कालासगिरीची रहस्यकथा - 7 Sanket Gawande द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कालासगिरीची रहस्यकथा - 7

अध्याय 16

 

सात वाजता ते सगडे गावात पोहोचलेत. संपूर्ण रस्त्यात मुल सगडे तोच विचार करत होती , मीरा विचारात होती कि पंडितजी नि तिला आणि तिचा बाबांना ओडकत होते का ? ते विचार करतच वाड्याचा दरवाजा मध्ये प्रवेश केला.

 

सगडे झन  आदीच ओसरीवर बसले होते.सगडे मुले तिते त्यांचा जवड गेली .

 

सरपंच म्हणाले या मुलानो प्रवास कसा झाला, दर्शन झालेत का ? 

मीरा म्हणाली आम्ही दर्शन घेतलं काका,  सूर्यास्त सुद्धा बगीतला आणि तिते आम्हाला पंडितजी सुद्धा भेटलेत, त्यांचाशी बोलन सुद्धा झाला.

 

सुप्रिया म्हणाली मंदिर आणि तो परीसर फार सुंदर आहे बाबा  तीतून गाव  तर अजूनच सुंदर दिसतोय आपण सागडे जाऊयात तिते परत.

 

सायली ने पुढे होऊन महेश , डॉ. यश, डॉ. संकेत, आणि श्यामच्या हातावर धागा बांधल्या,  हे सांगून की पंडितजींनी ती काढू नका असे सांगितले आहे.सगळ्यांना हे संशयास्पद वाटले.

 

सायलीने तिच्या वडिलांना म्हणाली, "पंडितजींनी चेतावणी दिली आहे बाबा कि तुमचा पैकीकुणीच हा धागा काढू नका हातातून."

 

सरपंच चिंतेत म्हणाले, "भगवान नरसिंह आपल्या सगळ्यांचे रक्षण करो."

 

डॉ. यश आणि डॉ. संकेत यांना हे विचित्र वाटले.

श्याम म्हणाला, "सर, कृपया, ही विनंती आहे. तो धागा कधीच काढू नका."

 

मीरा आणि सुप्रिया यांनी त्यांचे वडिलांना वचन द्यायला सांगितले की ते तो धागा काढणार नाहीत. त्यांनी ते हसत हसत मान्य केले.

  

मीराने चिंच संकेत आणि यशला दिली आणि म्हणाली, "पंडितजींनी सांगितलंय तुम्हाला द्यायला."?

 

यश म्हणाला, "पण आम्ही दोघंही चिंच खात नाही मीरा."

संकेत म्हणाला, "हो खरंच, आम्हाला लहानपणी खूप आवडायचं, पण एका घटनेनंतर आम्ही कधीच चिंच खात नाही आम्ही खानच सोडलं ते."

 

मीराने आग्रह केला, "ते म्हणाले मला तुम्हाला द्यायला, का ते माहिती नाही ?" आणि ती स्वयंपाकघराकडे निघाली.

 

जातानी मीरा म्हणाली, "बाबा, पंडितजी म्हणाले तुमच्या बाबांना लहानपणी चिंच आवडायची म्हणून. तो चिंचेचा झाड आठवलं का म्हणून?" "कुठलं झाड आहे ते बाबा?"

डॉ. संकेत म्हणाले, "काय ? मला माहित नाही तू  कुठल्या झाडा बद्धल बोलतो आहे ते मीरा ?"

  

मीरा विचार करतच घरात गेली मदत करायला आईला.

 

डॉ. यश आणि डॉ. संकेत थोडा वेळ बाजूला बसले. डॉ. संकेत म्हणाले, "तुला काहीतरी विचित्र वाटते का?"

डॉ. यश म्हणाले, "हो,”  मला तेच वाटले. गावात येण्यापासूनच, मग महेशने त्या घराबद्दल सांगितले. मग त्या नंतर वातावरण बदलले, मुलं सुद्धा विचित्र वागत आहेत, आणि आता त्यांनी आपल्याला हा धागा काढू नका असे वचन दिल. हे सगळं त्या घराशी संबंधित आहे का रे ?"

 

डॉ. संकेतने मान हलवली. "कदाचित असू शकते किंवा कदाचित नाही पण."

डॉ. यश म्हणाले "पण त्या घरात काहीतरी विचित्र आहे. श्यामही त्या दिवशी विचित्र वागला. लक्षात आहे का?"

डॉ. संकेत म्हणाले "हो, त्याला उद्या विचारूया. “

आणि तस पण मी मीराला ओळखतो यश; ती उत्सुक आहे आणि ती नक्की काहीतरी करेल ज्याची आपल्याला कल्पना नाही आणि तिच्या मदतीसाठी जयेश आणि सुप्रिया तिच्यासोबत असतील आणि आता तर सायली सुद्धा मिडाली त्यांना.”

 

डॉ. यश म्हणाले ,”आपल्याला काय चालले आहे ते शोधावे लागेल.”

 

संकेत आणि यश दोघे ही झन चिंचा कडे बघु लागले ?

 

सरपंच म्हणाले, "कदाचित हे पंडितजींनी खास दिलेलं प्रसाद असेल तुम्हाला ."

 

यश हसला आणि म्हणाला, "कदाचित असेल काय माहिती ."

आणि त्या दोघांनी पण पहिल्या चाव्याबरोबरच दोघंही चिंच चवीला ओळखू लागले आणि त्यांचा डोक्यात त्याच वेळी एक नाव आठवले, " गोपाल ?" दोघेही धक्क्यात पडले आणि एकमेकांकडे पाहू लागले.

 

 

======================पुढील भागात============================