विभाजन - 12 Ankush Shingade द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

विभाजन - 12

विभाजन

(कादंबरी)

(12)

म गांधींचा दोन गोष्टीने राग आला होता. एक म्हणजे पंचावन कोटी पाकिस्तानला देणे व दुसरा म्हणजे ज्या ज्या मुसलमानांना भारतात राहायचे असेल त्यांनी राहावे असे म. गांधींचे बोलणे. मग देशातील तमाम मुस्लिमेतर लोकांना वाटत होते की मुसलमानांनी आपल्या धर्माच्या लोकांसाठी पाकिस्तान मागीतला ना. मग या देशातील सर्व मुसलमान पाकिस्तानात जावे. औषधालाही मुसलमान सापडू नये. पण म. गांधींच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या मुसलमानांना जर भारतात राहायचे असेल, त्यांनी राहावे हे विधान इतरत्र धर्मांतील लोकांच्या पोटात दुखण्यासारखं होतं. त्यांना वाटत होतं की पाकिस्तानची भूक पुष्कळ मोठी आहे. आज जरी पंचावन कोटी रुपये पाकिस्तानला दिलेही. पण त्यांची भूक क्षमणार नाही. पण म. गांधींच्या आग्रहापुढं कुणाचं चालत नव्हतं.

म. गांधींना देश राष्ट्रपिता मानत होता. कारण टिळकानंतर त्यांनीच देशाचं नेतृत्व केलं होतं. त्यांनाही वाटत होतं की भारताचे दोन तुकडे होवू नये. भारत पाकिस्तान बनू नये. पण त्यांचा नाईलाज होता. जीनानं पाकिस्तानची केलेली मागणी जरी गांधीजींना आवडत नसली तरी त्यांना नाईलाजानं त्या मागणीवर शिक्कामोर्तब करावंच लागलं. जर पाकिस्तान नाही मिळाला तर आम्ही अखंड भारताचे स्वप्न धुळीस मिळवू असा पाकिस्तानचा सूर होता. त्यामुळेच की काय? येथे हिंसा भडकल्या होत्या.

शेवटी येथील तमाम लोकांनी म. गांधींना निर्णय घेतला. जरी महात्मा गांधी देशाचे आधारस्तंभ असतील, जरी ह म. गांधी देशाचे राष्ट्रपिता असतील, जरी त्यांनी भारताच्या स्वतंत्रतेत सिंहाचा वाटा उचलला असेल तरी आज त्यांचे निर्णय कामाचे नाहीत. आज ते ज्या ज्या मुसलमानांना राहायचे असेल त्यांनी देशात राहिले पाहिजे म्हणतात. आज पाकिस्तानला लहान भाऊ समजून पंचावन कोटी रुपये देतात. उद्या अजून काही देतील. असं येथील तमाम लोकांना वाटलं. त्यानंतर त्यांनी म गांधींना मारण्याचा डाव रचला. कारण त्यांना वाटत होतं की हा निर्माण झालेला पाकिस्तान उद्या आपल्यासाठी डोकेदुखी ठरेल.

म. गांधींनी म्हटलं होतं की ज्या ज्या मुसलमानांना देशात राहायचं असेल. ते राहू शकतात. ते झरीना व युसूफसारख्यांसाठी बरोबर होतं. ते म्हणणे काही लोकांसाठी बरोबर होतं. कारण त्यांची देश सोडून जायची इच्छा नव्हती. जीनानं पाकिस्तान वेगळा मागायची इच्छा नव्हतीच. कारण शेवटी ज्या मुसलमानांसाठी नव्हे तर ज्या मुस्लिम धर्मासाठी पाकिस्तान मागीतला. त्यापैकी पाकिस्तानात किती गेले. असा जर प्रश्न केला तर त्याचे उत्तर देता येणार नाही. या देशात राहणा-या तमाम लोकांना वाटत होतं की जर गांधीजींनी मनात इच्छा केली असती तर पाकिस्तान निर्माणच झाला नसता. पण गांधीजी तरी काय करणार. नाईलाज होता. देशात हिंसा भडकल्या होत्या. पण गांधीजींनी पाकिस्तानला जाहीर केलेले पंचावन कोटी तमाम भारतीयांना दुःख देणारी घटना ठरली. त्यातच हे वाद गांधीजीच्या हत्येशिवाय क्षमणार नाही असं काही लोकांना वाटलं. त्यांनी डाव रचला. ते गांधीजीच्या मागावर राहिले.

म. गांधी दररोज सायंकाळला मंदीरात प्रार्थनेला जात. त्यांचा हा क्रम कधीच चुकला नाही. आज तीस तारीख होती. तीस जानेवारी म. गांधींसाठी काळ घेवून आली होती. काळाला एकतीस जानेवारीचा सकाळचा सुर्य पाहू द्यायला नव्हता की काय?गांधीजी यावेळी दिल्लीत मुक्कामी होते.

म. गांधींची सरदार पटेलांसोबत भारत पाकिस्तान विषयावर त्या दिवशी बैठक सुरु होती. सव्वा पाच वाजले होते. तशी ती वेळ गांधीजींच्या लक्षात आली व ते प्रार्थनेसाठी नेहमीप्रमाणे उठले. त्यांनी हातपाय धुतले. पंचा व्यवस्थीत केला. तसे ते दिल्ली स्थित बिर्ला मंदीराच्या पाय-या चढू लागले. तशी आरतीची वेळ झाली.

आरती होणार होती. तसे महात्माजी त्या बिर्ला मंदीराच्या पाय-या चढू लागले. दोन तीन पाय-या बाकी असतील. तोच हे राम हे राम असा आवाज आला. क्षणभर काय घडलं हे कुणालाच कळलं नाही. गांधीजींना तीन गोळ्या लागल्या होत्या. तशी गर्दी जमली होती. त्या गर्दीतून अंगावर पांढरा पंचा ओढलेला एक युवक पळतांना दिसला. लोकांनी त्याला पकडलं. त्यांची शहानिशा केली. तर तो तोच युवक होता. ज्याने गांधीजीचे गोळी मारण्यापुर्वी पाय धरले होते व मला माफ करा म्हटले होते.

नाथुराम घोळसे... ... . म. गांधींचा मारेकरी. त्याचा जन्म एका ब्राम्हण कुटूंबात. त्याच्या जन्मापुर्वी त्याच्या परीवारात अपत्य वाचत नसत. म्हणून त्याचं नाक टोचवण्यात आलं होतं. नव्हे तर लहाणपणी त्याला नथ घालून देण्यात आली होती. तसेच त्याला मुलगीच मानण्यात येत असे. त्या नथवरुन त्याचं नाव नथुराम पडलं नव्हे तर त्याचा इंग्रजी अपभ्रंश नाथुराम. त्यानं मधातच आपलं शिक्षण सोडलं होतं.

सुरुवातीला त्याला गांधीजी जास्त आवडायचे. त्यानं स्वतःचं हिंदू राष्ट्र म्हणून समाचारपत्रही काढलं होतं. त्याला लेखनात फारक आनंद वाटायचा. त्याचे विचार वेगवेगळ्या वर्तमानपत्रात छापले जात होते.

त्याला जर महात्मा गांधी आवडायचे. मग त्यानं म. गांधींची हत्या का केली?हा प्रश्न संभ्रम निर्माण करणारा आहे. त्याच्या मतानुसार म. गांधींनी देशाचे दोन गटात विभाजन करणे ही त्याला न आवडणारी गोष्ट होती. त्याच्या मतानुसार ह्या भारत पाकिस्तान विभाजनाने कोट्यवधी लोकांच्या ह्रृदयावर घाव झाले होते. तसेच गांधीजी हे मुसलमानांना खुश करीत आहेत. असे त्याला वाटत होते. त्यांना हिंदूंच्या भावनांची पर्वा नसून ते फक्त मुस्लीमांचं हित पाहात आहेत असं त्याला वाटत होतं. एवढंच नाही तर पाकिस्तानला पंचावन कोटी रुपये देणे हा निर्णय काँग्रेसनं बदलवला होता. पण गांधींजीनं ते मुस्लिमांना द्यावे म्हणून उपोषण करण्याची धमकी दिली.

म. गांधींचे हे विभाजनाचे पाऊल गोडसेला त्रस्त करणारे पाऊल वाटले. शेवटी त्याला वाटलं की ह्या पावलानं भारतमातेला वेदना होत आहेत. म्हणून त्यानं महात्मा गांधीला मारले. त्यालाही दि. १५ नोव्हेंबर १९४९ ला अंबाला कारागृहात फाशी देण्यात आली. मरतासमयी त्याचं बयाण घेण्यात आलं. त्यात नाथुरामनं म्हटलं की माझी अस्थीरक्षा तेव्हापर्यंत सांभाळून ठेवा. जेव्हापर्यंत भारत पाकिस्तान एक होवून सिंधू नदी भारतातून वाहणार नाही. माझी भारतमाता आज दोन तुकड्यात विभाजीत आहे. जेव्हा ही भारतमाता अखंड होईल. तेव्हाच माझी अस्थीरक्षा त्या सिंधू नदीत शिरवावी. भारत पाकिस्तान कधी ना कधी एक होईलच. त्याचं नाव हिंदुस्तान असेल. ते बोल... ... . जोपर्यंत हा भारत पाकिस्तान वाद मिटणार नाही. तोपर्यंत त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही असे होते.

युसूफलाही भारत पाकिस्तान फाळणी आवडत नव्हती. तो आता मोठा झाला होता. त्याचबरोबर झरीनाही. झरीना शिकली नव्हती. पण तिनं अति परीश्रम घेवून भावाला शिकवलं होतं. लहानाचं मोठं केलं होतं.

पाकिस्तान वेगळा झाला होता. सारे संस्थान विलीन झाले होते. निर्वासीतांचा प्रश्न मिटला होता. पण आजही भारत पाकिस्तान वाद सुरुच होता. कधी काश्मीरवरुन भांडणं तर कधी द्वेषावरुन भांडणं सुरुच होती.

आज युसूफला भारत आवडत होता. त्याला पाकिस्तान आवडत नव्हता. जरी पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र असले तरी... ..... कारण मायबापाच्या मरणानंतर त्याला याच देशातल्या हिंदूंनी सहारा दिला होता. नव्हे तर याच मातृभूमीनं पोट जागवलं होतं. कधी त्याला मायबापाची आठवण यायची. तेव्हा तो या धरणी मातेच्या चरणी नतमस्तक व्हायचा. तिलाच आपले मायबाप समजायचा व ती माती कपाळाला लावायचा. मग गहिवरुन यायचं. तेव्हा सहजच ह्रृदयातून शब्द फुटायचे व तो म्हणायचा, 'भारत माता की जय' तेव्हा त्याला अगदी हलकं वाटायचं. तसा त्याला विभाजनाचा व स्थलांतराचा रागही यायचा. कारण याच स्थलांतरानं त्याचे मायबाप हिरावले होते.

युसूफ आज नेता बनला होता. तो देशाच्या राजकारणात सक्रीय झाला होता. त्याला वेळ मिळत नव्हता. त्यानं आपल्या नेतेपणानं देशातील सा-या समस्या दूर केल्या होत्या. सीमावादाचे प्रश्न मार्गी लावले होते. आतंकवाद्यांचा बंदोबस्त केला होता. पण तरीही जेव्हा सीमेवर गोळीबार व्हायचे. तेव्हा मात्र त्याला विचार यायचा की काश! भारत पाकिस्तान बनला नसता तर बरं झालं असतं. मग हताश होवून तो एकटक पाहात बसायचा त्या बापाच्या फोटोकडे ज्याने भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा केली नव्हती. लढला होता. तरीही याच भारतीय लोकांनी त्याचीही हत्या केली होती. त्यांचं कार्य विचारात न घेता... ...

मोहम्मद मरण पावला होता. नव्हे तर याच देशासाठी त्यानं स्वातंत्र्यापुर्वी कार्य करुनही आंदोलनकर्त्या लोकांनी त्याला मारुन टाकलं होतं. तो निरपराध होता. त्याचबरोबर निरपराध असलेल्या त्याच्या पत्नीला म्हणजेच शफिनालाही मारून टाकलं होतं. त्यांनाही लहान मुलं आहेत. ती कुठे जातील? कशी राहतील? याची चिंता न करता... ..... ते यमदूतच होते की काय असे वाटत होते.

पाकिस्तान बनवला खरा. पण असा निरपराध लोकांचा जीव घेवून ही गोष्ट युसूफला पाहावली जात नव्हती. कारण त्या पाकिस्तानच्या निर्मीतीच्या निमित्यानं त्याच्या मायबापासारख्या शेकडो लोकांच्या प्राणांचे बळी गेले होते.

पाकिस्तानची भूक खुप मोठी होती. त्या पाकिस्तानला एवढा सगळा भुभाग मिळूनही त्याला अजून भारताकडून भुमी हवीच होती. अशातच काश्मीरच्या भागावर ते हक्क दाखवीत होते.

काश्मीरचा प्रश्न ब-याच वर्षापासून रेंगाळत होता. या भागात नेहमी पाकिस्तान हमले करीत होता. नेहमी कोणत्या ना कोणत्या निमित्याने या काश्मीर भागात भारत पाकिस्तान सीमारेषेवर चकमकी चालत असत. दरवर्षी शेकडो सैनिक गोळीबारात मृत्यूमुखी पडत असत. पाकिस्तानला त्या सैनिक मरण्याचा पश्चाताप नव्हता. कारण ते बीजच तसं पेरत होते असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.

त्या देशात कुटूंबनियोजनाला पाहिजे तेवढा वाव नव्हता. शिक्षणाचा अभाव होता. त्यामुळं कुटूंबनियोजन पाहिजे त्या स्वरुपात समजत नव्हतं. ते मुलं पैदावारला अल्लाची देण समजत असत. तर स्रीयांनाही पाहिजे त्या प्रमाणात वाव नव्हता. त्यामुळं स्रीया मुलं निर्माण करण्याची मशीन असल्यागत एका एका कुटूंबात दोन पेक्षा कितीतरी जास्त मुलं पैदा करीत. त्यातच पत्नी करण्याचं बंधन नव्हतं. एका एका माणसाला त्याने इच्छा केल्या तेवढ्या पत्नी बनवता येत असे. त्यामुळं साहजिकच एक मुलगा युद्धात प्रत्येक घरातील जात असे. त्यामुळे त्यांचे युद्धात सैनिक मरण पावले तरी पाकिस्तान त्या गोष्टीची तमा बाळगत नसे. पण भारताची मात्र स्थिती याउलट होती. लोक लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत तेवढे सुशिक्षीत होते. आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण व्हावं. सर्वांना पुरेपूर खायला मिळावं. हा उद्देश ठेवून भारतातील लोकं वागत होते. ते स्वतः पुढाकार घेवून कुटूंबनियोजनाच्या शस्रक्रिया करुन घेत असत. बहुतेकांना एक किंवा दोनच मुले असायची. त्यामुळं सैनिक भरतीसाठी मुलं द्यायला ते मागंपुढं पाहात असत.

भारतात लोकं शिक्षणावर जास्त भर देत होते. इथं सर्वात जास्त पैसे शिक्षणावर खर्च होत असे. ते सुशिक्षीत होते. कुटूंबनियोजनात सर्वात पुढे असलेला भारत पण याही देशात लोकसंख्या वाढतच होती. कारण जेवढी या देशातील जनता शिकली होती. तेवढीच काही मंडळी अशिक्षीतही होती. ती मंडळी कुटूंबनियोजन पाळत नसत. तर कितीतरी मुलं पैदा करीत असत. मात्र सैन्यात भर्ती करते वेळी माझ्या पोटचा मुलगा युद्धात मारला जाईल असा विचार करुन ते त्या मुलांना युद्धात पाठवत नसत.

आज देशात बेरोजगारी वाढली होती. त्यामुळं साहजिकच लोकांना काम मिळत नव्हतं. सैनिकांचेही वेतन वाढले होते. त्यामुळं साहजिकच आज लोकं सैनिक भर्तीकडं आकर्षित झाले होते. सैनिक भर्तीकडं आकर्षित होण्याचं अजून एक कारण होतं. ते म्हणजे आता पाहिजे त्या प्रमाणात युद्ध होत नसत.