बरसुनी आले रंग प्रीतीचे - 36 Anjali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 36

सकाळीच प्रणिती ला जाग आली तर तो बाजूला नव्हता... खाली असतील म्हणून तिने पटापट सगळ आवरलं ... मंगळसूत्र घालायला जाणार ते हातातून खाली निसटलं...




"ohh god ..."तिने खाली वक्त ते उचललं पण मधून तुटलं होत... 

"मॉम तर बोलल्या होत्या असं झालं तर अपशकुन होत...."तिने त्या तुटलेल्या मंगळसूत्रावरून हात फिरवला आणि सोनाराकडे जाताना देऊ असा विचार करत purs मध्ये ठेवलं.... 

तुंमध्ये बाहेर पडत ती पायऱ्या उतरत होती... कि हॉल मधला शांत नजर दिसला.... घरातले सगळे मांस उभी होती.... समोर ऋग्वेद उभा होता.... प्रिया चा हात हातात घेऊन...!!!


प्रणिती खाली आली ... सगळेच ऋग्वेद ने जे सांगितलं होत ते ऐकून सुन्न झाले होते... 

"वेद ..."प्रणिती ने हाक मारली... पण त्या बदल्यात त्याने तिच्यासमोर काही पेपर धरले .... 

 प्रणितीच्या डोक्यावर आठ्या पडल्या ... आधीच एकतर काय झाली ते समजत नव्हतं .... पटापट तिने पेपर उघडले.... 

"डी .... divorce ... पेपर ...."तिचे डोळे टचकन पाण्याने भरले.... 

"मॉम तू बोलली होतीस समजा एकत्र राहून सुद्धा प्रणिती आणि माझं जमत नसेल तर तू आम्हाला अडवणार नाही .... मी प्रिया सोबत केलय ...."ऋग्वेद 


"हा...?.." प्रणिती च्या हातातले पेपर खाली पडले... 


लग्न...?.... जमत नसेल...?.... divorce ...?... सगळं तिच्या डोक्यात भिरभिरत होता .... तिचा नवरा दुसऱ्या कोणत्या तरी मुलीचा हात धरून येऊन ती माझी बायको आहे म्हणून सांगत होता.... तीच पूर्ण शरीर थरथरल पण थोडावेळच ... लागोपाठ तिच्या डोळ्यात राग दाटून आला... 


"तुम्ही काय बोलताय समजतंय तुम्हाला ..?..." तिने ऋग्वेद ची कॉलर धरली.... 

"मी सगळे निर्णय शांत डोक्यानेच भेटलेत...." ऋग्वेद ने तिचा हात बाजूला केला... 


"हिने काहीतरी केलं असेल बरोबर ना...?,.... बोला ना वेड..?.."प्रणिती ने रंगीत कटाक्ष प्रिया वर टाकला ... 



"ती माझी बायको आहे आता प्रणिती.."ऋग्वेद 

"आणि प्रणिती ह्या घरची मुलगी आहे... आम्हाला तुझं हे लग्न मान्य नाहीय .."आजी 



"आजू..?.."प्रिया ला आजी कडून ह्या reaction ची अपेक्षा नव्हती.... 




"तुला divorce हवाय ना... देईल प्रणिती ... पण ती ह्याच घरात राहणार .... आमची मुलगी म्हणून.... प्रियाला कोणत्याही प्रकारचा मान सन्मान मिळेल ह्याची अपेक्षा धरू नको... आणि हि गोष्ट बाहेर समजली तर त्या क्षणी तुम्हा दोघांना सूर्यवंशी परिवार आणि प्रॉपर्टी दोघामधूनही बाहेर काढण्यात येईल..."आजी ओरडल्या च .... 


बाकी घरातले सगळे शांतच ओटे .... काय बोलणार होते..?... बोलायला काहीच उरलाच नव्हतं .... 




प्रणतीने खाली पडलेले दिवोरसे चे पेपर उचलेले आणि त्यावर सही करून टेबल वर ठेवले.... एवढा वेळ स्वतःला थांबवलं पण आता तिला हुंदका आवर झाला आणि ती पळतच आजीच्या रूममध्ये गेली..... 

सृष्टी आणि सर्वेश ऋग्वेद कडे बघतच नव्हते.... ते तसेच त्याच्या कमला निघून गेले... मॉम तर अजून धक्क्यातच होत्या .... काकी त्यांना घेऊन आत गेल्या .... आता हॉल मध्ये फक्त ऋग्वेद आणि प्रिया होते.... 


"I am sorry ऋग्वेद माझ्यामुळे sss ..."प्रिया.... 


"its okey .... तू आराम कर जा... ती गेस्ट रूम आहे..."ऋग्वेद ने प्रियाला गेस्ट रूमकडे हात दाखवला... ऐक क्षण प्रिया भांबावली ... तिला वाटलेलं तो बेडरूम मध्ये घेऊन जाईल पण त्याने तर सरळ गेस्ट रूमचे दरवाजे दाखवले ..... 


पहिल्याच दिवशी जास्त drama नको म्हणून ती शांत गेस्ट रुममशे गेली.... 




आजी रूममध्ये आल्या तर प्रणिती बेड ला टेकून खाली बसली होती.... पायात चेहरा घालून रडत होती.... काहीवेळापूर्वी फुलासारखी असणारी ती लागोपाठ कोमेजून गेली होती.... 

"प्रणिती...."आजींना खाली बसता येत नसल्याने त्या बेड वर बसल्या आणि प्रणितीच्या खांद्यावर हात ठेवला.... 


"मी ... कोणाचं काय बिघडवला आजी....?.. सगळं.... सगळं.. माझ्यासोबत का होत...?.... कंटाळलीत मी ह्या सगळ्याला .. त्यांना लग्न टिकवायच नव्हतं तर केलंच कशाला..? ... मी तर मागे लागली नव्हते... हा कोणता खेळ चालूय का..? ... कधी हि जवळ घ्या कधीही लॅब करा...." ती जोरा जोरात रडत होती.... ... दरवाज्यात तिला भेटायला आलेल्या मॉम तश्याच मागे गेल्या .... त्या तरी आता कसा चेहरा दाखवणार होता तिला..?.. कदाचित त्यांनी ऋग्वेद ला फोर्स केलाच नसता तर बार झालं असत....... 


"हे बघ बाळा .... जेव्हा देव आपल्याकडून एक नातं हिरावून घेतो ना तेव्हा अजून खूप मांस आपल्या आयुष्यात पाठवतो... तू असं रडत बसणार आहेस का...?.... तुझी काही चुकी नाहीय तर तू का त्रास करून घेतेय स्वतःला ज्याची चुकी आहे शिक्षा त्यांना झाली पाहिजे .. तू आतापर्यत कशी स्ट्रॉग होतीस.. अशीच रहा... ... सगळं नीट होईल .. आणि आम्ही आहोत ना तुझ्यासोबत ... हे तुझं घर आहे बाळा..... तुझा हक्क आहे... ह्यावर..."आजीनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला...

थोडा वेळ प्रणिती तशीच त्याच्या मांडीवर डोकं ठेऊन राहिली ..... 
"खर बोलताय आजी.... माझी चुकी नसताना मी रडत बसणार नाही.... आणि मी इथे इथेचराहणार ...."तिने काहीतरी विचार करत जिद्दीने मान ठेवले..... 



"good girl ... मी आहे तुझ्यासोबत ..."आजीने तिच्या डोक्यावर ओठ टेकवले.... 



"मी आता ऑफिस ला जाते.... त्याच्यासाठी मी माझा मड घालवणार नाही... हे माझं आयुष्य आहे... त्यात काय करायचं काय नाही हे मी ठरवणार ...."प्रणिती 



"ये हुई ना बात... आणि येताना icecream घेऊन ये... आपण पार्टी करू...."आजीनी डोळा मारला... 


"नक्कीच ... कोण अडकत बघूया...."प्रणिती पण हसली .... आणि त्याच्या पाया पडून बाहेर निघाली.... बाहेर आल्यावर कार्ड ने तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला... तिने वर नजर टाकली तर ऋग्वेद तिच्याकडेच बघत होता.... gaallary मधून ... 

"मला ह्या फडतूस गाडीतून यायचं नाहीय.... ह्ह..."जरा मोठ्यानेच ओरडत प्रणितीने टायरवर लाथ मारली आणि चालतच बाहेर येऊन टॅक्सी केली..... 


"ऋग्वेद ..sss तुझ्या हाताला काय झालं.....?..."तिने त्याचा हात हातात घेतला... ऋग्वेद लागोपाठ हातात घेतला.... ऋग्वेद लागोपाठ तो मागे घेतला... 




"nothing .."त्याने रक्त येत होत तिथे रुमाल बांधला ...... 




"माझी तयारी झालीय आपण निघूया का...?..."प्रिया 


"हो...."ऋग्वेद ने मान हलवली ....... 


गाडीमध्ये समोरच्या सीट वर गार्ड असल्याने प्रियाला काही बोलता आलं नाही... पण मनातून त आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.... ऋग्वेद ऑफिस मध्ये आल्यावर सरळ त्याच्या केबिन मध्ये गेला आणि डिस्टर्ब् करू नको म्हणून सांगितलं..... 

लॅपटॉप मधून त्याने प्रणिती च्या केबिन मधला cctv चेक केला तर ती मस्त हसून जॅबी सोबत गप्पा मार्ट होती.... जॅबी ला बघून त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या ... 



"तुम्ही खर्च असं केलेलं जॅबी सर .... ohh god ... खूप लकी आहे तुमची मैत्रीण ....."प्रणितीची हसून हसून हालत खराब झालेली... जॅबी तिला जुने किस्से सांगत ओटा.... त्याला कुठेतरी वाटत होत निदान ते ऐकल्यावर तरी तिला काही आठवेल पण ती काहीच react होत नव्हती....!!!



मधेच त्याचा फोन वाजला म्हणून तो बाजूला गेला.... 


"okey मृ ....अम्म्म ..... प्रणिती मला जावं लागेल... urgent काम आली ..."जॅबी 



"हा ... पण विसरू नाकात आपली कॉफी पेंडिंग आहे....."प्रणिती 



"of course .... मी कास विसरणार..?..bye ...."त्याने हाताची मूठ तिच्यासमोर धरली... तिने पण अगदी naturally त्याच्या मुखावर मूठ मारली.... 

नंतर ती स्वतःच आश्चर्यचकित झाली.... जॅबी च्या चेहऱ्यावर मात्र smile आली.... तिला आठवत होत....!!!ती विसरली नव्हती त्याला...!!!


जॅबी निघून गेला... आणि प्रणिती आता झालं त्यावर गहाण विचार करायला सुरवात करणार तोच तिच्या केबिन मधला landline वाजला.... तो कोणाचा असणार हे ओळखला तिला वेळ लागला नाही... फोन कट करून तिने cctv कडे रागात बघितलं... 


"तू अशी ऐकणार नाही तर..." ऋग्वेद ने विचार करून तिच्या फोन वर मेसेज केला... 

"तू आताच्या आता वर नाही तर मी सगळ्याच्या समोरून तुला उचलून घेऊन येणार... पुढे काय होणार ते तूच ठरव..."

प्रणिती ने एकदा रागात त्या मेसेज कडे बघितलं आणि एकदा cctv कडे ..... फोन टेबल वर आपटत तंतांतच ती लिफ्ट कडे निघाली.... 


प्रिया पाच मिनिटापूर्वीच एका client सोबत मिटिंग करायला गेली .... त्यामुळे टॉप floor वर secuity शिवाय दुसरं कोणीच नव्हतं.... 


तिने केबिन चा दरवाजा उघडायची फुरसवंत कि ऋग्वेद ने ओढून तिला घट्ट मिठीत घेतलं .... तिने कसाबसा एका हाताने दरवाजा लॉक केला.. 


"रिलॅक्स वेद ... ठीक आहे सगळ ...."हळू टाय त्याच्या पाठीवर हात फिरवत दिलासा दिला.... 


"i was so scared .."त्याने खांद्यावर चेहरा टेकवत दीर्घ श्वास घेतला..... 


"तुम्ही बाजूला व्हा... मी रंगवलाय तुमच्यावर...."प्रणिती ने त्याला लांब ढकललं .... 



"का..?..."त्याच्या डोक्यावर आठ्या पडल्या.... 

"का म्हणजे...?.... तुम्ही सकाळीच प्रिया ला घेऊन येणार हे आधी सांगता येत नव्हतं...?.... अशी अचानक मला acting करायला कशी येईल..?..."ती ओरडली.... 

"मी घाबरलो होतो नीती.... तिने कोळ केला आणि नंतर ..."ऋग्वेद 


"ते काही नाही ... शिक्षा तर तुम्हाला मिळणारच ..."प्रणिती 

"शिक्षा ..?..मला..?..."ऋग्वेद 


"हो तुम्ह्लाकंच ... एक आठवडा अजिबात मला हात लावायचा नाही तुम्ही..."प्रणिती 


"what ...?एक आठवडा...?... हे जरा जास्तच होती.."ऋग्वेद 


"पंधरा दिवस ..?..."प्रणिती 



"नीती..?.."ऋग्वेद 



"एक महिना.."प्रणिती 


"okey fine .... एक आठवडा .."ऋग्वेद ने नाराजीचा मान हलवली... 


"छान.."प्रणिती ने केस उडवले आणि मस्त चेअरवर जाऊन बसली.... 


"आता पुढे काय...?..."ऋग्वेद च्या चेहऱ्यावर काळजी सष्ट दिसत होती.... 




"तिने रिपोर्ट दिले का... तुम्हाला?..."प्रणिती

"हो.." ऋग्वेद ने तिच्यासमोर हॉस्पिटल चा लिफाफा साइकवला.... त्यावर प्रायः नाव होत.... आणि pregnancy postitive दाखवत होत... 


प्रणिती च्या डोळ्यात पाणी आलं ... पण तिने ते बाहेर येऊ दिल नाही... 


"नीती ... मी खर्च काही केलेलं नाहीय ... मला काही आठवत नाहीय पण काही झालं असत तर मला समजलं असत नहक्की...."ऋग्वेद ने तिचा चेहरा वर केला..... 



"माझा विश्वास आहे तुमच्यावर वेद .... आपणं ह्याचा शोध घेऊ.."तिने मान हवाली.... स्वतःच्या नवऱ्याला असं दुसऱ्या स्त्री सोबत तिला सुद्धा त्रास होत होता पण जोपर्यंत हातात काहीच पुरावे मिळत नाही तोपर्यंत काही बोलून पण फायदा नव्हता.... 


एक तर त्याने सगळं सांगितलं होत तेच खूप होत तिच्यासाठी नाहीतर आज खर्च त्याच नातं तुटलं असत...!!




"मी ह्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चोकशी करते.... नक्कीच काही ना काही मिळेल ..."प्रणिती 



"मी पण तुझ्यासोबत येतो..."ऋग्वेद 


"तुम्हाला ओळखणार वेद .... आणि प्रिया ला समजलं तर..."प्रणिती 


"मी तुला ऐकत सोडू शकत नाही नीती.... मला आता कोणतीही रिस्क घ्यायची नाहीय.... आणि आता तिला समजलं तरी मला काहीही फरक पडत नाही .."ऋग्वेद 

प्रचंड रागावला होता.... पण तिच्यासमोर तो शांतराहत होता..... 


"ठीक आहे चला... पण तुम्ही हॉस्पिटल बाहेर थांबा मी एकटीच आत जाणार ...."प्रणिती 


"हम्म .... चाल...."त्याने तिचा हात हातात घेतला ... आणि दोघेही बाहेर पडले ....... 




क्रमशः