कालासगिरीची रहस्यकथा - 9 Sanket Gawande द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कालासगिरीची रहस्यकथा - 9

 

अध्याय १८

 

डॉ. संकेत म्हणालेत, "सरपंचजी, हे पंडितजी कोण आहेत?"

 

सरपंच म्हणाले, " ते एक महान व्यक्तीमत्व आहेत. ते आता आपल्या टेकडीवरील मंदिरात पंडित आणि वैद्य आहेत. ५ वर्षांपूर्वी आपले जुने पंडितजी जेव्हा वारलेतना, तेव्हा हे कुठून तरी दुसऱ्या ठिकाणावरून इथे आलेत आणि म्हणाले की ते पंडित आणि वैद्य आहेत आणि त्याचं नाव वासुदेव आहे. त्यांना नरसिंहस्वामीचा मंदिरात पंडित म्हणून सेवा करायची आहे या आदी ते येथील पंडितजींना भेटले होते मन्हालेत तर त्यांनीच त्यांना इथे येण्यास सांगितल होत. त्यांचा चेहऱ्यावरील तेज बघून गावातील सगळ्यांनी ते मान्य केल, ते ५ वर्षांपूर्वी डोंगरावरील मंदिरात गेलेत आणि त्या नंतर खाली गावात अजून परत आले नाहीत , ते तिथेच कायम असतात तितेच त्यांची कुठी (झोपडी) आहे , आम्ही त्यांना लागणारा सगड सामान तिते नेऊन देतो जे काही त्यांना हव असते . ते नेहमी आम्हाला मदत करतात. जेव्हा कुणी आजारी पडतो, ते त्यांना आयुर्वेदिक औषधांनी मदत करतात. त्याचा स्वभाव देवदर्शनी आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व  शांतता देतं मन्हाला, त्यांचात खूप दैविक ताकद आहे . “

 

डॉ. यश म्हणाले, "खूप रहस्यमय आणि शक्तिशाली व्यक्ती आहेत वाटते हे पंडितजी?." 

 

संकेतने मीरा, सायली आणि सुप्रिया यांना बोलाऊन घेतलं,  त्या लगेच घरातून बाहेर आल्यात.

 

मीरा म्हणाली, "हो बाबा, तुम्ही बोलावलं?"

 

संकेत म्हणाला, "मीरा, पंडितजींनी तुम्हाला आणखी काय सांगितलं ? त्यांना आमची ओळख आहे का? किवा तुला वाटते का कि ते आम्हाला ओळखतात?"

 

मीरा म्हणाली, "मला माहिती नाही बाबा, त्यांनी अस सरड तर मन्हालेत नाही पण मला वाटलं की त्यांना ओळख आहे तुम्ही आणि यश काका कोण आहात. ते म्हणाले की त्यांना आपण  या गावात येणार हे माहीत होतं, आणि त्यांनी तुमच्याबद्दल आणि काका यशबद्दल विचारलं सुद्धा."

 

सायली म्हणाली, "हो काका, ते शक्तिशाली आणि सभ्य व्यक्ती आहेत. कधीकधी ते काहीतरी सांगतात जे सामान्य माणसाला समजतच नाही."

 

सरपंच म्हणाले, "हो, हे खरं आहे. जेव्हा केव्हा आम्ही त्यांना भेटतो, तेव्हा ते नेहमी आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. ते नेहमी गावकऱ्यांचे रक्षण करतात."

 

डॉ. संकेतने विचारलं, "त्यांनी अजून काही सांगितलं का?"

 

सायली आणि मीरा एकमेकांकडे बघत होते आणि सांगायला घाबरत होते.

 

पण सुप्रिया म्हणाली, "हो, त्यांनी सांगितलं की ते लवकरच गावात येणार आहेत तुम्हाला भेटायला . त्यांनी असं काहीतरी सांगितलं की जेव्हा वेळ येईल तेव्हा ते येतील आणि आम्हाला हे धागे बांधायला सांगितलं बस इतकच."

 

यशने त्या धाग्याकडे पाहिलं आणि संकेतला विचारलं, "संकेत, हा धागा पाहिलास का?"

 

संकेतने देखील पाहिलं आणि म्हणाला, "हो,…. हा गोपालचं आहे."

 

ते दोघं आनंदित झाले आणि म्हणाले, "हो, नक्कीच हा गोपाल आहे, यात शंका नाही."

ते दोघं उठले आणि म्हणाले, "चल, आपण त्याला लगेच भेटायला जाऊ."

 

मीरा, सायली, सुप्रिया आणि इतर सर्वजण आश्चर्यचकित झाले.

 

मीरा म्हणाली, "बाबा, हे गोपाल कोण आहेत?"

 

संकेत म्हणाला, "ज्याला तुम्ही भेटलात."

 

सायली म्हणाली, "पण पंडितजींचं नाव वासुदेव आहे."

 

मीरा म्हणाली, "हो, त्यांनी सांगितलं की त्यांचं नाव वासुदेव आहे."

 

यश म्हणाला, "संकेत, आपल्या गावचे पंडितजी गोपालला काय म्हणायचे आठवतंय का?"

 

संकेत म्हणाला, "हो, 'वासुदेव' "

 

सरपंच म्हणाले, "पंडितजी तुमचे मित्र आहेत डॉक्टर."

 

यश मान्हाला " अम्हचा जिवलग लहानपणीचा मित्र आहे तो "

 

श्याम देखील आश्चर्यचकित झाला त्याला ५ वर्षा आधील पंडितजीन सोबत गावात पहिल्यांदा येतानाची गोष्ट त्याला आठवली, "पंडितजी सुद्धा त्याला त्याच जंगलात मिडाले होते ते सुद्धा गावात येताना, श्यामनेच त्यांना गावचा रस्ता दाखवला होता आणि गावात येताना सोबत दिल होत पण ज्या वेडस गावाच्या वेशीवर ते आलेत पंडितजींना श्यामला त्या घरा समोर थांबवलं आणि ते आत त्या घराचा वरांड्या जवड गेलेत आणि तिथे  त्यांनी बाहेरूनच त्या घराचा निरीक्षण केल श्याम त्या वेडेस घाबरला होता तो बाहेरच वाट बघत होता , त्याला तिते त्या दिवशी कसला तरी दडपण जाणवत होता पण पंडितजी चा असण्यानी त्याला भीती कमी वाटत होती तो बाहेरूनच सगड काही बगत होता, पंडितजी त्या झुल्य कडे गेले झाडाकडे बगितल त्या नंतर ते त्या खिडकीत बगत होते जणू तिते त्यांना कुणी दिसल, ते सतत त्या खिडकीत बगत होते आणि त्यांचा चेहऱ्यावर कसला पण भीती दिसत नवती ते बस हलकी सी स्मित हास्य करून ते बाहेर आलेत , श्यामला ते म्हणालेत या नंतर या घरात परत कुणी जाऊ नये ते बाघशील आणि ते गावात आलेत."

श्आयामने आता] सर्व गोष्टी जोडण्याचा प्रयत्न केला. त्याने सायलीला हळूच विचारलं, " सायली हे कोणत्याही प्रकारे त्या भुताटकीच्या घराशी संबंधित आहे का? तुम्ही पंडितजींकडे त्या घराबद्दल विचारायला गेला होतात ना?" मीराने श्यामकाकाचं बोलणं ऐकलं. सायली घाबरली होती.

 

मीरा म्हणाली, "नाही काका."

श्याम म्हणाला, "मला माहिती आहे मीरा, मी तुम्हाला त्या घरातून येताना पाहिलं आहे आणि तुम्ही सगळे विचित्र वागत होतात. पण लक्षात ठेवा, हे शहर नाही आहे तिथे जान खूप धोका दायक होऊ शकते आणि पुन्हा तिथे जाऊ नका."

 

मीरा म्हणाली, "माफ करा श्याम काका," सायली आणि सुप्रिया सुद्धा म्हणाल्या, "माफ करा श्याम काका ,पुन्हा परत तिकडे नाही जाणार आम्ही."

 

पुढील भागात...................................