परीवर्तन Balkrishna Rane द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

परीवर्तन

परिवर्तन 

राजा चंडप्रताप नखशिखांत रक्‍ताने भरत्ला होता. शत्रूला यमसदनास पाठवून, अनेकांना कंठस्नान घालून तो आपल्या राजधानीकडे परतत होता. त्याची सेना मिळालेल्या विजयाने उन्मादित होत विजयघोष करत होती. घोड्यांच्या टापांनी सगळा आसमंत भरून गेला होता. धुळीचे लोट उसळत होते. राजा चंडप्रताप खूष होता. त्याच्या पराक्रमाच्या कथा दूरदूरच्या प्रांतापर्यंत पोहोचल्या होत्या. आपल्या राज्याच्या सीमा चारही दिशांना त्याने वाढविल्या होत्या. आता त्याच्या राज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणाला होणार नव्हती. भाट व कवी त्याच्या पराक्रमावर स्तुतिसुमने उघळणार होते. नव्या उपाध्या, पदव्या त्याला चिकटणार 'होत्या. 

त्याची राजधानी त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. जागोजागी गुढ्या तोरणे उभारली होती. रांगोळ्यांनी रस्ते सजले होते. मंगलवाद्यांचा नाद सगळीकडे गुंजत होता. राजधानीच्या प्रवेशद्वारावर सुवासिनी नटून-थटून राजाला ओवाळण्यासाठी जमल्या होत्या. राजपुरोहित जातीनिशी सर्वांना सूचना देत होते. फुलांच्या शेकडो टोपल्या हाती घेऊन रमणी उभ्या होत्या. ही फुले विजयी सैनिकांवर उधळली जाणार होती. तुतारीचा आवाज अंगात वीरश्री निर्माण करत होता. हजारो नागरिक आपल्या पराक्रमी राजाच्या  विजयी सैन्याच्या स्वागतासाठी जमले होते. असा पराक्रमी, प्रजेचा हित पाहणारा राजा असणे हे आपले भाग्य आहे, असं प्रजा समजत होती .

एव्हाना विजयी सैन्य प्रवेशद्वारावर पोहोचले. साऱ्या नागरिकांनी एका सुरात प्रचंड जयघोष केला. रमणींनी टोपल्यांतील फुले सैनिकांवर उधळली. रंगांचे फवारे उडू लागले. एका सजवलेल्या हत्तीच्या सोंडेत हार देण्यात आला. हा हार हत्तीने राजा चंडप्रतापाच्या गळ्यात घातला. टाळ्यांचा कडकडाट झाला. महाराणी चंद्रकला लगबगीने राजाला ओवाळण्यासाठी पुढे झाल्या. आपल्या शूर-प्रतापी अशा पतीला 

डोळे भरून पाहिल्यावर तबकातील कुंकुमतिलक राजाच्या विस्तृत भालप्रदेशावर 

लावला. आता महाराणी राजाला ओवाळण्यासाठी सज्ज झाल्या. तेवढ्यात एक गंभीर ध्वनी ऐेकू आला.

थांब | राजा... मला काही सांगायचय !'' सारे स्तब्ध झाले. 

महाराणी घाबरल्या. राजा चंडप्रतापाने मान वर करून पाहिलं. भगवी वस्त्रे परिधान केलेला 'एक संन्यासी गर्दीतून जाट काढत पुढे आञत्ला

“बोला स्वामीजी... काय पाहिजे आपल्याला?'' राजाने त्या संन्याश्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. 

संन्यासी मंद हसला. 

"राजन्‌, अरे ज्याला प्रत्यक्ष परमेश्वर प्राप्त झालाय त्याला आणखी कशाची अपेक्षा असणार?”' 

““मग.... मग... आपलं म्हणणं  काय आहे?” राजाने विचारले. 

“राजन्‌. -. अरे, मला तुझी दया येतेय... अरे, आणखी किती लढाया करशील? भूमीच्या एका  तुकड्यासाठी किती हिंसा करशील? स्वत:ला पराक्रमी म्हणून घेतोस अजून तुझ्या या रक्‍ताची तहान लागलेल्या तत्लवारीने किती जणांना कंठस्नान घालणार आहेस? अरे, थांबव हे सारं...! मोक्षाचा मार्ग धर. 'हातून घडलेल्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी “संन्यासी हो.' अरे, या युद्धात जे मारले गेले त्यांच्या बायका-मुलांचा विचार तरी तुझ्या मनी कधी आला काय? नाही ना! अरे, तू कुणाला जीवन देऊ शकत नाहीस, तर त्यांना मारण्याच्या हक्कही तुला नाही....

अधिकारही नाही ! राजन्‌ हीच वेळ आहे... पश्चाताप करण्याची-.'' तो तेजस्वी संन्यासी धीरगंभीर आवाजात म्हणाला.  सारे आवक झाले... पुतळ्यासारखे स्तब्ध झाले. विजयोत्सवाच्या त्या उन्मादात स्मशानशांतता पसरली. सेनापती रुद्रप्रताप संतापाने बेभान झाले. राजपुरोहितांना काय बोलावे तेच कळेना. त्या आगंतुक संन्याशाविषयी सर्वांना प्रचंड संताप आला. पण विचारमग्न असा राजा चंडप्रताप झटकन पुढे झाला. संन्याशाचे पाय पकडून म्हणाला, 

“स्वामी... मी अज्ञानी बालक आहे. आजवर खोट्या मायेला बळी पडून अनेकांचे प्राण हिरावून घेतले. खरंच माझ्यासारखा पापी या पृथ्वीवर आणखी कुणी नसणार. आजपासून हिंसा करणार नाही, तलवारीला स्पर्शही करणार नाही. ही पाहा ठेवली तलवार तुमच्या पायी. स्वामी, तुम्हीच मला संन्यास धर्माची दीक्षा द्या." 

"उठ राजा. फार थोड्यांना त्यांच हित कशात आहे हे कळतं... धन्य आहेस तू... चल माझ्यासोबत.” संन्यासी राजाचा हात पकडून म्हणाला. 

साऱ्या प्रजेला शोकसागरात सोडून राजा संन्याशासोबत वनाकडे चालता झाला. 

काही महिने निघून गेले. संन्यासी राजाला उपदेश करून केव्हाच मार्गस्थ झाला होता. राजा चंडप्रताप राज्याच्या सीमेवरच्या घनदाट अरण्यात संन्यस्त जीवन जगत होता. निसर्गाच्या सहवासात... शांत वातावरणात देवाची उपासना करत आनंदाने दिवस कंठत होता. 

पण एके दिवशी नदीवरून स्नान-संध्या करून राजा आपल्या वनातील झोपडीकडे परतत होता. एवढ्यात समोरील दृश्य बघून तो थबकला. एका वृद्ध जोडप्याला काही दरोडेखोरांनी घेरलं होतं. यात्रेला निघालेल्या त्या दांपत्याकडचे गाठोडे त्यांनी हिसकावून घेतले होते. आता ते त्यांच्या अंगावरचे दागिने ओरबाडत होते. घाबरलेले ते वृद्ध जोडपे त्यांची विनवणी करीत... मदतीसाठी कुणी यावं म्हणून हाका मारत होते. दरोडेखोरांचा नायक खदखदा हसत, आपल्या सहकाऱ्यांना उत्तेजित करत होता. राजा चंडप्रतापला त्या जोडप्याची दया आली. संन्यासी वेषातीला राजा तत्काळ पुढे झाला. 

“सोडा त्यांना... देऊन टाका त्यांचं धन...” 

" अरे हा बघा गोसावडा... उपदेश करायला आलाय." दरोडेखोरांचा नायक म्हणाला .

“अरे, दुसऱ्याचे धन लुटणे,., जीव घेणे हे पाप आहे. सोडून द्या हे धंदे'! 

राजा चंडप्रताप विनवणीच्या सुरात म्हणाला, 

“आं ! व्या... छान ! सोडू म्हणतोस यांना? मग आम्ही काय खायचं.,; माती?'' सरदार तलवार नाचवत म्हणाला. 

" माती... माती कशासाठी? काम करा,,. कमवा व खा. देवाने सर्वांसाठी काही ना काही काम ठेवलंच आहे.'' 'चंडप्रताप शांतपणे म्हणाला. 

“होय ! म्हणूनच या जोडप्याला आता देवाकडे पाठवितो... खुशाल बसून खातील स्वर्गात... मारा रे त्यांना. '' दरोडेखोरांचा सरदार निर्दयपणे म्हणाला. दरोडेखोरांपैकी एक दरोडेखोर हातात नंगी तलवार घेऊन पुढे सरकला. ते वृद्ध जोडपे समोर साक्षात मृत्यू पाहून गर्भगळीत झाले. आता आपला मृत्यू अटळ आहे याची त्यांना जाणीव झाली. 

एवढा वेळ दरोडेखारांची विनवणी करणारा राजा चंडप्रताप झटकन त्या वृद्ध जोडप्यासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत संतापाची ठिणगी पेटली. मी कुणाला उपदेश करतोय? शांती, दया, क्षमा हे शब्दही ज्यांच्या शब्दकोशात नाहीत त्यांना! हिंसा हा ज्यांचा धर्म आहे... देव आहे त्यांना ! दगडाला उपदेश करून 

काय मिळणार?

 इकडे तलवार घेऊन तो क्रूरकर्मा राजाजवळ पोहोचला. त्याचे साथीदार बेभान होऊन हसत होते. संन्यासी राजाची टर उडवत होते. तरीही राजा चंडप्रताप शांत होता. पण त्याच मन त्याच्या अहिंसक तत्त्वाविरुद्ध बंडखोरी करून उठलं म्हणालं, “अरे तू राजा आहेस... प्रजेचं पालन करणे, तिचं रक्षण करणे हे तुझं 'परमकर्तव्य आहे. हाच खरा राजधर्म आहे. आज हे वृद्ध, शक्तिहीन जोडपं तुझ्याकडे अपेक्षेने पाहात आहे. 'एखाद्या षंढासारखं आयुष्य कंठण्यापेक्षा राजधर्माचं पालन करताना मेलास तर तुला मुक्‍ती मिळेल.. खरा मोक्ष मिळेल. चल उठ... हो पुढे !' 

 राजा चंडप्रताप  संतापाने थरथर कापत जागेवर उसळला. .. पुन्हा त्या संन्यस्त शरीरात राजा चंडप्रताप संचारला. ज्याची तळपती तलवार विजेलाही लाजवायची तो चंडप्रताप संतापाने बेभान होत पुढे झेपावला. कुणाला काही समजायच्या आत त्याने एका दरोडेखोराच्या हातून तलवार खेचून घेतली आणि मग त्या रणधुरंधर राजाची तलवार सपासप चालायला लागली. बघता बघता कुणाचा हात, कुणाचं डोकं घडावेगळं झालं. ज्या राजाने पुन्हा तलवार हाती घेणार नाही... हिंसा करणार नाही अशी शपथ घेतली होती तोच राजा आज निर्दयपणे आपल्या अपार युद्धकौशल्याने दरोडेखोरांना यमसदनी पाठवत होता. आठ-दहा वरोडेखोर भूमीवर पडून विव्हळत होते. उरलेले दोघे-तिघे भयाने तिथून पळून गेले. राजा चंडप्रताप नखशिखांत रक्‍ताने भिजला होता. ते वृद्ध जोडपे आश्चर्याने आपल्या . समोरच्या संन्याशाकडे पाहातच राहिले. रक्‍ताने माखलेली तलवार तशीच हाती  घेऊन राजा त्या वृद्ध जोडप्याला म्हणाला, “चला... मी सोडतो तुम्हाला. मी पण वाट चुकलेलो. पण आज पुन्हा मला माझी वाट सापडली. ” राजा त्या जोडप्यासमवेत वनाचा त्याग करून राजधानीच्या दिशेने चालू लागला. 

बाळकृष्ण सखाराम राणे