हम साथ साथ है - भाग ४ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • नियती - भाग 24

    भाग -24पण एक दिवस सुंदर तिला म्हणाला...."मिरा.... आपण लग्न क...

  • लोभी

          "लोभी आधुनिक माणूस" प्रस्तावनाआजचा आधुनिक माणूस एकीकडे...

  • चंद्रासारखा तो

     चंद्र आणि चंद्रासारखा तो ,जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे....च...

  • दिवाळी आनंदाचीच आहे

    दिवाळी ........आनंदाचीच आहे?           दिवाळी आनंदाचीच आहे अ...

  • कोण? - 22

         आईने आतून कुंकू आणि हळदची कुहिरी आणून सावलीचा कपाळाला ट...

श्रेणी
शेयर करा

हम साथ साथ है - भाग ४

हम साथ साथ है भाग ३मागील भागावरून पुढे…

रात्री सगळे म्हणजे दीपक, दीपकचे वडील सुभाषराव,आई निलीमा बहीण रेवती आणि तिचा नवरा प्रवीण असे सगळे जेवायला बसले होते. सुलभाला यायला उशीर होणार होता त्यामुळे कोणी जेवायला थांबू नका असं तिने सांगीतलच होतं.

"मला अजीबात आवडत नाही हिच्या हातचा स्वयंपाक." निलीमा म्हणजे सुलभाच्या सासूबाई. म्हणाल्या

"मला सुद्धा आवडत नाही." रेवती म्हणाली.

"काय बोलतेस निलू तू. किती छान वांग्याचं भरीत केलंय."

"उगीच काहीतरी बोलू नका सुलभा वर इंप्रेशन मारायला बोलू नका."

"मी कशाला तिच्यावर इंप्रेशन मारीन. इंप्रेशन मारायचं असेल तर तुझ्यावर मारीन पण तशी वेळ येत नाही."

गंभीरपणे सुभाषराव म्हणाले. पण यावर दीपक आणि प्रवीण दोघंही हसले.

"हसण्याची काही गरज नाही." निलीमा गरजली

"आई ही बाई स्वयंपाक छान करते. सुलभा वहिनींच्या हाताची चव नाही पण अगदी टाकाऊ पण नाही."  प्रवीण म्हणाला.

"सुलभाचं कौतुक केलं की जमतं सगळं हे तुला छान कळलय प्रवीण त्यामुळे तू काहीच बोलू नको."

"अगं प्रवीण जावई आहे आपला. तो खोटं थोडीच बोलतोय."

"कळतंय मला."

"तुला स्वयंपाक करावा लागतोय का? मग जेव नं नीट. प्रत्येकाची स्वयंपाक करण्याची पद्धत वेगळी असते."

"आई अग ही बाई इतका बेचव स्वयंपाक नाही करत. ऊगीचच कशाला विरोधाला विरोध करते. मला कळतंय सुलभा नी स्वयंपाकीण ठेवली म्हणून तू आणि रेवती त्यात खोड काढताय."

"अजीबात नाही."  निलीमाचा आवाज चढताच होता.

"तसंच आहे.सुलभाने काही केलं की त्याला विरोध करायचाच हे मी सात वर्षांपासून बघतोय."‌ दिपक जरा रागानेच बोलला कारण त्याचं म्हणणं खरं होतं.

"दीपक तू जेव. या दोघींकडे लक्ष देऊ नको. निलू तुला जर हिच्या हातचा स्वयंपाक आवडत नाही तर या बाईला काढून टाकू तू कर स्वयंपाक."

"मी अजीबात स्वयंपाकघरात जाणार नाही. हल्ली माझे किती गुडघे दुखतात तुम्हाला माहिती आहे नं."

"बाबा या सुलभा वहिनीला स्वयंपाक करून ऑफीसला जायला काय होतं?" रेवती फणका-याने बोलली.

"रेवती सुलभाच रोज स्वयंपाक करते आणि मग ऑफीसला जाते. तू काय करते? तिला कधी मदत केलीस?" दिपकने रेवतीला प्रश्न केला.

"मला कुठे सकाळी वेळ असतो? प्रवीणचा डबा करायचा असतो."

"हो पण तो सकाळी. प्रवीण ऑफीसमध्ये गेल्यावर तू इथे पडीकच असते. तू आणि आई काय काम करता ते माहिती आहे. त्यापेक्षा संध्याकाळचा स्वयंपाक तू करत जा सुलभाला  जरा आराम मिळेल."

"मी कशाला करू.मी या घरची सून थोडीच आहे?"

" म्हणजे काय सूनेनेच सगळं करायचं असा नियम आहे का?" दीपक चिडून बोलला

"अरे पण तू मुलगी आहेस नं या घरची! दिवसरात्र इथेच राहायचं तर मदत नको करायला?"  प्रवीण रागातच बोलला.

"अरे प्रवीण शांत हो." सुभाषराव म्हणाले.

"बाबा मला रोज याच गोष्टीचा राग येतो. दिवसभर इथे नुसती आळश्यासारखी लोळत असते. डब्यात देते ती पोळीभाजी खाण्यालायक नसते. अन्नाचा अपमान नको म्हणून पाण्याबरोबर गिळतो. माहेरीच असते नोकरीही करत नाही मग त्या वेळेत स्वयंपाक तरी शीक. आज बोललो विषय निघाला म्हणून."प्रवीण नाराजीनेच बोलला.

प्रवीणच्या बोलण्यावर रेवतीने रडणं सुरू केलं.लगेच तिचे डोळे पुसायला तिची आई धावून आली.

"प्रवीण का रागावलं  तिला? "

"बरोबर केलं प्रवीणनी. इतकी वर्ष मला जमलं नाही."सुभाषराव

"काय बरोबर बोलला. डबा देते नं उपाशी तर पाठवत नाही."

"अगं निलू तो डबा खाण्यालायक असायला हवा नं? तसंही आडात नाही तर पोह-यात कुठून येणार?"

"कळतं मला सगळं." निलीमा म्हणाली.

"अरे वा तुला कळलं. आनंद वाटला." इती सुभाषराव

या सगळ्या वादावादीपासून दीपक जरा बाजूला गप्प बसला होता. कारण आई आणि बहिण दोघींचेही स्वभाव त्याला माहिती होते.

तेवढ्यात सुलभा आली. जेवताना सगळे बसलेले दिसले पण जेवताना गंभीर वातावरण आहे ते का आहे याकडे तिचं फारसं लक्ष गेलं नाही. कारण असं वातावरण पुष्कळदा असायचं. सुलभाला बघताच दीपक म्हणाला

" सुलू ये तूपण लवकर जेवायला."

" हो. हातपाय धुवून येतेच." सुलभा म्हणाली.

" सुलभा  ऑफीसमधून आलेली आहे.आतामला जेवणाच्या टेबलावर कोणतेही वाद नको. मुकाट्याने जेवण झालं पाहिजे. कळलं." सुभाषरावांनी फर्मान काढलं.

"आज काय वांग्याचं भरीत केलेलं दिसतंय. रंग तर छान आलाय." सुलभा जेवायला बसताना म्हणाली. सुभाषरावांनी तंबी दिल्यामुळे सगळे गप्प होते." आवडलं नाही का? बरी करते नं ही बाई स्वयंपाक?" सुलभा ने विचारलं.

" अगं बाईंनी भरीत छान केलं आहे.मला माहिती आहे तू अशी तशी बाई आणणार नाहीस." सुभाषराव म्हणाले.

"माझी मैत्रीण म्हणालीच होती बाई छान स्वयंपाक करते म्हणून. म्हणजे आता काही दिवस प्रश्न नाही स्वयंपाकाचा मीही निश्चीत"

"हो वहिनी. तुम्ही निश्चीत रहा. प्रमोशन झाल्यानंतरचा हे पहिलंच ऑडीट आहे.तुम्ही ऑफीसमध्येच लक्ष द्या." प्रवीण म्हणाला.

एकंदरीत मघाचा जेवणाच्या टेबलावर लागलेला सूर आता निवळला होता.शांतपणे सगळे जेवत होते.__________________________क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागातलेखिका.. मीनाक्षी वैद्य