विकास झालेला आहे Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विकास झालेला आहे

विकास ; झालेला आहे?

भारत हा आधीपासूनच अतिशय सुजलाम सुफलाम देश आहे. या देशाचाही अतिभव्य असा इतिहास आहे. तो इतिहास समृद्ध आहे. शिवाय या देशात असे असे वीरपुरुष जन्माला आले की ज्याचा आपल्याला गर्व वाटतोय.
भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालं. प्रचंड प्रमाणात असलेल्या इंग्रजांच्या दहशतीतून भारत स्वातंत्र्य झाला. त्यासाठी कित्येक लोकांना बलिदान द्यावे लागले. ज्यात केवळ हिंदूच नव्हते तर तमाम मुस्लीम, शिखही होते. ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. आज ते नाहीत, परंतु त्यांच्या आठवणी आजही तेवत असतात आपल्या प्रत्येक भारतीय माणसांच्या मनामध्ये.
भारत स्वतंत्र झाला, तेव्हा काही प्रश्न निर्माण झाले होते. ज्यात पहिला प्रश्न होता. तो म्हणजे निर्वासीतांचा. तो प्रश्न सोडविणे भाग होते. कारण असे असे काही राज्य होते की त्या राज्यातील काही लोकांना पाकिस्तान हवाच होता तर काही लोकांना तेवढ्याच प्रमाणात भारतही. शिवाय काही राजे असेही होते की तेथील राजांना पाकिस्तान आवडत होता आणि जनतेला भारत. अशातच सरदार वल्लभभाई पटेलच्या नेतृत्वात बऱ्याच राज्यांचे प्रश्न सोडवले गेले आणि संबधीत सर्व राज्य भारत आणि पाकिस्तानात विलीन करण्यात आले. भारत स्वतंत्र्य झाल्यावर दुसरा प्रश्न निर्माण झाला. तो म्हणजे संविधानाचा. भारत स्वतंत्र्य तर झाला होता. परंतु येथील कारभार चालवायचा कसा? कोणत्या यंत्रणेनुसार कारभार चालवायचा. त्यासाठी काही नियमावली लिखीत स्वरुपात हवी होती. तो मुद्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या नेतृत्वात मसुदा समितीनं सोडवला. तिसरा प्रश्न होता अन्न पिकवणे व त्यात वाढ करणे. जर अन्नच पिकलं नाही तर आपण आपल्या देशातील तमाम भारतीयांना खायला काय घालणार? हाही एक कळीचा मुद्दा होता. कारण इंग्रज या देशातून जेव्हा स्वातंत्र्य देवून गेले. तेव्हा जातांना त्यांनी या देशात काहीच असं शिल्लक ठेवलं नव्हतं. सर्व बाबतीत भारताला लुटलूट लुटलं होतं. त्यामुळं तोही एक प्रश्नच होता व तो प्रश्न सोडवतांना पंडीत नेहरुंनी तमाम पंचवार्षिक योजना राबववल्या व सिंचनाखाली जास्तीत जास्त क्षेत्र आणलं. व्यतिरीक्त भारताची उच्चकोटीनं प्रगती केली. चौथा प्रश्न होता शिक्षण. गावागावात शिक्षणाच्या सोयी पुरविणे. कारण शिक्षण जर नसेल, तर कोणीही कोणाला मुर्ख बनवेल शकतं. हे सरकारचं म्हणणं होतं. त्यातच भारतीय नेत्यांना वाटत होतं की माझ्या देशातील कोणत्याही व्यक्तीला, तो कुठेही गेलेला असतांना कोणीही मुर्ख बनवायला नको. मग काय, तीच बाब हेरुन सरकारनं सरकारी शाळा ह्या गावागावात काढल्या व सर्वांच्या प्राथमिक शिक्षणाच्या सोयी मोफत केल्या गेल्या. पाचवा प्रश्न निर्माण झाला होता रस्त्याचा. सरकारनं पाहिलं की दळणवळण करायला रस्ते नाहीत आणि दळणवळण जर केलं गेलं नाही तर एका ठिकाणचा माल दुसऱ्या ठिकाणी जाईल कसा? याचाच प्रश्नातून रस्त्याची निर्मीती झाली व दळणवळणाचा प्रसार झाला. त्यातच सरकारनं पाहिलं की आपण रस्ते बनवले. परंतु त्या रस्त्यावर पुल. पावसाळ्यात पाऊस पडायचा. तेव्हा नद्या तुडूंब भरलेल्या असायच्या. त्यावेळेस वाहतूक खोळंबायची. कारण जायला जागाच नसायची. सरकारनं विचार केला की जर नदीवर पुल नसेल आणि दोन दोन दिवस रस्त्यावरील वाहतूक खोळंबळत असेल तर त्या साधनात असणारा माल खराब होवून फेकला जाईल. अशानं अतोनात नुकसान होईल. यातूनच पुलाची कल्पना आली व पुल बांधल्या गेलीत. पुढं सरकारनं पाहिलं की मोठमोठे पुल देशात आहेत. परंतु छोट्या पुलाचं काय? छोटे पुल जर नसतील तर गावातील माल शहरात येणार कसा? शिवाय मुलं गावातील ओढ्याला पाणी असल्यानं शाळेत जात नाहीत. शिक्षण बुडतं. त्यावर उपाय म्हणून सरकारनं गावागावात लहान लहान रस्ते निर्माण केले. त्यानंतर विचार केला उद्योगाचा. देशात उद्योग नसतील तर आत्मनिर्भरता येईल कशी? लोकांना रोजगार मिळेल कसा? याच दृष्टीकोनातून विचार करुन सरकारनं उद्योगांची व कारखान्यांची निर्मीती केली. नंतर सरकारनं पाहिलं की आता देश विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर गेला. परंतु हे सर्व करीत असतांना देशात वीज जर नसेल, तर उद्योगधंदे चालतील कसे? कारण उद्योगधंदे हे विजेवर अवलंबून असतात. मग सरकारनं वीज निर्माण करण्याला प्राधान्य दिलं. त्यानंतर सरकारला वाटलं की जनतेचं आरोग्यही बघावं. जर जनतेचं आरोग्य चांगलं असेल तरच ते कारखान्यात काम करु शकतील. त्यानंतर कारखान्यात काम करणाऱ्या मजबूत व सशक्त कामगाराची गरज पुर्ण करण्यासाठी सरकारनं मोठमोठी रुग्णालये उघडली. त्यानंतर सरकारला वाटलं की जे आपण रुग्णालय उघडलं आहे. त्या रुग्णालयात रोगी जास्त आहेत. ते का येतात? या कारणांचा शोध घेतल्या गेला व कळलं की देशात पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. तसेच सर्व आजार हे दुषीत पाणी पाण्यानं होत आहेत. त्यामुळंच तसा विचार करीत असतांना सरकारनं गावागावात व शहराशहरात नळलाईन पुरवली. त्यातच पाण्याचाही प्रश्न सोडवला. त्यानंतर सरकारनं पाहिलं की आपण रस्ते बनवले. परंतु ते रस्ते लहान पडतात. त्यामुळं अपघात होतो. मग रस्ते मोठे केले. तरीही अपघात होतच होते व त्यात लाखो रुपयाचं नुकसान होत होतं. ते पाहून सरकारनं मोठ्या रस्त्यावर रस्ते दुभाजक लावले. असे बरेच प्रश्न होते. या सर्व गोष्टी अल्पावधीतच भारतानं पुर्ण केल्या. परंतु कोणत्याच भारतीयांना त्यांनी उपासात ठेवलं नाही वा कोणत्याच भारतीयांची उपासमार होवू दिली नाही.
आज आम्हाला भारताचं समृद्ध असं रुप दिसत आहे. देश सुजलाम सुफलाम दिसत आहे. सगळीकडं रस्ते चकाचक दिसत आहेत. गावागावात रस्ते पोहोचले आहेत व ते पक्क्या स्वरुपाचे दिसत आहेत. मोठ्या तसेच छोट्या नद्यांवर पुल दिसत आहेत. गावागावात वीज पोहोचलेली दिसत आहे. गावागावात शाळा आणि शिक्षण, शिवाय आरोग्याच्या सुविधा पोहोचलेल्या दिसत आहेत. सिंचनाच्या सोयी दिसत आहे. पिण्याच्या पाण्याच्या सोयी आज गावागावातही दिसत आहेत. उद्योगही निर्माण झाले आहे. तसेच काही मोठ्या शहरात मोठमोठे सरकारी रुग्णालये देखील.
शिक्षणाच्या सुविधाही गावागावात पोहोचल्या आहेत. नदीवर भव्यदिव्य पुलाचे निर्माण केले गेले आहेत. विज्ञानाच्या बाबतीतही देश आघाडीवर आहे. आज देश चंद्रावर पोहोचलेला आहे. हेच नाही तर देशानं कित्येक अणूबाँब बनवले आहेत आणि कितीतरी प्रमाणात अणूबाँब बनवले आहे. आज देश महासत्ता बनण्यास तयार आहे. त्याचं कारण म्हणजे गतकाळातील नेत्यांनी घेतलेली मेहनत. ती मेहनत एवढ्या प्रमाणात घेतली की विचारता सोय नाही. तसे नेते आज दिसत नाहीत. त्यांची वानवा जाणवते. मात्र असं निश्चीतपणानं म्हणता येईल की आजच्या नेत्यांनीही त्यांच्यासारखंच बनण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्यावर ताशेरे न ओढता. जेणेकरुन देशाचा अतिशय उच्च कोटीचा विकास होवू शकेल. गतकाळात असेही काही राजकारणी होवून गेलेत की ज्यांनी केवळ आणि केवळ आपल्या देशासाठीच काम केले. जोही उत्पन्नाचा पैसा यायचा. त्या पैशानं आपलं घर भरलं नाही. तर त्या पैशातून आपल्या देशाचा विकास केला. म्हणूनच ही भरभराट दिसते आहे. मात्र काही मध्यंतरीच्या काळात काही नेत्यांनी भ्रष्टाचार करीत मंत्री बनल्यावर देशाचाच पैसा खाल्ला नव्हे तर जनतेचा पैसा खाल्ला. आपल्या परीवारांना सशक्त बनविण्यासाठी. त्यांनी भ्रष्टाचार केला व नेत्यांच्या पुर्वी असलेल्या स्वच्छ प्रतिमेवर कलंक लावला. खरं तर नेते बनल्यावर अशा प्रकारचा देशातील पैसा त्या नेत्यांनी खायला नको होता.
आज भारत स्वतंत्र्य आहे व या स्वतंत्र्य भारतातील आजचे काही नेते बरळतात की गतकाळातील बऱ्याच नेत्यांनी भ्रष्टाचार केला, पैसा खाल्ला. ठीक आहे. भ्रष्टाचार केला, पैसा खाल्ला. परंतु तो पैसा कोणी खाल्ला? असा प्रश्न उपस्थीत झाल्यास एक प्रश्न हाही निर्माण होतो की ज्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेस देशाजवळ किती प्रमाणात पैसा होता? शिवाय असंही म्हटलं जातं की कालपर्यंत असा पैसा खात असतांना देशाचा विकासच झाला नाही. मग देशाचा विकासच झाला नाही तर आज जे गावं न् गाव रस्त्यानं जोडलेली दिसतात, ती कोणी जोडली? आज गावागावात शाळा दिसतात, त्या कोणी निर्माण केल्या? आज गावागावात सिंचनाचे प्रकल्प दिसतात, ते कोणी निर्माण केले? तसेच काल अवकाशात गेलेला आर्यभट्ट कोणी पाठवला? गावागावात वीज कशी पोहोचली? खरं तर भारत स्वतंत्र्य झाला तेव्हा आपल्या देशाची हालत खस्ता होती. सारेच प्रश्न आ वासून उभे होते आपल्यासमोर. परंतु तत्कालीन नेत्यांनी एवढी मेहनत केली भारताला उभारणी देण्यासाठी की त्याची कल्पना आपण करु शकत नाही. शिवाय आपल्या भारतानं विकास करु नये म्हणून आपल्याच उरावर बसलेला पाकिस्तान चीनच्या माध्यमातून आपल्याला नेस्तनाबूत करु पाहात होता. परंतु त्यांनाही मात देत देशानं त्यांनाही चूप बसवलंच होतं. म्हणून देशाचे नेते त्याकाळचे कोणतेही का असेना, त्यांच्यावर ताशेरे ओढणे बरे नाही. असे ताशेरे ओढण्यापेक्षा आपण काय करतो याकडे प्रत्येकानं लक्ष द्यावं. आपण त्यांच्या तोडीचं काम आधी करावं. मगच बोलावं. कारण विकास झालेला आहे आणि तोही भरपूरच झालेला आहे. शिवाय विकास झालेला असण्याची बाब सत्य आहे. त्यात किंचीतही असत्यता नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०