“मी माझ्या मनातल्या भावना अश्विनीला सांगीतल्या , आणि त्यानंतर अश्विनीने माझ्या सोबत बोलनंच सोडून दिलं. अश्विनी माझ्याकडं दुर्लक्ष करु लागली. तिच्या अशा वागण्यामागचं कारण मी तिला विचारलं. पण ती काहीच बोलंली नाही. या गोष्टीला घेऊन ती तणावात राहत होती. अचानक एका दिवशी तिने मला बोलवलं. मी तिने सांगितलेल्या ठिकाणी गेलो. तिने मला सांगितलं की तिने तिच्या मामाच्या मुलीला, जिचं नाव सई आहे. तिचा अपघातात मृत्यु होताना पाहिलं आणि आदल्या दिवशी स्वतःला तिच्या मामाच्या घरी असल्याचे सांगितले. दुसर्-या दिवशी मी तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी दिलेल्या गोळ्या तिला दिल्या. तरी असचं पुढंच्या तिन चार दिवस झालं. तिच्या घरच्यांना तशी मी कल्पना दिली होती. त्यानंतर मी तिला घेऊन तिच्या गावाला गेलो. तिचं इंगेज्मेन्ट होतं दुसर-या दिवशी. तिथं गेल्यावर अश्विनीच्या वडीलांना सगळं काही सांगितलं. तेव्हा मला कळालं की तिला कोणी मामा नाही आणि कोणी मामाची मुलगी नाही. तिथं गेल्यावर तिला भास येणे बंद झाले. तिने नोकरी सोडून दिली. त्यानंतर महिण्याभराने तिचं लग्न सुध्दा झालं. लग्नाला महिनाच झाला होता, अचानक तिला काय झाल, ती सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली. तिच्या नवर्-याने तिला अडवले, तेव्हा तिने तिच्या नवर्-या विरुध्द पोलीसात तक्रार केली. पोलीसांना तिच्या नवर्-याने सांगितले की आदल्या रात्री त्यांच्यात भांडण झालं होतं आणि दुस-या दिवशी ती घर सोडून जाताना त्याने तिला अडवलं. जेव्हा ही गोष्ट तिच्या घरी कळाली तेव्हा तिच्या सासरकडच्यांना तिला असे भास होत असल्याचे त्यांनी कळवले. तेव्हा तिच्या सासरकडच्यांनी अश्विनाला माहेरी पाठवली आणि चार दिवसां आधी तिला तिच्या नव-याकडून घटस्फोटाची नोटिस आली. मी ठरवलं होतं की अश्विनीला परत कधीच भेटनार नाही आणि कधीच तिच्याशी बोलनार नाही पण तिच्या घरच्यांनी काल मला फोन केला आणि माझ्याकडे मदत मागीतली. आता काय करायचं, तुम्हीच काहीतरी उपाय सांगा.”
राकेश डॉक्टरांसमोर बसला होता. राकेशचं बोलणं संपल्यावर डॉक्टरांनी काही क्षण विचार केला आणि नंतर बोलू लागले.
“जसं तुम्ही सांगितलं जर तसंच झालं असेल तर एका गोष्टीची शक्यता आहे. तुम्ही सांगितल्या प्रमाणे तुमच्याशी भांडण झाल्यावर ती तणावात होती आणि दुसर्-या दिवशी तिला भास होण्यास सुरवात झाली. पुन्हा तिचं तिच्या नव-यासोबत भांडण झालं आणि दुस-या दिवशी तिला भास होऊ लागले. भास होण्यास सुरुवात झाल्यानंतर ती तिचा भूतकाळ पुर्णतः विसरुन जाते. या सगळ्यांतून एकच निष्कर्श निघतो. तिच्या भूतकाळात हीच घटना किंवा या सारखी दुसरी घटणा घडली असावी. त्या घटने मुळे ती बराच काळ ती तणावातुन गेली असावी आणि ज्या ज्या वेळी ती पुन्हा तणावात जाते, तेव्हा तिला तेच भास होऊ लागतात... ”
त्यांना थांबवत राकेश म्हणाला -
“ पण तिला बरेचदा विचारुन झालंय. या पुर्वी तिच्या सोबत असं कधी झाल्याचे तिच्या घरच्यांनी सुध्दा नाकारले. तिला मामा नाही आणि मामाची मुलगीही नाही मग तिच्यासोबत असं कसं होऊ शकतं. ”
“ १००% असंच झालं असेल, असं मी सांगू शकत नाही. पण याची खात्री करण्यासाठी आपण एक काम करु शकतो. तिला हिप्नॉटिसमने आपण भूतकाळात पाठवु शकतो. त्याने आपल्याला तिच्या भूतकाळा विषयी कळण्यास मदत होईल.”
“.... आणि त्यासाठी काय करावं लागेल..”
“तिला येत्या रविवारी इथं घेऊन या. मी त्यासाठी डॉक्टर काळेंना बोलावून घेतो. ते हिप्नोटिसम या विषयात पारंगत आहेत”
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाने राकेश अश्विनीला रवीवारी त्यांच्या क्लिनीकमध्ये घेऊन आला. डॉ. काळेसुध्दा तिथं पोहोचले होते.
अश्विनीला आराम खुर्चीवर बसवली होते. राकेशही काही अंतरावर बसला होता. डॉक्टर काळे त्यांच्या तयारीत मग्न होते. अश्विनीला हिप्नोटिसमची पुर्न कल्पना राकशने दिली होती. ती शांतपणे त्या आराम खुर्चीवर बसुन भविष्याबद्दल विचार करत होती. डॉक्टर काळेंची तय्यारी झाल्यावर त्यांनी हिप्नोटिसमला सुरुवात केली. तिच्या समोरच्या स्क्रिनवर ब्लॅक अँड व्हाईट असे गोलाकार रेषा जणू आतल्या बाजूला फिरु लागल्या. त्याकडे एकटक पाहण्यासाठी डॉ. काळेंनी तिला सांगितले. पाहता पाहता अश्विनीला झोप लागली. ते पाहुन डॉ. काळेंनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. -
“अश्विनी, तू आता कुठं आहेस.¿ ”
“मी एका क्लिनीकमध्ये आहे. ”
“आता तू तुझ्या भूतकाळात जा. जिथं तुला खुप मानसिक त्रास झाला होता. ”
“हं... ”
“गेलीस भूतकाळात ¿”
“हं... ”
“काय पाहतीयेस तू... .¿ ”
“माझ्यावर माझा नवरा ओरडत आहे. तो माझ्यावर कसले तरी आरोप करत आहे. ”
“अश्विनी आणखिन माघं जा. तूला नोकरी लागण्या आधी असं काय झालं होतं ज्या कारणाने तुला खुप त्रास झाला होता. ”
“हं... ”
“ अश्विनी आता तू कुठं आहेस.. .¿”
“ मी रानात फिरत आहे. ”
“ तू किती वर्षाची आहेस त्या वेळी. ”
“मी १० वर्षाची आहे... ”
“काय होतयं तिकडं..¿”
“मी आणि माझी मैत्रीण सई, आम्ही फिरायला गावा बाहेरच्या रानात चाललोय. आम्ही घरापासुन लांब कधी गेलोच नाही. आम्हाला घरापासुन लांब आमच्या आई- वडीलांनी कधी सोडलंच नाही. घरच्यांशी खोटं बोलुन आम्ही रानात पळुन आलो होतो. मी चालुन चालुन दमली होती म्हणुन तिथल्या एका दगडावर बसुन राहिले. पण सईला मात्र त्या स्वातंत्र्याचा पुरे पुर आनंद घ्यायचा होता. ती त्या रानात नुसती धावत होती. आकाशात काळे ढग दाटुन आले होते. त्यामुळे वातावरणात अंधारमय सावली पसरली होती. तिथं कोपर्-यावर छोटासा झरा होता आणि त्या झर्-याच्या पलीकडे माळराण, ज्याच्यावर सर्वत्र हिरवे गवत पसरले होते. त्याच माळरानचे पुढे टेकडीत रुपांतर झालेले दिसत होते. त्या टेकडीच्या मधोमध एक वडाच झाड होतं. सईने झरा ओलांडून त्या टेकडीच्या दिशेने पळायला सुरुवात केली. मी बरीच लांब होते. मी तिला थांबन्यासाठी हाक मारत होते पण ती थांबायला तय्यारच नव्हती. ती धावत त्या झाडाजवळ जात होती. तिच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मी सुध्दा धावायला सुरुवात केलं पण झर्-या पाशी येऊन मी थांबले.
आकाशात दाटलेले काळ्या ढगांमुळे आता पाऊस पडू लागला. अधून मधून विजा चमकत होत्या. ती झाडाजवळ पोहोचली होती. माझी नजर तिच्यावरच खिळली होती. ती त्या वडाच्या झाडावर चढली आणि एका फांदीवर जाऊन बसली. ती फांदी वडाच्या पारंब्यांनी भरलेली होती. इतर फांद्यांच्या पारंब्या त्या फांदी शेजारुन जात होत्या. खेळण्याच्या नादात तिने फांदीकडे लक्षच दिले नाही. पारंब्यांशी खेळताना तिचा तोल गेला आणि ती त्या पारंब्यांच्या गर्दीतून खाली कोसळली. स्वतःला वाचवण्यासाठी तिने हात पाय हलवायला सुरवात केली. पण तिच्या याच प्रयत्नात काही पारंब्या तिच्या गळ्या भोवती गुंडाळल्या गेल्या. आणि तिच्या गळ्याला फास लागला. मी तिच्या पासुन बरीच लांब होते. मी तिच्याजवळ पोहचे पर्यंत तिने प्राण सोडला होता. मी खुप घाबरले होते. मी घरी पळून आले आणि कोणाला काहीच सांगितलं नाही... ”
अश्विनी बोलताना घामाने पुर्न नाहुन गेली. ती घाबरलेल्या स्थितीत होती. तीच्या हृदयाचे ठोके वाढले होते. तिला शांत करत डॉ. काळे म्हणाले –
“अश्विनी, शांत हो आणि त्या काळातुन आताच्या काळात निघुन ये. तू आता एका क्लिनीकमध्ये आहेस.. ”
अश्विनीच्या काळच्या चक्रात अडकण्या मागील कारण कळालं होतं. त्यानुसार डॉक्टरांनी उपचार सुरु केले. उपचारानंतर ती बरी झाली. पण जर तिला कोणत्याही प्रकारचं मानसिक त्रास सतत होत राहिला किंवा ती जर मानसिक तणावा खालुन सतत जात राहिली तर नक्कीच हा चक्र पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे, असं डॉक्टरांनी त्यांना समजवलं.
अश्विनीचं घटस्फोट झालं. काही वर्षात राकेश आणि अश्विनीचं लग्न केलं. पुढंच्या काही वर्षात त्यांना एक मुलगा झाला. मुलाचं शिक्षण झालं. तो हुशार असल्याने पुढच्या शिक्षणासाठी त्याला परदेशात शिकण्याची संधी आली. तो परदेशी गेला. तिथंच त्याचं शिक्षण झालं, तिथंच त्याला नोकरी मिळाली आणि तिथंच त्याने लग्न करुन तो तिथेच स्थायी झाला.
राकेश आणि अश्विनी त्यांचं आयुष्य सुखाने व्यतीत करत होते. त्यांनी स्वतःची दिनचर्या ठरवली होती आणि ते राज त्याच प्रमाणे वागत होते. रोज सकाळी जोगींसाठी पार्कमध्ये सोबत जायचं. त्यानंतर घरी जाऊन मिळू जेवन बनवायचं. पुस्तक वाचायचं, चित्रपट पाहायचं, रात्रीच्या जेवनाला रोज वेगवेगळ्या रेस्टोरंटमध्ये जायचं. मुलगा गेल्याचं दुःख त्यांनी मनातुन काढून टाकायचं ठरवलं. पण अश्विनीच्या मनात मात्र दुःख घर करुन बसला होता. वर वर पाहता ते खुप आनंदि होते. पण अश्विनी तिचं दुःख लपवत होती.
वयाच्या ६५ वर्षाला राकेश हृदयरोगाने गेला. आता त्या घरात आणि तिच्या आयुष्यात अश्विनी एकटीच राहुन गेली. जगण्यासाठी लागणार्-या सगळ्या आवश्यक गोष्टी तिच्याजवळ होत्या. फक्त गोष्ट नव्हती जगण्याची ईच्छा.
नेहेमी प्रमाने एका दिवशी ती जोगींसाठी पार्कमध्ये गेली. पण तिथं गेल्यावर मात्र तिने जोगींग न करता तिथंल्या कोपर्-यातल्या बाकावर जाऊन बसली. तिचं आधी लक्ष गेलं नाही, तिच्या भोवताली होणार्-या बदलांवर. पण नंतर तिला जाणवले की नेहेमी पेक्षा काहीतरी वेगळं होत होतं. पुन्हा तोच माळरान, तोच पाऊस आणि तिच धावनारी सई. पण यावेळी अश्विनी तिच्यामागे धावली नाही. तिने जाग्यावरुनच सईच्या नावाने हाक मारली. तिचा आवाज ऐकुन सई जाग्यावर थांबली. तिने मागे वळून पाहिले.
यावेळी मात्र अश्विनी त्या भासांच्या विश्वातुन सत्यात आलीच नाही. सत्यात येऊन तरी काय करणार. त्या विश्वात तिची मैत्रिण तरी होती. पण सत्यात तिचं स्वतःच असं कोणीही उरलं नव्हतं. त्या बाकावर तिचा निर्जीव शरीर तसाच पडून होता. अंततः काळाने तिला एक सोबती आणि त्या एकटेपणातुन मुक्ती दोन्ही दिलं.