कालासगिरीची रहस्यकथा - 8 Sanket Gawande द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कालासगिरीची रहस्यकथा - 8

अध्याय 17

      यश आणि संकेत ला त्यांचा लहान पणीचा मित्र गोपाल आठवला जो त्यांच्या गावात त्यांच्या सोबत राहत होता. तो एक अनाथ मुलगा होता जो कुठूनतरी बाहेरून आला होता. तो मंदिरात पंडितजींसोबत राहत होता आणि तेथे काम करत होता. तो आध्यात्मिक गोष्टी शिकत होता.

 

संकेत, यश आणि गोपाल हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. एकदा ते यशच्या मामाच्या गावाला काही दिवसांसाठी गेले होते. त्यांना माहिती पडल की तेथे तलावाजवळ काही लोक कॅम्पिंग करत आहेत. त्यांनीही कॅम्पिंगला जायचं ठरवलं.

 

संकेत, यश, गोपाल आणि यशचा चुलत भाऊ असे सर्वजण तिथे गेले. सर्वांनी कॅम्पिंगसाठी सर्व तयारी केली. रात्री सर्व गप्पा मारत बसले होते.

 

यशचा चुलत भाऊ म्हणाला, "तुम्ही ती झाड पाहिली का? ती चिंचाची झाड आहे."

 

यश म्हणाला, "हो, तशीच आहे."

 

त्याचा चुलत भाऊ म्हणाला, "लोक म्हणतात  कि ती झाड भूताटकीची आहे, लोक तिथे जायला घाबरतात."

 

गोपाल त्या झाडाकडे पाहत होता आणि त्याने समजून घेतलं की हो, ते भूताटकीचं आहे.

 

संकेत आणि यशने हे मान्य केलं नाही, पण त्यांना माहीत होतं की गोपाल अशा गोष्टींमध्ये जास्त जाणकार आहे. त्यांनी विचारलं, "गोपाल, खरंच ते झाड भूताटकीचं आहे का?" गोपालने मान हलवली आणि म्हणाला, "हो, मला त्या झाडापासून काही वेगडी जाणीव होत आहे ."

 

त्याच दिवशी आणखी एका मुलांच्या गट देखिल तिथे कॅम्पिंग ला आल होतं. ते देखील ही गोष्ट ऐकून होते पण त्यांनी हे खोटं मानलं. त्यांनी पैज लावली की रात्री त्या झाडाला स्पर्श करून चिंच आणणारा खरा शूरवीर ठरेल.

 

तो दिवस अमावस्येचा होता. सगळीकडे काळोख होता. फक्त आकाशात तारे चमकत होते आणि तलावाकडून थंड हवा वाहत होती. रात्री ११:४५ वाजले होते आणि सर्वजण मस्त पेकि जेवण करून अजूनही गप्पा मारत होते. अचानक त्या दुसऱ्या गटातील दोन मुलं उभी राहिली आणि म्हणाली, "आम्ही तिकडे जाऊन काही चिंच आणतो." त्यांच्या दोन मित्रांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नव्हते. ते त्या झाडाच्या दिशेने चालू लागले.

 

यशच्या चुलत भावाने हे पाहिलं आणि यशला सांगितलं, "पहा, त्या मुलांनी त्या झाडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली आहे." गोपाल त्वरित उठला आणि त्या दोन मुलांच्या दिशेने गेला, "अरे थांबा, त्या मुलांना तिकडे जाऊ देऊ नका, ती जागा धोकादायक आहे."

 

पण त्यांनी ऐकून घेतलं नाही. संकेत, यश आणि त्याचा चुलत भाऊही त्यांच्या दिशेने गेले. सगळे ओरडू लागले, "अरे, परत या, तिकडे जाऊ नका!" पण ती मुलं ऐकायला तयार नव्हती.

 

गोपालला तिथे काहीतरी विचित्र घडणार याची जाणीव झाली . अचानक वातावरण बदलू लागलं. प्राण्यांचा ओरडन्याचा आवाज यायला लागल.  कुत्री भीतीने ओरडत होते . गोपालने ताबडतोब त्यांच्या कॅम्पमध्ये जाऊन काहीतरी आणलं. त्याने टॉर्च आणि केसरी धागा घेतला. संकेतने गोपालच्या हातात रुद्राक्ष पाहिलं. त्याने यश आणि संकेतलाही रुद्राक्ष दिलं होतं, त्यांनी ते अजूनही घातलं होतं. गोपाल म्हणाला, "तुमच्याकडे ते आहे ना?" त्यांनी होकार दिला. गोपाल म्हणाला, "ठीक आहे, माझ्या मागे या, पण मी सांगतो तेच करा, नाहीतर खूप धोकादायक होईल."

 

गोपालने त्या दोन मुलांना धागा दिला आणि त्यांना इथेच थांबायला सांगितला यश चा भाऊ सुद्धा तितेच थांबला . त्याच वेडेस तिकडे गेलेल्या त्या दोन मुलांन पैकी एकाने अचानक ओरडायला सुरुवात केली. गोपाल त्यांच्या दिशेने धावत गेला आणि संकेत आणि यश त्याच्या मागे गेले. त्यांनी टॉर्चने दिशा शोधली. त्यांना झाडाच्या जवळ एक व्यक्ती खडकावर बसलेला आणि विचित्र वागताना दिसला. दुसरा मुलगा झाडाकडे पाहून हसत होता. गोपालने झाडा कडे बगत असणार्या  त्या मुलाच्या दिशेने धाव घेतली मागून संकेत आणि यश तिथे आले.

 

तो मुलगा सतत झाडाकडे बघत होता आणि विचित्र आवाजात हसत होता. त्यांची त्वचा पिवळी झाली होती, तोंडातून पांढरी फेस येत होती, डोळे लाल झाले होते. संकेत आणि यशला ते सगड विचित्र वाटत होतं. वातावरण भुताटकीचं वाटत होतं. दोघेही आतून घाबरले होते, पण त्यांना गोपालसोबत असल्यामुळे आत्मविश्वास आणि त्याचा असण्या मुडे धीर आला.

गोपालने संकेतला त्या मुलाच्या हातात धागा बांधायला सांगितलं.

संकेतने ते धागे त्या मुलाच्या हातात बांधायला गेला तो मुलगा संकेत कडे बघून कर्कश आवाजात मानायला लागला “ आलास...... ये ये तुजा जीव घेते आणि हसायला लागला हिहीहीहि....त्यांचा तोंडातून पांढरा फेश निगत होता , ते बघून संकेत तितेच थांबला.

गोपाल जोरात ओरडला त्याला तो धागा लगेच बांद , यश तू त्या मुलाला पकडून ठेव, यश नि मागून त्या मुलाला पकडल तो मुलगा ओरडायला लागला सोड मला मी तुजा जीव घेईल सोड..... संकेत नि घाई घाईने त्या मुलाचा हातावर तो धागा बांधला.....

 

गोपालने त्याच वेडेच फायदा घेत दुसर्या मुलाचा हातावर तो धागा बांधला. त्या मुलांनी विचित्र वागणं बंद केलं.

दोन्ही मुलं जागेवर बेशुद्ध पडली आणि त्यांच्या शरीरातून दोन सावल्या बाहेर पडल्या. त्या सावल्या संकेत आणि यशच्या दिशेने आल्या, पण त्यांना रुद्राक्षांमुळे त्यांना काहीच होऊ शकलं नाही. त्या सावल्या झाडाच्या फांद्यांवर चढल्या. गोपालने संकेत आणि यशला त्या मुलांना घेऊन कॅम्पकडे जायला सांगितला. त्यांनी लगेच तस केल जाताना त्यांनी इतरांना मदतीसाठी हाक मारली.

गोपाल अजूनही झाडाकडे पाहत मंत्र म्हणत होता. बाकी झन लगेच तिते आले त्यांनी त्या मुलांना घेऊन कॅम्प कडे जायला सांगितल आणि हे दोगे परत गोपाल चा दिशेने धावत सुटले, ते झाडा जवड पोचले तर तिते त्यांनी पाहिलं की गोपाल आता तिथे नाही. झाडाच्या फांद्यांवर दोन स्त्रिया बसलेल्या होत्या आणि त्यांनी भयाण आवाजात हसत होत्या हीहीहीही हाहाहाहा....... आणि त्या सतत या दोघान कडे बघत होत्या ....

 

त्या स्त्रियांचे पाय उलटे होते आणि त्यांच्या मोठ्या नखांनी ते झाडाच्या फांद्या कुरतडत होती. त्यांचे काळे केस आणि त्यांच्या मानेवरच्या निशाणांमुळे ते भयानक दिसत होते पिवडे डोळे तोंडातून येणारा तो पांढरा फेश आणि तो सडक्या मासाचा वास पूर्ण वातावरणात पसरला होता. त्यांची हसण्याची आवाज कर्णकर्कश होती. यश ओरडला, "गोपाल, गोपाल!" पण गोपाल तिथे नव्हता. संकेतने झाडाच्या मागे काहीतरी पाहिलं. गोपाल जमिनीवर पडलेला होता. संकेत धावत तिकडे गेला. गोपाल बेशुद्ध पडलेला होता आणि त्याचं शरीर थंड झालं होतं. त्याचा डोक्याला मार लागला होता.

 

फांद्यांवर बसलेल्या त्या चेटकिणी आता जोरात हसत होत्या. संकेत आणि यशने गोपालला उठवायचा प्रयत्न केला. त्यांनी त्याला धरून वर उचललं. गोपाल आता हळूहळू जागा झाला त्यांनी लगेच आपल मंत्र ओचार करायला परत सुरुवात केली आणि मंद आवाजात त्या दोघांना तो धागा झाडाला बांधायला सांगितलं.

वर बसलेला ते भयानक दडपण आता त्यांच्या अंगावर येत होतं. त्या चेटकिणीने यशवर झडप घेतली आणि यश मागे दगडावर जाऊन आपटला त्याचा पायला जोरात मार बसला तर दुसरी ने संकेत कडे झडप घेत त्याला झाडाचा दिशेला ढकल संकेत झाडावर जाऊन जोरात आपटला त्याचा हातातून तो धागा सुटून खाली पडला.

गोपाल एका जागेवर बसून त्यांनी मंत्रांनी एक स्वताभोवती एक गोला तयार केला जे ने करून त्या चेटकिणी त्याला पार करून याचा दिशेला न येवो , गोपाल मंत्र ओपचार करत होता त्या चेटकिणी नि त्याचावर धाव घेतली याच वेडेच फायदा घेत संकेत धाग्याच्या दिशेने धावला. दुसऱ्या चेटकिणी ने ते बगून त्याला परत झाडाच्या दिशेने ढकललं. यशने त्या संधीचा फायदा घेतला आणि धागा पकडून संकेतच्या दिशेने फेकला. तिकडे गोपाल मंत्रोच्चार करत होता जे ने करून या चेटकिणीची शक्ती कमी हो .

 

गोपालने जोरात मंत्रोच्चार सुरू केले. त्याला माहिती होत त्याआता काही करू शकणार नाही. त्याने इतरांना धागा झाडाला बांधायला सांगितलं. आत्म्यांची शक्ती कमी झाली त्या जोरात किंचाडू लागल्या गोपाल वर वार करण्याचा प्रयान्त करू लागल्या. त्याच वेडेचा फायदा घेत संकेतने धागा धरून झाडाभोवती बांधायला सुरुवात केली. त्या आत्म्यांनी आता जोरात ओरडायला सुरुवात केली.

 

गोपाल जोरात मंत्र म्हणत होता. शेवटी आत्मे कमजोर झाले , आणि  परत झाडावर जाण्याचा प्रयन्त करू लागले पण इतक्यात यश आणि संकेत नि धागा झाडाला बांधला होता .

गोपाल जागेवरून उठला आणि त्यांनी त्याचा खिशातून एक पुढी काढली त्यात एक राख होती ती त्याने त्या चेटकिणी वर फेकली त्या राखिनी त्या चेटकिणी जडायला लागल्या आणि चीलाऊ लागल्या

अखेर त्यांची सुद्धा राखच झाली आणि वातावरण हळू हळू सामान्य झाले. गोपाल म्हणाला, "भगवान नरसिंह आपले संरक्षण केल आहे." ते परत त्यांचा कॅम्प कडे जायला निघाले.

 

 ते सर्वजण त्यांच्या कॅम्पकडे परतले. इतर सर्वजण तिथे त्यांची वाट पाहत होते. आता त्या मुलानाही बरे वाटत होते. सगळे तिते भीतीने बसले होते.... गोपाल म्हणाला, "आता सगळ ठीक आहे. उद्या सकाळी तुम्ही तिथे जाऊन हवी तितकी चिंच खाऊ शकता. आता ती झाड भुताटकीची नाही." संकेत आणि यश म्हणाले, "आम्ही कधीही आता चिंच खाणार नाहीत," आणि सर्वजण हसू लागले. डॉ. संकेत आणि डॉ. यशला ती घटना आठवली.......)

 

डॉ. संकेत आणि डॉ. यश अजूनही आश्चर्यचकित होते. संकेत म्हणाला, "आपण गाव सोडल्यानंतर तोही तिथून निघून गेला होता, असं कळलं होतं. काहीतरी आयुर्वेदिक शिक्षण घेण्यासाठी गावचे पंडित म्हणाले होते. मी जेव्हा जेव्हा गावी गेलो विचारलं त्यांना, पण त्यांनीही सांगितलं की तो मग परत कधी आलाच नाही." यश म्हणाला, "हो, मीसुद्धा मागे गेलो होतो तेव्हा ते पंडितजीसुद्धा जग सोडून गेले होते, म्हातारे झाले होते खूप. आणि गोपालला बघून तर आता ३० वर्षं झालीत असणार."

 

“संकेत हा खरच तो असणार का ? “ यश मान्हाला

 

सरपंच म्हणाले, "हा गोपाल कोण?"

 

डॉ. यश म्हणाले, "आमचा लहानपणीचा जिवलग मित्र तो, आम्ही गावात सोबत होतो."......

 

======================पुढील भागात============================