मैत्री Ankush Shingade द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मैत्री

मैत्री

         मैत्री कधीही गोडीगुलाबीची असावी.त्यात गोडवा असावा साखरेसारखा.ती उसाप्रमाणे असावी. कितीही पिरगाळला,कितीही ठोकला.तोडला तरी ज्या उसाचा गोडवा कधी समाप्त होत नाही.तशी मैत्री असावी व मैत्रीचं नातंही तसंच असावं.
          सुलभा सांगत होती महेशला,नव्हे तर मार्गदर्शन करीत होती.तिची मित्रता होती महेशबरोबर ब-याच दिवसापासून.त्याची मैत्री तुटू नये कधीच असं तिला वाटत होतं.म्हणून ती बोलत होती.त्या दोघांचं कोणत्यातरी कारणावरुन भांडण झालं होतं.म्हणून त्याला समजविण्याचा तिचा अल्पशः प्रयत्न.
         चांगल्या माणसाच्या सोबतची मैत्री ऊसा सारखी असते ,ठोका ,मुरगळा,तोडा,त्यामधून गोडवाच मिळतो.माणसाचे जीवन हे सुख दु:खाच्या आरशाच्या काचेसारखं आहे.एकीकडे सुख असतं.दुसरीकडे दुःख.पण पारा लावलेला असल्यानं पलिकडचं सुख कोणाला दिसत नाही.फक्त दुःख तेवढं दिसतं.
           ती त्याला विनवीत होती,
           "आपल्या दोघात फक्त मैत्रीचं नातं कायम राहीन ना जीवनभर. मैत्रीच्या या नात्याची दुस-या कोणत्याच नात्याशी तुलना नाही करता येत. जर प्रत्येकानेच स्वत:सोबत दुस-यांचा मान आणि मनाचाही विचार केला,तर त्या नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा येणार नाही.मला मैत्री अशी टिकवायची की ज्याच्यामध्ये सूख दु:खाला सामावण्याची,समजून घेण्याची शक्ती आहे. शब्दाची साथ फार आहे. प्रत्येक गोष्टीत तो ह्रृद् याच्या तो जवळ असतो.ज्याचं जीवन हे दु:खा पासून लांब नाही.अशांशी मैत्री करायला मला आवडतं.तू अगदी मी विचार केलेल्या चाकोरीतील व्यवस्थेप्रमाणे आहेस.म्हणून तू मला हवासा आहेस.तू माझे स्वप्न आहेस.मी सोचलेले......तेव्हा आपल्याला या मैत्रीला जपून ठेवायचे आहे. कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या नशीबात नसते.चांगल्या मित्रांची साथ मिळायला नशीब लागत आणि ती साथ कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठीही नशीब व मन साफ असावं लागत.नाती पक्ष्यासारखी असतात ,घट धरुन ठेवली तर कोमेजून जातात,सैल सोडली तर उडून जातात,हळुवार जपली तर साथ देतात.आपण आपले जीवन जगत असतो,पण जीवन जगण्याचा खरा अर्थ शिकवते ती मैत्री, दुराव्यात पण टिकते ती मैत्री आणि स्वतःचीच ओळख नव्याने करुन देते ,ती असते मैत्री,दिवा मातीचा की सोन्याचा हे महत्वाचं नसतं.तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं असतं. त्याच प्रमाणे मित्र-गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे.मैत्रीच्या पवित्र नगरीत कधी हसायचे,कधी रुसायचे असते. मैत्रीरुपी वृक्षाला आयुष्यभर असंच जपायचे असतं.त्याला सांभाळायचं असतं.असं भांडायचं नसतं."
           सुलभा बोलत होती.कारण तिचं मन अगदी वैतागून गेलं होतं.त्यानं एवढ्या दिवसाची मैत्री तोडून टाकली होती एका झटक्यात शुल्लक कारणावरुन.
          महेश हा शंकेखोर होता.ती मात्र साधी होती.तिचा बा लहानपणीच कुठेतरी शुल्लक कारणावरुन निघून गेला होता.कोकणात राहणारी ती माणसं.बाप कुठंतरी निघून जाताच आईनं आपल्या चारही पोरांना मुंबापुरीला भावाकडं ठेवलं.भावानं त्या चारही लेकरांना लहानाचं मोठं केलं.दोघांचे कसेतरी विवाह केले.तिस-या क्रमांकावर सुलभा.हिचं महेशवर अतोनात प्रेम.आई आताही गावाकडंच राहात होती.
          महेश काय समजायचं ते समजला.त्याला तिची भाषा कळली नाही.मैत्री मात्र कळली होती.मैत्रीचा अर्थही कळला होता.तसा तो म्हणाला,
           "सुलभा,आतातरी शांत बस.अगं माझे कान दुखतात.मी समजलो मैत्रीची परीभाषा."
           तशी ती पुन्हा म्हणाली,
          "महेश,मैत्री ही आई आहे,ती ताई आहे,ती मैत्रीण आहे,ती पत्नी आहे, ती मुलगी आहे,ती जन्म आहे,ती माया आहे,तीच सुरुवात आहे आणि तीच शेवट आहे. सुरुवातच नसेल तर बाकी सारे व्यर्थ आहे.अरे जीवनात आनंदच नसेल तर माणुस जगत नाही.त्याला मेल्यासारखं वाटतं आणि आनंद मैत्रीमुळंच मिळतं.पण मैत्री शुद्ध असायला हवी."
          महेश जे समजायचं ते समजला.त्या दिवसापासून त्यानं कधीच सुलभाशी भांडण केलं नाही.दोघांनीही परस्पर समजुतीनं पुढे चालून विवाह केला.त्यांना काही दिवसांनं मुल जन्माला आलं.त्याचं नाव ठेवलं मैत्री.आता मात्र त्यांच्या जीवनात आनंदी आनंद आहे.कारण मैत्री त्यांच्या सदोदीत जवळ आहे. सुलभाही आता भांडत नव्हती. ती अगदी प्रेमानं राहात होती त्याचेसोबत. 

       अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२