Mich.. 2 books and stories free download online pdf in Marathi

मीच... - 2

निधी अमनच्या समोर उभी होती. अमनला त्याच्या डोळ्यांवर विश्वासंच बसत नव्हता.

“निधी... तू ?... याचा अर्थ तू मला माफ केलंस तर. तू आलीस, खरंच खुप बरं वाटलं. लग्नाला अजुन तिन दिवस आहेत. तुझ्या राहण्याची चांगली सोय मी करतो, तू त्याची काळजी करु नकोस.... ”

त्याला मध्येच थांबवत निधी म्हणली -

“मी लग्ना पर्यंत थांबणार नाहीये,.. मला जावं लागेल. ”

“पण का ?”

अमनचा चेहेरा पुर्णपणे उतरला. त्याला झालेला आनंद ओसरला.

“माझ्या आईची तब्बेत दोन दिवसांपासुन खराब आहे. मी गावाकडेच निघाली होते पण मी इथं आली नसते तर तुला असं वाटलं असतं की मी तुला माफ केलं नाही. इथं मी तुला हेच सांगायला आली आहे की मैत्रीमध्ये चुक करुन सुध्दा माफी मागनं चुकीचं असतं. आणि तू तर चुक केलीच नाहीस मग कसली माफी... ”

ती काही क्षणासाठी थांबली आणि नंतर बोलु लागली –

“तुझ्या लग्नात तर येऊ शकणार नाही. पण तुमच्या दोघांसाठी हे गिफ्ट आणलं आहे... ”

हातातला चौकोणी बॉक्स त्याच्या दिशेने पुढं करत ती पुढे बोलत होती.

“गिफ्ट तसं तुला कळणार नाही. पण माझी आठवन म्हणून जपुन ठेव. ”

अमन स्वतःला समजवत होता. काय चाललं होतं त्याच्या मनात हे त्यालाच माहित.

“चल अमन मला जायला हवं. ”

“इतक्या लवकर. लग्नाला नाही येणार मग आता तरी थोडावेळ थांब.. ”

“रीअली सॉरी, पण मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. त्यासाठी मला जावं लागेल. ”

ती तिथुन निघुन गेली. तिने जाताना एकदाही वळुन पाहिले नाही आणि अमन तिला तोपर्यंत पाहत होता, जो पर्यंत ती त्याच्या नजरे आड गेली नाही. त्याचे डोळे अश्रृंनी भरुन आले होते. काय हवं होतं त्याच्या मनाला, तो ते कोणालाही सांगु शकत नव्हता.

त्याच संध्याकाळी त्याला घेण्यासाठी पोलीसांची जिप आली. ते अमनला घेऊन पोलीसस्टेशनला आले. पोलीस स्टेशनमध्ये अमन येण्या आधी निधी तिथे उपस्थित होती. निधीला तिथं पाहुन त्याला आश्चर्य वाटले. त्याला बसायला पोलीसांनी जागा दिली. तो एकटक निधीकडे पाहत होता तर निधी त्याची नजर चुकवत होती.

“इंस्पेक्टर साहेब, निधी इथं... आम्हाला इथं का बोलवलं आहे... ”

“तुमच्या जिवलग मित्राच्या खुनाच्या आरोपीशी तुम्हाला भेटवायचं आहे.

“मी त्यासाठी येणारच होतो. पण तिन दिवसांनी माझं लग्न आहे.तर विचार केला की लग्ना नंतर येईन... ”

“थांबा थांबा मिस्टर अमन... ” त्याला थांबवत इंस्पेक्टर म्हणाले –

“तुम्ही परीस्थितीला जसं समजतायं परीस्थिती तशी नाहीये. मी तुम्हाला समजवतो. तुम्ही मला परवा फोन करुन सांगितलं की तुम्हाला राकेशच्या खुन्याचा फोन आला होता. तुम्ही त्याचा फोन नंबर दिला. त्या नंबरला ट्रेस करुन त्या खुन्याला आम्ही पकडलं. त्याने त्याचा गुन्हा कबुल केला. मला वाटलं सगळं संपलं. तर आज सकाळी मिस् निधी इथं आल्या आणि त्यांनी कबुल केलं की राकेशचा खुन तिने केलाय. आमच्या हातात दोन आरोपी असताना एक असा पुरावा सापडला की ज्याने यांच्या शिवाय आणखिन एक व्यक्ती खुनी असल्याचं आम्हाला कळालं.”

“पण इंस्पेक्टर...”

“तुम्ही मला विचारा की तो कोन आहे... कारण तुम्ही त्याला चांगलंच ओळखता.”

“कोण आहे तो...?”

“तो व्यक्ती तुम्ही आहात. खरंतर तुमचा प्लॅन खुप चांगला होता. पण थोडीशी चुक झाली. तुमच्या कॅमेर्-यात एक फंगशन कमी असल्याचा तुम्ही चांगलाच फायदा केला की. आम्ही तुमच्या कॅमेर्-यातले फोटो ओथेंटेसीटी चेक करण्यासाठी पाठवले तर आम्हाला कळालं की तुम्ही काढलेले फोटो खुनाच्या एक दिवस आधीच काढलेले आहेत. मग आम्हाला कळालं की खुन होण्याच्या आदल्या दिवशी तुम्ही फोटो काढले. दुसर्-या दिवशी कॅमेरा सोबत घेऊन गेलात. खुन केलं आणि परत आम्हालाच फोन करुन सांगितलंत की खुन झाला आहे. म्हणजे आम्हाला फोटो दाखवले की तुमच्यावर कोणीही संशय करणार नाही. पण आता प्रश्न हा आहे की जर खुन तुम्ही केलाय तर मग तो व्यक्ती कोण आहे ज्याने तुम्हाला फोन केला होता आणि खुनी तो आहे असं सांगितलं होतं, आणि मिस् निधीने आरोप का कबुल केला...”

अमनने निधीकडे पाहुन भुवया उंचावल्या. त्याला वाटले निधीकडून काही उत्तर येईल पण अजुनही निधी त्याची नजर चुकवत होती.

“हे बघा, मी तुम्हाला अर्धा तास देतो. शेजारच्या रुममध्ये तुम्ही तिघं बसुन काय ते ठरवा. अर्ध्या तासाने मला खुनीचं नाव आणि त्या खुन्याला बाकीचे का वाचवण्याचा प्रयत्न करत होते ते पण सांगायचं. जर असं झालं नाही तर मात्र मी तुम्हा तिघांना जेलमध्ये टाकेन... ”

नाईलाज होता. अमनलाही जाणुन घ्यायचे. निधी आणि अमन पोलीसांनी सांगितलेल्या रुममध्ये गेले. आत आधीपासुन तो व्यक्ती उपस्थीत होता. त्याचे नाव संतोष होते. आत जाताच अमनने पहिला प्रश्न हाच होता –

“हा व्यक्ती कोन आहे...?”

“हा संतोष आहे.” निधीने शांतपणे उत्तर दिले.”

अमन पुर्णतः गोंधळला होता. त्याला काहीही समजत नव्हते. तो निधीच्या समोर जाऊन तिला प्रश्न विचारुन त्याच्या मनातला गोधळाला सोडवण्याचा प्रयत्न करु लागला.

“ निधी या मानसाने मला फोन करुन मला सांगितलं की खुन याने केला आहे. आणि पोलीसासमोर त्याचा गुन्हा त्याने कबुल केला होता. मग तू का स्वतःवर गुन्हा ओढून घेतेस?... तुझा तर या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना तू का असं केलंस... खरं खरं सांग तू याला वाचवण्याचा का प्रयत्न करत आहेस, तुला माझी शप्पत आहे”

“ मी त्याला नाही वाचवतं.”

“त्याला नाही वाचवतं तर कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेस.. ?”.

निधी काही न बोलता तिथेच उभी राहिली. तिचे डोळे पाण्याने भरुन आले होते. ती कोणत्या क्षणात रडणार होती. ते पाहिल्यानंतर अमनला तिच्याबद्दल दया आली.

“ हे बघं निधी. माझं बोलणं तुला त्रास दायक वाटलं असेल किंवा त्याने तुझं मन दुःखावलं गेलं असेल तर मी तुझी माफी मागतो. पण आपल्याकडं वेळ कमी आहे त्यामुळे हा काय गुंता आहे तो सोडवुन त्या पोलीसांना खरा खुनी आहे तो द्यायलाच पाहिजे. निधी... प्लीझ्..”

आता पर्यंत शांत बसुन राहिलेला तो व्यक्ती आता बोलो लागला.

“ तिला काय विचारतोस,. मला विचार काय झालंय आणि कोणी केलंय ते...”

“ हे पहा, मला काही घेणं – देणं नाही तुझ्याशी. पण तरीही तू जे काही सांगशील ते खरं खरं सांग अशी मी तुला रीक्वेस्ट करतोय... प्लीझ् जर तुम्हाला माहितं असेल की हा काय प्रकार आहे आणि खुनी कोण आहे तर सांगा.”

“तुला असं वाटतंय ना की तुझं माझ्याशी काही घेणं – देणं नाही. हे खरं आहे रे. लहान पणा पासुनचा तुझा मित्र आहे मी तुझा. मात्र तुझ्यासाठी तेव्हा घेणं – देणं होतं. आपली मैत्री ईतकी पक्की होती की मी गरीब असुनही तू मला तसं कधी भासुन दिलं नाही. तू मला प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी मदत केली. पैशांची मदत तर केलीस पण माझ्या प्रत्येक अडचणीत तू माझ्या सोबत राहिलास. तुझ्या मदतीचे खुप मोठे कर्ज माझ्या डोक्यावर होती. तुला नोकरी लागली. तुझ्या सोबतचं निधीलाही तिथेच नोकरी मिळाली. तुम्ही सोबतंच काम करत होता. निधी तुझ्या प्रेमात पडली पण तू मात्र तिला तुझी गर्लफ्रेंडंच समजलंस. तू तिच्यावर कधीच प्रेम केल नाहीस. तिने तुझ्यासाठी काय काय नाही केलं. पण तुझ्यावर मात्र त्याचा काहीही परीनाम झाला नाही. सहा महिन्या आधी तुमच्या मध्ये राकेश आला. त्याला निधी आवडू लागली. तुलाही ही गोष्ट कळाली आणि निधीलाही कळाली. पण आधी त्याच्या प्रेमाला निधीने नकारलं. पण तू तिच्या प्रेमाचा बाजार केलास. राकेशला अंधारात ठेऊन त्याच्या आणि निधीच्या प्रेमाच्या भावनांशी खेळलास. निधीला ही गोष्ट कळाल्यावर तिचं आणि तुझं भांडण झालं. आणि त्या भांडणानंतर तू तिला सांगितलंस की तू तिच्यावर कधीच प्रेम केलं नव्हतंस. त्यानंतर तुझ्यापासुन लांब जाऊन तुला स्वतःची किंमत दाखवुन देण्यासाठी राकेशला निधीने होकार दिला. पण तुझ्यावर मात्र काहीही परीणाम झाला नाही. त्यांच्या मधलं नातं आता खुप टोकाला जाऊन पोहोचलं होतं. राकेशने तिला लग्नासाठी विचारले. तिला समजलं नाही त्याला काय उत्तर द्यावं. त्याने निधीच्या आणि त्याच्या घरच्यांना सुध्दा सामील केले. दिवसां मागुन दिवस जात होते. तू मला वेळो वेळी सगळी माहिती देत होतास. यावेळी मला तू कुठंतरी चुकतोय असं वाटलं आणि तसं मी तुला सांगितलं पण तू माझं ऐकलं नाही. त्यावेळी मी निधीला भेटलो. तिने मला सर्व काही सांगितलं. तुला ही गोष्ट कळाल्यावर तुला असं वाटलं की माझं आणि निधीच्या मध्ये काहीतरी आहे. तू माझ्यावर सुध्दा संशय केलास. त्याच दरम्यान तुला निधी आणि राकेशच्या लग्ना बद्दल कळालं. माहित नाही का पण तू आमच्या तिघांवर चिढला होतास. तू तुझा राग राकेशवर, निधीवर काढू लागला आणि माझ्याशी तर तू बोलायचंच सोडून दिलं होतं. तुझ्या आणि निधीच्या संबंधांबद्दल राकेशला जेव्हा कळालं त्यानंतर त्यांच्यामध्ये खुप भांडणं होऊ लागली. भांडनं कधी कधी इतकी टोकाला जायचं की अनेकदा त्यांनी एकमेकांना लग्न मोडण्याची धमकीसुध्दा दिली. एवढंच काय तर निधीने त्याला मारण्याची धमकीसुध्दा दिली. एक दिवसं अशाच भांडणात राकेशने निधीला कानाखाली मारली. त्यानंतर लग्न मोडल्यातचं जमा होतं. तुझ्या कानावर ही गोष्ट पडल्यावर तू निधीला फोन केलास आणि तू राकेशला मारुन टाकशील असं म्हणालास. निधीला तुझ्या अशा बोलण्यामुळे खुप टेंशन आलं होतं. त्यामुळे तिने मला फोन केला. ते कळाल्यानंतर मी खुप समजवलं पण राग तुझ्या डोक्यात गेला होता. तू माझं बिलकुल ऐकलं नाहीस. आणि दुसर्-याच दिवशी तुझं अपघात झाला. आणि नंतर कळालं की त्याच दिवशी राकेशचं खुन झालं होतं...”

“ याचा अर्थ, त्याचा खुन मी केला तर... पण मग खुनाचा आरोप तुम्ही स्वतःवर का घेतला.?”

“तुला भूतकाळातंल काही आठवतं नव्हतं. खुनी पोलीसांना सापडला नव्हता आणि संशय तुझ्यावर नव्हता. त्यामुळे मी ठरवलं की खुनाचा आरोप मी स्वतःवर घेईन. असं करुन तू आतापर्यंत माझ्यासाठी केलेल्या मदतीची मी परतफेड करेन.”

“... आणि निधी तू का माझा आरोप स्वतःवर घेतलास?”

अमन निधीकडे वळाला. तिच्या डोळ्यातले पाणी अजूनही थांबले नव्हते. डोळे पुसत ती म्हणाली -

“ तुझ्यावर खुप प्रेम केलं होतं मी आणि अजुनही करते पण परीस्थितीच अशी झाली की मी तुला नकार दिला. तू आधी जसा होतास त्यावर मी प्रेम केलं. जो मला प्रेम करत नव्हता. आणि आता तू मला खरचं प्रेम करायला लागलास आणि मी तुला नाकारलं. मला या गोष्टीचा खुप पश्चाताप होतं होता. पोलीस कधी ना कधी तुझ्यापर्यंत पोहोचणार हे माहित होते. आणि आता माझ्या आयुष्यात राहिलंच काय होतं जगायला. म्हणून मी तुझ्यावरचा आरोप स्वतःवर घेतला. ”

अमनने त्या दोघांकडे पाहिले. दोघंही गंभीर होते. अमनने स्मित हस्य केले आणि बोलु लागला -

“ तुम्ही माझ्यासाठी जे काही करत होता त्याला मी काय म्हणावं तेच समजंत नाहीये. पण माझ्यासाठी तुम्ही जे प्रेम दाखवलं त्या बद्दल धन्यवाद...”

तो पुढे काही बोलणार त्या आधी इस्पेक्टर त्या रुममध्ये आले. कोणी काय बोलणार त्या आधी ते बोलले.

“ आता कोणीही काहीही बोलु नका. आम्हाला खुनी हवा होता आणि तो आम्हाला मिळाला आहे. अमनसाहेब चला आता. तुमची शिक्षा आजपासुन सुरु झाली आहे.”

“ पण तुम्हाला कसं कळालं ?” आश्चर्य चकीत झालेला संतोष म्हणाला.

“ तुम्ही स्वतःला खुप हुशार समजत असाल पण पोलीस तुमच्यापेक्षा जास्त हुशार असते. आम्ही आधीपासुन या रुममध्ये जागोजागी मायक्रोफोन लावले होते. त्याद्वारे आम्ही तुमचं संभाषन ऐकलं.”

काही न बोलता अमन बाहेर आला. त्याच्या चेहेर्-यावर शिक्षा मिळाल्याबद्दल काहीही तणाव दिसत नव्हते. तेवढ्यात हवलदार एका वयस्कर मानसाला घेऊन आला.

“ कोण आहे हा ?” इस्पेक्टरांनी हवलदाराला विचारले.

“ त्या राकेश मर्डर केसमध्ये आपल्याकडे ज्या बोटीचा वापर झाला होता. त्या बोटीचा हा मालक आहे. खुन झाल्यानंतर तिथुन बोट घेऊन निघुन गेला. आपल्या केस संबंधीत पुरावा गायब करण्याचा याने प्रयत्न केला आहे. ”

“नाही साहेब. मी कोणताही पुरावा नष्ट केला नाही आणि मी कोणाचाही खुन केला नाही.?”

“पुरावा नष्ट केला नाही तर बोट का तिथुन घेऊन गेलात ?” इस्पेक्टरांनी त्या वयस्कर मानसाला विचारले.

“ मी गरीब मानुस आहे साहेब. तुम्हाला मी सगळं खरं खरं सांगतो. मी मासेमारी आहे. नदीतले मासे पकडून त्यांना बाजारात विकुन दोन वेळच्या भाकरीची सोय करतो. एक दिवसं हे अमन साहेब मला भेटायला आले. त्यांचा कसल्यातरी स्पर्धेसाठी त्यांना नदीतल्या बोटीचे फोटो हवे होते. त्यासाठी मी त्यांना मदत केली. संध्याकाळी मी माझं काम उरकुन त्यांना माझ्या बोटीचे फोटो काढण्यात त्यांची मदत केली. त्यांच्या सोबत राकेश साहेब पण आले होते. अमन साहेबांनी माझं त्या राकेश साहेबांसोबत बोटीवरचं फोटो काढला. हवे तसे फोटो आले नाही. आणि अंधार झाला होता. त्यासाठी त्यांनी मला आणि राकेश साहेबांना परत दुसर्-या दिवशी बोलवले. आम्ही एक वेळ ठरवला होता. दुसर्-या दिवशी ठरवल्या पेक्षा राकेश साहेब लवकर आले. त्यांनी नदीकाठी लावलेली माझी बोट सोडली आणि त्या बोटीत जाताना दगड घेऊन गेले. मी तिथे पोहोचलो. तो पर्यंत ते बरेच आत गेले होते. त्यांनी स्वतःच्या पोटाला तो दगड एका दोरखंडाने बांधले. ते पाहता क्षणी मी पाण्यात उडी मारली. मी बोटीवर पोहोचलोच तोपर्यंत त्यांनी पाण्यात उडी मारली. मला त्या बोटीवर आणि राकेश साहेबांना पाण्यात उडी मारताना पाहुन अमन साहेबांना वाटलं मी त्यांना पाण्यात ढकलले. ते खुन झाला - खुन झाला असं ओरडंत तिथुन निघुन गेले. मी घाबरलो होतो. मी राकेश साहेबांना खुप शोधलं पाण्यात पण ते तळाला गेले असणार. त्यामुळं मला सापडले नसावे. मला वाटलं मी खुनाच्या आरोपात जेलमध्ये जाणार. तेव्हा कळालं की अमन साहेबांचं अपघात झाला आहे आणि त्यांची स्मरन शक्ती नष्ट झाली होती. म्हणुन मी काही बोललो नाही. परवा मला माझ्या बोटीवर राकेश साहेबांनी आत्महत्या करण्या आधी लिहिलेली चिठ्ठी सापडली. पण मला वाटलं हा केस बंद झाला असेल. म्हणुन मी ती चिठ्ठी पोलीस स्टेशन मध्ये दाखवली नाही.”

“आता आहे का ती चिठ्ठी...”

त्या वयस्कर मानसाने एक कागदाचा तुकडा इंस्पेक्टरांच्या हातात दिला.

त्या कागदावरील हस्ताक्षर तपासल्यावर ते अक्षर राकेशचे असल्याचे नक्की झाले. राकेशच्या खुनाच्या आरोपातुन त्या तिघांना सोडण्यात आले.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED