इंग्रज असते तर Ankush Shingade द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इंग्रज असते तर

इंग्रज या देशात काही दिवस असते तर?

            *धर्म....... धर्मातील भांडण. अमूक धर्म चांगला व अमूक धर्म वाईट. यावरुन भांडण, वादविवाद. विटाळ...... विटाळाची भांडणं. काही ठिकाणी अस्पृश्यांनी नवीन कपडे परीधान केले म्हणून भाडणं. काही ठिकाणी अस्पृश्य शेतात गेला म्हणून भांडणं. काही ठिकाणी अंधश्रद्धेवरुन भांडणं. तर तर काही ठिकाणी सुधारणेतून भांडणं. यातूनच बलात्कार व गुन्हेगारीला वाव मिळत असतो.*
         भांडणं नेहमीच होत असतात. कारण सर्वांना आपआपल्या गोष्टी प्रिय असतात. धर्मही प्रियच असतो. शिवाय धर्म वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. प्रत्येकाला त्यांचा त्यांचा धर्म आवडतो म्हणून. एका व्हाट्सअप ग्रुपवर असंच भांडण. दोघांचं भांडण सुरु होतं. एक म्हणत होता, अमूक धर्म चांगला व अमूक धर्म वाईट. त्यावर दुसरा वेगळीच प्रतिक्रिया देत होता. भांडण चांगलंच रंगात आलं होतं. त्यांचं त्याला म्हणणं. 
           "तुम्ही मनुवादी आहात."     
           त्यावर उत्तरात म्हटलं गेलं,      
           "मी मनुवादी नाही. परंतु हिंदू आहे. मला हिंदू धर्म आवडतो. कारण माझ्या बिरादरीतील कित्येक लोकांना, या धर्मानं हिंदू म्हणून का असेना, आजपर्यंत टिकवून ठेवलं. म्हणूनच मी आज जीवंत आहे व बोलू शकत आहे. नाहीतर आपल्या सर्व बिरादरीतील लोकांचे जबरदस्तीनं धर्मांतरण करणारे व हत्या करणारे या जगात होतेच."
           पुढील व्यक्ती हा कदाचीत बुद्धीष्ट असेल व त्यानं बुद्ध धम्म स्विकारलाही असेल. तसा तो म्हणाला, 
           "अहो, बोलायला संविधानानं शिकविलं. तशी मुभा दिली. नाही तर आपल्याला कुठं गतकाळात बोलता येत होतं."
           पलीकडील उत्तर देणाऱ्यांचं संभाषण सुरुच होतं. तसा दुसरा व्यक्ती उत्तरादाखल म्हणत होता. 
          "बादशाहा बाबरपासून तर औरंगजेबांपर्यंत आपल्याही बिरादरीतील लोकांसह कित्येकांना मुस्लीम बनवलं गेलं जबरदस्तीनं. म्हणूनच तर खुद्द बाबासाहेबानं मुस्लीम धर्म नाकारला होता. हे त्यांनी त्यांच्या शेवटच्या अनरिचेबल थॉट या ग्रंथात लिहून ठेवलंय. शेवटचा बाबासाहेबांच्या हातचा ग्रंथ. परंतु त्यांनी हिंदू धर्मही नाकारला होता. त्याचं कारण होतं, हिंदू धर्मातील काही लोकांचं वागणं. ते वागणं तांदळाच्या खड्यासारखे होतं. तांदळात दोनचार खडे असले की सगळा तांदूळ खराब होतो तसं."
           ते त्याचं उत्तर. त्यावर तो म्हणाला, 
           "आपण बिनडोक आहात. आपल्याला अक्कलच नाही. म्हणूनच आपण त्या धर्मात आहात. नाहीतर केव्हाचाच आपण आपला धर्म आपण बदलवला असता." 
            ते त्याचं बोलणं. ती काढलेली अक्कलच. ते पाहून उत्तर देणारा व्यक्ती म्हणाला, 
            "मी तर बिनडोकंच आहे. परंतु आपल्याला जर डोकं आहे तर हा वादविवाद नाही हे लक्षात घ्या आधी. ही एक चर्चा आहे. आपण माझ्याच डोक्यात आपले विचार टाकू शकत नाही. काय आपण इतर आपल्याच समाजाच्या लोकांच्या मनात आपले विचार पेरु शकाल? बोलणं सोपं असतं. करणं अवघड. मी भांडत नाही आहे, चर्चा करीत आहे. माझे विचार त्यावरच अवलंबून असतात. आता कोणाला राग येत असेल त्यात मी काय करु? मला त्याचा फायदाच होतो. मला माझे विचार प्रगल्भ करण्यासाठी विषय सापडतात. आधी आपण स्वतः त्या धर्मातील संपुर्ण नियम पाळून दाखवा. मगच अक्कल सांगा."
          धर्म....... धर्म कोणतेही असोत. प्रत्येकाला त्याचा त्याचा धर्म आवडतोच. जरी धर्मात बरेच नियम असले तरी व ते नियम पाळणं गरजेचं असलं तरी. ते नियम समजा नाही पाळले तर त्या व्यक्तीला निष्काषीत केलं जातं तरीही. 
         पुर्वीही असंच व्हायचं. ते नियम न पाळल्यास वाळीत टाकण्याचा समाजाचा नियम होता. अन् मंदिरातील स्पृश्यांचे नियम पाळले नाहीत तर आपलीच माणसं आपल्यालाच वाळीत टाकत असत. ज्यात सायंकाळी स्पृश्य वस्तीत जाणे. कधी त्यांच्या विहिरीला हात लावणे इत्यादी. 
          भारत स्वातंत्र्य होण्यापुर्वी येथील अस्पृश्य समाज हा विटाळाच्या विळख्यात होता. तसाच धर्माच्याही. त्यांना मानाचं स्थान नव्हतं. त्यांना भेदभावानं गुरफटलं होतं. तसं पाहिल्यास इंग्रज सुधारणाही करीत होते. त्यांनी बऱ्याच सुधारणा केल्या. त्या सुधारणा आवडत नसलेला समाज स्वातंत्र्य मागत होता. तसे बाबासाहेबही स्वातंत्र्याच्या विरोधात नव्हतेच. परंतु बाबासाहेबांना वाटत होतं की जर या देशातील इंग्रज निघून गेले. तर सुधारणा होणार नाही. अस्पृश्यांना वर उठता येणार नाही. हा समाज स्वातंत्र्यानंतर त्यांना वर उठू देणार नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणत होते की आम्हाला आधी सुधारणा हव्यात. त्यानंतर स्वातंत्र्य. कारण स्वातंत्र्यानंतर सुधारणा घडूनच येणार नाही. देशातील लोकांना सुधारणा हव्या नाहीत हे त्यांना माहीत होतं. त्यांना अस्पृश्य स्पृश्य यांच्यात भेदभावच हवा होता. त्याचं कारणही होतं, ते म्हणजे आजपर्यंत लोकांनी तसंच विदेशी शासकांनी सुधारणा केल्या नव्हत्या. इंग्रज सुधारणा करु पाहात होते. त्या सुधारणा इंग्रजांना करु द्यायच्या नव्हत्या. अन् तसंच झालं. स्वातंत्र्य मिळालं. संविधान आलं. तरीही येथील भेदभाव गेला नाही. येथील काही वाईट प्रथाही गेल्या नाहीत. त्या अजुनही सुरु आहेत. तेच खुपतं येथील काही लोकांच्या मनात. अन् खुपणंही साहजीकच आहे. कारण त्यांना समाजात बदल हवा आहे. नव्या स्वरुपाचा. त्यांना अंधश्रद्धा हव्या नाहीत. अन् अंधश्रद्धा पाळणारा धर्मही हवा नाही. म्हणूनच धर्मावरून भांडणं होत असतात. 
         आजचा काळ पाहिल्यास इंग्रज गेले देशाला स्वातंत्र्य देवून. तरी आजही भेदभाव गेलेला नाही. काही ठिकाणी अस्पृश्यांनी नवीन कपडे घालणंही स्पृश्यांना आवडत नाही. त्यांनी घरेदारे बांधणंही त्यांना आवडत नाही. व्यतिरीक्त त्यांना पंगतीत जेवन चारणंही आवडत नाही. काही ठिकाणी आजही लग्न समारंभात अस्पृश्यांना न बोलवता त्यांच्या घरी त्यांनीच स्वयंपाक बनवावं म्हणून दोन आलू व थोडेसे तांदूळ त्यांना देण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी आपल्या घरची अलाबला वा पीडा निघावी म्हणून अस्पृश्यांना कपडे व सुग्रास अन्न, तेही दरवाजात बसवून देण्याची प्रथा आहे. तसंच अस्पृश्यांनी असंच वागावं. तसंच वागावं. असं वागू नये. तसं वागू नये. ही सारी बंधनं आहेत. भारत स्वतंत्र्य झाला असला तरी. तसंच सुधारणांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काल ज्या इंग्रजांनी सुधारणा केल्या, त्या बरे झाले. नाहीतर आजही त्या अस्तित्वातच राहिल्या असत्या, जरी इंग्रज देश सोडून निघून गेले असले तरी. आजही देशात देव्या अंगात आणणे. मुर्तीसमोर कोंबड्या बकऱ्यांचा बळी देणे, गळ्यात गंडेदोरे बांधणे, मांजर आडवी गेल्यास वा घुबड ओरडल्यास अंधश्रद्धा मानणे, मांत्रीक पाळणे व मंत्रविद्येवर विश्वास ठेवणे. कोणी मरण पावल्यास विटाळ मानणे, टक्कल करुन चेहरे विद्रूप करणे, एवढंच नाही तर रजस्वाचा विटाळ मानणे, होमहवन करणे, मुर्तीपुजा करणे. या अंधश्रद्धा आहेत व या अंधश्रद्धा अजूनही सुरुच आहेत. काही ठिकाणी बालविवाहही आहेत आणि काही ठिकाणी विधवांचं पांढरी साडी परीधान करणं. बांगड्या फोडणं वैगेरे सर्व काही. तसं पाहिल्यास आजही लाखो रुपये खर्च करुन मुर्त्या बनवल्या जातात व त्या पुर्णतः पाण्यात बुडवल्या जातात. असं करण्याऐवजी तोच पैसा गरीबांना दान दिला तर? बिचाऱ्यांची मुलं तरी शिकू शकतील. उच्च शिक्षण घेवू शकतील. परंतु तसं होत नाही. त्यांचं मूल शिकायलाच नको. ही आपली भावना. सर्व रस्सीखेच. त्यामुळं आज असं वाटू लागतं की इंग्रज बरे होते. हळूहळू सुधारणा तर होत होत्या. ते काही दिवस भारतात थांबले असते तर नक्कीच भारतात एक नवा बदल दिसला असता. स्पृश्य अस्पृश्य भेदभाव कायमचा संपला असता. अंधश्रद्धा पुर्णच संपल्या असत्या. ना कोणाच्या अंगात देव्या आल्या असत्या. ना रजस्वाचा विटाळ राहिला असता. बालविवाह पुर्ण संपला असता. शिवाय बलात्कारावर व गुन्ह्यावर कडक कायदे बनले असते व बलात्कार तसेच गुन्हेही घडले नसते. ते संपले असते कायमचेच. अन् संपले असते धर्मातील भांडणंही. या भारतात हिंदूच नाही तर इतर सर्वच धर्म अगदी गुण्यागोविंदानं नांदत राहिले असते यात शंका नाही.

         अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०