आज सक्षम पिढी तयार होत नाही Ankush Shingade द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आज सक्षम पिढी तयार होत नाही

आज सक्षम पिढी तयार होत नाही? 
         
           *गुरु..... काल गुरुला देव मानत होते. म्हणत होते की गुरु हाच ब्रम्ह, गुरु हाच विष्णू, गुरु हाच महेश आणि गुरु हाच सर्वेसर्वा अर्थात परब्रम्हं आहे. एवढा गुरुला मान होता. कारण गुरु जे काही विद्यार्थ्यांना शिकवायचा. त्यात ते शिकवितांना मुलांच्या समोर संकटं निर्माण करायचा. त्यात तो कधीकधी शिक्षाही करायचा. ज्यातून विद्यार्थी असे घडायचे की ते पुढं युद्ध करतांना मरणालाही घाबरत नसत. ते भेकाड्यासारखे आत्महत्या करीत नसत. तर युद्ध करुन मरण पत्करत. काही विद्यार्थी हे आपल्या संसारात यशस्वी होत. मग त्याला कितीही संकट आलं तरी. मात्र आज तसं नाही. आजचे विद्यार्थी मरणाला अजिबात घाबरत,नाहीत. ते संकटालाच घाबरतात. कारण आजचा शिक्षक हा संकटांवर मात कशी करायची ते शिकवीत नाहीत. ज्यामुळं संकटावर मात करण्याचं तंत्र विद्यार्थ्यांना माहीत नसल्यानं आत्महत्या घडतात. याला जबाबदार कोण? याला जबाबदार आजचा शिक्षक नाही तर,याला जबाबदार आहे पालक. पालकांमुळंच सरकारनंही शिक्षणाचं तंत्र बदलवलं. ज्याची झळ पालकांना नाही, शिक्षकांनाही नाही, सरकारलाही नाही तर विद्यार्थ्यांना पोहोचेली आहे. यात शंका नाही.*
         कालमितीस माणूस बदलला नव्हता असे नाही. काय परीवर्तनाचाच असतो. त्यानुसार बदलाव महत्वपुर्ण घटक असतो. काल माणूस माकडरुपात झाडावर राहात होता. आज तो जमीनीवर राहतो. यालाच परीवर्तन म्हणता येईल. कालचा झाडावरचा माणूस आज जसा जमीनीवर आला. तसतसा त्याच्या राहणीमानातही बदल झाला. तो बदल अनुषंगीक व कालसापेक्ष आहे. 
          सामाजिक परीवर्तन झालं व काळ बदलला. त्यानुसार काळ बदलला असल्यानं माणसाच्या राहणीमानातही बदल झाले. एक स्री एका नऊवारी लुगड्यावरुन साडीवर आली. त्यानंतर सलवार कमीजवर व आता जीन्स टीम शर्टवर. आज स्रियांची केससज्जाही बदलली.
          आज स्री जशी बदलली. तसाच बदलला पुरूषही. त्यानं आपलं धोतर त्यागून त्याजागी फुलपँट आणला. केसाचीही फॅशन बदलवली. इतकंच नाही तर कालची डोक्यावरची टोपी जावून त्याजागी इंग्रजांची हॅट आली. 
         खानपान बदललं व घरेदारेही बदलली आणि रहदारीची साधनंही बदलली. त्यामुळंच साहजीकच गुरुही बदलला. कालचा गुरु हा कालचा गुरु राहिलेला नाही. 
          कालचा गुरु हा भेदभाव करणारा नव्हता. तो विद्यार्थ्यांना सर्वतोपरी ज्ञान शिकवीत असे. तो आपल्या मुलाला तेवढंच ज्ञान देत असे, जेवढे ज्ञान ते आपल्या शिष्यांना देत असत. परंतु आजचा गुरु आपली मुलं कॉन्व्हेंटमध्ये टाकतात. ते ज्या मुलाला शिकवतात. त्या शाळेत टाकत नाहीत. हे झालं शिकविणं. आजच्या शिक्षकांचा पोशाखही बदलला. कालचा गुरु हा धोतरवर राहात असे. आजचा गुरु शाळेत चक्कं टी शर्ट व फुलपँटवर वावरतो. 
         आज शिक्षकाचं जसं राहणीमान बदललं. शिकवणं बदललं, तसंच शिकविण्याचं स्थळही बदललं. कालच्या काळात मुलांवर संस्कार व्हावे म्हणून त्याला आश्रमात जावं लागत असे. तिथंच अभ्यास व्हायचा, परीपुर्ण अभ्यास. ज्यात केवळ युद्धकलाच नाही तर राजकारण, राज्यकारभार याचाही अभ्यास शिकवला जायचा. तोही परीपुर्ण. मग एकदा का परीपुर्ण अभ्यास झाला की कसोटी व्हायची. ती कसोटी मायबापासमोर व्हायची. त्यावेळेस त्यावेळच्या मुलाच्या शिक्षणात पालक ढवळाढवळ करायचे नाहीत. आपल्या मुलाला आपण टाकलेल्या आश्रमातील गुरु काय शिकवतो, कसा शिकवतो? याकडे मायबाप लक्ष द्यायचेच नाही अजिबात. ते शिक्षण परीपुर्ण झाल्यावरच दिसायचं. जेव्हा कसोटी घेतली जात असे. शिक्षणात मध्यंतरीच्या काळात मायबाप दिसत नसत. ते दिसत असत एकदम शेवटी. जेव्हा कसोटी असायची व परीक्षा घेतली जात असे. 
         शिकविण्याचं सानिध्य अर्थात स्थळ हेही दूर अशा ठिकाणी अर्थात अरण्यात असायचं. जरी एवढा मोठा राजमहाल असायचा. तरी तिथं शिकवायची व्यवस्था नसायची. त्याचं कारण असायचं विद्यार्थ्यांना काटक बनवणं. विद्यार्थी हे अरण्यातच राहात असल्यानं ते स्वतःचं आणि आपल्या गुरुंचं संरक्षण हिंस्र प्राण्यांपासून करायचे. त्यामुळंच विद्यार्थी साहजीकच काटक बनत असत. शिवाय विद्यार्थ्यांलाही मग मायबाप बालपणापासूनच दिसत नसल्यानं ते आपल्या गुरुंनाच मायबाप समजायचे. त्यांनाच देवही समजायचे. त्यानंतर ते त्यांच्याच आज्ञेत वागायचे. तसंच स्थळ हे निसर्गाच्या सानिध्यात असल्यानं त्या विद्यार्थ्यांना परीसर अभ्यास, भौगोलिक घटना शिकविण्याची गरज नसायची. पर्यावरण, प्रदूषण, स्वच्छता या बाबी त्याला प्रात्यक्षिक रुपात शिकायला मिळत असत. एकंदरीत सांगायचं झाल्यास मायबापाचा शिक्षणात हस्तक्षेप नसल्यानं त्यांची मुलं एवढी काटक स्वरुपाची तयार व्हायची की त्यांच्या जीवनात कोणतंही संकट आलं की ते त्या संकटाचा सामना करण्यास समर्थ असायचे.
          काळ बदलला. तसं शिक्षण शिकविण्याचं स्थळही बदललं. मायबापाचा हस्तक्षेपही बदलला. शिक्षणाचं जे स्थळ अरण्यात होतं, ते स्थळही बदललं व ते स्थळ राजमहालात आलं. त्या राजमहालात, ज्या राजमहालात पर्यावरण दिसत नव्हतं. नैसर्गिक वातावरण नव्हतं. त्यामुळंच पर्यावरण म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना नैसर्गिकरीत्या शिकवता येत नव्हतं. परीसर अभ्यासाचे कुत्रिम पाठ शिकवावे लागायचे. संकट नसायचं. ना हिंस्र प्राण्यांचं संकट असायचं, ना कोणत्या स्वरुपाचं संकट की जे संकट आश्रमात शिकविणारा गुरु विद्यार्थी कितपत शिकला, हे तपासून पाहण्यासाठी निर्माण करायचा. 
          एकंदरीत सांगायचं झाल्यास काळ बदलला व बदलत्या काळात जिकडे तिकडे पसरलं अंधाराचंजाळं. अंधानुकरण. प्रदुषण वातावरणाचं नाही तर विचारांचं होत गेलं. ज्यातून कलुषीत विचार शिकवले जायला लागले. आश्रमपद्धती केव्हाचीच अदृश्य झाली व त्याजागी आली कुत्रीम शिकविण्याची व्यवस्था. ज्यात मायबापाचा वारंवार हस्तक्षेप होत असल्यानं गुरुंना अभय नव्हतं व त्याला ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवायचं होतं. ते तो शिकवू शकत नव्हता. साहजीकच तंत्र बदललं व बदलत्या तंत्रानुसार शिक्षण बदललं. 
         आज शिक्षणाची अवस्था वाईटच आहे व या वाईट अवस्थेनुसार शिक्षण हे कालच्या शिक्षणासारखं वाघिणीचं दूध राहिलेलं नाही. आज मायबापाचा वारंवार शिक्षणात हस्तक्षेप होत असल्यानं मुलांसमोर गुरु संकट निर्माण करु शकत नाही. त्यातच मुलं ही काटक स्वरुपाची तयार होत नाहीत. ती भेकड स्वरुपाची तयार होतात व थोडंसं जरी संकट आलं तरी घाबरुन जातात. 
          महत्वपुर्ण बाब ही की शिक्षणापुढं मायबापानं आपल्या मुलांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवू नये. त्याचा बाऊ करु नये. गुरु त्यांना अभ्यासाविषयी करीत असलेल्या शिक्षा ह्या किरकोळ स्वरुपाच्या असतात. त्याचा बाऊ करु नये. ते,एक संकटच. काही पालक आता शिक्षणाच्या स्थळाची व्यवस्था बदलण्यानं त्याचा बाऊ करतात. 
          कोणतेही संकट. ते संकट येणारच आहे. ते जेव्हा येईल, तेव्हाच मुलंही काटक बनतील. त्यानंतर ते जीवनातील कोणत्याच संकटाला घाबरणार नाहीत. कारण मायबाप काही त्याच्या समस्त जीवनाला पुरत नाहीत. सगळा संसार मायबापानंतरही त्यांनाच सांभाळावा लागतो. जर त्या विद्यार्थ्यांच्या समोर त्यांचा सर्वांगीण विकास करीत असतांना परीक्षारुपी वा किरकोळ शिक्षेच्या स्वरुपाचं संकट निर्माणच झालं नाही तर ते जीवनातही यशस्वी होणार नाही याची पालकांनी दखल घ्यावी. त्यामुळं काळ जरी बदलला असला तरी बदलत्या काळानुसार पालकानं बदलावंच. बदलू नये असं नाही. परंतु असा बदलाव करु नये की जो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देवू शकेल. तुमच्या बदलावानं तुमच्याच विद्यार्थ्यांचं आयुष्य उध्वस्त होवू शकेल.