झाडं लावण्यासाठी सरकारनंच पुढाकार घ्यावा?
*आज उष्णतामान फारच वाढलं आहे. सकाळी उठलं की या उष्णतेनं झोप न लागत असल्यानं सतत मळमळ व उलटीसारखं वाटायला लागतं. त्यातच रात्रभर कुलर जरी आपण लावून झोपलो, तरी पुरेशी झोप होत नाही. त्याला कारण आहे आजची परिस्थिती. आज परीसरात झाडं नसल्यानं ही स्थिती आहे व ही स्थिती आजच एवढी भयावह आहे आणि संकेत देत आहे की जर अशीच परिस्थिती नेहमीसाठी सुरु राहिली की उद्या तो दिवस दूर नाही की हीच परिस्थिती सर्वांना जाळत सुटेल.*
काल रस्ते होते व रस्त्याच्या दोन्ही बाजूला डेरेदार झाडं होती. तसेच ते रस्ते डांबराचे असून ते जास्त गरम होत नसत. आज मात्र त्या डांबरी रस्त्याच्या जागेवर सिमेंटचे रस्ते आले व ह्या सिमेंटच्या रस्त्यानं तापमान वाढवलं. तापमान एवढं वाढवलं की त्या तापमानानं लोकांचा जीव धोक्यात आला.
आज उष्णतामान वाढलं आहे. याला कारणीभूत आहे मोठमोठ्या सडका बनवणे व त्यासाठी उभी असलेली झाडंची झाडं तोडणं. अशी झाडं तोडली गेली व सिमेंटचे रस्ते बांधकाम केले गेले. मात्र काल रस्त्याच्या दोन्ही कडेला असणारी झाडं तोडली परंतु आज सिमेंट रस्त्याचं बांधकाम पुर्ण झालं तरी काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला आजही झाडं लावली गेली नाहीत. याला जबाबदार कोण? याला साहजीकच प्रशासन जबाबदार आहे. व्यतिरीक्त सर्व लोकं म्हणतात व झाडं नसल्याचा दुष्परिणाम सांगतात. परंतु स्वतः झाडं लावत नाहीत व झाडं लावण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. ते फक्त बोलतात. कृती मात्र शुन्य असते.
काल अंगणात झाडं होती. कुलर वा एसी बहुतांश नव्हताच. तो अतिशय श्रीमंत माणसांकडे असेलही कदाचीत. परंतु गरीबांकडे तो अजीबात नव्हताच. त्यावेळेस घरातील सर्व मंडळी अंगणात असलेल्या झाडाखाली पलंग टाकत असत व रात्रीची निवांत झोपही घेत असत. आज मात्र तसं नाही. आज लोकांचं उन्हाळ्यातील आयुष्य कुलर आणि एसीमध्येच जात असतं. लोकांना आज अजीबात उष्णतामानाचे चटके सहन करायला वेळ नाही. समजा कुलर नसेल तर पंख्याच्या हवेची तरी मजा घेतात आजचे लोक. परंतु झाडाखाली झोपत नाहीत. कारण झाडंच नाहीत.
काल झाडाबाबत बरेच समज गैरसमज होते. जसं चिंचेच्या झाडाखाली झोपू नये. लावडीन येते. चिंचेच्या झाडाखाली झोपू नये. चिंचेचं झाड कार्बन डायऑक्साईड वायू सोडतो. जो वायू श्वसनाला मदत करीत नाही तर माणसाला मारतो. परंतु आज ते चिंचेचं झाडंही दिसत नाही. अशी चिंचेची झाडं गावांमध्ये चौकाचौकात दिसायची. आज ती तोडली असल्यानं अजीबात दिसत नाहीत. मग झाडंच नाहीत तर ऑक्सिजन येणार कुठून? मग माणसाला गुदमरल्यासारखं नाही लागणार तर कसं लागेल. महत्वपुर्ण बाब ही की आज तापमान वाढलं आहे असे सारेच जण म्हणतात. परंतु त्या वाढत्या तापमानावर कोणीच उपाययोजना करायला तयार नाहीत. झाडं लावावीत ही ओरड आजची नाही. त्याला कमीतकमी वीस पंचवीस वर्षाचा काळ झाला. परंतु कोणीच झाडं लावली नाहीत वा लावण्याचा प्रयत्न दाखवला नाही. हं, रस्ते रुंदीकरणासाठी झाडं मात्र तोडण्याचा नक्कीच प्रयत्न केला. सर्वत्र उदासीनता. याबाबत खरं सांगायचं झाल्यास आजच्या काळात आळसच भरला आहे लोकांत, असंच जाणवतं. काल घराघरामधील खिडक्या व दरवाजेही उघडे राहायचे. आज त्याला उघडं ठेवायला जागा नाही. फ्लॅटच्या जिंदगीत तर दरवाजे बंदच असतात. बेल वाजवूनही उघडली जात नाहीत दारं. मग कुठून मिळणार मोकळी हवा? म्हणूनच श्वास गुदमरतो आहे. अलिकडे तर खिडक्याही बंद असतात.
विशेष बाब ही की आज तापमान वाढले आहे, वाढते आहे. यावर एकमात्र उपाय म्हणजे झाडं लावणे व त्यांचं संगोपन करणे. आज जर झाडं लावली तर त्याची फळं उद्या नक्कीच मिळणार. शिवाय झाडं लावा असं सगळेजण म्हणतात. परंतु झाडं कोणीच लावत नाहीत. तेव्हा हा उपक्रम सरकारनं राबवावा. सरकार जर हा उपक्रम राबवेल, तर नक्कीच झाडं लावली जातील. जी तापमान वाढीला मर्यादा घालतील.
*झाडं कुठं लावावीत?*
झाडं ही ओसाड माळरानावर, रस्त्याच्या दोन्ही कडेला, आपल्या प्रत्येकाच्या घरी, शाळेत, ग्रामपंचायत मध्ये, स्थानीय, सरकारी, खाजगी अशा प्रत्येक इमारतीत तसेच जी जी मोकळी जागा असेल, त्या प्रत्येक ठिकाणी झाडं लावावीत. जेणेकरुन तापमान कमी करता येईल.
*झाडं कोणं कोणं लावावीत?*
झाडं लावण्याचा जो उपक्रम आहे. तो सर्वांनीच राबवावा. सर्वांनीच जिथं जागा मिळेल, तिथं झाडं लावण्याचा प्रयत्न करावा. झाडं असतील तर आपण सुखी होवू, हा एकच मुलमंत्र डोक्यात ठेवावा. बाकी सर्व विसरुन जावं. झाडं लावणं याला एक उपक्रमच समजावे व तो उपक्रम आपण जसे राबवणार. तसाच तो उपक्रम सरकारनंही राबवावा. याला प्रश्नाचे स्वरुप देवू नये. कारण जसे, इतर कोणी झाडं लावा म्हटलं तरी झाडं कोणीच लावत नाहीत. त्यासाठी झाडं लोकांनी लावली पाहिजेत म्हणून सरकारनं योजना देतांना ज्यानं झाड लावलं त्यालाच योजनांचा लाभ द्यावा. इतरांना नको. शिवाय जे झाड लावलं. त्या झाडावर आपल्या नावाची पाटी असावी असं बंधन घालावं. सेल्फी काढता आला तर काढायला लावावा. तो व्हायरल करायला लावावा. जो इतरांना प्रेरणा देईल. झाडं जगली पाहिजे म्हणून शासनाने सर्वांनाच कठडे पुरवावे. शिवाय झाडं ही प्रत्येक घरी एक याप्रमाणे रचना असावी. ज्यात नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिका, स्थानीय वसाहत, काही समाजसेवक, पोलीस प्रशासन या सर्वांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन झाडं अति प्रमाणात लावली जातील व तापमान वाढीला मदत होईल.
महत्वाचं सांगायचं झाल्यास तापमान वाढ हा भष्मासूरच आहे. याचे परीणामही दूरगामी होत आहेत. ते आपणाला पाहायला मिळत आहेत. तसाच जेव्हा जेव्हा उन्हाळा येतो आणि तापमान वाढ दिसते. तेव्हा तेव्हा आपणाला तापमान वाढीवर उपाय म्हणून झाडं लावण्याचा विचार करतो माकडाच्या कथेसारखा आणि उन्हाळा संपलाच तर आपली आठवण विसरुन जाते. मग वर्षभर उन्हाळा येईपर्यंत आपल्याला झाडं लावण्याची आठवणही येत नाही. जसं एक माकड पावसाळा लागताच ओला होतो व त्याला वाटते की आपण पावसापासून संरक्षण करण्यासाठी एक घर बांधायला हवं. परंतु जसा पावसाळा संपतो. तशी त्याची आठवण संपते. ती पुढील पावसाळा येईपर्यंत. आपलीही झाडं लावल्याबद्दल हीच गत आहे. उन्हाळा आला की झाडं लावण्याची आठवण येते आणि उन्हाळा गेला की ती आठवण संपून जाते. कारण आपणही माकडाचेच वंशज आहोत. म्हणूनच हे चालणारच. परंतु हे जरी खरं असलं तरी आज गरज आहे झाडं लावण्याची. माकडाचं ठीक आहे की त्याचं भागून जातं व तो एक प्राणी असल्यानं त्याला ते कळत नाही. परंतु आपण माणूस आहोत व आपल्याला जाणीव आहे. आपण झाडं लावू शकतो. तसंच ती झाडं लावून आपण आपलंच नाही तर कित्येक प्राण्यांचंही संरक्षण करु शकतो हे तेवढंच खरं आहे. म्हणूनच कोणी सांगायची वाट पाहण्याऐवजी आपण स्वतःच पुढाकार घेवून झाडं लावलेली बरी हे तेवढंच खरं आहे. कारण झाडंच आपल्याला मारणार आहेत आणि तीच आपल्याला तारणारही आहेत.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०