प्रेम करावे. पण... Ankush Shingade द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम करावे. पण...

प्रेम करावे. पण...........?          प्रेम व विवाह. या एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोघांचाही परस्पर संबंध आहे. जसं प्रेम झालं की त्यातून विवाह होत असतो. पुर्वी तसंच व्हायचं. जे पुर्वीच्या पिढीला पसंत नव्हतं. ज्यातून त्या काळातील लोकं प्रेमाला विरोध करीत असत. कारण प्रेम जर झालं तर हमखास विवाह व्हायचे. प्रेमातून धोके देण्याचे प्रमाण फारच कमी होते. त्यातच विभिन्न जितीतील प्रेम करणारी मुलं अशा प्रेमातून पुढे विवाह करीत अफल्यानं घरातील लोकांची व घराची बदनामी होत असे. एवढी बदनामी होत असे की लोकं संबंधित कुटुंबाला ताणे मारत असत. त्यांना वाळीत टाकत असत. त्यांचं जगणं कठीण करुन टाकत असत. ज्यातून त्या कुटुंबाला नैराश्य येत असे व कधी आई तर कधी वडील वा कधीकधी घरच्या सदस्यांच्या आत्महत्याही घडत असत. आज तसं नाही. आजच्या काळात मुलंमुली वयात येताच प्रेम करतात. परंतु ते त्यातून विवाह करतीलच असे नाही. ते प्रेम तर करतातच. परंतु त्यातून फक्त आपल्या कामवासना पुर्ण करतात. विवाह करीत नाही. ज्यातून विश्वासघाताला निमंत्रण मिळतं. ज्यातून गंभीर स्वरुपाचे परिणाम होवू शकतात. कधीकधी आत्महत्या घडतात आणि अपहरणही. आजच्या काळात काही काही मुलं हे मुलींच्या भोळ्याभाबड्या स्वभावाचा फायदा घेवून तिचा मादकतेचा वापर आपल्या मित्रांची मादकता पुर्ण करण्यासाठी करतात. ज्यातून पैसा कमविणे हा उद्देश असतो. कधीकधी त्याच मुलींना प्रेमातून फसवून तिची विक्री एखाद्या टोळीला करतात. जी टोळी वेश्येचे काम करायला मजबूर करते. जी टोळी तिच्यापासून पैसेही कमविते व प्रेम करुन तिला विकणारा मुलगाही पैसे कमवतो. कधीकधी अपहरण हे तिचे अवयव विकण्यासाठीही असतं. म्हणूनच आजच्या काळात प्रेम करण्यात भय निर्माण झालेलं आहे. प्रेम करावं, परंतु त्यातून विवाह जर होत असेल तर ठीक. जर त्यात भय असेल वा त्या मुलींचं अपहरण होत असेल, तिचा प्रेमातून विश्वासघात होत असेल. तिला वेश्येच्या टोळीला विकलं जात असेल, तिचे प्रेमातून अवयव विकले जात असेल, आपल्या मित्रांची मादकता पुर्ण करण्यासाठी तिचा वापर होत असेल वा तिच्यावर प्रेम करुन तिला वेश्या टोळीला विकून जर पैसा कमविण्याचा उद्देश असेल तर ते प्रेम खरे नाही. अर्थात ज्या प्रेमात भय असेल तर असे प्रेमच करु नये. असा एक नवविचार आजच्या काळात आईवडीलांच्या मनात आहे. ज्यातून आजच्या काळात प्रेमाला विरोध आहे.           काल प्रेमाला विरोध होता, कुटुंबाची बदनामी होवू नये म्हणून. ज्यातून प्रेमविवाह झालाच तर त्यालाही विरोध असायचा. कधीकधी असा विवाह करणाऱ्या मुलामुलींचे खुन केले जात असत. ज्याचा उद्देश असायचा की इतर गावातील मुलामुलींनी पुन्हा एकदा तशा स्वरुपाचे प्रेमविवाह वा प्रेम करु नये. आज तसं नाही. आज बदनामीला कोणी मानत नाही व घाबरतही नाही. प्रेमाला तेवढं विचारात घेतलं जात नाही वा प्रेमविवाहालाही तेवढा विरोध नाहीच. आजच्या काळात विरोध आहे, प्रेमातून विश्वासघात होण्याला. आज विरोध आहे, प्रेमातून अपहरण केलं जात असलेल्या गोष्टीला. कारण आजचा काळ हा बरोबर नाही. आजच्या काळात मिडीयावरुन जाणवतंच की कितीतरी मुलींना प्रेमजाळ्यात फसवलं जात आहे व तिची आईबापाला माहिती न होवू देता परस्पर विक्री होत आहे. कधी अवयव तस्करीसाठी तर कधी तिची वेश्याव्यवसाय चालावा म्हणून त्यात मुली हव्या म्हणून. ज्यातून असं दुःख आपल्या मुलींना भोगावे लागू नये म्हणून आजचे आईवडील चिंतेत आहेत व ते आपल्या मुलींना त्याच गोष्टी सांगतात. परंतु मुली त्या गोष्टी ऐकतील तेव्हा ना. मुलींना समजच नसते, ते करीत असलेल्या प्रेमातून काय घडू शकते त्याची. परंतु त्याची कल्पना मुलींच्या आईवडीलांना असते..म्हणूनच त्यांचा आजच्या काळात प्रेमाला व प्रेमविवाहाला विरोध. प्रेमातून वा प्रेमविवाहातून कोण कसा निघेल याची शाश्वती नाही. कधीकधी प्रेमविवाह करणारी मुलं ही प्रेमविवाह केल्यानंतर काहीच करीत नाहीत. ते त्याच मुलींच्या डोक्यावर बसून फक्त ऐषआराम भोगत असतात नव्हे तर ऐतखाऊ भुमिका निभवीत असतात. हेच वास्तव चित्र बरेच ठिकाणी घडतं. म्हणूनच मायबापांना आजच्या काळात प्रेमविवाहाची चिंता आहे व त्याचबरोबर प्रेम करण्याचीही. जे प्रेम करणंही आजच्या काळात बरोबर नाहीच.           अलिकडील काळात प्रेम करणं जास्तच वाढलेले आहेत. त्याचं कारण आहे, पाश्चात्यपण. लोकं आजच्या काळात शिकत आहेत. ते उच्च शिक्षण घेत आहेत व त्याच उच्च शिक्षणातून प्रेम करण्याच्या गोष्टी वाढलेल्या आहेत. ते आपल्या बरोबरीचा पाहून प्रेम करायला लागलेले आहेत. त्यातच विवाहही करु लागलेले आहेत.           प्रेम वाढलेले आहे व प्रेमविवाह आज होवू लागलेले आहेत व त्याचे प्रमाणही वाढू लागलेले आहे. त्याची कारणं अनेक आहेत. परंतु एक कारण ठोस व महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणजे हुंडा पद्धत व विवाहाला येणारा खर्च. विवाहाला खर्च लागतो. बॅड, घोडे, मंडप, जेवनखावण, भरजरी कपडे, सोने यासाठी खर्च लागतो. ते सर्वसाधारण परीवाराला परवडत नाही. शिवाय सामान्य घरची मुलगी असेल व त्या घरी जास्त मुली असतील तर त्या मुलींना पैसे लावण्यासाठी सामान्य घरातील आईवडीलांजवळ पैसे नसतात. मग त्या घरच्या मुली काय करतील? त्या मुली आपल्या घरची परिस्थिती पाहतात व प्रेमविवाह करुन मोकळ्या होतात. तसंच मध्यंतरीच्या काळात मुलगा हवा व मुलगी नको. या दृष्टिकोनातून भ्रृणहत्या अमाप प्रमाणात झाल्यानं मुलींची संख्या फारच कमी झालेल्या आहेत. ज्यातून प्रेमविवाह होवू लागलेले आहेत. ज्यातून भोळ्याभाबड्या वयात न आलेल्या मुलींनाही फसवून मुलं विवाह करु लागलेले आहेत. आणखी एक कारण म्हणजे येथील लैंगीतेबाबतीतील उष्ण वातावरण. ते वातावरण वाढलेलं आहे. त्याचं कारण आहे आपलं जेवनखावण. आपलं राहणीमान. जेवनखावण अर्थात खाण्याच्या सवयीत बदल झालेला आहे. रसायनयुक्त पदार्थ आपण जास्त खावू लागलेलो आहे. ज्याचा परिणाम मुलांच्या लवकरच वयात येण्याला कारणीभूत आहे. त्यातच आपले कपडे सुद्धा याच गोष्टीला कारणीभूत आहेत. जसे आपले तोकडे कपडे वापरण्याचे धोरण. त्याच तोकड्या कपड्यात तरुण मुलींना पाहून एवढी  लैंगिक मादकता वाढते की ती रोखता येत नाही. शिवाय सध्याची मोबाईल क्रांतीही प्रेमविवाहाला कारणीभूत आहे. आजची दुसर्‍या वर्गातील मुलं याच मोबाईल क्रांतीनं फारच पुढे गेलेली आहेत.            प्रेमविवाह वाढलेले आहेत व याला कारणीभूत आहेत मायबापच. मायबाप घरी वावरतांना तारतम्य बाळगत नाहीत. ते आपल्या मुलांसमोरच तोकड्या कपड्यात वावरतात. आपल्या मुलांसमोरच गोष्टी करतांना प्रेमाच्याच गोष्टी करतात. आपली मुलं जागीच असतांना लैंगीकतेचं प्रदर्शन करतात. जे अनैसर्गिक कृत्य मुलं लपूनछपून पाहतात व आपली मादकता वाढवून घेतात.          प्रेम करणं व प्रेमविवाह करणं. यात परस्पर बरीच विसंगती आहे. काही लोकं प्रेम करतात. परंतु विवाह करतांना आपल्या जातीबिरादरीतील मुली बघतात. काही मुलं प्रेमालाच जास्त महत्व देतात. ते विवाहाला जाफ्त महत्व देत नाहीत.  कारण प्रेमातून मुख्य गोष्ट म्हणजे लैंगीकता पुर्ण होवू शकते. जी पुर्ण झाली की विवाहाचे तेवढे महत्व वाटत नाही. अशा पद्धतीनं वागण्यानं विवाहाचे वय वाढलेले आबेत. काही मुलांना मुली मिळत नाहीत, ते कितीतरी वयाचे झाले असले तरी. त्यातच काही काही मुलीही विवाहाला जास्त महत्व देत नाहीत. कोण दबाबात राहिल पतीच्या? कोण स्वयंपाक करेल? कोण सासूचं व सासरच्या मंडळींचं ऐकेल? कोण मुलं पैदा करुन संसारात पडेल? या गोष्टीचा विचार आजच्या काळात बरेचजण करतात. त्यातच आजच्या काळात झोमॅटोसारखे ॲप आलेले आहेत. ज्यातून जेवणाचे आर्डर एका क्लिकवर देता येतात व घरपोच जेवन मिळतं. त्यातच शिकलेल्या लोकांना घरातील कामं अर्थात फरशी पुसणे, कपडे धुणे, जेवण बनवणे, भांडे घासणे. या गोष्टी करावाशा वाटत नाहीत. ज्यातून विवाह करावेसे वाटत नाहीत. काही काही मुलं मुली तर आजच्या काळात चक्कं विवाह न करताच राहतात, आजीवन. याचा अर्थ ते प्रेम करीत नाहीत, असा होत नाही.           विवाहाला आजच्या काळात लोकं पसंती देत नाहीत. त्याचं कारण म्हणजे लैंगीकता पुर्ण होणे. विवाह हा लैंगीकता पुर्ण करण्यासाठी केला जातो. परंतु ही लैंगीकता जर विवाहापुर्वी प्रेम करण्यातून पुर्ण होत असल्यानं मुलामुलींना विवाह करण्याची काय गरज आहे आजच्या काळात. ज्यातून लोकं विवाह करण्याला जास्त प्रमाणात प्राधान्य देत नाहीत.            आजच्या काळात प्रेमाला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे व मुलं मुली वयात येताच प्रेम करु लागलेले आहेत. प्रेमाला व विवाहाला कराराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. आजच्या काळात होत असलेलं प्रेम वा त्यातून झालेले विवाह काहीही विचार न करता तुटू लागलेले आहेत सर्रासपणे. असं असतांना प्रेम करावं. प्रेम करण्याला मनाई नाही. परंतु थोडा विचार करुन. प्रेम ज्याचेवर केलं. तो व्यक्ती विश्वासघात करणारा नसावा. हाही एक विचार करुन. त्यानं आपला वापर करुन आपल्याला वेश्याव्यवसायासाठी विकू नये, आपलं अपहरण करुन आपल्याला अवयव विक्रीसाठी विकू नये. आपल्या मित्राच्या लैंगिक हौसा पुर्ण करण्यासाठी आपल्या देहाचा सौदा करु नये. हाही एक विचार करुन. तसं पाहिल्यास तरुण वय झालं की प्रेम होतंच. कारण आकर्षण असतं मुली व मुलं यात. जी लैंगीकता एक शाश्वत गोष्ट नसली तरी ते काही नुकत्याच तरुण होणाऱ्या व वयात येणाऱ्या मुलामुलींना माहित नसते. म्हणूनच प्रेम. परंतु असं मुलींनी प्रेम करीत असतांना तो मुलगा आपल्या लायक आहे का? यासाठी त्याची वारंवार परीक्षा घ्यावी, प्रेम सुरु करीत असतांना. एखाद्या वेळेस आपल्याला मदत हवी नसतांना तो प्रेमी आपल्याला मदत करु शकतो का? हे पडताळून पाहावे. ज्यातून त्याचं खरं प्रेम आपल्याला समजू तरी येईल. तो आपल्यावर किती प्रेम करतो? किती नाही? हे तरी दिसून येईल. जर तो मुलगा यात पास झाला, तरच त्याला निवडावे व परस्पर पळून न जाता त्याची कल्पना आपल्या आईवडीलांना द्यावी. मगच प्रेम करावे व प्रेमविवाहातून विवाह. कारण आपण भारतात राहतो व आपल्या भारताची एक चांगली अशी संस्कृतीही आहे. जी संस्कृती सुजलाम, सुफलाम आहे. परंतु सध्या ती पाश्चात्तीकरणानं बदनाम झालेली आहे. त्याच देशाची संस्कृती टिकावी. तिचा दर्जा कायम राहावा. तसाच आपल्या प्रेमातून आपलं कुटुंब, आपला परीसर व आपले नातेवाईकच नाही तर आपला देश बदनाम होवू नये. यासाठी प्रेम व प्रेमातून विवाह करतांना आधी बराच विचार करावा. मगच पाऊल उचलावं प्रेमाचं व प्रेमविवाहाचं. जेणेकरुन आपण सुरक्षित राहू, आपले मायबाप सुरक्षित राहतील व आपला देशही सुरक्षित राहिल. हे तेवढंच खरं.            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०