तोडला होता जीवा महालानं आणि याच विश्वासातून पावनखिंडही लढवली होती बाजीप्रभूंनी. एवढंच नाही तर रायबाचा विवाह मागे टाकून कोंढाणा सर करायला गेला होता तानाजी आणि स्वतःच्या जीवावर मरण ओढवून घेतलं.
विश्वासाबाबत कितीतरी उदाहरणं देता येतील. विश्वास आहे म्हणूनच जग टिकून आहे. नाहीतर देशातील लोकांची केव्हाचीच खांडोळी झाली असती. कारण जिथं विश्वास तुटतो. तिथं भांडणं व वाद उत्पन्न होत असतात. म्हणूनच सर्वांनी विश्वास करायला शिकावं. विश्वासघात करु नये. कारण विश्वासातून पवित्र नातं निर्माण होवू शकतं. माणसं जोडता येवू शकतात आणि विश्वासघातातून. विश्वासघातातून नाती तुटतात. माणसं दुरावली जातात आणि जे न व्हायचं ते होतं. जीवनाचा सत्यानाश होतो आणि तेवढाच संसाराचा बट्ट्याबोळही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०