विभाजन कादंबरीलेखक अंकुश शिंगाडे नागपूर 9373359450कृपया कादंबरी वाचून एक फोन अवश्य करा. टिप- ही कादंबरी काल्पनिक असून या कादंबरीचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी. विभाजन... भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही, त्यासाठी इथे भारतीय नेत्यांना फार मोठा त्याग करावा लागला. कित्येक क्रातीकारक लढले. शहीद झाले. काहींची नावं इतिहासात नाहीत. काहींची आहेत. पण जे जे या देशासाठी लढले. त्यांच्या प्राणांच्या बलिदानाचा इतिहास भारत देश विसरू शकत जरी नसला तरी आजही काही लोकं त्यांना शिव्या हासडतांना दिसतात. ही या देशाची शोकांतिका आहे. निदान आपण तरी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही करु शकलो नाही. आताही करण्यासारखे असूनही करु शकत नाही. हे सगळं विसरुन त्यांना शिव्या देण्याचं नव्हे तर बदनाम करण्याचं काम नेहमी काही लोकं करीत असतात.

Full Novel

1

विभाजन - 1

विभाजन (कादंबरी) (1) विभाजन कादंबरीलेखक अंकुश शिंगाडे नागपूर 9373359450कृपया कादंबरी वाचून एक फोन अवश्य करा. टिप- ही कादंबरी काल्पनिक या कादंबरीचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी. विभाजन... भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही, त्यासाठी इथे भारतीय नेत्यांना फार मोठा त्याग करावा लागला. कित्येक क्रातीकारक लढले. शहीद झाले. काहींची नावं इतिहासात नाहीत. काहींची आहेत. पण जे जे या देशासाठी लढले. त्यांच्या प्राणांच्या बलिदानाचा इतिहास भारत देश विसरू शकत जरी नसला तरी आजही काही लोकं त्यांना शिव्या हासडतांना दिसतात. ही या देशाची शोकांतिका आहे. निदान आपण तरी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही करु शकलो नाही. आताही करण्यासारखे असूनही करु शकत ...अजून वाचा

2

विभाजन - 2

विभाजन (कादंबरी) (2) ही देवळं पाडण्यानं व जबरदस्तीच्या धर्मपरीवर्तनानं मजबुरीनं जरी येथील मुस्लीम वगळता इतर धर्म चूप बसले असले त्यांच्याही मनात असंतोष खदखदत होता. सामान्य माणसांमध्येही छोट्या छोट्या स्वरुपात आपल्या धर्माबद्दल आत्मीयता जाणवतच होती. फरक एवढाच होता की ते ती गोष्ट बाहेर काढत नव्हते. १८५७ चा उठाव होवून गेला होता. हिंदी सैनिक हारले असून पूर्णतः इंग्रजांचा भारतात जम बसला होता. मुघल साम्राज्य हे पूर्णतः दुबळे झाले होते. त्यामुळं काही काळासाठी का होईना तमाम हिंदूस्थानीय वासीयांना चूप राहणे भाग होते. कारण हे इंग्रजही मुस्लिम राज्यकर्त्यांच्याच नीतीचे होते. फरक एवढाच होता की हे सुधारणावादी होते. १८५७ चा राष्ट्रीय उठाव यशस्वी झाला ...अजून वाचा

3

विभाजन - 3

विभाजन (कादंबरी) (3) स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. स्त्रिया स्वतःचे लेखनातून मांडू लागल्या. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व यायला लागले. ज्याप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीत सुधारणा झाल्या. त्या प्रमाणे मुस्लिम समाजात सुद्धा सुधारणा घडून आल्या. मुस्लीम समाजातही धर्मसुधारणेला सुरुवात झाली होती. त्यांनी बंगाल प्रांतात दम पकडला होता. मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना झाली होती. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले होते. पुढे याचेच अलिगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. त्यांनी पाश्चिमात्त्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार ...अजून वाचा

4

विभाजन - 4

विभाजन (कादंबरी) (4) राष्ट्रीय सभेच्या १९१६ च्या लखनौ अधिवेशनात टिळकांनी परत राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. याच वर्षी राष्ट्रसभा व मुस्लिम लीग यांच्यात समेट घडून आला. असे म्हणतात की या करारानुसार राष्ट्रीय सभेेनं मुस्लिमांचे विभक्त ...अजून वाचा

5

विभाजन - 5

विभाजन (कादंबरी) (5) महात्मा गांधी हे देशाचे प्रेरणास्थान होते. त्यांना वाटत होतं की हिंदू आणि मुसलमान यांनी एकत्र अधिवास हवा. भावाभावासारखं राहायला हवं. देशाचे विभाजन करू नये. विभाजनाला त्यांचा विरोध होता. गांधीच्या मनात होतं की माझी जी आत्मा आहे. माझी आत्मा, माझी आत्मा मुस्लिमांना आणि हिंदूंना वेगळे मानत नाही. त्यांची संस्कृती सुद्धा विभिन्न मानत नाही. जर मी हिंदू आणि मुसलमान असा जर भेद केला तर त्या ईश्वराला नकार देण्यासारखे होईल. असं महात्मा गांधीच्या म्हणणं होतं. पुष्कळ सालापर्यंत गांधी आणि त्यांच्या अनुयायांनी बराच प्रयत्न केला की हिंदू आणि मुसलमान ह्यांनी एकत्र राहावे. राष्ट्रीय सभा सोडून जाऊ नये. परंतू काही जणांना ...अजून वाचा

6

विभाजन - 6

विभाजन (कादंबरी) (6) अशातच एक दिवस टिळक मृत्यू पावल्याची बातमी कानावर आली. सारा देश हरहळला. देशानं एक नेता गमावला. नेत्यांसह इंग्रजही हळहळले. कारण ज्या माणसानं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळविणारच. अशी घोषणा केली होती. तो असामी आ ...अजून वाचा

7

विभाजन - 7

विभाजन (कादंबरी) (7) धुळ्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर बाळकृष्ण चापेकर बंधूंनी २२ जून १८९७ रोजी रँडचा वध केला. दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव तीन बंधू व त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली. एकाच घरातील तीन भावांनी देशसेवेसाठी होतात्म पत्करले. याच सुमारास बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध फार मोठा उठाव केला. १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारकाची गुप्त संघटना स्थापन केली. १९०४ साली या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले. तेथून ...अजून वाचा

8

विभाजन - 8

विभाजन (कादंबरी) (8) मोहम्मदने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात घेतलेली उडी गावच्या लोकांना आवडली होती. प्रत्येक गावन् गाव स्वातंत्र्याच्या ध्येयानं पछाडलेलं होतं. ब्रिटीशांना जुमानत नव्हतं. त्यांना देशातील लोक आवडत होते. नव्हे तर जेही स्वातंत्र्यासाठी झिजत होते. त्यांना गावची लोकं मदत करीत असत. मोहम्मदनं तोडलेल्या टेलिफोनच्या तारा.... हा प्रकार ब्रिटीशांसाठी लांच्छनास्पद असला तरी गावासाठी गावचा अभिमान बाळगणाराच होता. म्हणून की काय अख्ख गाव त्याच्या धर्माचा बाऊ न करता त्याला आपल्या घरात लपवीत होते. त्याच्यासाठी प्रसंगी पोलिसांचा लाठीमार खात होते. मोहम्मद काही पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांनी बराच प्रयत्न केला. त्यावेळी तर मोहम्मदला गावच्या लोकांबद्दल आत्मीयता निर्माण झाली होती. हिंदू महासभेची दोन राष्ट्राची कल्पना ...अजून वाचा

9

विभाजन - 9

विभाजन (कादंबरी) (9) मोहम्मदनं विचारलं, "मी मुसलमान आहे हे कसं समजलं तुम्हाला?" "तुम्ही एक दिवस पहाटेला नमाज पढत होते. गोष्टीला बरेच दिवस झाले. " मोहम्मद विचार करीत होता. त्या माणसांचा की जी माणसं हिंदू तर होतीच. तरीही ती स्वतःला हिंदू न समजता माणूस समजत होती. देशात हिंसाचाराचा डोंब उसळला होता. पण आज एक वर्ष होवूनही हिंसा बंद झाली नव्हती. झारखंड कुठे ना कुठे दंगा झाला. अमुक ठिकाणी एवढी माणसं मारली गेली अशा बातम्या कानावर येत होत्या. त्याचबरोबर मोहम्मदला परीवाराचीही चिंता वाटत होती. माझा परीवार कसा असेल का असेल वैगेेरेच्या चिंता सतावत होत्या. आपण दंगे जर पाहात बसलो तर आपला ...अजून वाचा

10

विभाजन - 10

विभाजन (कादंबरी) (10) यूसुफ त्या लहानग्याचं नाव. तो लहान होता. त्यानंही ते शव पाहिले होते. त्याला धर्म म्हणजे काय?हे नव्हतं. कशासाठी हे मुडदे पाडले हे त्यालाही समजत नव्हतं. तसा तो शव पाहात असतांना त्याची बहिण झरीनानं रडत रडत त्याचा हात धरला व खिचत खिचत त्याला नेवू लागली. तसा तो म्हणाला, "दिदी, आपण कुठे चाललोय? अन् हे शव का बरं?" "आपल्याले लपाले हवं. " "पण कावून?" युसूफला न उमगल्यानं तो बोलला होता. तशी झरीना म्हणाली, "युसूफ चूप बैस. ते आंदोलन कारी आपल्याला मारुन टाकतीन. " "कोण गं ताई?" तसा आपला एक हात झरीनानं त्याच्या तोंडावर ठेवला. तशी ती म्हणाली, "मी ...अजून वाचा

11

विभाजन - 11

विभाजन (कादंबरी) (11) फ्रेंच वसाहतीची समस्या होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही चंद्रनगर, पुद्दुचेरी, कारिकल, माहे व यानम या प्रदेशावर फान्सचे होते. तेथील रहिवासी भारतीय भारतात सामील होण्यास उत्सुक होते. ते प्रदेश भारताचे घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावे अशी मागणी भारत सरकारने केली. फान्सने १९४९ साली चंद्रनगर मध्ये सार्वमत घेतले. तेथील जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला. चंद्रनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर भारतातील उत्तर प्रदेश सरकारच्या हाती सोपवले. गोव्याची सुद्धा समस्या होती. पोर्तुगालने मात्र आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळविण्यासाठी भारतीयांना लढा द्यावा लागला. या लढ्यात टी बी कुन्हा आघाडीवर होते. त्यांनी सरकार विरुद्ध ...अजून वाचा

12

विभाजन - 12

विभाजन (कादंबरी) (12) म गांधींचा दोन गोष्टीने राग आला होता. एक म्हणजे पंचावन कोटी पाकिस्तानला देणे व दुसरा म्हणजे ज्या मुसलमानांना भारतात राहायचे असेल त्यांनी राहावे असे म. गांधींचे बोलणे. मग देशातील तमाम मुस्लिमेतर लोकांना वाटत होते की मुसलमानांनी आपल्या धर्माच्या लोकांसाठी पाकिस्तान मागीतला ना. मग या देशातील सर्व मुसलमान पाकिस्तानात जावे. औषधालाही मुसलमान सापडू नये. पण म. गांधींच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या मुसलमानांना जर भारतात राहायचे असेल, त्यांनी राहावे हे विधान इतरत्र धर्मांतील लोकांच्या पोटात दुखण्यासारखं होतं. त्यांना वाटत होतं की पाकिस्तानची भूक पुष्कळ मोठी आहे. आज जरी पंचावन कोटी रुपये पाकिस्तानला दिलेही. पण त्यांची भूक क्षमणार नाही. पण ...अजून वाचा

13

विभाजन - 13

विभाजन (कादंबरी) (13) युसूफ नेता बनला खरा. त्याचं जीवन सुखी झालं खरं. पण त्याच्याहीसमोर प्रश्न होता. तो म्हणजे नेहमीनेहमी देशावर होणा-या पाकिस्तानच्या सतत आक्रमणाचा, पाकिस्तान नेहमी नेहमी या भारतावर गोळीबार करीत होता. भारताला मिटविण्याच्या धमक्याही देत होता. कधी परमाणू बाँब टाकू असंही बोलत होता. युसूफ देशाचा नेता असला तरी या पाकिस्तानच्या अशा वागण्यानं परेशान होता. देशात ठिकठिकाणी बाँबस्फोट होत असत. त्याचे सुत्रधार हे पाकश्रेत्रात लपून बसत असत. ते सुत्रधार स्वतः त्याची कबूली देत असत. पण पाकिस्तान सरकार नेहमी खोटं बोलत असे. ते नेहमी म्हणत असे की आम्ही कुणालाही लपवलेलं नाही. अशाप्रकारचं खोटं बोलणं, त्यातच पाकिस्तानचं असं वागणं ही गोष्ट ...अजून वाचा

14

विभाजन - 14

विभाजन (कादंबरी) (14) तो काळ १९९२ ते १९९७ चा होता. त्या काळातच युसूफ खासदार म्हणून निवडून गेला होता. पहिल्या जेव्हा संसद भवनात अधिवेशन भरलं. त्यात युसूफलाही बाजू मांडायला लावली. तेव्हा त्यानं जनसंख्या वृद्धीवर जोरदार भाषण केलं आणि हेही सांगीतलं की जर याचवेळी जनसंख्येवर नियंत्रण आणलं गेलं नाही. तर उद्या लोकसंख्येचा विस्फोट आपल्या देशात झाल्याशिवाय राहणार नाही. युसूफचं भाषण संपलं. तशा जोरदार टाळ्या संसदभवनात वाजल्या. युसूफचं बोलणं सर्वांना पटलं होतं. त्यातच लोकसंख्या नियंत्रणाचा युसूफचा मुद्दा सर्वांना पटला. त्यांनी ह्याच मुद्दयाचा गांभीर्यानं विचार करुन पुढे ज्या पंचवार्षीक योजनेची कलमं तयार केली. त्या कलमात जनसंख्या वृद्धी नियंत्रणावर जोर देवून लोकसंख्या नियंत्रण कायदा ...अजून वाचा

15

विभाजन - 15

विभाजन (कादंबरी) (15) युसूफ काश्मीर बाबत विचार करीत असतांना त्याला अचानक तो शाळेत वाचन केलेला काश्मीरचा इतिहास आठवला. तसा विचार आला. काश्मीर मुद्दा हा वादाचाच मुद्दा आहे. नेहमी तिथे रक्त सांडत असतं. सर्वात पहिलं रक्त रणजीत सिंगच्या रुपानं सांडलं ह्याला इतिहास साक्षी आहे. त्यानंतर शर्माचं रक्त. आम्ही काश्मीर जिंकलो होतो. पण तो जिंकलेला भाग आम्ही दिलखुलासपणे सोडून दिला. याचं कारणही तसंच होतं. आमच्या तत्कालीन नेत्यांना वाटत होतं की जर का हा भाग घेतला तर ती आमच्यासाठी डोकेदुखी ठरेल. तो भाग आम्ही आम्हाला डोकेदुखी ठरेल म्हणून सोडून दिला. त्यातच आमचं चुकलं. याचं कारण असं की तो भाग आम्ही सोडल्यानं त्या ...अजून वाचा

16

विभाजन - 16

विभाजन (कादंबरी) (16) आम्ही भारतीय आहो असं मानत आणि म्हणत आम्ही देशात राहतो. काश्मीरला आम्ही आमच्या देशाची शान समजतो. तर त्या काश्मीरला आम्ही आमच्या नकाशातही दाखवतो. तसेच त्या ठिकाणी असलेल्या अमरनाथ गुफेत प्रकट होणा-या शिवलिंगाचे अर्थात बर्फानी बाबाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हिंदू भावीक जातात. नव्हे तर त्या ठिकाणी लावलेल्या दुकानातील माल घेवून त्या काश्मीरच्या लोकांना जगवतो. तिथे सेना ठेवून त्या सेनेच्या मदतीने पाकिस्तानात दडलेल्या आतंकवाद्याकडून आम्ही त्या काश्मीरच्या लोकांची सुरक्षा करतो. बदल्यात आम्हाला काय मिळतं? काश्मीर ही घाटी आहे. अत्यंत बर्फाच्छादीत प्रदेश. उन्हाळ्यातच काही दिवस थोडं गरमपणा. बाकी वर्षभर थंड वातावरण. तेवढंच रमणीयही. याच काश्मीरला भारताचा स्वर्गही म्हणतात. अशा ...अजून वाचा

17

विभाजन - 17

विभाजन (कादंबरी) (17) तो व्हँलेंटाईनचा दिवस होता. सर्वत्र आनंद होता. अशातच बातमी आली की भारताचे वीर सुपुत्र शहीद झाले. प्रत्येक सैनिकांच्या पत्नीला वाटलं की आपल्या घरचा तर जीव नसावा? त्यांनी फोन बंद करुन ठेवलेले. सर्व श्रद्धांजली अर्पित करण्याच्या मुडमध्ये. कोणी मेसेज टाकून श्रद्धांजली अर्पण केली तर कोणी कविता बनवून. सारेच शोकसागरात बुडाले होते. मा. पंतप्रधानांनी तर इशाराच दिला की आम्ही याचा बदला घेवू. सारा दोष पाकिस्तानवर. पण पाकिस्तान नेहमीसारखा फुशारकी मारत म्हणाला, 'आम्ही हमला केला कशावरुन? आमचा यात काहीही दोष नाही. मग दोष कोणाचा? असंख्य लोकसंख्या असूनही शांतता बाळगणा-या भारताचा की आमच्या राजकारण्यांचा. काहीही कळेनासे. सामान्य माणसाला गुमराह करणारे प्रश्न. ...अजून वाचा

18

विभाजन - 18 - अंतिम भाग

विभाजन (कादंबरी) (18) वाजपेयी पंतप्रधान असताना देखील ‘समान नागरी कायदा’, ‘राममंदिर’ आणि ‘कलम ३७०’ हे भाजपचे निवडणुकीचे मुद्दे असायचे. वाजपेयी यांनी काश्मीर प्रश्नावर चर्चेचाच मार्ग अवलंबिला होता. अमरजितसिंह दुलत यांच्या ‘Kashmir The Vajpayee Years’ ह्या अतिशय माहिती पूर्ण पुस्तकात वाजपेयी यांनी सामंजस्य अणि संयम दाखवत काश्मीरबरोबर कसा व्यवहार केला याची अनेक उत्तम उदाहरणे देखील आहेत. तेव्हा वाजपेयीप्रणीत त्रिसूत्री ‘इन्सानियत’, ‘झमूरियत’ आणि ‘कश्मीरियत’ (मानवता, शांतता आणि काश्मीरी लोकांच्या भावनांना महत्त्व) ह्या पायावर विकसित झाले होते. काश्मीरसंबंधीचे हे ‘वाजपेयी-सूत्र’ आजही तिथल्या जनतेला आठवते आणि आवडते, कारण त्या काळात दिल्ली श्रीनगरशी मोकळ्या मनाने बोलायची आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेत असे. नंतरच्या काळात ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय