हम साथ साथ है - भाग १० Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

हम साथ साथ है - भाग १०

हम साथ साथ है भाग ९वामागील भागावरून पुढे..

सकाळी उठल्यापासून सुलूची लगबग चालू होती. दीपक नेहमीप्रमाणे कंपनीच्या बसने निघून गेला होता. आज सकाळी उठताच सुलूला वाटले होते रोज असा रूक्ष दिवस का उगवतो? रोज सकाळी उठल्यापासून रूक्षपणे तीच तीच कामे करायची. वेगळं काही वाटेल असे घडायचं नाही. आता स्वयंपाकाला बाई असल्यामुळे तिचं एक काम कमी झालं होतं.

सुलूला रोजचा दिवस गेलेल्या दिवसापेक्षा वेगळा हवा असायचा. हसरा चुणचुणीत, पण छे! “आपल्या नशिबी कुठला असा दिवस यायला..." असे कातावतच म्हणायची.

आत्तासुद्धा असे स्वतःशी बडबडतच तिनं डबा भरला अचानक तिला वाटलं डब्यात लोणचं न्यावं. या वाटण्यानेच तिला खूप बरं वाटलं. चला डब्यात पोळी भाजी बरोबर काहीतरी वेगळं न्यावंसं वाटलं.. या आनंदातच तिनं लोणच्याची बरणी उघडली. आपला पिशवीत ठेवलेला डबा काढला आता त्यात ती लोणचे भरणार तोच तिच्या कानावर शब्द आदळले.

"शेजारच्या गर्दे वहिनींच्या सुनेला म्हणे आजकाल रोज आंब्याचे लोणचे खावेसे वाटू लागले आहे.” सासूबाईंचा डायलाॅग.

झालं... वेगळं काही वाटल्याचा सुलूला झालेला आनंद क्षणात विरला.

सासूबाईंकडे न बघताच  सुलभानी लोणच्याची बरणी बंद केली. सासूही आपण काही खूप बोललोय असे न दाखवता एकीकडे औषध घेत घेत ठसक्यात बोलली.

"मी फक्त शेजारच्या घरातील नवीन बातमी सांगितली त्यावर नको एवढं चिडायला."

सासूच्या या वाक्यावरही फार काही न बोलता सुलूने डब्याची पिशवी नि पर्स घेतली नि ऑफिसला निघाली. दीपकचं पटलं नाही तरी अशावेळी न बोलणं खूप शहाणपणाचं  असतं हे आता तिलाही कळू लागले होतं.

***

घरच्यापेक्षा सुलूला ऑफिसमध्ये आवडायच. कारण बऱ्याच नव्या नव्या गोष्टी कळायच्या. वेगळ काहीतरी कळत म्हणून तिला ऑफिस आवडायचं. आपल्या कामात मात्र सुलू वक्तशीर होती.

“मिसेस देशपांडे तुमचा फोन”

असा चपराश्याने तिला निरोप देताच ती चपापली. सुलभाचं प्रमोशन झालं तसा तिच्या टेबलवर फोन लागला पण त्याचा नंबर तिने घरच्यांशिवाय अजून कोणाला  दिला नव्हता. आज हा फोन रिसेप्शनीस्टकडे आला  होता.

आपल्या रूक्ष आयुष्यात कोण बरे ऑफिसमध्ये आपल्याला फोन करणारा महाभाग आहे? फोनजवळ जाता-जाता अनेक नावे तिच्या डोक्यात येऊन गेली. फोन घेतानांही ती जरा संभ्रमातच होती.

"हॅलो... कोण बोलतंय? मी श्रीधर."

"कोण श्रीधर…!अरे हां ओळखलं मी. पण तुम्ही ऑफीसमध्ये फोन कराल असं वाटलं नव्हतं. म्हणून लक्षात यायला वेळ लागला.कधी आलात?"

“आलो परवाच. पण इथे चार्ज घेण्याच्या गडबडीत तुम्हाला फोन करायचा राहून गेला. दीपक काय म्हणतोय?"

“मजेत...” अचानक सुलूच्या डोक्यात प्रकाश पडला नि तिला कल्पना सुचली आपण श्रीधरची मदत घ्यावी का?

"हॅल्लो... वहिनी काय झाले? बोलत का नाही?"

“अं ..श्रीधर तुम्ही मला एक दोन दिवसात दुपारच्या सुटीत भेटाल?जेवणाच्या सुट्टीत."

“काम आहे का?" श्रीधर ने विचारले.

“हो तसं जरूरीचे आहे. या दोन दिवसांत तुम्ही आमच्या घरी येऊ नका.आधी मला भेटा." सुलभा म्हणाली.

“ठीक आहे. नक्की भेटेन. तेव्हाच बोलू..." म्हणत श्रीधरने फोन ठेवला.

सुलू आपल्या विचाराच्या नादात टेबलवर येऊन बसली. श्रीधर हा दीपकचा लहानपणचा खास मित्र होता. तो नुकताच त्यांच्या गावातील सरकारी दवाखान्यात बदलून आला होता.

डॉक्टर होता तो. आपल्या ट्रिटमेंटबद्दल याची मदत घ्यावी असे तिच्या मनात आलं. कारण मागच्या महिन्यात डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं,

"तुमच्यातला दोष जवळपास दूर झालाय. एखाद दोन महिने औषध घेतलत की पूर्ण दूर होईल. पण मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या मिस्टरांनी स्वतःची तपासणी करून घेतली का?" डॉक्टरांना नाही म्हणून सांगताना सुलभाला लाजीरवाणी झालं.

"अहो तुमच्यासारखे सुशिक्षित लोक तपासणीसाठी नाही म्हणतात तर त्या अशिक्षीतांना काय म्हणावं?"

असं डाॅक्टर म्हणाल्यावर तिला फार कानकोंडल्यासारखे झालं.

"तुमच्यात जो दोष होता तो दूर होत आलाय. पण तुमच्या मिस्टरांच्या तपासणीनंतर कळेल नं. मूल न होण्याचे कारण त्याच्यात दोष नसेल तर उत्तमच. जर दोष असेल तर जन्मभर तुम्ही वाट बघितली तरी काय फायदा? "

सुलूला डॉक्टरांच्या बोलण्याचा राग आला नाही. तिला दिपकच्या विचारांचं आश्चर्य वाटलं. एरवी एवढा समजूतदारपणे वागतो. त्याच्या तपासणीची गोष्ट निघाली की मूग गिळून बसतो. हा सगळा सासूबाईंचा प्रभाव आहे हे तिच्या लक्षात आलं. काहीतरी करायला हवं हेही तिच्या लक्षात आलं.

__________________________क्रमशः  भाग ९वालेखिका…मीनाक्षी वैद्य