कोणतेही कर्म करतांना विचार करावा?
*खुन....... खुन म्हणजे केवळ माणसाचीच हत्या नाही तर या प्रकारात पशूपक्षाचीही हत्या असा याचा अर्थ काढता येईल. पशूपक्षांची हत्या? हा काय विचित्र प्रकार आहे. असा प्रश्न कोणालाही अगदी सहज पडू शकतो. परंतु तो प्रश्न वास्तविक प्रश्न आहे. कारण पशूपक्षांनाही जीव असतो आणि त्यांचीही हत्या केली तरी त्याचेही गंभीर परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. ज्याला कोणत्याच स्वरुपाचं प्रायश्चित नाही. म्हणूनच जो कोणी मुक्या प्राणीमात्रांचीही हत्या करीत असतील. तो कधीच सुखी राहात नाही. हं, शरीरानं धडधाकट असलं म्हणजे सुख नसतंच. सुख असतं त्या माणसाचं आनंदी असण्यात. त्या माणसाच्या आनंदी वागण्यात. जर त्या व्यक्तीला आनंदी वागता येत नसेल वा आनंदानं जगता येत नसेल तर त्याच्यासारखा दुःखी माणूस जगात नाही. हे तेवढंच खरं. म्हणूनच माणसानं कोणाचाही खुन करु नये. मग ते प्राणीमात्रा काही असेना. कारण प्राणीमात्राही सृष्टीचे महत्वाचे घटकच आहेत.*
सध्याच्या काळात गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे. कोणी मद्यधुंद होवून चालवून रस्त्यावर झोपलेल्यांचा बळी घेतात तर कोणी अनेकांचा खुन करीत सुटतात. कोणी आपल्या मुलीचा गळा घोटतात तर कोणी आपल्या मायबापांचा जीव घेतात. याला जबाबदार कोण? याला जबाबदार आहेत पोलीस की जनता? असा प्रश्न सामान्य माणसांनाही अगदी सहज पडल्याशिवाय राहात नाही. कारण दोघांचीही भुमिका ही संशयास्पदच असते.
कधी कधी जेव्हा खुन होतो, तेव्हा त्या खुनाच्या बाबतीत काही लोकं म्हणतात की काही बोलू नये यावर. खुन झालाच नसता. परंतु पोलीस उशिरा पोहोचले ना. मग खुन होणारच.
खुनाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास खुन होणारच. कारण पोलीस पोहोचले नाहीत. जर पोलीस पोहोचले असते तर खुन झाला नसता काय? खुन झालाच असता, जरी पोलीस उपस्थीत असते तरीही. कारण ते थांबवू शकले नसते खुन करणाऱ्यांना. त्याचं कारण असतं भीती. पोलीसही काही देवाचे बाप नाहीत की ते आपला जीव धोक्यात घालतील. त्यांनाही भीती असते की जर ते आडवे झाले व त्यांनी खुन थांबविण्याचा प्रयत्न केलाच तर संबंधीत खुन करणारा व्यक्ती त्या पोलिसांचाही जीव घेईलच ही गोष्ट नाकारता येत नाही. याउलट कधीकधी नव्हे तर एखाद्या वेळेसच चमत्कार घडतो व पोलीस दिसताच खुन करणारी माणसं पळून जाऊन अनर्थ टळतो.
पोलीसांची भुमिका नेहमीच संदिग्ध राहिलेली आहे. त्याला कारणीभूत असतात काही पोलीस मंडळी. त्या पोलीस मंडळींनी जर आपली ड्युटी इमानेइतबारे बजावली तर गुन्ह्यांची संख्या निश्चीतच कमी होईल. परंतु ते तपास जेव्हा करायला सुरुवात करतात, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. ज्यातून गुन्हेगार हा अगदी सहजरित्या वाचत असतो. तो मोकळा सुटत असतो. ज्याची परियंती त्या गुन्हेगाराची हिंमत वाढते व तो दुसरा गुन्हा करण्यास मोकळा होतो. परंतु म्हणतात ना. कितीही सराईत गुन्हेगार असला तरी तो एक ना एक दिवस जाळ्यात सापडतोच पोलिसांच्या आणि पोलिसांच्या जाळ्यात नाही सापडला तर विधात्यांच्या जाळ्यात तो नक्कीच सापडतो हे तेवढंच खरं. याबाबतीत एक प्रसंग सांगतो.
एक शाळा व त्या शाळेतील मुख्याध्यापक रोजच अत्याचार करायचा आपल्या कनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांवर. अशातच तो धमक्या देवून देण वसूल करायचा शाळेतून. देण म्हणून वसूल करीत असलेला पैसा एखाद्या शिक्षकानं देण्यास नकार दिल्यास त्याचे वेतनही बंद करायचा तो कायमस्वरुपानं. यावर संबंधीत शिक्षक पोलीस ठाण्यात गेल्यास पोलिसांना सेटींग करुन संबधीत शिक्षकांनाच वेठीस धरण्यास सांगायचा तो. त्यानंतर शिक्षकानं न्यायालयात जाब मागितल्यास न्यायालयातूनही क्लीनचीट मिळायची त्याला. ज्यातून अख्खे वेतन बुडायचे शिक्षकाचे. यातूनच त्याची हिंमत वाढली. त्याच्या या अत्याचारानं कित्येक शिक्षकाच्या नोकऱ्या गेल्या. परंतु मुख्याध्यापक जो की तो राहिला. तसा मुख्याध्यापक विद्यार्थ्यांकडूनही बराच पैसा खायचा. त्यांना येत असलेल्या खिचडीतून पैसा खायचा. यातूनच त्याचं आर्थीक उत्पन्न बरंच वाढलं होतं व तो गर्भश्रीमंत बनला होता. त्याच श्रीमंतीचा त्याला अतीव गर्वही चढला होता. मात्र त्याचे शिक्षकांवर होत असलेले अत्याचार व त्याचे विद्यार्थ्यांप्रती व पालकांप्रती वागणे, नियती पाहात होती. ती बोलत नव्हती आणि त्याच नियतीला बोलताही येत नव्हतं. अशातच एक दिवस असाही उजळला.
तो एक दिवस. त्या दिवशी तो सकाळीच आपल्या टूर व्हिलरनं फिरायला निघाला व वाटेतच एक सुक्ष्म अपघात झाला. ज्यात त्याला गंभीर लागलेलं जाणवत नव्हतं. परंतु मेंदूला मार लागला होता. ज्यात तो जागीच मरण पावला.
महत्वपुर्ण बाब ही की आपण जसे कर्म करतो. त्याची शिक्षा आपल्याला मिळतेच. प्रसंगी थोडा वेळ लागतो. म्हणूनच चांगले कर्म करावे.
कधीकधी पोलिसांच्या संशयाच्या भुमिकेमुळे गुन्हेगार सुटतात. मग ते अव्वल दर्जाचे गुन्हेगार बनतात. परंतु नियती त्यांना सोडत असते काय? जे दुसऱ्याचा खुन जरी करुन मोकळे सुटत असले तरी ते नियतीच्या कचाट्यातून सुटत नाहीत. त्या खुनाऱ्यांच्या घरात एवढे सारे विघ्न येतात की त्याचं जगणं कठीण होवून बसतं. कधी गंभीर आजार तर कधी त्यांच्या स्वतःच्या मुलांचं घरातून पळून जाणं वा मरणं वा सोडून जाणं. कधी पैशाची अडचण. कधी विवाह न जुळणे, कधी घरात जास्तीचा लठ्ठपणा. कधी मरणासन्न यातना. कधी मधूमेह तर कधी हाय ब्लडप्रेशर. अन् लोकं आपल्यावर आलेल्या यातना सहन करु शकतात. परंतु जेव्हा त्यांच्या मुलांचे गंभीर हाल होतात. ते मात्र कोणीही सहन करु शकत नाही. अशा गोष्टीचा आपल्याला भयंकर त्रास होतो. त्यावेळेस आपल्याला विधाता आठवतो आणि आपण रोज विधात्याला आळवत बसतो. कधी प्रचंड स्वरुपाची पुजापाठ तर कधी नदीत अभंग स्नान करणं. विचार करतोय की नदीत अभंग स्नान केल्यानं आपलं पाप खंडीत होईल. परंतु जसा एखाद्या कपड्यावरचा डाग धुतला जात नाही. तसंच हे आपलं पाप असतं. गुन्हेगारीचं पाप. त्या पापाची ना नदीत अंघोळ केल्यानं सुटका होत ना कोणत्या देवालयात गेल्यानं. जरी त्या पापाला पोलिसांकडून न्याय मिळाला नसेल तरीही त्या गुन्ह्याला शिक्षा देण्याचं काम नियती करतेच करते. म्हणूनच कोणतंही पाप का असेना, ते करुच नये. जरी एखाद्या सुक्ष्मातीत सुक्ष्म जीव मारण्याचं पाप का असेना. तेही जीव मारणं हे पापच असते आणि नियती त्याचीही शिक्षा ही देतच असते. विशेष म्हणजे गुन्हे घडत जरी असले तरी त्याला थांबवायची ताकद ही पोलिस व जनतेमध्ये आहे आणि तेही सक्षमपणे काम करीत नसतील तर नियती त्यावर अतिशय सक्षमपणे काम करीत असते. ती ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा त्याला त्याला त्या स्वरुपात देत असते. मग आपण कितीही पुजापाठ केली वा कितीही वेळा अभंग स्नान केले तरीही आपण नियतीच्या कचाट्यातून कधीही सुटू शकत नाही. म्हणूनच कोणतंही पाप करण्यापुर्वी सतरावेळा विचार करावा. मगच पाप करावं हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०