मला स्पेस हवी पर्व २ भाग २ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व २ भाग २

मला स्पेस हवी पर्व २ भाग२

मागील भागात आपण बघितलं की नेहा अपर्णा आणि अनुराधा नेहाच्या केबिनमध्ये चर्चा करत असताना अचानकपणे रमण तिथे आला आणि त्यानंतर रमण आणि तिच्या जे काही बोलणं झालं त्यांनी नेहा अहवाल दिल झाली आता पुढे काय होणार बघूया

नेहाच्या समोर टेबलवर कॅन्टीनच्या माणसाने चहा आणला चहा ठेवल्यावर त्यांनी नेहाला हाक मारली,

“मॅडम चहा ठेवलाय.”

नेहाने डोळे उघडले नाहीत एक दोन सेकंद वाट बघून कॅन्टीन च्या माणसाने पुन्हा,

“ मॅडम चहा घेताना !”

असं नेहाला विचारलं तरीही नेहा भानावर आली नाही तेव्हा कॅन्टीनचा माणूस सरळ अपर्णाकडे गेला अपर्णाला म्हणाला,

“मॅडम तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी नेहा मॅडमच्या टेबलवर चहा आणून ठेवलाय. दोनदा मी त्यांना हाक मारली पण त्या डोळे उघडत नाही काय करू?”

यावर अपर्णा उठली आणि म्हणाली,

“ ठीक आहे तू जा. मी बघते.”


कॅंटीनच्या माणूस निघून गेला. अपर्णा नेहाच्या केबिनमध्ये गेली. तिने बघितलं की नेहा खुर्चीला मागे डोके टिकवून झोपली होती आणि तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहत होतं. हे बघितल्यावर आपर्णाला वाईट वाटलं. अपर्णांनी हळूच नेहाला हाक मारलं.

“ नेहा मॅडम काय झालं ?उठताना “

अपर्णांनी दोनदा हाक मारल्यावर नेहाने डोळे उघडले. तिने विचारलं,

“ अपर्णा काय झालं ?”

अपर्णा म्हणाली,

“मॅडम तुमच्यासाठी चहा आलेला आहे.”

चहाची कप बशी बघून नेहाला आश्चर्य वाटलं ती म्हणाली ,

“मी चहा बोलवलं नव्हता.”

अपर्णा म्हणाली ,

“मी बोलावला मॅडम. मी मगाशी बघितलं रमण सर तुमच्या केबिन मधून बाहेर पडले तुम्हाला आता खूप त्रास झाला असेल हा विचार करून मी चहा बोलावला.”

नेहाच्या डोळ्यात अपर्णाबद्दल प्रचंड कृतज्ञता दाटून आली. ती म्हणाली,

“ अपर्णा किती मनकवडी आहेस. मला खरंच खूप त्रास होत होता आणि मला चहा हवा होता.”

यावर किंचित हसून अपर्णा म्हणाली ,

“मॅडम तुम्ही कशाला काळजी करता? मी आहे. तुम्ही शांतपणे चहा घ्या अजून काही चहाबरोबर हवंय का ?”

“नको नको काही नको मी घरून नाश्ता करूनच आले आहे .”

“ठीक आहे. थोड्या वेळाने ताम्हाणे साहेबांच्या केबिन मध्ये आपल्याला जायचंय ना?”


अपर्णांनी हे विचारताच यावर नेहा म्हणाली,

“ अरे हो हे माझ्या लक्षात नाही आलं पण अपर्णा पुढच्या जाहिराती संबंधी आपलं अजून काही बोलणं नाही झालं त्याच्या आधीच ताम्हाणे साहेबांच्या केबिनमध्ये कसं काय जाणार ?”


“मॅडम तुम्ही चहा घ्या आणि मग आपण यावर बोलूया तोपर्यंत मी माझं काम बघते.”

“ हो “

अपर्णा आपल्या जागेवर निघून गेली. नेहा टक लावून चहाच्या कपबशी कडे बघत होती. तिच्या मनात आलं कुठल्या कोण या दोघीं पण माझी किती काळजी घेतात! रमण शहा आपल्या केबिनमध्ये आल्यावर आपल्या चेहऱ्यावर जे भाव आले ते बघून अपर्णाच्या लक्षात आलं की मला काय त्रास झाला असेल. म्हणूनच रमण गेल्यानंतर किती तत्परतेने तिने माझ्यासाठी चहा आणला. खरंच परमेश्वरा मागच्या जन्मीचे ऋणानुबंध हे आहेत का म्हणूनच अपर्णा आणि अनुराधा सारख्या स्त्रिया मला या जन्मात भेटल्या.



मी मला स्पेस हवी म्हणून बंगलोर आल्यावर असा काही रमण नावाचा गोंधळ आयुष्यात निर्माण होईल असं अपेक्षितही केलेलं नव्हतं. मला फक्त नात्यांमध्ये आलेली नको ती अपेक्षांची बंधनं लांब ठेवण्यासाठी मी स्पेस हवी म्हणत बंगलोरला आले आणि इथे काय झालं ! इथे नको असणारा हा बंध मला कर्कचून बांधायला निघालाय. काय करू परमेश्वरा काहीच कळत नाही.

थोड्यावेळाने नेहा भानावर आली. तिने चहा प्यायला. गरम गरम चहामुळे तिला खूप तरतरी आली. तिने चहा संपताच लगेच अपर्णाला इंटरकाॅमवरून फोन केला आणि आपल्या केबिनमध्ये बोलवून घेतलं. अपर्णा नेहाच्या केबिनमध्ये आली. नेहा म्हणाली,

“ अपर्णा आता आपण दुसऱ्या जाहिरातीकडे वळलं पाहिजे पण मगाशी मी म्हटलं होतं की राजेश सरांनी नंतरचे दुसरे टूर्स कुठले आखले आहे का? याबद्दल मी आल्या आल्या तरी मला त्यांनी काही कल्पना दिलेली नाहीये तू जरा विचार.”

“हो मॅडम विचारते.’

असं म्हणत अपर्णाने राजेशच्या केबिनमध्ये फोन लावला राजेशची असिस्टंट रियाने फोन उचलला,

“ हॅलो”

“ मी अपर्णा बोलतेय. मॅडम राजेश सरांनी नंतरच्या छोट्या टूर्स अरेंज केल्या आहेत का ?त्याचं प्लॅनिंग केला आहे का ?”

रिया म्हणाली,

“हो मॅडम प्लॅनिंग झालेला आहे पण सरांनी अजून ते डिटेल बघ बघितले नाही. त्यांनी ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या त्यानुसार आम्ही तसं प्लॅनिंग तयार केलाय.”

यावर अपर्णा म्हणाली,

“ हे बघ ते सगळं प्लॅनिंग एकदा राजेश सरांना डोळ्याखालून घालायला सांग कारण त्या प्लॅनिंगच्या आधारे पुढची कामं करायची आहेत .नेहा मॅडम आज जाॅईन झाल्या आहेत.”

“ मॅडम मी राजेश सरांना विचारून बघते.”

“ ठीक आहे तू विचार आणि राजेश सरांना नेहा मॅडमच्या केबिनमध्ये बोलवले म्हणून सांग.”


एवढं बोलून अपर्णाने फोन ठेवला. अपर्णाच्या लक्षात आलं की नेहा पुन्हा कुठेतरी आपल्या तंद्रीत गेली आहे. अपर्णाच्या लक्षात आलं आज ऑफिसमध्ये आल्या आल्या नेहा मॅडम थकलेल्या दिसत होत्या पण कामासाठी उत्सुक होत्या मध्येच रमणने येऊन गोंधळ घातला. आता काय करावे? यांचा मूड कसा कसा आहे हे बघायला हवं अपर्णाने काहीतरी विचार करून नेहाला म्हटलं,


“ मॅडम तुम्ही आता ठीक आहात ना ?राजेश सरांना तुमच्या केबिनमध्ये यायला मी निरोप दिलेला आहे. तुमचा मूड असेल तर आज आपण बोलूया.”

नेहा म्हणाली ,

“अपर्णा मघाशी जो काही गोंधळ झालानं त्यांनी जरा मी बावरले हे खर आहे पण मी आज जॉईन झाले वीस पंचवीस दिवसानंतर. त्यामुळे आज मला माझ्या मूडची पर्वा करून उपयोग नाही. मला माझं काम करणं आवश्यक आहे. आपण बोलूया राजेश सर कधी पर्यंत येतात आहे ?”

“ मी नेहा मॅडमने बोलावलय म्हणून निरोप दिला आहे तो मिळाला की येतील. ते कुठल्यातरी मीटिंगमध्ये असावे.”

“बर ठीक आहे. काही हरकत नाही आपण तोपर्यंत बोलूया मी आजारी पडण्या अगोदर ताम्हाणे साहेबांना म्हटलं होतं जाहिरातीच्या स्क्रिप्ट रायटिंग साठी स्पर्धा ठेवूया. त्या स्पर्धेमध्ये विषय घेऊया. त्यातून चांगला स्क्रीप्ट रायटर मिळेल. मला वाटतं त्यावर काही कृती झालेली दिसत नाही.”

“ मॅडम कारण तुम्हीच आजारी पडलात. त्याच्यामुळे ताम्हणे सरांनी सांगितलं होतं की तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या सगळ्या कल्पनांवर तुम्ही पुन्हा ऑफिसमध्ये आल्यानंतरच कृती करायची आहे. “

“ ताम्हाणे साहेबांचं पण बरोबर आहे. या वीस पंचवीस दिवसात राजेश सरांनी छोट्या टूर्सचा आराखडा जरी तयार केला असेल तर आपल्या कामाला गती येईल.”

“ हो मॅडम. राजेश सर आल्यावर सगळं कळेल.”

“ अपर्णा मागची जी जाहिरात तयार केली होती ती तयार करणारे ते तिघं लेखक कुठे आहेत? त्यांच्याशी काही संपर्क झाला?”

“ खरं सांगायचं तर मॅडम तुम्ही आजारी असल्याने सगळं काम थांबलं होतं. ताम्हाणे साहेबांना तुमच्या नवीन कल्पना खूप आवडल्या आहेत. त्यामुळे ते म्हणाले नेहा मॅडम आल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे टूर प्लॅन करू. तसही राजेश सर नेहमीप्रमाणे मोठी टूर आखतीलच. या छोट्या टूर्सचं प्लॅनिंग तुमच्या समोर होऊ दे असं ताम्हाणे साहेब म्हणाले.”

यावर नेहाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं.ते बघून अपर्णाला बरं वाटलं.

“मॅडम आपण रमण शहांच्या लेखकांना पण बोलवायचं आहे का ? मागच्या वेळेस सारखं की आपण शोधलेल्या लेखिकेला बोलवायचं?” यावर नेहा म्हणाली,

“अपर्णा थोडा विचार करूया ते लेखक खरंच चांगले आहेत.रमण शहाचा राग त्यांच्यावर काढून उपयोग नाही. शेवटी आपण स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स साठी काम करतो. आपल्या कंपनीसाठी आपण काम केलं पाहिजे मला असं वाटतं. बरोबर?”

नेहाने असे विचारतात अपर्णा हसत म्हणाली,

“ मॅडम तुम्ही नेहमी कंपनीचा विचार करता हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे तुमचा रमण शहांवरचा राग तो तुम्ही इथे काढणार नाही हे पण माहिती आहे. पण जर रमण शहाने त्या लेखकांच्या मदतीने तुम्हाला त्रास द्यायला प्रयत्न केला तर ?”

यावर नेहा म्हणाली,

“अपर्णा हे बघ आपल्याला त्रास होतोय हे जेव्हा आपण मनाला सांगतो ना तेव्हा आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते. जर मी माझ्या मनाला सांगितलं की मी माझ्या कंपनीसाठी काम करते रमणशहाचा मला काहीही त्रास होत नाही त्यावेळेला रमण शहाचा मला त्रास होणार नाही.”

“मॅडम तुम्ही केवढा विचार करता! रमण शहांमुळे तुम्हाला किती त्रास झाला हे मगाशी मी बघीतलं.”


“अपर्णा शेवटी काम आणि पर्सनल लाईफ हे वेगळं ठेवायला हवं.”

“ हे खरं आहे मॅडम पण आत्ताच तुम्हाला जरा बरं वाटतंय. तुम्ही घरी एकट्या असता. रमण शहाला तुमचं घर माहिती आहे.”

नेहा म्हणाली,

“ हो ते आहेच पण माझी कामावर खूप निष्ठा आहे. कंपनीसाठी मी तेवढा त्रास सहन करीन.”

यावर अपर्णांनी सरळच विचारलं,

“ मॅडम तुमच्या घरच्या लोकांना बोलवून घ्याल का तुम्ही थोडे दिवस म्हणजे मला असं वाटलं म्हणून विचारते.”

नेहाच्या लक्षात आलं अपर्णाच्या मनातील काळजीआहे नेहा म्हणाली,

“ अपर्णा मी आजारी होते ना तेव्हाच माझ्या मिस्टरांना यायचं होतं पण त्यांना सुट्टी नाही मिळाली. माझ्या मुलाला ऋषीला पण आणायचं होतं. ऋषीला तर केव्हाही शाळा बुडवून आणू शकतो तसं मिस्टरांना नाही येता येत त्यामुळे ते आले नाहीत.”


नेहा आणि अपर्णा बोलत असताना,

“ मी आत येऊ मॅडम ?” राजेशने विचारलं.

“ या”
नेहा म्हणाली. राजेश केबिनमध्ये आला.

“ मॅडम कसं वाटतंय आता? तुम्ही आज जॉईन होणार आहेत हे मला कळलं पण मी थोडसं कामात बिझी होतो.”

“ हरकत नाही सर. मी आता ठीक आहे. राजेश सर छोट्या टूर्स काही आखल्या गेल्यात का हे मी तुमच्या असिस्टंट ला विचारलं होतं.”

“ हो मॅडम. तुम्ही आजारी होतात तेव्हा ताम्हाणे सर म्हणाले की तुम्ही फक्त आउटलाइन करून ठेवून द्या. मॅडम जेव्हा जॉईन होतील तेव्हा त्याच्यावर नजर फिरवतील आणि मग त्यांच्या परवानगीने आपण त्या फायनल करू. “

“ मग तसं केलं का सर तुम्ही ?”

नेहाने विचारलं.

“ हो मॅडम तसं केलंय मी आणि रियाला सांगितलय ती आता सगळं प्लॅनिंग मेल करते तुम्हाला. ते बघून घ्या.”


“ ठीक आहे.सर तुम्ही मोठ्या टूर्सचं काय ठरवलं? “

नेहाने विचारलं.

“ मॅडम मी मोठ्या टूर्सचं प्लॅन केलेलं आहे तयार आपल्याला फक्त त्याच्या जाहिराती तयार करायच्या आहेत.”


यावर नेहा म्हणाली,

“ हो सर त्यासाठीच अपर्णाला मी बोलवलंय. आपण मागे एक जाहिरात केली होती ना ते दोन लेखक रमण शहांचे आणि आपली एक लेखिका अशा तिघांना आपण सेपरेट वेळ देऊन त्यांच्याकडून जाहिरात तयार करून घेतली होती.”

“ हो मॅडम. “

“ त्याप्रमाणे आपण आता जाहिरात तयार करू किंवा मी ताम्हणे सरांना म्हटलं होतं एक स्पर्धा घेऊ. त्या स्पर्धेतून जे चांगले मिळतील त्यांच्याकडून जाहिरात तयार करून घेऊ.”

“ हो मॅडम तुमची कल्पना मला आणि अपर्णा मॅडम दोघांनाही आवडली होती. आता आपल्याकडे तेवढा वेळ आहे का स्पर्धा घेऊन लेखक निवडण्यात?”

राजेशने आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. अपर्णा म्हणाली,

“ मॅडम राजेश सर म्हणतात ते बरोबर आहे. आपण हे सगळं आत्ता करू शकू का ?”

यावर नेहा म्हणाली,


“आपण हे आधीच करायला पाहिजे होतं पण आता स्पर्धा किती दिवसात घ्यायची ? त्याची आपण निवड कशी करायची? यासंबंधी साहेबांशी बोललं पाहिजे. त्यानंतरच आपण हा निर्णय घेऊ शकतो.”


यावर अपर्णा म्हणाली,

“ मॅडम आपण जर ही स्पर्धा यावेळी न घेता पुढच्या वेळेस घेतली तर चालेल का ? म्हणजे आता कशी उन्हाळ्याची सुट्टी जवळ आलेली आहे तर आपण
आपल्याकडे ज्या लेखिका आहेत त्यांच्याकडून आपल्याला हव्या त्या पद्धतीने टूरची जाहिरात करून घेऊ असं मला वाटतं. मॅडम तुम्हाला काय वाटतं?”

यावर नेहा म्हणाली,

“तुझं म्हणणं बरोबर आहे. आपण सध्या तरी याच दृष्टीने विचार करू. राजेश सर तुम्ही मोठ्या टूर्सचं प्लॅनिंग मला पाठवा. त्यावर आम्ही विचार करतो दोघीजणी. त्याचबरोबर तुम्ही आज पासून आठवड्याभरात मला छोट्या तीन तरी टूर्स अरेंज करून द्या.”


यावर राजेश हो म्हणाला


“मी आता निघू का मॅडम?”

असं राजश्री विचारताच नेहा म्हणाली ,

“काही हरकत नाही”

पण तीन दिवसात मला या टूर्स अरेंज करून द्या. ही आठवण मात्र करायला ती विसरली नाही. राजेश निघून गेला. त्यानंतर अपर्णा आणि नेहा पुन्हा त्या विषयावर बोलायला लागल्या

तितक्यात नेहा चा फोन वाजला फोनवर सुधीरच नाव दिसलं ते बघताच नेहा ने फोन उचलला नाही तेव्हा अपर्णा म्हणाले,

“मॅडम मी निघते तुम्ही फोन घ्या.”

अपर्णा केबिन बाहेर गेली आणि फोन उचलत

“ हॅलो “
नेहा म्हणाली .

‘ मी सुधीर बोलतोय. कशी आहेस?”

“ मी ठीक आहे. मी आजच जॉईन झाले. मी रात्री घरी गेल्यावर फोन करीन.

“ ठीक आहे”

एवढं म्हणून सुधीर मी फोन ठेवला तसं नेहानेही फोन ठेवला आणि नेहा पुन्हा आपल्याच विचारात घडवून गेले

नेहाला खूपच गोंधळल्यासारखं झालं होतं एकीकडे सुधीरची आठवण येत होती कारण शेवटी सुधीरशी नऊ वर्षाचा सहवास होता. त्या सगळ्या सुखद आठवणीच होत्या ती फक्त आजूबाजूच्या नात्यातील आवाज बंधनांमुळेच कंटाळून स्पेस हवी म्हणत बंगलोरला आली.

आता तिला रमण शहाचं नवीन बंधन नको होतं. पण नेहा इतकी गोंधळी होती की तिला काय करावं सुचत नव्हतं.

स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या जाहिरातीचं सगळं काम रमण शहाच्या जाहिरात कंपनीवर अवलंबून होतं त्यामुळे नेहा काहीच करू शकत नव्हती आणि तिला सुधीरला डावलायचंच नव्हतं कारण शेवटी तोच तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग होता.

काय करावे या रमण शहाला कसं बाजूला सराव? त्याला कसं समजवावं ?या सगळ्याचा आपल्या कामावर आपल्या तब्येतीवर आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ नये असं नेहाला वाटत होतं.नेहा विचारत गुंतलेली असताना तिचा इंटरकॉम वाजला त्यानी तिची तंद्री भंगली. इंटरकॅम उचलताच समोरून आवाज आला
“मॅडम मी ताम्हणे बोलतोय.”

आणि नेहा तंद्रीतून बाहेर आली आणि गडबडीने म्हणाली,
“ गुडमाॅर्निंग सर. “


________________________________