हिंदुस्थानातही होत्या असल्या कुप्रथा
माकड रुपातील मानव झाडावरुन खाली येताच त्यानं आपल्या पोटाची गरज पुर्ण करण्यासाठी कामाची निर्मिती केली व ही कामं सुकररितीनं पार पडावीत म्हणून त्यानं त्यावर एका व्यक्तीची देखरेख करण्यासाठी निवड केली. मात्र अशा व्यक्तीनं आपलाच स्वार्थ पाहात आपल्याला काहीच काम करावं लागू नये. तसंच आपलं इतर लोकांनी ऐकावं. आपल्याला त्रास देवू नये. आपण त्यांना हवेहवेसे वाटावे म्हणून मंदीर कल्पना आणली. त्यातच देवाचे भय दाखवून त्यात भावार्थ भरला. व्यतिरीक्त काही अंधश्रद्धाही भरल्या. पहिली अंधश्रद्धा होती रथयात्रा. त्या व्यक्तीनं देवाच्या नावानं रथ काढण्याची प्रथा सुरु केली होती. तो रथयात्रा काढायचा व त्या रथाखाली लोकांना झोपावयास लावत असे. जो व्यक्ती देवाचा आवडता. तोच मरण पावेल. दुसरा नाही. अशी ती प्रथा होती. जर तो व्यक्ती मरण पावला तर त्याला मोक्ष मिळालं. असा त्याचा अर्थ होत असे. अशा लोकांच्या अंगावरुन तै रथ न्यायचा. त्यात जो वाचला. तो स्वतःला पापी समजला जायचा व त्याचेवर देवाची असीम कृपा नाही असं समजलं जायचं. तसाच जो मरण पावला. त्याला पुण्यवान समजलं जाई. याच त्याच्या धोरणामुळं कित्येक लोकं त्या रथयात्रेखाली झोपत व त्यातील बरेच मरतही असत. त्यातच अशा प्रकारानं त्या व्यक्तीच्या मार्गातील अनेक काटे आपोआपच दूर होत असत काहीही न करता, केवळ देवांच्या नावावर. शिवाय त्याचं मोक्षाच्या नावाखाली त्याचं नावंही होत असे.
दुसरी प्रथा होती, तिही मंदिरातीलच. एक मंदीर व त्या मंदिरातील एक विहीर. त्या विहिरीत जीव दिल्यास मोक्ष मिळतो असं लोकांचं म्हणणं. या प्रथेतही बरेच लोकं स्वखुशीनं जीव देत. त्यातच त्या माणसाचं कार्य अतिशय सुकर पद्धतीनं होत असे.
तिसरी प्रथा होती. गंगाप्रवाह. या गंगाप्रवाहात जे लोकं चामड्याचे काम करीत. त्या मंडळींना तो सांगत असे की त्यांनी आपलं पहिलं अपत्य गंगेत सोडावं. म्हणजे त्यांचेवर देवाची जास्त कृपा राहते. या प्रथेत तर त्याचा जास्तच फायदा होता. कारण चामड्याचं काम करणारे लोकं जास्तच हुशार असायचे. शिवाय शुरवीरही. त्यातच त्यांनी पहिलं अपत्य गंगेला सोडताच वा समर्पीत करताच ते स्वतःचं लेकरु असल्यानं दुसरं अपत्य जन्माला घालतांना त्यांच्या स्रीवर्गाची मानसिकता ही ढासळून जात असे व दुसरं किंवा तद्नंतरचं अपत्य तेवढं धष्टपुष्ट व शुरवीर जन्मास येत नव्हतं. ज्यातून चामड्याचं काम करणाऱ्या सर्व लोकांची पिढी पुढील काळात अशीच दुर्बल जन्मास येत होती.
चवथी प्रथा आणली होती त्यानं चरकपुजा. या प्रथेत एक चरखा राहात असे. ज्या चरख्याला लांब दोरखंडानं एका व्यक्तीला बांधलं जात असे. त्यानंतर चरखा वर लटकावून त्याला जोरात फिरवलं जात असे, त्या व्यक्तीचा जीव जाईपर्यंत. ज्यात संबंधीत व्यक्तीचा जीव गेला की तो भाग्यवान होता असे मानले जात असे. ज्यात कितीतरी कुलीन लोकं मरत असत. त्यानंतर पाचवी प्रथा त्यानं आणली होती. ती म्हणजे नरमेध. या प्रथेत अनाथ वा निर्धन असणाऱ्या व्यक्तीला जाणूनबुजून जबरदस्तीनं यज्ञात बळी म्हणून कापले जात असे. ज्यात बऱ्याच लोकांचा समावेश असे. परंतु त्या प्रथेत देवाच्या नावानं तसा नरबळी दिला जात असल्यानं कोणीही विरोध करीत नसत.
सहावी प्रथा होती सतीप्रथा. या प्रथेत कर्तबगार असलेल्या स्रियांचा विवाह जाणूनबुजून म्हाताऱ्या व्यक्तीशी करुन देण्यात येईल व आपला डाव साधवण्यात येई. ज्यात असा म्हातारा मनुष्य व तिचा पती मरण पावलाच तर त्याच्याच निधन पावल्यावर तिच्या पतीच्या शरणावर जाणूनबुजून जबरदस्तीनं जाळलं जात असे. ज्यातून तरुण असलेल्या कर्तबगार स्रिया आपोआपच त्या व्यक्तीच्या रस्त्यातून दूर जात असत.
सातवी प्रथा होती कन्यावध. पहिली कन्या झालीच तर तिची देवीच्या चरणावर बळी चढविण्यात येत असे. ही प्रथा चामड्याचं काम करणाऱ्या लोकांच्याच घरात होती. त्याचं कारण होतं भय. कर्तबगार व शुरवीर अपत्य चामड्याचं काम करणाऱ्या लोकांच्या घरात जन्माला येवू नये. कारण गंगाप्रवाह प्रथेसारखं अशा कन्यास्वरुपात पहिल्या अपत्याची हत्या केल्यास ज्या स्रिचं ते अपत्य आहे. त्या स्रीवर आघात होईल व ती स्री दुसरं अपत्य जन्माला घालतांना तेवढ्या सक्षमपणानं जन्माला घालणार नाही व आपोआपच गंगाप्रवाह प्रथेसारखी दुर्बल संतती जन्मास येईल. जी त्या व्यक्तीसमोर संकट निर्माण करणार नाही.
आठवी प्रथा होती. महाप्रस्थान. ही प्रथा पाण्यात स्वतःला बुडवून घेवून वा अग्नीत स्वतःला जाळून घेवून मोक्ष प्राप्त करण्याची प्रथा होती. म्हटलं जात असे की देवाच्या नावानं असे केल्याने देवाच्या लवकर जवळ जाता येतं.
नववी प्रथा होती, ती म्हणजे तृषानल. या प्रथेत लोकं गवतात वा तणसमध्ये स्वतः जळत. त्यासाठी ते आपल्या अंगाभोवती गवत वा तणस गुंडाळून आपल्या शरीराला स्वतःच अग्नी लावून घेत. ती तणस किंवा ते गवत अशाप्रकारे स्वतःच्या शरीराला गुंडाळून घेत की ते गवत वा ती तणस, त्याला अग्नी लागल्यानंतर किंचीतही निघून जाणार नाही.
दहावी प्रथा होती हरीबोल. या प्रथेत ज्यांना असाध्य रोग असायचे. त्या सर्वांनाच पाण्यात खोल जावे लागत असे वा त्याला नावेनं नेवून सोडलं जात असे. ज्यात त्या व्यक्तीला बुचकाळ्या माराव्या लागत. मग तो अर्धमरा झालाच की त्याला तिथं सोडून देण्यात येत असे. त्यानंतर त्याला त्याचा जीव निघून गेलाच की त्याला मोक्ष प्राप्त झाला असे मानण्यात येई.
अकरावी प्रथा होती भृगृपन्न. या प्रथेत व्यक्तीनं स्वतः कड्यावरुन उडी मारावी व मृत्यूला कवटाळावं तेही देवाच्या नावावर. यात तो व्यक्ती मरण पावलाच तर मोक्ष प्राप्त होईल व तो देवाच्या लवकर जवळ जाईल. अशीही प्रथा निर्माण केली गेली.
बारावी प्रथा होती धरना. आपल्याच हातानं कुणाच्याही दारासमोर चाकूनं स्वतःला भोपून मरण पावणं व हिंमत होत नसल्यास दुसऱ्याला भोप म्हणणं आणि तसा तो व्यक्ती करीत नसेल तर त्याच व्यक्तीच्या घरासमोर थांबणं अर्थात धरना देणं. ही कृती सुद्धा देवाला समर्पीत होती.
महत्वाचं सांगायचं म्हणजे माकडरुपात मानव जेव्हा पृथ्वीतलावर राहायला लागला. तेव्हा येथील काही स्वार्थपीडीत काही लोकांनी देवादिकांच्या नावानं आपल्यापेक्षा इतर समाज वरचढ ठरु नये. म्हणून कुप्रथा सुरु केल्या होत्या. त्याचं कारण होतं आपली मक्तेदारी निर्माण करणं. ज्या मक्तेदारीतून समाज स्वतःच मरत होता देवाच्या नावानं नव्हे तर स्वतः आत्महत्या करीत होता मोक्ष मिळतो म्हणून. परंतु त्यात मोक्षप्राप्ती नव्हती तर स्वार्थ लपलेला होता. तसाच नवा डाव होता. ज्या डावानं साप भी मरे और लाठी भी ना तुटे अशी अवस्था इतर लोकांची होत होती.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०