अजींक्य डोहिफोडे हवलदाराने दिलेल्या फाईलमध्ये पाहत बाहेर आले. हवलदार शिंदे नुकतेच बाहेरुन पोलीस स्टेशनमध्ये आले होते. त्यांच्या हातात एक पिशवी होती. पिशवीत चौकोणी बॉक्स असल्यासारखे वाटत होते. त्यांना पाहून अजींक्य म्हणाला -
“हं...शिंदे, काय घेऊन आलात...”
“काही नाही पोरांसाठी मिठाई घेऊन आलो, पुण्यावरुन...”
“पुण्यावरुन का¿”
“त्या अमनच्या आणि निधीच्या संबंधाबद्दलची माहिती गोळा करायला गेलो होतो. त्यामुळं येता येता आनली मिठाई.”
शिंदेने त्याच्या हातातली पिशवी त्यांच्या कपाटातल्या शेवटच्या कप्प्यात ठेवत म्हणालो.
“काय कळालं त्यांच्या बद्दल¿”
अजींक्य शेजारच्या टेबलावर सरकून बसला आणि शिंदे हवलदाराने सांगायला सुरुवात केली.
“सर, पुण्याला गेलो. तिथून राकेश आणि निधी बद्दल माहिती गोळा केली. तिथून मला कळालं की निधी आपलीच गावंवाली आहे. तिचं घर आपल्या खरासवाडीतंच आहे आणि ती कॉलेजला सुध्दा इथंल्याच कॉलेजला होती. तिच्या घरी जाऊन विचारणा केली. तिच्या माहेरी तिचे आई – वडील राहतात. त्यांच्याकडून कळालं की राकेश आणि निधीचं प्रेम विवाह झाला होता. घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केलं. आणि राकेशचा वेगळा दबावही त्यांच्यावर होता. लग्ना नंतर निधी राकेशमुळे खुप दुःखी असायची. राकेश तिला खुप त्रास देत होता. त्यांनी जेव्हा इथून पुण्याला घर शिफ्ट केले, तेव्हा निधीच्या वडीलांनी राकेशची पैशांनी मदत केली. त्याला त्यावेळी चाळीस लाख रुपये दिले होते. तो लवकरंच परत करेल असं तो म्हणला होता. पण त्याने त्यानंतर पैसे दिले नाही. त्यांच्यात बरेचसे वाद विवाद चालले होते. त्यानंतर मी निधीच्या कॉलेजमध्ये चौकशी केली. तिथून कळालं की अकरावीत अमन तिच्याच वर्गात होता. पण बारावीत त्याला कॉलेजमधून काढण्यात आले. त्याला का काढलं त्याचं कारण जास्त स्पष्ट झालं नाही, फक्त एवढंच कळालं की त्याने सोनल नावाच्या मुलीची छेड काढली होती आणि त्यानंतर त्याला कॉलेजमधून काढले गेले...”
“ही किती वर्षा पुर्वीची गोष्ट आहे¿”
“पाच वर्षापुर्वी त्याला कॉलेजमधून काढलं. त्यानंतर त्याचं काय झालं कोणालाही माहित नाही.”
“माहित कसं नाही... त्याला कॉलेजमधून काढला असेल आणि त्यानंतर तो पुण्याला गेला असेल आणि तिथं त्या हॉटेलमध्ये कामाला लागला असेल... पण तो आता कुठं आहे ते कसं कळणार...”
तेवढ्यात हवलदार डोहिफोडे पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याच्या हातात एक कागद होता.
“सर, अमनचा कॉल रेकॉर्ड आणि एक चांगली बातमी आहे. अमनचा मोबाईल त्याने ऑन केला होता. त्याचं लोकेशन मुंबईत दाखवत आहे.”
“ग्रेट...”
अजींक्य उडी मारून त्या टेबलावरुन उठला.
“एक काम करा, मुंबई पोलीसांना ताबडतोब त्याच्या मोबाईलचा लोकेशन सेंड करा आणि त्यांना त्या स्पॉटवर जायला सांगा...”
हवलदार डोहिफोडे वेळ न घालवता तिथून आतल्या खोलीत गेला.
“शिंदे, तुम्हाला जर त्यांच्या क्लास मधल्या कोणाचाही पत्ता कॉलेजमधून मिळत असेल तर त्याला घेऊन या किंवा त्यांच्या पत्त्यावर जाऊन या अमनबद्दल मिळेल ती बातमी गोळा करा.”
“ऑके सर...”
हवलदार शिंदेही त्याच्या कामाला निघाला.
***
रात्री नेहा आणि अजींक्य घरी आले. नेहा आनंदात दिसत होती, पण अजींक्य मात्र खुश दिसत नव्हता. नेहा सोफ्यावर उडी मारुन बसली. अमन कोपर्-यातल्या स्टुलवर बसून बुट काढत होता.
“कसला मस्त पिक्चर होता¡”
“हं”
अजींक्यने थंड असा प्रतिसाद दिला.
“काय रे, पुर्ण पिक्चरमध्ये असाच चेहेरा घेऊन बसला होता. माहित आहे तुला कामाचं टेंशन आहे... म्हणून तर मी तुला मी पिक्चर पाहायला घेऊन गेले होते ना... एक तर काय झालंय ते सांगत नाहीयेस आणि नुसता तोंड वाकडं करुन बसलायंस... एक काम कर, काय झालं ते सांग नाहीतर तुझा मुड बदल.”
“काही खास नाही¿”
सॉक्स काढून त्याने वॉशिंग मशिनच्या दिशेने फेकले. सोफ्यावर स्वतःचं अंग टाकून देत त्याने डोळे मिटले.
“काही खास नाही झालं तर काय झालं ते सांग¿”
“तुला आठवतं का, तिन दिवसांपुर्वी मी तुला एका व्यक्ती बद्दल सांगितलं होतं. अमन नाव होतं त्याचं¿”
“हं... तोच ना ज्याने पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगितलं की त्याने खुन केला, मग त्याने मृतदेहांना कुठं ठेवलं त्या जागा सांगितल्या आणि तिथं गेल्यावर कळालं की तिथं तर काहीही नव्हतं...”
“हं, तोच... ज्या ठिकाणी त्या मृतदेहाला ठेवल्याचे सांगितले होते. त्याच ठिकाणी मृतदेह सापडला. त्याने जो बंगला त्याच्या स्वतःचा सांगितला होता. खरंतर तो दुसर्-याच कोणाचातरी निघाला. त्याच्या बद्दल सर्व काही माहित असुनही त्याच्या जवळ आम्हाला पोहोचता येत नाहीये. आता त्या अमनला शोधायचं कसं त्याचा विचार करत होतो.... कसं शोधावं तेच समजत नाहीये..”
त्याच्या डोक्यावरील केसांना प्रेमाने कुरवाळत नेहा म्हणाली –
“सापडेल तो. गुन्हेगार कोण आहे हे कळणं खुप महत्त्वाचं असतं. गुन्हेगार कोण आहे हे माहित आहे, गुन्हेगाराचा गुन्हा सिध्द करण्यासारखे पुरावे आहेत, आता फक्त त्याला शोधायचं आहे. आणि त्याला शोधनं एवढं अवघड नाही, त्याचा फोटो तर आहे ना तुमच्याकडं.”
“आमच्याकडं त्याचा फोटो सुध्दा नाहीये.”
“अरे काय फोटो नाहीये म्हणतोयंस. तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये तो आला. तर पोलीस स्टेशनच्या आवारात कुठंतरी सि.सि.टि.व्ही. कॅमेरा असेलंच ना. त्यातून घ्या.... सिम्पल.”
अजींक्य आनंदाने उठून बसला.
“अरे हो... ही गोष्ट तर मी साफ विसरलोच...”
“तुम्हाला पोलीस केलं कोणी¿.. एवढी साधी गोष्ट लक्षात आली नाही तुमच्या डोक्यात.”
अजींक्यने हसून तिच्याकडे पाहिले. त्याला हसताना पाहून नेहा बरं वाटलं पण त्याच्या हसण्यामागंचा खरा कारण तिला कळाला नव्हता.
“तू काय पोलीसांना कॉलेज मधली मुलं समजतेस का¿... आम्ही पोलीस आहोत. पण तो आमच्यापेक्षा जास्त हुशार निघाला. जिथं सि.सि.टि.व्ही. कॅमेरे बसवले आहेत त्या जागेवरून तो गेलाच नाही. मुख्य गेटवर सुध्दा सि.सि.टि.व्ही. बसवला आहे पण तो मागंच्या गेटमधून आत आलाय. त्यामुळं त्याचा फोटो तर नाही मिळू शकत...”
“मग तुम्ही त्याला पाहिला आहे ना... त्याचा स्केच तय्यार करा.”
“स्केच तय्यार झाला आणि त्यांना इतर पोलीस स्टेशनमध्ये पाठलासुध्दा.”
नेहा सोफ्यावरुन उठली आणि कपडे बदलण्यासाठी निघाली. जाता जाता तिने वळून पाहिले, अजींक्य अजूनही हसतंच होता.
“राहू दे... बायकोचं तर कधी कौतुकच करायचं नाही असं ठरवलंय तुम्ही..”
ती कपडे बदलायला निघून गेल्यावर त्याला आठवले, निधीला फोन करायचा होता. त्याने त्याच्या मोबाईलवरुन फोन लावला. तिने फोन उचलला नाही. रात्रीचे साडे दहा झाले होते.
‘कदाचित तिच्या शाळेतल्या फंक्शनमुळे खुप दमली असेल. त्यामुळे लवकर झोपली असेल.’
तो मनातल्या मनात स्वतःला म्हणाला आणि बेडरुममध्ये गेला. त्या दिवशी नेहा आणि अजींक्य थिएटरमध्ये पिक्चर बघून बाहेरच जेवून करुन आले होते. त्यामुळे कपडे बदलल्यावर सरळ झोपायची तयारी करु लागले. अजींक्यला आजही त्याच्या मुलीशी बोलू शकला नव्हता. त्याला वाटंत होते की त्याच्याकडे कामावरुन आल्यावर पिक्चर बघायला आणि बाहेर जेवायला वेळ मिळतो. फक्त स्वतःच्या मुलीला फोन करायला वेळ मिळत नाही. त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. बेडला लागुन असणार्-या छोट्याश्या कपाटावर तिच्या मुलीचा फोटो फ्रेम करुन ठेवला होता. अजींक्यने तो फोटो फ्रेम हातात घेऊन त्याच्यावरुन हात फिरवले. तेवढ्यात बेडरुममध्ये नेहा आली. तिने अजींक्यला त्या फोटो फ्रेम सोबत पाहिले. ती शांतपणे त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याच्याकडे पाहू लागली. अजींक्य त्याच्या भावनांना लपवण्याचा प्रयत्न करत होता.
“काल जेव्हा मी तिला फोन केला, तेव्हा तिने मला विचारलं की तिच्या लहानपणाचा एकही फोटो का नाहीये... म्हणजे तिला तिचा एक – दोन वर्षाचा फोटो हवा होता. तिच्या सगळ्या मैत्रिणींकडे आहे त्याच्या लहानपणाचा फोटो म्हणून हिने मागितला...”
“मग तू काय सांगितलं तिला...¿”
“मी सांगितलं, जेव्हा ती लहान होती... म्हणजे एक – दोन वर्षाची होती त्या वेळी आपली परीस्थिती खुप नाजूक होती. आपण खुप गरीब होतो म्हणून नाही काढू शकलो तिचा फोटो...”
“बरं झालं तू सांभाळून घेतलंस. पण तिला विश्वास बसलाना¿”
“माझ्या बोलण्यावर तिचा विश्वास तर बसला, पण असं किती दिवसं चालणार. आज फोटोवरुन उद्या दुसर्-या कशावरुन तरी... तिला संशय येत राहणार. मला वाटतयं तिला आपण खरं काय ते सांगुन टाकायला हवं.”
“नाही¡” अजींक्य मोठ्याने ओरडला. “तिला कधीही हे कळता कामा नये की तिला आपण ऍडोप्ट केलं आहे ते.”
“पण तिला जर बाहेरुन कळालं तर...”
“ती आपली मुलगी नाही, ही गोष्ट कोणालाही माहित नाहीये शिवाय तुझ्या आणि माझ्या... त्यामुळे कोणालाही सांगायचं नाही, मग ती स्वतः निधी असली तरी... कोणालाही सांगायचं नाही.”
नेहाने होकारार्थी मान हलवली आणि त्याच्या हाताला विळखा घालून खांद्यावर डोकं ठेऊन ती भूतकाळ आठवू लागली.
***
दुसर्-या दिवशी, पोलील स्टेशनमध्ये...
डोहिफोडे हवलदार अजींक्य समोर आला आणि बोलू लागला.
“ सर मुंबई पोलीसांचा फोन आला होता. आपण त्यांना जो मोबाईलचा लोकेशन आपण पाठवला होता. त्या ठिकाणी फक्त मोबाईल सापडलाय. आपल्याला फसवण्यासाठी त्याने मुद्दाम नुसात तिथं ठेवला होता...”
अजीक्य टेबलावरचा पेपर वेट फिरवत म्हणाला -
“पण आपल्याला फसवण्यासाठी मोबाईल इतक्या लांब मुंबईला ठेवायला कोण मुर्ख जाईल. तो इतका वेडा तो नाही...”
अजींक्यने आणखि गहण विचार केला आणि एका निष्कर्षावर पोहोचला.
“मला असं वाटतंय की आपले दोन दिवस वाया घालवायचा त्याचा उद्देश असेल त्याचा... किंवा मग आपलं लक्ष त्याच्याकडे काही वेळासाठी जाऊ नये यासाठी त्याने असं केलं असावं...”
सगळेच विचारात मग्न होते. प्रत्येक जण आपापल्या परीने उत्तराच्या शोधात होते. तेवढ्यात शिंदे हवलदाराला काहीतरी सापडलं. तो हातात जुना रजिस्टर घेऊन अजींक्यच्या टेबला जवळ आला. त्याने टेबलावर रजीस्टर ठेवत अजींक्यला म्हणाला –
“सर, अमनचा रेकॉर्डला नाव सापडलं.”
ते एकल्या बरोबर अजींक्य उभा राहिला. त्याचा विश्वास बसत नव्हता.
“खरं सांगताय ना¿... आपल्याच रेकॉर्डमध्ये सापडला...”
“हो सर... पाच वर्षापुर्वीची घटना आहे... तो सोनल नावाच्या मुलीने त्याच्या विरोधात छेड काढल्याचा आणि तिला मारल्याचा आरोप लावला होता. तिच्या सोबत राकेश आला होता आणि त्या घटनेचा तो साक्षीदार होता. त्याची साक्षही आपण लिहून घेतली होती. त्या गुन्ह्यासाठी त्याला जेल झाली होती.”
अजींक्यने ड्राव्होरमधून कोरा कागद काढला. पेनाने त्यावर एक आकृती काढली.
“मला थोडा उशीर झाला... पण आता आठवलं, पाच वर्षांपुर्वी तो राकेश माझ्याकडे आला होता. आमची नुकतीच ओळख झाली होती. त्याने सांगतलं की या अमनला जेलमध्ये दोन एक दिवस ठेवा. म्हणून मी त्याला जेलमध्ये टाकलं होतं. पण त्याचा या निधीशी काय संबंध होता हे काही स्पष्ट आठवत नाहीये... पण पाच वर्षांपुर्वी झालेल्या घटणेचा सुड पाच वर्षा नंतर का...¿”
***
दुसरीकडे मी एका गाड्यासमोर बसून संतोष सोबत चहा पीत होतो. तो गाडा अत्यंत साधारण होता. गाड्यावर १५ – १६ वर्षाचा मुलगा चहा बनवत होता. चहा पिताना त्या मुलाकडे मी एकटक पाहत होता.
“काय पाहतोयस.¿”
संतोषने मला विचारले.
“स्वतःच्या भूतकाळाला पाहतोय.”
“का... तू पण चहा विकत होता का¿”
बोलता बोलता संतोष हसला. त्याच्या हसण्याला पाहून मीसुध्दा स्मितहास्य केलं. काही क्षण शांत राहिल्यानंतर मी त्याला म्हणाला -
“मी सुध्दा एका झोपडीत राहत होतो... म्हणजे अजूनही राहतोच, पण हा मुलगा आज ज्या परीस्थीतींना सामोरं जात आहे, पैशाची गरज भागवण्यासाठी जे काही याला करावे लागत आहे.... अशाच परीस्थितीला काही काळा पुर्वी मलाही सामोरे जावे लागत होते. मी हॉटेलमध्ये काम करायचो. पैशे कमी पडत होते ना म्हणून...”
संतोष पुन्हा हसला आणि चाहाचा कप त्या मुलाला देत म्हणाला –
“तुला पैशाची कमी नव्हती. तुझी आई कमवत होती. तिला जेवढे पैसे मिळायचे त्या पैशात घर आणि तुझं, दोघांच भागायचं. पण तू स्वतःच्या पायावर कुर्-हाड मारुन घेतलीस. कोणी सांगितलं होतं त्या रझीयाचं ऐकायला.”
एव्हाना माझा कपही रीकामा झाला होता. रीकामा कप हातात घेऊन बसलो होतो मी आणि शुण्यात पाहत होतो. माझ्या हातातून कप घेऊन संतोषने मला विचारलं.
“आता पुढं काय करणार आहेस ते सांग. वर्तमान पत्रातही तुझं नाव आणि फोटो आलं आहे. तुला पकडणं आता त्यांच्यासाठी सोप्प झालं आहे. पुढंचा प्लॅन काय आहे¿”
मी त्याच्याकडे आनंदाने पाहत म्हणालो.
“प्लॅन काय असणार... तेच, जे आपलं ठरलं आहे. उद्या सब इंस्पेक्टर अजींक्यला भेटायला जायचं आहे.”
“तू पुर्ण तय्यारी केली आहेस ना¿”
“आता तय्यारी कशी केली आहे ते तर उद्याच कळेल... पण तुला सांगितलेलं काम तू केलंस का...”
“तुझं काम झालयं... असा स्फोटक आहे की फुटता क्षणी सगळं काही उध्वस्त...”
तो गाडीला किक् मारत होता. पहिल्या किक् मध्ये गाडी चालू झाली नाही म्हणून त्याने गाडीच्या इंजीनाकडं पाहिलं आणि पुन्हा किक् मारली.
“अरे, सर्व काही उध्वस्त होण्या पेक्षा जास्तीत जास्त जाळ झाला पाहिजे. सगळ्या गोष्टी जळाल्या पाहिजे, एकही गोष्टी राहता कामा नये....”
“तेच तर म्हणतोय. जळून सगळं काही खाक् होऊन जाईल... तू काळजी करु नको रे.... तू बस गाडीवर...”
एव्हाना गाडी सुरु झाली होती. गाड्यावरच्या मुलाला पैसे दिले आणि दुचाकीवर बसून निघालो.
*****
क्रमशः