कामीनी ट्रॅव्हल - भाग २२ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

  • गोळ्याचे सांबार

    🟡गोळ्यांचे सांबार🟡माझी आई नोकरीवाली होतीपण अनेक पदार्थात तिच...

श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग २२

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २२

मागील भागात आपण बघीतले की प्राची छान स्वप्नात मश्गूल असताना कोणाचा तरी तिला फोन आल्याने ती भानावर आली. कोणाचा फोन आला असेल? बघू या भागात

फोन कोणाचा आहे म्हणून प्राचीने बघीतलं तर स्क्रीन वर नाव नव्हतं नुसताच नंबर दिसला तरी प्राचीने फोन घेतला,

" हॅलो…" प्राची म्हणाली.

" मॅडम मी पटेल इनव्हेस्टमेंट मधून बोलतेय.आपण प्राची मॅडम बोलताय?"

समोरून त्या मुलीने प्राचीला विचारलं.

" हो पण मी सध्या मिटींग मध्ये आहे. मला तुर्तास तरी काही इनव्हेस्ट करायचं नाही.साॅरी."

" ओके मॅम नो प्राॅब्लेम.थॅंक्यू." समोरून फोन कट झाला.

प्राची मधील अभिसारीकेचा फार हिरमोड झाला.खूप सुंदर स्वप्नात ती रममाण झाली होती.त्याचा विचका या फोनचे केल्यामुळे तिला जरा रागच आला.

" वेळ काळ बघत नाहीत केव्हाही फोन करतात." प्राची स्वतःशीच पुटपुटली.नंतर क्षणात तिला तिच्यावर हसू आलं

" या लोकांना कसं माहिती असेल मी स्वप्नं बघत होते. साॅरी फोनवरील बाई तुझ्यावर उगीच चिडले."

अजूनही प्राचीच्या चेहे-यावर आपल्या बालिशपणा बद्दलचं हसू होतं. तेवढ्यात प्राचीच्या केबिनच्या दारावर टकटक झाली.

" यस…कोण आहे?" प्राचीने विचारलं.

"मॅडम मी प्रिया.आत येऊ?"

हळूच दार उघडत प्रियाने विचारलं.

" हा ये. किती वाजले?"

"मॅडम साडेतीन वाजले. मी तुकारामाच्या मदतीने तुमच्या केबिनमध्ये बसण्याची व्यवस्था करते."

" हो कर." एवढं बोलून प्राचीने घरी कामीनी बाईंना फोन लावला.

प्रिया तुकारामांचा बोलवायला गेली.

" हॅलो." कामीनी बाईंनी फोन उचलत म्हटलं.

" आई, आता थोड्यावेळाने आपल्या ऑफीसमध्ये त्या प्रवाशांना बोलवलं आहे.ज्यांना घेउन आपण आपल्या कामीनी ट्रॅव्हल्सची जाहिरात करणार आहोत.

" होका. खूप शुभेच्छा. मिटींग छान होऊ दे.तुझी कल्पना वेगळी आहे आणि मला वाटतं अशी जाहिरात बघून लोकांना कामीनी ट्रॅव्हल्स बरोबर जाण्याची इच्छा होईल."

" तसंच होवो.आई जोपर्यंत मिटींग चालू आहे तोपर्यंत मी माझा फोन सायलेंट वर ठेवीन. यादव पण मिटींगमध्ये असणार आहेत त्यामुळे त्यांचा पण फोन सायलेंट वर असेल. काही गरज लागलीच तर ऑफीसमध्ये लॅंडलआईनवर करा फोन."

प्राची म्हणाली.

" ठीक आहे.सांगीतलस बरं केलं.तशी गरज तर काही लागणार नाही पण तरी लागली तर लॅंडलआईनवर फोन करीन. मिटींगची सगळी तयारी झाली का?"

" हो. प्रिया तुकारामाच्या मदतीने खुर्च्या मांडतेय.आई मी फोन ठेवते. घरी आल्यावर मिटींग कशी झाली ते सांगीन."

" हो चालेल.मिटींग छानच होणार आहे.तू काळजी करू नकोस."

दोघींनी फोन ठेवला.

***

मिटींग चार वाजता सुरू झाली. मिटींगला येणारे सगळे चार वाजेपर्यंत हजर झालेले बघून प्राचीला बरं वाटलं. कुणाला परत फोन करण्याची गरज भासली नाही.

सगळेजण खुर्चीवर बसल्यावर यादवने बोलायला सुरवात केली.

" नमस्कार मी किशोर यादव. मी कामीनी ट्रॅव्हल्स सुरू झाल्यापासून या कंपनीत आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे.आमच्या ऑफिसच्या टूर प्लॅनिंग विभागाच्या प्रिया हणमंते मॅडम आपलं स्वागत करतील."

यादवने असं म्हणताच प्रियाने सगळ्यांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत केलं. त्यानंतर यादव पुन्हा बोलू लागला.

"आपण सर्वांनी आमच्या कामीनी ट्रॅव्हल्स बरोबर प्रवास केला आहे. तुम्ही नेहमीच आमच्या उत्साह वाढेल असाच प्रतिसाद देता. कामीनी ट्रॅव्हल्सचा नेहमी असा प्रयत्न असतो की प्रवासात काही तरी वेगळेपण असलं पाहिजे.ठरावीक पद्धतीने प्रवाशांना त्या भागाचा प्रवास घडविण्यापेक्षा तोच प्रवास रंजक होईल अशा पद्धतीने घडवला तर प्रवाशांना दुप्पट आनंद मिळेल आणि नेहमीसाठी तो प्रवास लक्षात राहील.

आज आपण इथे वेगळ्या कारणासाठी जमलो आहोत.त्यावर चर्चा करायची आहे. तुम्ही जाणताच की टूर्स अँड ट्रॅव्हल्स या व्यवसायामध्ये की स्पर्धा वाढली आहे. इतर टूर्स अँड ट्रॅव्हल सारखे आम्ही प्रवाशांना कुठलीही अवास्तव गोष्टी कबूल करत नाही. प्रवाशांना आमच्या टूर कडे खेचून घेण्यासाठी आम्ही कधीच चुकीच्या गोष्टी करत नाही. आमच्या टूरची जाहिरात वेगळ्या पद्धतीने करण्याची कल्पना प्राची मॅडमची आहे. ती कल्पना मॅडम स्वतः आपल्यासमोर मांडतील. मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपली कल्पना मांडावी."

एवढं बोलून यादव खुर्चीवर बसला आणि प्राची बोलायला उभी राहिली.

" नमस्कार. आज तुम्ही कबूल केल्याप्रमाणे इथे आलात आणि ठरलेल्या वेळेत आलात त्यामुळे आमचा उत्साह वाढला. त्यासाठी आम्ही सगळे तुमचे ऋणी आहोत.

मी माझी कल्पना तुमच्या समोर मांडते.तशी थोडीफार कल्पना तुम्हाला आली असेल. कारण यादवसर तुमच्याशी फोनवर बोलले आहेत. मी जरा सविस्तर ती कल्पना सांगते.

व्यवसाय वाढविण्यासाठी तसंच आपल्या व्यवसायाची कल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येक व्यावसायिक आपल्या व्यवसायाची जाहिरात करत असतो.आम्हीपण करतो. यावेळेस माझ्या मनात आलं की आमच्या कामीनी ट्रॅव्हल्स तर्फे प्रवास करणारी कोणी सेलिब्रिटी व्यक्ती जाहीरातीत न दाखवता,त्या सेलिब्रिटी लोकांनी आमच्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा म्हणून इतर लोकांना सांगण्याऐवजी आमच्या बरोबर प्रवास केलेल्या लोकांनी जर जाहीरातीत आपला अनुभव सांगितला तर तो लोकांना पटेल. कामीनी ट्रॅव्हल्स ची विश्वासार्हता पटेल.

तुम्ही जसे तुमच्या घरात वावरता तसाच वावर जाहिरातींमध्ये दाखवायचा आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवायचा. तो परिसर कदाचित काही लोक ओळखतील. त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना कामीनी ट्रॅव्हल्स बद्दल माहिती कळेल.

सेलिब्रिटी टच नसलेली जाहीरात बघून लोकांचं कुतूहल वाढेल असा आमचा अंदाज आहे. त्या कुतूहलाने ते कामीनी ट्रॅव्हल्स बद्दल चवकशी करतील. हे आमचे अंदाज आहेत. या जाहीरातीमुळे फायदा कदाचित उशिरा होईल पण तोटा मात्र नक्कीच होणार नाही. कोणतीही नवीन गोष्ट लोकांच्या पचनी पडायला वेळ लागतो.

तुमची हरकत नसेल तर आम्ही तुम्हाला आमच्या जाहिरातींमध्ये सामील करून घेऊ. तुमच्या सोयीची वेळ आणि दिवस ठरवू. तुमच्या घरी आपण जाहीरात शूट करु. तुमच्या घरी यासाठी शुटींग करायचं की तुम्ही तुमच्या घरात मोकळेपणाने वावरावं.तुम्हाला शुटिंगचं टेन्शन येणार नाही.कॅमेरासमोर जेवढा बेसिक मेकअप लागतो तेवढाच करायचा.

कपडे तुमच्या आवडीचे घरात वापरायचे असे हवेत. लग्नसमारंभासाठी वापरतो तसे नको. तुम्ही जाहीरातीत काय संवाद बोलायचे त्यासाठी आम्ही संवाद लेखक नेमणार आहोत. तो संवाद लिहिण्यापूर्वी तुम्हाला भेटेल. तुमच्याशी बोलेल. तुम्हाला सोयीचे असणारे, तुम्ही रोज बोलत असेल असे शब्द तो लिहीलं. हे यासाठी करायचं कारण आपण घरगुती वातावरणात जाहीरात शूट करणार आहोत.

घरगुती वापरातील शब्द, तुमचा घरगुती वेश आणि तुम्ही घरातील काम करताना जाहिरात बघणा-या प्रेक्षकांना तुमचा अनुभव सांगणार आहात. तुम्हाला कोणीतरी प्रश्न विचारेल.कसा? तर तुमचा ‌मित्र किंवा मैत्रीण विचारेल असा. त्याला तुम्ही जे उत्तर द्याल ते उत्तर म्हणजे आपली जाहिरात असेल. कळलं?"

एवढं बोलून प्राची थांबली.

यादवने प्रियाला खूण केली तशी ती केबीनबाहेर गेली. थोड्याच वेळात ती चहा,काॅफीचे कपाचे ट्रे घेतलेल्या तुकारामसह केबिनमध्ये शिरली.प्रत्येकाला तुकारामने चहा किंवा काॅफी दिली.

एक गृहस्थ उठून बोलू लागले,

"नमस्कार मॅडम मी सुधाकर भावे. तुमची कल्पना मला आवडली. ही नावीन्यपूर्ण कल्पना आहे. नेहमी दिसणारी सरधोपट जाहीरात ही नसेल. मॅडम आम्ही करू या जाहीरातीत काम."

" हो मॅडम मलासूद्धा ही कल्पना आवडली. नमस्कार मी कुमूद भावे."

" नमस्कार. तुम्ही दोघं बसलात तरी चालेल. इतरांना बोलायचं असेल तर बसून बोला हरकत नाही." प्राची खुर्चीवर बसत म्हणाली.

" नमस्कार मै अरुण शहा. मुझे भी आपकी ये कन्सेप्ट अच्छी लगी. मुझे और मेरे वाईफको इस ॲडव्हर्टाइजमे काम करना अच्छा लगेगा परंतु मराठी बोलनेमे थोडी रिक्त आयेगी."

" कोई बात नहीं. आपके लिये हम हिंदी में संवाद लिखेंगे. हमारे ॲडव्हर्टाइजमेंटमे अगर अलग भाषा बोलनेवाले लोग होंगे तो और अच्छा होगा. आपके संवाद हम हिंदी गुजराती मिक्स ले सकते हैं. उसका आपके गुजराती लोगोंपर अच्छा असर होगा."
प्राची हसून म्हणाली.

" जी बिलकूल सही कहा आपने." अरूण शहा म्हणाले.

" मॅडम मै शकुंतला शहा. हमारे कुछ टिपीकल गुजराती वर्ड हम लोग युज करेंगे तो और इफेक्ट होगा

" हां बिलकूल सही कहां आपने. जो संवाद ‌लिखेगा वो आपको पूछकर ये वर्ड लिखेंगे .कोई प्राॅब्लेम नही."

" मॅडम मी अनिकेत कुळकर्णी. मला सांगावं वाटतंय ते सांगीतलं तर चालेल का?"

" कुळकर्णी साहेब जरूर सांगा. ही जाहीरात करतांना आपल्या सगळ्यांच्या कल्पना त्यांच्यात आल्या तर ती लोकांना जास्त खरी आणि जवळची वाटेल. सांगा तुम्ही."

बोलावलेल्या लोकांचा सहभाग बघून प्राची मनातून खूप आनंदली.

"सगळ्यांनी प्रवासाचा अनुभव सांगण्याऐवजी कोणतरी तुमच्या येणा-या पुढल्या टूरचं बुकींग केलंय आणि ते प्रवासाची तयारी करतात आहे असंही दाखवू शकतो. म्हणजे त्यांनी बोलताना काय वस्तू घेतल्या आहेत. प्रवासात कोणते कपडे लागणार आहेत. कदाचित ती जाहीरात बघून लोकांना कशी आणि काय तयारी करावी लागते हे पण कळेल. असं मला वाटतं."

" तुमची कल्पना चांगली आहे. आपण यावर विचार करू शकतो." प्राची म्हणाली.

" मॅडम नमस्ते मै रूस्तम सोनावाला. मुझे लगता है हिंदी और गुजराती के साथ हमारी पारसी भाषामे और अदर साऊथ इंडियन लॅंग्वेज मेभी ॲड बनाई जाए तो कैसा रहेगा?"

" मिस्टर सोनावाला आपका विचार अच्छा है. परंतु साउथ की भाषामे लिखनेवाला मिलना चाहिए."

यावर यादव म्हणाला,

" मॅडम त्याची चिंता करू नका.आपण तो लेखक पण हायर करू शकतो. काही थिएटर गृपमधून या लोकांची लिंक मिळेल."

" साउथच्या भाषेत लिहिणारा लेखक मिळाला तर चांगलं आहे.आपले कोणी साऊथचे प्रवासी आहेत का बघा?"

" मॅडम त्याची गरज नाही. साऊथचे आर्टिस्ट पण हायर करता येतील."

" ते बघा तुम्ही."

" हो मॅडम." यादव म्हणाला.

" तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर सांगा." प्राचीने सगळ्यांना विचारलं.

" मॅडम त्याची काही गरज वाटत नाही. तुम्ही कळवा आम्हाला. त्यावेळी कधी जमेल तसं सांगू." भावे म्हणाले.

" चालेल. तसं मग आमच्या ऑफिसमधून तुम्हाला फोन येईल." प्राचीने सगळ्यांना सांगीतलं.

" मिटींग संपली असेल तर आम्ही निघू शकतो का?"
अनिकेत कुळकर्णींनी विचारलं.

"मॅडम मिटींगमध्ये सगळं बोलणं झालंय का?" यादवने विचारलं.प्राचीने होकारार्थी मान हलवली.

"मंडळी तुम्ही सगळे वेळेवर आलात आणि मोकळेपणाने चर्चेत सहभागी झालात त्या बद्दल कामीनी ट्रॅव्हल्स तर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो. जाहीरातीचं शूट कधी होईल त्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला लवकरच मिळतील. आपली आजची मिटींग संपली असं मी जाहीर करतो."

यादवच्या या बोलण्यावर सगळे उठून उभे राहिले.प्राची आणि यादव यांना नमस्कार करून कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसबाहेर पडले.

" मॅडम आजची मिटींग जबरदस्त झाली."

"हो यादव खरच आजची मिटींग छान झाली.सगळ्यांनी चर्चेत छान सहभाग घेतला त्यामुळे आपल्याला उत्साह आला. पुढचं सगळं काम यादव लवकर करावं लागेल.ते इतर भाषेतील आर्टिस्ट शोधा आणि त्यांना किती मानधन द्यायचं ते बघा. त्यांना आपली कल्पना सांगावी लागेल."

" हो मॅडम . लवकर सगळ्या गोष्टी पूर्ण करून तुम्हाला सांगतो." यादव म्हणाला.

" ठीक आहे.मग आता तुम्ही लागा तुमच्या तयारीला."

यादव आणि प्रिया दोघंही केबीनबाहेर गेले.

प्राची आज खूपच आनंदली.

आनंदाने प्राचीने फोन लावला.
__________________________________
क्रमशः प्राचीने आनंदाने कोणाला फोन लावला असेल? प्राचीची ही जाहिरातीची नाविन्यपूर्ण कल्पना यशस्वी होईल? बघू पुढील भागात.
लेखिका…मीनाक्षी वैद्य.