अनुबंध बंधनाचे. - भाग 33 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 33

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ३३ )

काल रात्री जागरण झाल्यामुळे आज प्रेम थोडा उशिराच उठला होता. कामावर जायला उशीर झाल्यामुळे घाईतच आवरून तो टिफीन घेऊन घराबाहेर पडला. थोड्या वेळातच तो कंपनीत पोचला, बाप्पाच्या फोटोला हार चढवून अगरबत्ती लाऊन सर्व काही ठिक होऊ दे असा आशीर्वाद मागत आपल्या रोजच्या कामाला सुरुवात केली.
इकडे अंजली सुद्धा नेहमीप्रमाणे पहाटे लवकर उठून आवरून कॉलेजला निघुन आली होती. पण आज तिचे लेक्चर वरती लक्ष लागत नव्हते. कसेतरी सर्व लेक्चर अटेंड करून ती कॉलेज मधुन निघाली. सोबत मेघा आणि सॅड्रिक पण होते. 
त्या दोघांनाही या गोष्टीची कल्पना होती. पण आज सविस्तर तिच्याकडून जाणून घ्यायचे असे ठरवून ते दोघे तिला घेऊन जवळच असलेल्या तलावाजवळ येऊन बसले. 
खुप फोर्स केल्यावर तिने घडलेलं सर्व काही दोघांनाही सांगुन टाकले. आणि ते बोलता बोलता ती मेघाला मिठी मारून रडु लागली.

अंजली : मेघा....! मी प्रेम शिवाय नाही राहु शकत ग...!😥

मेघा : अरे हो...! तु रडु नको...! होईल सर्व ठिक.

* असे बोलुन त्या दोघांनाही तिला धीर देत तिची समजुत काढून तिला थोडंसं रिलॅक्स केलं. नंतर ते सर्वजण घरी आले. 
अचानक घडलेल्या या घटनेमुळे दोघांचेही रोजचे लाईफ बदलले होते. आता लवकर भेटता येणार नव्हते. कॉलवरही जास्त बोलता येणार नव्हते. 
पुढे काहीतरी चांगले होईल या आशेने, स्वतःच स्वतःची समजुत काढून दोघेही येणारा प्रत्येक दिवस पुढे ढकलत होते.
असेच काही दिवस निघुन गेले. दिवाळीचा सण आला होता. अंजलीने स्वतःहून तिच्या बाल्कनी मधे छानसा कंदील लावला होता. छान लायटिंग वगैरे करून, आजूबाजूला पणत्या लावुन तिने बाल्कनी छान सजवली होती. का कोणास ठाऊक पण तिला आज छान वाटत होते. 😊
दिवाळीचा पहिलाच दिवस होता. सुट्टी असल्यामुळे प्रेम आज घरीच होता. संध्याकाळचे सात वाजले होते. तेवढ्यात त्याला आरवचा कॉल आला, त्याने त्याला बाहेर बोलवून घेतले.
प्रेम बाहेर येऊन त्याच्या गाडीवर बसला. आपण कुठे चाललोय हे न विचारताच....
तिथून ते दोघे साईबाबांच्या मंदिरात गेले, तिथे आज थोडी गर्दी होती, त्यांनी एक एक गुलाबाचे फुल घेऊन दर्शनासाठी लाईन लावली. अर्ध्या तासातच त्यांचे दर्शन घेऊन झाले. गुलाबाचे फुल साईचरणी अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि ते तिथून प्रसाद घेऊन बाहेर पडले.
तिथून ते दोघेही गाडीवर बसुन निघाले, वाटेत आरवने एका ठिकाणी गाडी थांबवली. आणि मिठाई घेण्यासाठी तो एका मिठाईच्या शॉप मधे गेला. 
प्रेम तिथेच गाडीजवळ उभा होता. तेवढ्यात अंजली आणि तिचे मॉम डॅड त्या मिठाईच्या शॉप मधुन बाहेर पडत होते. प्रेमचे तिकडे लक्ष जाताच तो थोडासा गोंधळला... काय करावं ते त्याला सुचत नव्हतं. 
समोरून अंजली आणि मॉम येत होत्या, तिचे डॅड पार्किंग मधे असलेली गाडी आणण्यासाठी गेले.
प्रेम बाईक जवळच उभा होता, अंजलीला तो समोर दिसताच ती घावत त्याच्याजवळ आली. पाठीमागून मॉम पण तिथे आल्या. 
अंजली : ओय...! तु काय करतोय इथे....?😊
प्रेम : मी आरव सोबत आलो आहे. तो मिठाई घेण्यासाठी गेला आहे...तुम्ही इथे...?
मॉम : हो...! अरे आम्ही पण थोडी मिठाई घेण्यासाठी आलो होतो. खुपच गर्दी आहे आज इथे...! बरं झालं तु भेटला इथे....!😊
* त्या बॅग मधुन एक मिठाईचा बॉक्स काढून त्याच्या हाती देत त्याला बोलतात....
मॉम : तुला आणि तुझ्या सर्व परिवाराला माझ्याकडुन दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा. 😊
प्रेम : तुम्हाला पण दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा. पण हे कशाला हवं...! तुम्ही भेटलात हेच खुप होतं. 😊
अंजली : प्रेम माझ्याकडुन पण तुला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा. 😊
प्रेम : तुलाही माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा.😊
मॉम : अंजु...! चल...! डॅड गाडी घेऊन येतील, पुन्हा काही प्रॉब्लेम नको. 
अंजली : थांब ना जरा ...!
प्रेम : नको....! जा... तु, आपण बोलू नंतर. 
अंजली : बरं ओके...! आम्ही निघतो... बाय..!
मॉम : चल प्रेम...! बाय...! काळजी घे.
प्रेम : हो...! बाय.
* असे बोलुन त्या दोघी तिथून निघतात तेवढ्यात डॅड गाडी घेऊन तिथे पोचतात. प्रेम त्यांना पाहून लगेच पाठमोरा होतो. ते लोक गाडीत बसून तिथून निघतात. गाडी थोडी पुढे गेल्यावर तो मागे वळून गाडीकडे पाहतो. तर अंजली विंडो मधुन त्याला पहात होती. तिथूनच तो तिला हाताने बाय करतो. तशी ती त्याला एक गोड स्माईल देते आणि नीट सीटवर बसते. 
या अचानक घडलेल्या भेटीमुळे दोघांनाही खुप आनंद झाला होता. प्रेम तिच्या विचारात हातात मिठाईचे बॉक्स घेऊन तिथे उभा होता, तेवढ्यात आरव तिथे येतो. प्रेमच्या हातातील मिठाईचा बॉक्स पाहून तो बोलतो.
आरव : अरे....! हे काय...मिठाई...!🤔
प्रेम : अरे हो...! अंजली आणि तिची मॉम भेटले होते, त्यांनीच दिला हा मिठाईचा बॉक्स.
आरव : काय...! 🤔 कधी.... ?
प्रेम : आत्ताच...! इथेच आले होते ते लोकं, गेले पण.
आरव : काय बोलतो...! खरंच, चला मग दिवाळीची छान भेट मिळाली तर....!😊
प्रेम : बरं...! ते जाऊ दे, चल आता निघूया...!
* ते दोघेही तिथून घरी येतात, आरव त्याला वाटेत त्याच्या घराजवळ सोडतो आणि पुढे तो त्याच्या घरी निघुन जातो.
प्रेम घरी येऊन तो मिठाईचा बॉक्स ताईकडे देतो, आज अचानक घडलेल्या अंजलीच्या भेटीमुळे तो खुप खुश होता. आणि तिकडे अंजलीही आनंदी होती.
दोघांच्याही दिवाळीची सुरुवात खुप छान झाली होती.

असेच पुन्हा काही दिवस निघुन जातात. 

प्रेम आणि अंजली आता भेटत नव्हते. पण कधीतरी त्या दोघांचे फोनवर बोलणे होत होते. 
अंजली खुप वेळा त्याला भेटण्यासाठी बोलवत होती, पण प्रेम नेहमी नकार देत होता. त्याला नकळत या गोष्टीची जाणीव झाली होती की, अशा वातावरणात अंजलीला भेटणं योग्य नाही. कारण त्याच्या डॅड नी तिच्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली होती. ही गोष्ट स्वतः सॅड्रिक ने त्याला सांगितली होती...
एक दिवस सॅड्रिकला घरी बोलवून तिच्या डॅड नी त्याला ताकीद दिली होती की, "तो मुलगा म्हणजे प्रेम.... यापुढे कधीही अंजलीला भेटला नाही पाहिजे आणि तुम्ही लोक पण त्याला जवळ करू नका, त्याच्यापासून लांबच रहा." 
या सर्व प्रकारामुळे प्रेम सावध होता पण ही गोष्ट तो अंजलीला सांगु शकत नव्हता. म्हणुन तो तिला भेटायला टाळत होता.
असेच पुढे काही दिवस निघुन जातात...
 ख्रिसमस जवळ आला होता. आत्ता पर्यंत अंजली प्रेम चे सर्व ऐकत होती कारण त्याने ख्रिसमस ला भेटण्याचे प्रॉमिस केले होते. 
त्या एका आशेवर ती एवढे दिवस इच्छा असूनही त्याला न भेटता राहिली होती. 
अखेर ख्रिसमस चा दिवस आला होता. आज ते दोघे भेटणार होते. 
अंजली आज खुप खुश होती... पण भेटायचा काही प्लॅन तयार नव्हता, कारण आज तिच्या घरी तिचे काका आणि त्यांची फॅमिली आले होते. आणि डॅड घरी असताना त्यांना काय कारण सांगून घराबाहेर पडायचं हा प्रश्न होताच....
घरातील लोक आणि पाहुणे, तसेच डॅडचे मित्र मंडळी यांचे घरी येणे जाणे चालू असल्यामुळे संपूर्ण दिवस त्यातच गेला होता. संध्याकाळ झाली होती, घरातले सर्व आवरून ते सर्वजण चर्च मधे प्रेयर साठी जाण्यास निघाले.
इकडे प्रेम याच विचारात होता की, आज तिला भेटायचे प्रॉमिस केले होते, तरीही तिचा आज एकही कॉल पण आला नाही...🤔
शेवटी तो घरातुन निघतो आणि आरव ची बाईक घेऊन तो त्या चर्च जवळ येतो. कारण त्याला हे माहीत होते की, अंजली आणि तिची फॅमिली तिथे नक्की येणार. 
थोड्या अंतरावर गाडी पार्क करून तो तिथेच उभा राहतो. जेणे करून अंजली त्याला चर्च कडे जाताना तरी दिसेल. 
अर्धा तास होऊन गेलेला असतो, पण ती काही त्याला दिसत नाही, त्यामुळे तो थोडा अस्वस्थ होतो. शेवटी त्याला राहवत नाही म्हणुन तो सॅड्रिकला कॉल करतो, पण तोही कॉल घेत नव्हता, त्यामुळे तो थोडा निराश होतो. अजुन थोडा वेळ थांबुन निघु... असं मनाशीच ठरवून तो चर्च च्या गेट कडे डोळे लाऊन बसतो. 
तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग होते. सॅड्रिकचा कॉल आलेला पाहून तो पटकन रिसिव्ह करतो.
सॅड्रिक : हाय प्रेम...! बोल.... कुठे आहेस..?
प्रेम : मी...! तुमच्या इथेच...! तु कुठे आहेस...?😊
सॅड्रिक : मी चर्च मधे आहे, तु थांब मी बाहेर येतोय.
*असं बोलुन तो चर्चच्या गेट मधुन बाहेर येतो. प्रेमला तो दिसताच तो त्याला आवाज देतो. सॅड्रिक तिथे येताच प्रेम त्याला मिठी मारत बोलतो.
प्रेम : हॅप्पी ख्रिसमस... सिद...!😊
सॅड्रिक : मेरी ख्रिसमस ब्रो....!😊
प्रेम : बाकी....! कसं झालं सेलिब्रेशन..?😊
सॅड्रिक : मस्त...! पण तु कधी आला इथे ? आणि अंजु भेटली का तुला. ?
प्रेम : नाही भेटली रे...! मी पण आत्ताच आलोय, आणि आज दिवसभरात तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही.
सॅड्रिक : हो...! बोलली ती मला...! ती पण आत मधेच आहे तिच्या फॅमिली सोबत.
प्रेम : म्हणजे तिला भेटता येणार नाही...? खरं तर मीच तिला प्रॉमिस केलं होतं, आज भेटू म्हणून, पण....
सॅड्रिक : इट्स ओके...! माहितीये मला...! तुम्ही इथे भेटणं सेफ नाही....! तु एक काम कर, माझ्या घरी चल....! मी थोड्या वेळात अंजुला तिथे घेऊन येतो.
प्रेम : अरे... पण...! कशाला उगाच रिस्क, नको मी जातो घरी, तु निरोप दे तिला की, मी येऊन गेलो म्हणुन....?
सॅड्रिक : अच्छा....! म्हणजे तु मला मार खायला लावणार....!😊
प्रेम : का....?
सॅड्रिक : मॅडम मला बोलल्या आहेत की, आज काहीही करून मला प्रेमला भेटायचे आहे. आणि तु इथे येऊन तिला न भेटता गेला, हे जर तिला समजले तर मग माझं काही खरं नाही. 😊
प्रेम : मग काय करणार....?
सॅड्रिक : मी सांगतोय ते कर, तु चल पुढे, मी येतो तिला घेऊन. 👍🏻
प्रेम : बरं ओके....! पण रिस्क वाटत असेल तर नको हे सर्व करायला, आम्ही भेटू नंतर.....!
सॅड्रिक : नको रे भाई....! तु जाशील निघुन आणि मला ऐकुन घ्यावं लागेल. तु हो पुढे....! आम्ही पोचतोच.
प्रेम : ठिक आहे...! जातो.😊
*असं बोलुन तो तिथून बाईक घेऊन सॅड्रिकच्या घराजवळ पोचतो. गाडी पार्क करून तो त्यांची वाट पहात बसतो.
थोड्याच वेळात समोरून अंजली सॅड्रिकसोबत येताना त्याला दिसते. जसजशी ती जवळ येते, तसा प्रेम एकटक तिच्याकडे पहात असतो. 
व्हाइट गाऊन मधे एखादी सुंदर परी समोरून येत असल्याचा त्याला भास होतो. आणि थोड्याच वेळात ती त्याच्या समोर येऊन उभी राहते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालुन एकमेकांना पहातच राहतात. 
आज खुप दिवसांनी ते दोघे भेटत होते त्यामुळे तिचे डोळे पाण्याने भरलेले असतात. तिला तसे पाहून प्रेम तिचा हात हातात घेत तिला विश करतो.
प्रेम : हॅप्पी ख्रिसमस अंजु....!😊
* भरल्या डोळ्यांनी ती त्याला अलगद हलकीशी मिठी मारत ती त्याला बोलते.
अंजली : मेरी ख्रिसमस प्रेम...!😢
सॅड्रिक : आपण आत जाऊन बोलूया का...! हे इथे जरा बरं दिसत नाही....!😊
* तो असं बोलताच अंजली प्रेम पासुन वेगळी होते, ते सर्वजण सॅड्रिकच्या घरी जातात.
ते आत गेल्यावर सॅड्रिक दोघांनाही पाण्याचे ग्लास आणुन देतो. दोघेही सोफ्यावर बसुन पाणी पित असतात, तेवढ्यात सॅड्रिक बोलतो...
सॅड्रिक : चला आपल्याकडे जास्त वेळ नाही. तुम्ही माझ्या रूम मधे जाऊन बोला, तोवर मी इथेच हॉल मधे थांबतो. 😊
प्रेम : अरे...! कशाला...? आम्ही इथेच बोलतो ना !
* सॅड्रिक दोघांकडे पाहून हसतो...😊 तशी अंजली सोफ्यावरून उठते, स्वतःचा आणि प्रेमच्या हातातील पाण्याचा ग्लास टि पॉय वर ठेवते आणि प्रेमच्या हाताला पकडुन त्याला उठवते व तशीच ती त्याला सॅड्रिकच्या रूम मधे घेऊन जाते. आत गेल्यावर डोअर पुढे करते आणि तिथेच त्याला घट्ट मिठी मारते. प्रेम पण तिला मिठीत घेत तिच्या पाठीवर हात फिरवत थोड्या वेळाने तिला बोलतो.
प्रेम : हॅलो....! मॅडम...! सोडाल का आता, मला जरा नीट पाहू दे तरी या सुंदर परीला....!😊
अंजली : नाही...! मी नाही सोडणार,...! मला इथे असच राहायचं आहे तुझ्या मिठीत. 😔
प्रेम : अरे हो....! पण किती वेळ...?😊
अंजली : कायमचं....!😔
प्रेम : अच्छा....! पण तिकडे कोणीतरी आपली वाट पहात आहेत हे लक्षात आहे ना...?
अंजली : हो...! माहित आहे, पण प्रेम मला नाही राहायचं असं तुझ्यापासुन दुर. खुप ञास होतोय मला. हे असं अजुन किती दिवस चालणार आहे, कधी संपणार आहे हा दुरावा...? 😌
प्रेम : माहीत नाही पण अजुन काही दिवस तरी आपल्याला हे असच रहावं लागेल. 
अंजली : मी नाही राहु शकत तुझ्याशिवाय...? बोलले ना...! मग का कळत नाही तुला...? 
प्रेम : अरे सोन्या..! मी तरी काय करू, तुच सांग बरं, मला नाही वाटत का, तुला भेटावं म्हणुन...?
अंजली : ते माहीत नाही मला...! पण आत्ता मला असं वाटतंय की, तुला सोडुन जायचं नाही.
प्रेम : बरं ओके....! (असं बोलुन तो तिला आपल्या मिठीत घट्ट पकडुन ठेवतो)
* दोघेही थोडा वेळ एकमेकांच्या मिठीत विसावा घेत होते, तेवढ्यात बाहेर कोणाचा तरी बोलण्याचा आवाज आला. सॅड्रिक कोणाशी तरी बोलत होता. ते ऐकुन अंजली थोडीशी घाबरली, आणि प्रेमला हळुच बोलली.
अंजली : कोण आलं असेल....? डॅड तर नाही ना...? 
* प्रेम तिचा चेहरा दोन्ही हातात घेत तिला हळू आवाजात बोलतो.
प्रेम : रिलॅक्स...! मी आहे ना ! 
* ती पुन्हा त्याच्या मिठीत जाते. बाहेरचा आवाज बंद होताच ती प्रेमला बोलते.
अंजली : प्रेम मला हा दुरावा सहन होत नाही रे...!😢
प्रेम : हो...! कळतंय मला...! पण काय करणार, थोडे दिवस तरी आपल्याला हे असच रहावं लागेल.
अंजली : हे थोडे दिवस कधी संपतील....?😞
प्रेम : लवकरच.....! यातुन काहीतरी मार्ग निघेल. बी पॉजीटिव्ह.🙂 
अंजली : हो...! मी ही तोच प्रयत्न करतेय. 🙂
प्रेम : गुड गर्ल...! 🙂 आता कसं बोलली. 
अंजली : आय थिंक..., हे दिवस लवकर निघुन जातील.
प्रेम : हो...! नक्कीच...!🙂 पण या थोड्या दिवसात तु जरा अभ्यासात लक्ष दे. कळलं....!🙂
अंजली : हो.... सर...! मी प्रयत्न करेन. 😊
प्रेम : फक्त प्रयत्न नाही, तुला हे करायचंय. 😊
अंजली : येस बॉस...!😊
* असं बोलुन ती पुन्हा एकदा त्याला अलगद मिठी मारते.
प्रेम : मॅडम...! उशीर होतोय...! निघुया आता....?
अंजली : थोडा वेळ थांब ना...!🙂
प्रेम : नो...! बस झालं आता...! तिकडे वाट बघत असतील तुझी, पुन्हा काही प्रोब्लेम नको. चल निघु.
अंजली : बरं ओके....! पुन्हा कधी भेटशील....? 😊
प्रेम : लवकरच...!😊
अंजली : मी त्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहीन....!😊
* ते बोलत असतात तेवढ्यात बाहेरून सॅड्रिक दरवाजा नॉक करतो. प्रेम दरवाजा खोलतो आणि ते दोघे बाहेर येतात.
सॅड्रिक : चला आता...! टाईम अप...! खुप वेळ झाला. तिकडे शोधाशोध चालू झाली असेल. 
प्रेम : सिद...! थॅन्क्स ब्रदर....,!😊 आमच्यासाठी तु एवढं सर्व....!😊
सॅड्रिक : अरे....! आभार प्रदर्शन पुरे झाले. चला आता निघुया...!😊

* ते सॅड्रिकच्या घरातुन बाहेर पडतात. प्रेम तिथुनच घरी जातो. अंजली सॅड्रिक सोबत पुन्हा चर्च मधे निघुन जातात. 
खुप वेळ अंजली न दिसल्यामुळे तिचे डॅड थोडे अस्वस्थ झालेले असतात. थोड्याच वेळात अंजली आणि सॅड्रिक तिथे पोचतात. 
आम्ही मित्रांसोबत बाहेर होतो, असं बोलुन सॅड्रिक तिच्या डॅड ची समजूत घालुन थोडा रिलॅक्स होतो.
खुप दिवसांनी आज ते दोघे भेटलेले असतात. त्या काही क्षणाच्या भेटीने त्यांना खुप आठवणी दिल्या होत्या, पुढील काही दिवसांच्या विरहासाठी.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️