अपराधबोध - 13 Gajendra Kudmate द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपराधबोध - 13

आता सारांश पुढे बोलू लागला, "तर तो प्रसंग आहे त्याच रात्रीचा आहे शर्वरीने माझ्या मनाशी आणि शरीराशी जे अश्लील वर्तन केले त्यामुळे मी माझे भान हरवून गेलो होतो. माझा स्वतःवरचा ताबा सुटू लागला होता म्हणून मी ताकाळ माझा घरी नीघून गेलो. तीने माझ्या शरीरातील दबलेल्या आगीला पुनर्जीवीत केले होते त्यामुळे मी फारच बेचैन होतो. मी रात्री झोपू शकलो नव्हतो, म्हणून मी रात्रीला १२ वाजल्या नंतर माझ्या गच्चीवर जाऊन बसलो होतो, तर रात्रीला १२.३० च्या दरम्यान शर्वरी चादर पांघरून अंधारात गुपचुप आली होती. मी तीला चोर समजुन तीला धरले आणि जेव्हा तीची चादर काढली तर मला कळले की ती शर्वरी आहे. मी तीला त्या वेळेस गच्चीवर येण्याचे कारण वीचारले तर ती मला म्हणु लागली की मी तीचासाठी गचीवर फिरत आहे आणि मी जर तीला म्हटले असते तर ती वेळेचा आधी आली असती. मी काही दिवसापासून बघतो आहे तीचे मन हे अती चंचल आहे आणि ती परिसरातील कुणाही तरुणाचा आकर्षणाला बळी पड़ते. यामुळे तुमचे आणि तुमचा घराण्याचे नाव खराब होऊन राहिले," आता मात्र तेथे शांतता पसरलेली होती.

   थोड्या वेळेने श्वेता बोलली, " सारांश तु जे काही बोललास हे १०१ % खरे आहे. मी सद्धा स्वतःचा डोळ्यांनी पाहिले आणि बरेचदा अनुभवले आहे. यात माझीच चुक आहे, हे सगळ माझ्यामुळेच घडत आहे. मी माझ्या फाजिलचा अतीविश्वासाला बळी पड़लेली आहे. माझ्यामुळे माझ्या भावाचे आयुष्य उध्वस्त होण्याचा मार्गावर लागले आहे. म्हणून मी त्याचे प्रायश्चित्त करण्याचे ठरवले आहे. माझ्यामुळे शेखरचा संसार उध्वस्त होत आहे म्हणून मी माझा संसार थाटणार नाही ,मी आजन्म या अपराधाचे प्रायश्चित्त करणार आहे. माझ्या निर्णयाचे मूळ कारण तुझापुढ़े अनभिग्यपणे आले याचा मला आनंद आहे. आता मला आणखी काही जास्त बोलावे लागणार नाही आणि तुला तुझा प्रश्राचे उत्तर सहज मिळून गेले असेल" असे बोलून श्वेता उदास होऊन ढसाढसा रडू लागली होती. सारांश आता श्वेताला बघून अधिक भावुक आणि अस्वस्थ होऊ लागला होता. तो तीचा जवळ गेला आणि तीचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन म्हणाला, ' किती तरी त्याग करशील तू दुसऱ्यांचासाठी, अग तू काही थोर महात्मा नाही आहेस. तू फ़क्त आणि फ़क्त एक सामान्य स्त्री आहेस. तू आजवर जे काही करत आलीस तुझ्या परिवारासाठी ते सुद्धा फारच मोठे कार्य आहे. शिवाय तू एक स्त्री आहेस हे असे कार्य तर घरातील पुरुषाने करायला पाहिजे ते तू केलेस. स्वतः उन्हाचे चटके सहन करत रहिलीस परन्तु त्यांना मायेची आणि आपुलकीची सावली दिलीस सर्वथा. आता बास झाले परोपकार, अग तुच विचार कर शेखरचा हातून जर असे तुझ्या बाबतीत घडले असते तर तो काय आजन्म तुझ्यासाठी अविवाहित आणि सन्यासी बनुन राहिला असता काय, हे बघ वेळ अजूनही गेलेली नाही आहे, आपण याबद्ल शर्वरी आणि शेखर सोबत बसून बोलू आणि या समस्येवर काय तो उचीत मार्ग काढू."

    सारांशचा त्या बोलण्याने श्वेताला सुद्धा आता वाट्र लागले होते की तीला सुद्धा स्वतःबद्दल वीचार करावा लागेल. मग ते दोघेही घरी जाण्यास नीघाले होते, तेव्हा सारांश श्वेताला म्हणाला, " आता बर वाटते आहे मला, काय तुला हलके झाल्यासारखे वाटत आहे." मग श्वेता बोलली, " मला सुद्धा बरे वाटत आहे. मी आजवर सारखी त्या अपराधबोधाचा जाणीवेने सारखी स्वतःतच घुसमळत होती. त्या त्रासदायक परिस्थितीतून आज खरच मला बाहेर पडल्या सारखे वाट्र लागले आहे. त्याचासाठी मी तुझे फारच आभार मानते रे." असे म्हणून श्वेताने सारांशला मीठी मारली. सारांशने सद्धा तीला भरगच्च अशी कवटाळून मीठी मारली आणि मग हळूच तीचा ओठंवर चुम्बन दिले. आज श्वेताचा मनात कसलाच अपराध्याचा भाव नव्हता आणि त्याचा परीणाम म्हणून तीनेही सारांशचा ओठांवर चुम्बन दिले त्या नंतर ते दोघेही घरी नीघाले. घरी पोहोचल्यानंतर दोघही हसत आनंदात आपापल्या घरी नीघून गेले. सारांश फारच आनंदित होता त्याला आज खर प्रेम भेटण्याचे चीत्र दिसू लागले होते त्या आनंदात त्याला आज झोप येत नव्हती त्याला सारखा राहून राहून काही तासांचा पुर्वीचा श्वेताचा सोबत व्यतीत केलेला क्षण आठवत होता, त्याला आता या क्षणी सुद्धा श्वेताचा आलिंगनाची उब सारखी जाणवत होती. तो क्षण आठवून तो राहून राहून रोमांचित होऊ लागला होता. तर तो तसाच त्या आनंदमय क्षणात गच्चीवर जाऊन इकड़े तीकड़े फिरू लागला होता. 
  
    तो तसाच बेभान अवस्थेत असताना त्याला कुणाचा तरी भास होऊ लागला होता. त्याने सहज श्वेताचा गच्चीवर बघीतले तर तेथे कूणी तरी उभे असलेले त्याला भासले गच्चीवर अंधार होता तरीही त्याला तेथे कुणीतरी आहे म्हणून दिसत होते. सारंशने वीचार केला ती श्वेता असेल म्हणून त्याने ठरवले की गृुपचुप तीचा मागुन जाऊन तीचे डोळ मीटावे आणि तीला सरप्राइज करावे. त्यामुळे तो चोर पावलांनी श्वेताचा गच्चीवर गेला आणि खरच तेथे साड़ी घालून कुणीतरी उभे होते. सारांशने तीचा जवळ जाऊन तीचे डोळे त्याचा हाताने बंद केले होते. सारांशचा स्पर्श तीचा शरीराला होताच ती उत्तेजित होऊन सरळ सारांशचा छातीशी लीपटली. आता सारांशला सुद्धा आवेश आला आणि तो सुद्धा बेध्ंद होऊन तीचा शरीराला लीपटला आता दोघेही उत्तजनाचा प्रवाहात वाहू लागले होते. दोघांचे हात एकमेकांचा शरीराचा प्रत्येक भागावर सरसावू लागले होते. मग ते दोघेही एकमेकाना चुंबन देऊ लागले. दोघेही घामात चिंब ओले होऊन मनसोक्त त्यांचा प्रणयाचा तो क्षण अनुभवू लागले होते मग सारांशने तीचा ओठांवर चुंबन केले तीनेहीं त्याला चुंबन केले. तेवढ्यात सारांशने डोळे उघडले आणि तीला बघताच तो तीचा पासून लांब झाला, ती श्वेता नव्हे तर शर्वरी होती जीचा सोबत सारांश प्रणय क्रीडा करत होता, सारांशला आता फारच घाबरलेल्या प्रमाणे होऊ लागले होते. तो इकडे तीकडे बघू लागला त्याला काय घडले आपल्या हातून याचे फारच वाईट वाटू लागले होते. त्याचा अंगाला थरकाप सूटलेला होता आणि आता काय करावे हे त्याला कळत नव्हते. तो त्या कृत्याचा बोधाने शर्वरी सोबत नजर मीळवायला सुद्धा घाबरू लागला होता.

     शेष पुढ़ील भागात........