स्वतंत्रता आपली की इतरांची Ankush Shingade द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वतंत्रता आपली की इतरांची

स्वतंत्र्यता तुमची की इतरांची?

          *स्वातंत्र्य...... म्हणतात की भारतानं सन १९४७ ला स्वातंत्र्य मिळविलंय. तेही इंग्रजांपासून. भारत दिडशे वर्ष गुलाम होता. कोणी लोकं म्हणतात की भारत हा आधीपासूनच गुलाम होता. ज्यावेळेस आर्य आले. त्यांनी मुर्तीपुजा सांगीतली व आपण त्यावर विश्वास ठेवून मुर्तीची पुजा करु लागलो. शिवाय आपण आपल्या मनात अंधश्रद्धेचे बिजारोपण केले. विशेष म्हणजे त्या आर्यांनी आपल्या मनाचा ताबा घेतला. त्यासाठी साम दाम दंड आणि भेद हे चारही तत्व वापरले. त्यानंतर आपण त्यांचे आधीन झालो की ते काहीही म्हणोत. तीच पुर्वदिशा समजून वागत राहिलोत. त्यातच आपण त्यांचे एवढे आधीन झालो की त्यांनी ज्या ज्या कुप्रथा या देशात आणल्या. त्या सर्वांवर विश्वास करुन आपण आत्महत्याही करीत राहिलो. मग त्या प्रथा नरमेध असो, चरकपुजा असो, रथयात्रा असो, गंगाप्रवाह असो, सतीप्रथा असो, कन्यावध असो, महाप्रस्थान असो, तृषानल असो, हरीबोल असो, भृगृपन्न असो की धरना असो. आपण विश्वासच करीत गेलो आणि स्वतःच्याच आत्महत्या करुन आपलेच जीवन संपवत गेलो. कारण त्या सर्व गोष्टीत आपण त्यांचे गुलाम झालो होतो.*
          ते त्यांचे विचार होते. जे आपल्या मनात अगदी लहानपणापासूनच रुजविले गेले होते. जणू त्यांनीच आपल्या मनाचा ताबा मिळवला होता नव्हे तर त्यांनी त्यांच्या विचारांनी आपल्याला गुलाम केले होते. आपण त्यांच्या विचारांचे गुलाम होतो.
           ही विचार करण्यालायक गोष्ट. विचार करण्यालायक गोष्ट अशी की आपण त्यांच्या विचारांचे गुलाम होतो की आपल्याच विचारांचे? त्याचे उत्तर आपणाजवळ नाही. त्यामुळंच आजही आपण त्यांच्याच विचारानं चालत असतो व स्वतःचं नुकसान करीत असतो. त्याचं कारण आहे आपल्या मनातील भीती. ती भीती आहे देव आपल्याला काही करणार तर नाही.
          आपण पाषाणरुपी देव पुजतो. त्यातच आपल्याला वाटते की हा पाषाणरुपी देव नवसाला पावतो. याला कोंबडं बकरं भाव म्हणून बळी दिल्यास तो जास्त पावेल. कधीकधी आपण बोलायची वेळ व कर्म घडायची वेळ जुळून येते व आपला विश्वास बसतो की हे सगळं केलं. त्या पाषाणरुपी देवानंच केलं. ती गोष्ट कावळा फांदीवर बसण्यासारखी व फांदी मोडण्यासारखी होते. आता फांदी काही कावळा मोडू शकत नाही. हे आपल्याला माहीत असतांनाही फांदी मोडली जाते. यात कावळ्याचा चमत्कार नसतोच. परंतु अशाच काही घटनांनी कावळा आपल्यासाठी देव बनतो. यात शंका नाही. 
           खरं तर तेच आर्यांचे विचार. अमूक अमूक घटना झालीच तर,ती घटना जरी नैसर्गिक असली तरी ती देवानंच घडवून आणली. ही आर्याची विचारसरणी होती. जी त्यांनी आपल्याला सांगितली. ज्यातून आपले मन त्यांच्या विचारांचे गुलाम बनत गेले. त्यातच आपण त्यांच्या आजपर्यंत बऱ्याच प्रथा पाळल्या भारत स्वतंत्र्य होईपर्यंत. त्यातील काही प्रथा इंग्रज भारतात असतांनाच बंद झाल्या होत्या व त्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं होतं. जे मानसिक होतं. ज्यातून बऱ्याच लोकांचे जाणारे प्राण वाचले होते. इंग्रज जर भारतात आले नसते तर आजही त्याच प्रथा आजही सुरु राहिल्या असत्या आणि आपले आजही रोजच प्राण जात गेले असते. 
            इंग्रज जेव्हा भारतात आले. त्यानंतर बऱ्याच प्रथा बंद झाल्या होत्या. त्या प्रथांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. ज्या प्रथा इंग्रजांनी बंद केल्या होत्या. कारण त्या कुप्रथा होत्या. त्या कुप्रथांपासून स्वातंत्र्य मिळालं होतं. दुसरं स्वातंत्र्य हवं होतं ते इंग्रजांपासून. तेही सन १९४७ ला मिळालं. परंतु तरीही आपण गुलाम होतो आणि आजही आहोत. काही अनैतिक प्रथांचे. ज्या प्रथांनी आपले आजही जीव जात आहेत. एक कावडप्रथा आणि दुसरी विस्तवावर चालणे. कावडप्रथेतही अक्षरशः जीव जातो आणि विस्तवावर चालण्यातूनही शरीरावर वेदना होत असतात. शिवाय एक अशीही प्रथा आहे. ती गोटमार प्रथा. ज्यात देवाच्या नावानं गोटमार सुरु असते. ही प्रथा मध्यप्रेशातील पांढूरणा येथे सुरु आहे. पोळ्याच्या पाढव्याला ही गोटमार असते. ज्यात आतापर्यंत कितीतरी लोकांचे जीव गेले आहेत. अशा बऱ्याच प्रथा भारतात आहेत की ज्यांची आपणास कल्पनाही नाही. काही ठिकाणी देवी नवसाला पावतो म्हणून कोंबडं बकरं कापण्याची प्रथा आहे. कदाचीत त्याही प्रथा उद्या बंद होतीलही. परंतु आपण स्वतंत्र होणार का? तर त्याचं उत्तर नाही असंच येईल. कारण स्वतंत्र्यता मिळविण्यासाठी मनातील भीती नष्ट करावी लागते. शिवाय इतरांच्या मनातून नक्कीच आपण ती भीती काढू शकतो. परंतु आपल्या मनातील भीती? ती कोण काढणार? तिला आपणच काढावी लागणार. ती जेव्हापर्यंत निघत नाही. तेव्हापर्यंत आपण स्वतंत्र होणार नाही. 
         महत्वाचं सांगायचं झाल्यास आज आपण इंग्रजांपासून स्वतंत्र झालो. इतरांपासून स्वतंत्र झालो. कारण आज आपण इतरांचं अजिबात ऐकत नाही. परंतु आजही आपल्या आपल्या स्वतःपासून स्वतंत्र झालो नाहीत. आपलं मन कुठंतरी आपल्याला खात असतं. भीती वाटत असते पदोपदी आपल्याला अमूक अमूक गोष्ट मी नाही केली तर मला काही समस्या तर येणार नाही. तीच भीती आपल्या मनात असते. ज्यातून आपण स्वतंत्र होवू शकत नाही.
          आजही आपल्या मनात भीती आहे. एखादी स्री जर रजस्व अवस्थेत असेल आणि तिनं जेवन बनवलं तर ते अन्न विटाळतं हा आपला समज. आजही मंदिरात गेल्यावर पुजारी आपल्याला मंदिरातील मुर्तीला हात लावू देत नाहीत. कारण मंदिरातील मुर्ती विटाळण्याची भीती असते. जरी ती मुर्ती पाषाणाची असली तरीही. आजही चंद्र सुर्याच्या ग्रहणाचा परिणाम अन्न आणि कपड्यावर होत नसतांनाही तो परिणाम त्याचेवर होतो असं म्हणून ग्रहणानंतर दान करणारे भीतीनं दान करीत असतात. हीच मानसिकता कदाचीत आपल्याच मनाला गुलाम करीत असते नव्हे तर करते. यापासूनच आपल्याला स्वतंत्रता हवी. 
          महत्वपुर्ण बाब ही की स्वतंत्र्यता दुसर्‍यापासून नाही तर आपल्याला आपल्याच मनापासून मिळावी. आपलं मन साफ व्हावं अंधश्रद्धेच्या विळख्यातून. जेणेकरुन आपल्याला स्वतंत्र व मुक्तपणानं विचार करता येईल. आपण स्वतंत्र निर्णय घेवू शकाल व निर्णयक्षम बनू शकाल. तुम्ही दुसरा म्हणेल. मगच निर्णय घेवू असे म्हणणार नाही व तसे मानणारही नाही. तसंच त्यावर आश्रीतही राहणार नाही. तेव्हाच खऱ्या अर्थानं तुम्हाला स्वतंत्र झाल्यासारखं वाटेल यात शंका नाही. 

            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०