बाबासाहेबांना सिमीत करु नये Ankush Shingade द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बाबासाहेबांना सिमीत करु नये

बाबासाहेबांना कोणीही सिमीत करण्याचा प्रयत्न करु नये?

         *आज बाबासाहेब आमचे. आमच्या समाजाचे. आमच्या जातीचे व आमच्या धर्माचे म्हणत बाबासाहेबांना सिमीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ज्यातून बाबासाहेबांबद्दल इतर समाजातील लोकांत आकस निर्माण होवून त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते. ज्यातून इतर समाजात आपल्याच जातीबद्दल आकस निर्माण होतो व जातीय अत्याचाराच्या घटना घडत असतात. त्या तशा घटना घडणं बरे नाही. यासाठी आधी बाबासाहेबांना समजून घेणे गरजेचे आहे. कारण बाबासाहेब हे तलवार आहेत. विचारांची आणि एकतेची. ज्यातून समाजातील भेदभाव, अंधश्रद्धा, कुप्रथा व चमत्कार यांचा नाईनाट होवू शकतो यात शंका नाही.*
            अस्पृश्य जाती त्या की ज्या चामड्याचं काम करीत असत. ज्यात चांभार, मांग, खाटीक महार आणि इतर काही जातींचा समावेश होतो. कालप्रवाहानं गावसमुदायाचं संरक्षण करण्याचं काम या जातींना पुर्वी केलं. तरीही बदल्यात तथाकथीत समाजानं त्यांना काय दिलं? या अस्पृश्य जातींनीत्या काळात अतिशयहीन दर्जांचीस्पृश्यसमाजाचीकामं केली. बदल्यातकाय मिळालं? तर त्याचं उत्तर येईल, क्लेष, अपमान व हिनता. शिवाय या सर्व जातींचा इतिहास पाहता या जाती जरी आधी वैदिक धर्मातील असल्या तरी कालांतरानं बौद्ध धर्म या देशात पसरला. त्यावेळेस या सर्व जाती या बौद्ध झाल्या होत्या हे नाकारता येत नाही व तमाम हिंदूस्थानातील रहिवासी असलेले सर्वच लोकं हे बौद्ध झालेले होते. याचा प्रत्यय सम्राट अशोकाच्या कारकिर्दीचा अभ्यास करतांना दिसून येते. 
        सम्राट अशोक. त्या राजाचा अभ्यास करतांना त्याआधी धनानंदाचा अभ्यास करावा लागतो. धनानंद हा असा राजा होवून गेला की ज्यानं आर्य चाणक्य नावाच्या शिक्षकाचा अपमान केला. ज्यातून आर्य चाणक्यानं प्रतिज्ञा केली होती की मी धनानंदाला संपविल्याशिवाय शेंडीला गाठ मारणार नाही. मग त्यानं अशा मुलाचा शोध सुरु केला. जो हुशार असेल. ज्याच्यात जिद्द असेल व जो आपल्या जिद्दीच्या भरवशावर धनानंदाचा नाश करु शकेल. अशातच त्याला आठवलं की तो ज्या भागात शिकवतो. त्या भागात एक वस्ती आहे. जी वस्ती अस्पृश्यांची आहे. त्या वस्तीकडं कोणीही जात नाही. कारण तेथील लोकं हे घाणेरडे राहतात. कसेही जगतात. मेलेल्या प्राण्यांचे मांस खावून उदरनिर्वाह करतात. परंतु शूर आहेत. धनानंदाला सैनिक लागले तर तो त्याच वस्तीतून आणतो याचीही कल्पना आर्य चाणक्याला होती. तसा तो शोध घेत असतांना त्याच वस्तीतून जात होता. त्यावेळेस आर्य चाणक्यानं पाहिलं की एक मुलगा एकटाच एका वानराच्या कळपाला हाकलत आहे व त्याच्या त्या चातुर्यबुद्धीनं सर्व वानर त्या वस्तीतून पळाले आहेत. बस त्यानं त्या मुलाची बुद्धीमत्ता हेरली नमस्कार विचार केला. आपण याला न्यावं. याला शिकवावं व यालाच तयार करावं. जो धनानंदाचा नाश करु शकेल. 
          आर्य चाणक्य त्या मुलाच्या जवळ गेले. त्याला त्याचं नाव विचारलं. त्यानं त्याचं नाव चंद्र्या सांगीतलं. त्यानंतर त्याचं घर विचारलं व ते त्या मुलाच्या घरी गेले. त्यावेळेस चाणक्य त्याच्या मायबापाला बोलले. मला आपला मुलगा द्यावा. मी माझा मुलगा म्हणून याचा सांभाळ करील. मीच याला वाढवीन व मीच याला शिकवीन. त्यावर त्या मुलाचे मायबाप नकार देवू लागले. शतशः चाणक्यानं शेवटपर्यंत विनंती केली व शेवटी म्हणाले, 
         "मी या मुलाचं भविष्य ओळखलं आहे. तुमचा हा मुलगा एक दिवस या राज्याचा राजा बनेल आणि ते पवित्र कार्य मी करणार. आता तुम्हीच ठरवा तुमच्या मुलाला राजा बनवायचे आहे की असंच गावात ठेवायचे आहे."
          बस तेच बोलणं. ते शेवटचं बोलणं. तसं नाही नाही म्हणता त्या मुलाच्या मायबापानं आपला मुलगा आर्य चाणक्याला दिला व चाणक्यानं असं काही त्याला शिकवलं की त्यानं धनानंदाचा नाश केला व तो राजा बनला. हा मुलगा दुसरा तिसरा नसून लहानपणचा चंद्र्या होता. जो अस्पृश्य वस्तीतील होता व तोच पहिला अस्पृश्य जातीतून पहिला राजा बनला होता. त्यानं चाणक्याला नमन करुन त्यालाच राजगुरु बनवलं. त्यावेळेस चाणक्यानं हा स्पृश्य हा अस्पृश्य असा भेदभाव केला नाही. त्यावेळेस आर्य चाणक्याला सर्व लोकं ओळखतच होते. 
         आर्य चाणक्यानं राजपदावर बसवलेला व्यक्ती एका चांभार जातीचा होता. त्यावेळेस भेदभाव व स्पृश्य अस्पृश्यता नव्हती. जातीभेद तर अजिबातच नव्हता. चंद्रगुप्तानं गादीवर बसताच त्यानं साम्राज्यविस्तार केला. तेच सुत्र इतरही त्याच्या वंशजांनी अवलंबलं. त्यानंतर त्याचाच वंशज सम्राट अशोक गादीवर बसला. त्यानंही साम्राज्यविस्तार करण्यासाठी साम्राज्यवादी धोरण अवलंबलं. अशातच कलिंगचं युद्ध झालं. युद्धात विजय मिळाला होता. परंतु कोण कोण आपल्याकडील सैनिक मरण पावले हे पाहण्यासाठी तो कलिंगच्या युद्धभूमीवर फिरु लागला. ज्यात बरेच सैनिक मरण पावले होते. काही सैनिक जीवंत होते. त्यातच काही सैनिकांचे हात तर काही सैनिकांचे पाय तुटले होते. काही सैनिक शत्रूपक्षातीलही होते. काही सैनिकांची मुलं व बायका त्या सैनिकांजवळ बसून विलाप करीत होते. ते पाहून वाटत होतं की युद्ध करुच नये. काय मिळवतो आपण युद्ध करुन. शेवटी मरतांना ना राज्य नेत ना काही. त्यानंतर सम्राट अशोकाच्या मनावर त्या गोष्टीचा परिणाम झाला व त्यानं त्यावर उपाय काढला. आपण बौद्ध धम्म स्विकारायचा. ज्या धम्मात शांततेला व अहिंसेला प्राधान्य दिलं आहे. 
          सम्राट अशोकाची तसं ठरवताच त्यानं बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्याचबरोबर दोन चार लोकं जर सोडले तर संपुर्ण हिंदुस्थान बौद्धमय करुन टाकला. ज्यात महार, मांग, खाटक चांभारच नाही तर इतर सर्वच जाती होत्या. त्यातच त्याला बौद्ध धम्म चांगला वाटत असल्यानं स्वतःची मुलं संघमित्रा नमस्कार राहूल यांना त्या धम्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेत पाठवले. तेथून ते म्यानमार व इतर देशात गेले. 
         सम्राट अशोकानंतर बौद्ध धम्म काही दिवस जीवंत राहिला. त्यानंतर या हिंदुस्थानात तुकड्या तुकड्यात असलेल्या व विखुरलेल्या बऱ्याच राज्यांनी बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. परंतु समाजातही असे काही लोकं होते की ज्यांना साम्राज्यविस्तारवादी धोरण आवडत होतं. अहिंसा नाही. अशातच पुष्यमित्र शृंग नावाच्या दासीच्या मुलालाही अहिंसेचं तत्व मान्य नव्हतं. त्यानं सम्राट अशोकानंतर इथं आलेल्या त्याच्या वारसाची हत्या केली व इथलं राजपद हातात घेतलं. त्यानंतर त्यानं येथील बऱ्याच बौद्ध भिख्खूंची हत्या केली. त्यातच काही लोकं मरण्याच्या भयाच्या भीतीनं पळ काढला. ज्यातून इतर देशात ते पळून गेले. परंतु त्यांनी आपला धर्म सोडला नाही. त्यांनी आपल्या धर्माची तत्वे इतर देशातील राज्यांना सांगीतली. त्यांना ती पटली व बौद्ध धम्म जीवंत राहिला नव्हे तर विदेशात पसरला. 
         तमाम हिंदूस्थानातील बौद्ध झालेली जनता. इथं राहणारी सर्वच बौद्ध जनता पळून गेली नाही. ती इथंच राहिली. त्यातच कोणी बौद्ध असल्यास पुष्यमित्र शृंगाचे सैनिक कापून फेकत. तो त्रास नको म्हणून येथील रहिवासी असणाऱ्या लोकांनी नको असतांनाही पुष्यमित्र शृंगांचा धर्म स्विकारला. तसं पाहिल्यास त्या काळात जनतेचा पाहिजे तो धर्मच नव्हता. ज्या राज्याचं शासन. त्या राजाचा जो धर्म असेल, तो त्या जनतेलाही स्विकारावा लागत असे. जरी मनात इच्छा नसली तरी. अशारितीनं पुन्हा एकदा संपुर्ण समाज ढवळून निघाला व वैदिक धर्माचा अनुयायी बनला. ज्यात महार, मांग चांभारच नाही तर इतरही बरीच मंडळी होती. पुढं याच हिंदुस्थानात मुस्लीम जेव्हा आले. त्यांनीही तेच केलं. त्यांनीही आपला धर्म प्रसवला व त्यावेळेसही बरेच लोकं मुस्लीम बनले. परंतु काही काही लोकं कट्टर होते. त्यांनी आपला आपला धर्म जीवंत ठेवला. प्रसंगी त्यांनी धर्मासाठी प्राण दिले. परंतु धर्म बदलवला नाही. तेच पाहून धर्माबाबतची आत्मीयता धर्मातीत लोकांमध्ये निर्माण झाली व सामान्य जनतेनंही आपआपला धर्म बदलवला नाही. तो टिकवून ठेवला. काहींनी पळून जावून तर काहींनी अज्ञात रुपात राहून. काहींनी अंतर्मनात ठेवून संधीची वाट मोकळी होईपर्यंत तो धर्म टिकवून ठेवला. महत्वपुर्ण गोष्ट ही की काल आर्यांनी काही कथीत स्वरुपाच्या पोथ्या व पुराणांच्या आधारावर, देवांची भीती दाखवून तर काहींनी कापून टाकण्याचा धाक दाखवून आपला धर्म टिकवला. काहींनी धर्म पळून जावून आपला धर्म टिकवला. काहींनी राजा म्हणेल त्या पद्धतीनं बदलवला. तसा धर्म हा लवचीकच होता व तो केव्हाही बदलवता येतच असे. तसं पाहिल्यास त्या काळात जनता ही पाहिजे त्या प्रमाणात सुशिक्षीत नव्हती. ती अज्ञानी होती. परंतु आज, आज जनता ही अज्ञानी नाही. आज सुशिक्षीत आहे व विचार करायला स्वतंत्रही आहे. तै समाज विचार करु शकतो. कोणता धर्म चांगला व कोणता धर्म वाईट आहे यावर. असे असतांनाही आज धर्मपरीवर्तन. ही चिंतेचीच बाब आहे. मुळात कोणता धर्म चांगला आणि कोणता धर्म वाईट? त्या धर्माचा इतिहास काय? शिवाय तो धर्म पुर्वीच्या काळात कसा होता, कसा नाही? त्या धर्मात चमत्कार आहेत का आणि असतील तर खरंच आज विज्ञान युग असतांना खरंच चमत्कार होवू शकतात का? काल पाऊस देव पाडत होता, असं जी माणसं म्हणत होती. ते खरंच सत्य आहे का? चंद्र, सुर्य खरंच देव आहेत की त्या ठिकाणी नेमकं काय आहे? कोणत्या धर्मात भाकडकथा आहेत व कोणत्या धर्मात भाकडकथा नाही? कोणता धर्म अंधश्रद्धा प्रसवतो व कोणता धर्म त्या अंधश्रद्धा प्रसवीत नाही? अन् आजच्या काळात कोणता धर्म आपल्या लायक आहे? या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी आपण लायक आहोत. आज विज्ञानानं बरीच प्रगती केलेली असून चंद्र सुर्यावर नेमकं काय आहे हेही विज्ञानानं दाखवून दिलंय. आज पाऊस कसा पडतो. विजा कशा चमकतात हे कोणत्याही धर्मातून सांगण्याची गरज नाही. आज आजार हा औषधांनी सुधारतो. कोणताच मांत्रीक सुधरवत नाही. ना कोणता धर्मही. आज कोणाचाच जन्मही कोणाच्या पोटातून मुखातून होत नाही. या साऱ्या गोष्टी आपल्याला विज्ञानानं शिकवल्या. मग काय गरज आहे आपल्याला धर्म चमत्कार करतो असे मानून धर्म परीवर्तन करायची. कारण बरेचसे धर्म आज असेच चमत्कार सांगून व अंधश्रद्धा पसरवून समाजाचे धर्मपरीवर्तन करीत आहेत. शिवाय आज धर्मांध राजे नसतांनाही नमस्कार भीती नषतांनाही काही लोकं हे घरात एका खोलीत वेगळा धर्म ठेवतात व पुजापाठ करतात आणि बाहेर वेगळा धर्म ठेवतात. तशा जातीही. घरात एक जात असते व बाहेर एक जात.
           विशेष म्हणजे मी हिंदू, मी बौद्ध, मी मुस्लीम आहे. असं बोलून वा मी अमुक अमुक जातीचा आहे. असं बोलून चालणार नाही. आपण कोणीही असाल तरी चालेल. परंतु एकच निर्धार ठेवावा. सत्य बोलावं. दोगली जबान ठेवू नये. तसं पाहिल्यास अत्याचार हा कोण्या एका समुदायातील धर्मानं केला नाही. तर अत्याचार हा सर्वच धर्माच्या समुदायानं केला. काहींनी कमी केला तर काहींनी जास्त. तसा त्यांनी अत्याचार केला नाही तर आपण करवून घेतला. कारण जेवढा अत्याचार करणारा गुन्हेगार असतो. तेवढाच अत्याचार सहन करणारीही गुन्हेगार असतोच. ते डॉ. बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवले. ज्याला काही मंडळी फेक समजतात. मात्र डॉ. बाबासाहेबांनीच अशा समाजातील इतर धर्मातील अनैतिक गोष्टींचा धिक्कार केला. म्हणूनच आपण आज बोलतो आहोत. त्यांनी प्रत्येकच धर्मांना नाही तर जातींनाही स्वतंत्र्यता मिळवून दिली. तशीच स्वतंत्र्यता प्रत्येक माणसांनाही मिळवून दिली. 
          विशेष म्हणजे काल डॉ. बाबासाहेब जेव्हा संघर्ष करीत होते. तेव्हा खुद्द बाबासाहेबांना काही समाजातील माणसांनीही मदत केली नाही. मनुस्मृती जेव्हा जाळली. तेव्हा दहन समितीचे अध्यक्षच खुद्द बापूसाहेब होते व जे एक ब्राह्मण होते व ज्यांना जाती प्रथा पटत नव्हती. ना इथल्या कुप्रथा. असे अनेक उच्च जातीतील लोकं होते की त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला मदत केली. तेव्हाच संविधान बनलं. तसंच महाडातील चवदार तळे प्रकरण असो वा भंडाऱ्याची पोटनिवडणूक असो, बाबासाहेबांना आपल्याच समाजानं धोके दिलेय. हा इतिहास आहे. मात्र आता आपल्याला त्याचं काय करायचंय. समाजात उगाचंच हिंदू बौद्ध असा कलह नकोच. वाद नकोच. आतातरी सुधरावं व समाजात एकता निर्माण करुन एका ध्वजाखाली एकत्र यावं. जेणेकरुन डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील राष्ट्र वा भारत निर्माण करता येईल. मात्र सत्य पचायला कठीण जातं. आपण आपले आपापसातच भांडतो. त्यामुळंच ते आपल्यावर राज करतात. कधी होईल आपल्या समाजाची एकी? आज घराघरात राजकारण आहे. चार पाच नाही तर प्रत्येक घरातील व्यक्तीप्रमाणे पक्ष आहेत व गट बनले आहेत आपल्या समाजाचे. कोणी कॉंग्रेस, कोणी बीजेपी, कोणी बी एस पी, कोणी रिपब्लिकन कोणी एकता मंच. कोणी इतर बरेच. आठवले, खोब्रागडे, कवाडे आणि बरेच काही. परंतु यावर आपण विचार करायला पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्याला हेच शिकवलं काय? निदान आपल्या समाजाचा एकच पक्ष चालू द्यायला हवा. परंतु ते कामही नीट आपल्यानं होत नाही व आपण एकतेची गोष्ट करतो. जे आजची परिस्थिती पाहता शक्य नाही.
           महत्वाचं सांगायचं म्हणजे काल मनूचा एवढा पगडा होता की बाबासाहेबांना एकता निर्माण करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. त्यासाठी इतर समाजातील लोकांची मदत घ्यावी लागली व त्यांनीही सढळ मनानं मदत केलीही. कारण त्यातीलच काही लोकांना मनुच्या कायद्यानुसार येथीलच बांधवावर होणारे अत्याचार पटत नव्हते. त्यांना येथीलच बांधवावर लादलेल्या व अंधश्रद्धेनं ओतप्रोत भरलेल्या प्रथा, ज्याला कुप्रथा म्हणता येईल, त्या पटत नव्हत्या. मात्र काल बाबासाहेबांच्या कार्याला मदत न करणारे आज गर्वानं सांगतात की बाबासाहेब आमचे. असं म्हणत बाबासाहेबांना सिमीत करतात. त्याचाच परिणाम असा होतो की इतर समाज बाबासाहेबांचा जातीच्या आधारावर द्वेष करीत आहे. त्यांनी केलेलं कार्य विसरत आहेत व त्यांना दूर लोटत आहेत. हे केवळ आल्यामुळेच घडत आहे. ते काही बरोबर नाही. बाबासाहेब हे सर्वांचेच आहेत. महामानव आहेत. ते केवळ एकाच जातीचे नाहीत आणि केवळ एकाच धर्माचे नाहीत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तसंच त्यांनी संविधान केवळ आपल्या एकट्याच्याच जातीसाठी वा धर्मासाठी निर्माण केलेलं नसून ते सर्वच जातीधर्मासाठी निर्माण केलेलं आहे. हेही तेवढंच लक्षात घ्यायला हवं. हे तेवढंच खरं. 

           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०