चांभाराच्या इतिहासातील कोरी पानं Ankush Shingade द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चांभाराच्या इतिहासातील कोरी पानं

चांभार जातीच्या गौरवशाली इतिहासातील कोरी पानं?

              चांभार समाज...... पुर्वी या समाजाला एका वंशाचं नाव होतं. जो एक राजवंश होता. ज्याचं नाव होतं चव्वर. चव्वर वंश राजा चव्वरसेनानं स्थापन केला. जो एक राजपूत राजा होता. चव्वर राजवंशाचंच नाव चांभारांना मिळालं. या चव्वर राजवंशांनी काश्मीर येथे राज्य केलं होतं व ते राज्य बरेच वर्ष टिकून होतं. ज्याचा संबंध बाप्पा रावलशी होता. ज्या बाप्पा रावलला चव्वरवंशातील एका राजानं आपली मुलगी दिली होती. शिवाय त्यांचे राजस्थानच्या महाराणा सांगाशी चांगले संबंध असून तिथंही काही चव्वर राजवंशाचे लोकं राहात होते. त्यांचा मुख्य व्यवसाय हा चामड्याशी संबंधीत नव्हता तर ते लोकं कपडे शिवत असत. कापड हे चामड्यासारखंच असतं. ही भावना लक्षात घेवून या चव्वर राजवंशाचे लोकं कापड शिवण्याचे कामं करीत. ज्यावेळेस सिकंदर लोदीच्या काळात चांभाराचे गुरु असलेले रविदास व मुस्लिम गुरु सतना यांच्याशी शास्रार्थ झाला. त्यावेळेस रविदासांनी सतनाशी पैज लावली होती. ती पैज होती जो शास्रार्थात हारेल. त्याला आपला धर्म बदलवावा लागेल. परंतु त्यात मुस्लिम गुरु सतना हारले व त्यांनी मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्विकारला. ते पाहून सिकंदर लोदी निराश झाला व त्यानं गुरु रविदासावर हमला केला. जो हमला परतावून लावण्यासाठी आपलाच बंधू समजत चव्वर राजवंश धावून आला होता व संत रविदासांना अभय दिलं होतं. 
          चामड्याचं काम करीत असणारा हा चांभार नव्हे तर हा चव्वर राजवंश. या राजवंशाच्या काही काही चांभार समुदायातील राजांना मुस्लिम राज्यकर्त्यांनी सन १४८९ मध्ये गुलाम केलं. जेव्हा सिकंदर लोदी हिंदुस्थानात आला. 
        सिकंदर लोदी जेव्हा हिंदुस्थानात आला. तेव्हा त्यानं पाहिलं या हिंदुस्थानाला एवढं लुट लूट लुटलं, तरीही हिंदुस्थान सुजलाम सुफलाम असाच आहे. त्यानंतर त्यानं त्याचा अभ्यास केला. अभ्यासांती त्याला कळलं की ही वैभवसंपन्नता चांभाराशिवाय शक्य नाही. या चांभारांनीच हिंदुस्थानला वैभवसंप्पन्न ठेवलं आहे. तेव्हा या भारतातील असणाऱ्या चांभारांचाच नव्हे तर चव्वर वंशालाच नेस्तनाबूत करावं लागेल. तेव्हाच हिंदुस्थानची ताकद कमी होईल. अन् जेव्हा हिंदुस्थानची ताकद कमी होईल, तेव्हाच आपल्याला हिंदुस्थानात राज्य करता येईल. त्यावेळेस चांभार लोकं हे हिंदुस्थानात बहुसंख्य संख्येनं होते. 
           सिकंदर लोदीच्या मनात आलेले तसे भाव. त्यानंतर सिकंदर लोदीनं चांभार समुदायातील लहान लहान विखुरलेल्या व शुरवीर असलेल्या बऱ्याचशा टोळ्यांवर विजय मिळवला. त्यांची शुरविरी गंडाला गेली. ज्याचं कारण होतं फितुरी. येथीलच आपल्याच माणसांनी, ज्यांना चांभार राजवंशियांचं अस्तित्व खपत नव्हतं, त्यांनीच कुरघोडी केली व चांभारांचं राजअस्तित्व संपलं. ते गुलाम झाले. त्यानंतर सिकंदर लोदी त्यांच्यावर अत्याचार करु लागला. त्यांना चमार म्हणून अपमानीत करु लागला. त्यांना कोणत्याही प्रकारची हिन दर्जाची कामे सांगू लागला. 
          सिकंदर लोदी केवळ चांभारांनाच प्रताडीत करीत नव्हता तर तो चांभारांसारख्याच असलेल्या इतर जातींनाही जसे, महार, मांग, खाटीक, मेहतर, गोंड गोवारी या सर्व तत्सम जातींना प्रताडीत करु लागला होता. त्यांनाही अपमानीत करु लागला होता. ज्यातून निर्माण झालेली कलुषता आजही टिकून आहे. याच मुस्लिम राज्यकर्त्याच्या सहकार्यानं येथेच राहणाऱ्या आपल्याच काही फितूर लोकांनी आपली पोळी भाजली व चांभारांचं राजकीय अस्तित्व संपवलं.
           आज चांभार समाज सुधारणेपासून बऱ्याच लांब आहे. त्याचं कारण आहे, त्यांची समज. तो ती गोष्ट समजायलाच तयार नाही की कशानं आपला विकास होईल. शिवाय आज चांभार समुदायाला हेच माहीत नाही की नेमका कोणत्या समुदायानं कोणत्या समुदायावर अत्याचार केला? का अत्याचार केला? कसा अत्याचार केला? शिवाय ज्या समुदायानं कमी अत्याचार केला. त्यांचंच तुणतुणं वाजवत हा समाज फिरतो आहे. परंतु स्वतःचा विचार कसा होईल याचा विचारच करीत नाही.
          चांभार समाजाचाही विकास होवू शकतो. जर त्यांनी पिढीजात असलेले धंदे सोडले तर...... कारण केवळ पैसा जास्त आल्यानंच विकास होत नसतो. विकास दिसण्यासाठी हवे असते शिक्षण. जे समाजातील फक्त थोडक्याच लोकांना आहे. अन् जे शिकले, ते लोकं इतर आपल्या बांधवांना शिकवायला मदत करीत नाहीत. ते त्यांना तशी मदत व्यवसायातही करीत नाहीत. हं, करीत असतात थोडीशी मदत ती लहानशा टपऱ्या टाकण्यात. कारण वाटत असतं की ज्याला आपण मदत करणार. तो व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त वरच्या पातळीवर जायला नको. तो मी ज्या स्थितीत आहे. त्याच्या थोडा खालीच राहायला हवा. याबाबतीत महाडच्या चवदार तळ्याचं एक उदाहरण आहे व ते उदाहरण बोध घेण्यालायक आहे. 
         महाडमध्ये चवदार तळ्याचं आंदोलन झालं. त्यावेळेस बाबासाहेब चांभार समाजाजवळही गेले. म्हणाले, 
          "आपल्या महाडातच आमचं आंदोलन आहे. हे आमचं आंदोलन नसून तुमचं आंदोलन आहे. तेव्हा आपण आम्हाला सक्रीयतेनं मदत करावी."
           ते बाबासाहेबांचं बोलणं. त्यावर उत्तर देत महाडातील बरेच व्यक्ती म्हणाले, 
            "बाबासाहेब, आम्ही सधन आहोत. आम्हाला तुमच्या आंदोलनाची गरज नाही. आम्ही आमचं पाहून टाकू. तुम्ही जा. आम्ही जर तुम्हाला थोडीशीही मदत केली वा तुमच्या आंदोलनात सक्रीयतेनं सहभागी झालो. तर येथील इतरेतर समाज आम्हाला जगू देणार नाही. आमच्या आईबहिणीवर तो समाज अत्याचार करेल." 
           ते त्यांचं बोलणं. तो समाज आलाच नाही बाबासाहेबांना त्या काळात त्या आंदोलनात मदत करायला. शिवाय जातीभेदानं जरी त्याही काळात चरणसीमा गाठली असली तरी चांभार समाजातील काही लोकं त्याही काळात धनधान्यानं सधन होती. ती शिक्षणानं सधन नव्हती. असं जरी असलं तरी भेदभावाच्या शृंखलेनं केवळ महाडातच नाही तर संपुर्ण हिंदुस्थानात भेदभाव होता. 
           आज हाच समाज सांगत आहे शहाणपण की बाबासाहेबांच्या विचारावर चाला. अन् प्रत्यक्षात समाजाला टपऱ्या मागायला सांगत आहे व पिढीजात धंदे करायला सांगत आहे. जे बाबासाहेबांना अभिप्रेत नाही. बाबासाहेब स्वतः म्हणत होते की हे पिढीजात धंदे सोडा. त्याचं काय? केवळ पैशानं आणि धनधान्यानं समाज अग्रेसर झाला म्हणजे समाजाचा विकास झाला असं होत नाही. विकास हा सर्वतोपरी व्हायला हवा. जेणेकरुन समाजाची एक विशिष्ट ओळख निर्माण होईल व कोणीही समाजाकडे बोट दाखविणार नाही. हे बरोबर आहे. परंतु आज या समाजाकडे लोकं बोट दाखवतात. ताशेरेही ओढतात, जरी हा समाज धनधान्यानं व पैशापाण्यानं सधन असला तरी. त्याचं कारण आहे. आजच्या काळात या समाजातील लोकांवर होत असलेले अत्याचार. असे अत्याचार झाल्यास समाजातील इतर माणसं त्याला मदत करीत नाहीत. मग तयार होते समस्या. ज्यातून इतर समाज त्याच गोष्टीचा फायदा घेत असतात. आपल्या समाजाचा दुर्बलपणा पाहून. 
         महाडातही तेच झालं. त्यांचीच त्या काळातील बिरादरीनं बाबासाहेबांना मदत केली नाही. महाडातील व्यक्ती जर सोडला, तर कोणीच बाबासाहेबांच्या आंदोलनाला गेले नाहीत. मदतही केली नाही. कारण त्यांना माहीत होतं की हा संपुर्ण इतरेतर समाज आपण आंदोलनात गेल्यास आपल्याला मारुन टाकेल. आपल्या आईबहिणीवर अत्याचार करेल. 
          महत्वाचं सांगायचं झाल्यास आज समाजानं शिकावं. मोठमोठ्या पदावर जावं. समाजाला शिकवावं. शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. केवळ टपऱ्या मागून समाजाचा विकास बाधीत करु नये म्हणजे झालं. तेव्हाच समाज पुढं जाईल व समाजाची उन्नती होईल यात शंका नाही. त्या समाजाचा जो गौरवशाली इतिहास आहे. तो अबाधीत राहू शकेल. त्यात वाढ होवू शकेल. त्यात कोरी पानं अजिबात राहू नयेत म्हणजे झालं. 

         अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०