कालासगिरीची रहस्यकथा - 10 Sanket Gawande द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कालासगिरीची रहस्यकथा - 10

आध्याय 19

 

 

दुसरीकडे संकेत आणि यश यांनी लगेच मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सरपंच महेश आणि श्याम यांना सोबत येण्याचं विचारलं. त्यांनी सुद्धा होकार दिला.

 

मीरा तिचा बाबांना म्हणाली, "बाबा, आम्हीही तुमच्यासोबत येणार."

 

तिच्या वडिलांनी सांगितलं “ नाही मीरा.” तुम्ही आधीच तिथून आलात ना?.

 

पण मीरा म्हणाली, "बाबा, आम्हाला यायचा आहेन.

 

डॉ. संकेत मन्हालेत "ठीक आहे, चला तुम्हीपण."

 

तितक्यात अन्वी आणि निलिमा बाहेर आल्यात आणि सगळ्यांना जेवायला बोलावलं.

 

सरपंच म्हणाले सगळ्यांना, “जेवल्यानंतर आपण जाऊयात का तिकडे?."

 

यश म्हणाला, "असं करूया सरपंचजी, अन्न आपण पॅक करूयात. आपण आता त्यांच्या सोबतच जेवूयात ."

 

सरपंचजींनी होकार दिला आणि त्यांच्या पत्नीला अन्न पॅक करण्याची विनंती केली.

 

अपूर्वा बाहेर आली आणि विचारलं, "काय झालं यश?"

 

यश म्हणाला, " आम्हाला या गावात एक खास व्यक्ती सापडला अपूर्वा."

 

अन्वीने विचारलं, "कोण सापडला यशभाऊजी?"

 

यश म्हणाला, "आमचा जुना मित्र, गोपाल."

 

अन्वी आणि अपूर्वा गोपाल बद्धल ऐकून होत्या त्या गोपालचा नाव ऐकून आनंदित झाल्या आणि त्यांना संकेत आणि यशच्या आनंदाची कल्पना सुद्धा आली.

त्यांना हे नाव कितीतरीदा ऐकायला मिळालं होतं. जेव्हा जेव्हा हे दोघे लहानपणाच्या गोष्टी सांगायचे तेव्हा गोपालबद्दल खूपदा बोलायचे. त्या मुळे त्यांना गोपालचं नाव घेताच कळलं.

 

अन्वी म्हणाली, "अचानक इतक्या वर्षांनंतर ते कसे काय भेटलेत इथे?"

 

संकेत म्हणाला, "तो इथे पंडित आणि वैद्य म्हणून गेल्या ५ वर्षांपासून आहे. आम्ही जातो आणि त्याला इथे घेऊन येतो. मग तुमची ओळख करून देतो त्याच्याशी."

 

ते आत गेले आणि अन्न पॅक केलं. दुसरीकडे मीरा आणि सायलीने तितक्या वेडेच फायदा घेतला आणि निलेश आणि नीलूच्या घरी जाऊन त्यांना पंडितजींकडे येण्यास सांगितलं. निलेश चकित झाला इतक्या रात्री हे टेकडीवर पंडितजीन कडे का जायला लावत आहेत ,तो काही बोलेल याचा आदीच मीरा मान्हाली तुला सगड आम्ही गाडीत सांगू तू चल आधी आणि तिकडे सायलीने नीलूच्या वडिलांची परवानगी घेतली की ते सरपंचजी, डॉ. संकेत आणि श्याम काकांसोबत जात आहेत. त्यांनी परवानगी दिली. सगळे सरपंचांच्या घरी जमा झालेत. संकेतने ड्रायव्हरला गाडी आणण्यास सांगितलं. सर्वजण गाडीत बसले आणि मंदिराकडे निघालेत.

 

गाव रात्रीच्या वेळेस खूप छान दिसत होतं. काही लोक झोपायला गेले होते, त्यामुळे त्यांच्या घरांच्या लाईट्स बंद होत्या, पण काही लाईट्स अजूनही लुकलुकत होत्या. हवा थंड आणि ताजी होती, जी मनाला प्रसन्न करत होती.

व्हॅन वर जात होती आणि सुमारे एक तासाच्या प्रवासानंतर ते मंदिराजवळ पोहोचले.

 

तिथे दोन सोलर लाईट्स होत्या, ज्या मंदिराच्या परिसरात प्रकाश पसरवत होत्या. पंडितजी तिथे उभे होते, जणू कोणाची वाट पाहत होते. ड्रायव्हरने व्हॅन थांबवली आणि डॉ. संकेत आणि यश खाली उतरले. पंडितजी त्यांच्या समोर उभे होते. ते तिघं एकमेकांकडे पाहत होते.  त्यांचा मागो माग एक एक करून व्हॅनमधून उतरले.

पंडितजी म्हणाले, "तुम्ही दोघं नेहमीप्रमाणे उशीराच आलात होणा. मी इथे एक तासापासून वाट बघत आहो की तुम्ही येणार सोबत जेवायला घेऊन येनार. मला भूक लागली आहे किती माहिती आहे का तुम्हाला." आणि ते हसले.

 

संकेत आणि यशने त्यांना ओळखले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. गोपालच्याही डोळ्यात अश्रू आले. तो पुढे आला आणि दोघांनाही घट्ट मिठी मारली. ते सगळे खूप आनंदी होते की त्यांना अनेक वर्षांनंतर आपला मित्र सापडला.

 

सगडे त्यांकडे बघत होते कोणीही काही बोलत नव्हतं. मीरा आणि सुप्रिया आश्चर्यचकित होत्या. त्यांनी कधीही आपल्या वडिलांना अशा प्रकारे पाहिलं नव्हतं. सरपंच, श्याम, सायली, निलेश, नीलू देखील आश्चर्य होते. त्यांनी कधीही पंडितजींना असा साध्या स्वरूपात पाहिलं नव्हतं. ते सगळेही आनंदी होते की हे तिघे मित्र पुन्हा एकत्र आले.

 

पंडितजींनी सर्वांना आत बोलावलं. त्यांनी आधीच जमिनीवर चटया घातल्या होत्या. तशेच पानांच्या पत्राडी आणि पाणी ठेवलेलं होतं. इतरांनी ते पाहिलं आणि विचारलं की पंडितजी तुम्हाला कसं माहित होतं की आम्ही इथे येणार आहोत.

पंडितजी त्या वर सहज हसले , ते मन्हालेत  मला माहिती होत  यांना कडल कि मीच गोपाल  आहे,  तर हे वेड न बगता लगेच येतील इथे मला शोधत .

सगडे आत मध्ये बसलेत आणि गप्पा मारून लागलते तिकडे  मीरा अजूनही आपल्या वडिलांकडे, यश आणि पंडितजींकडे पाहत होती, ते एकत्र बसून गप्पा मारत होते. पंडितजींनी मीराकडे पाहून म्हणाले, "मीरा, आधी सर्वांना जेवायला वाढायला घे भुक लागली असणार सगळ्यांना."

मीरा म्हणाली, "ठीक आहे, पंडितजी." आणि सायली, सुप्रिया, निलू, निलेश आणि जयेश यांच्या मदतीने सर्वांना जेवण वाढायला लागली. सर्वांनी आपलं जेवण पूर्ण केलं. मुलं सगळं आवराआवर करत होती आणि श्याम, महेश, पंडितजी, संकेत आणि यश खुर्च्यांवर बाहेर गप्पा मारत बसले होते.

पंडितजींनी शांतपणे सगळ्यांना पाहिलं आणि हसत म्हणाले, "अरे, इतक्या वर्षांनी पुन्हा भेटून खूप आनंद झाला तुम्हा दोघांना , माहिती होत परत कधी तरी भेट होणार आपली कुठे न कुठे .

 

 

======================पुढील भागात============================