चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची...

(79)
  • 76.1k
  • 3
  • 32.8k

(नमस्कार, रसिक वाचकहो...! चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... ही माझी पहिली वहिली प्रेमकथा आहे . या कथेत शालेय वयीन मुलीला पहिल्यांदाच प्रेम ही संज्ञा समजू लागते. शाळेतील कोवळ्या वयात झालेल्या प्रेमाची सुरेख अशी ही कथा आहे. प्रेम म्हणजे काय? त्याची चाहूल कशी लागते ? या साऱ्या गोष्टी नकळतपणे तिला उमजतात आणि प्रेमाची परिभाषा तिला कळू लागते. आशा आहे तुम्हा सगळ्यांना ही कथा नक्की आवडेल.)

1

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - १)

शाळा सुटण्याची घंटा झाली. मुग्धा अगदी पळतच घराच्या दिशेने निघाली. रोज मैत्रिणींसोबत गप्पागोष्टी करत घरी जाणारी मुग्धा आज अचानक काहीच न सांगता निघाली म्हणून सगळ्या मैत्रिणी तिच्यावर खूप रागावल्या होत्या. पण मुग्धाने आज कोणाचाही विचार केला नाही, त्याला कारणही तसेच होते... मासिक पाळी !!! चौदा वर्षांची मुग्धा नववीमध्येच होती. कोवळंच वय ते ! इतिहासाचा तास सुरूच होता आणि अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले. आपल्यासोबत पहिल्यांदाच असे काहीतरी होत आहे, असे तिला जाणवू लागले. त्यामुळे जशी शेवटच्या तासाची घंटा झाली तशी तिने धूम ठोकली. घरी पोहचल्यावर तिने घडलेला सारा प्रकार आईला सांगितला. आईने मागून पुढून मुग्धाला अगदी नीट ...अजून वाचा

2

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - २)

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि पुन्हा शाळा सुरु झाली. तिसरा तास ऑफ असल्यामुळे वर्गातील सगळी मुले आज मैदानावर खेळत होती. आपल्या मैत्रीणींसोबत दिवाळीच्या सुट्टीतील गमतीजमती सांगत होती. त्यांच्या गप्पा अधिकच रंगल्या होत्या. तितक्यात मुग्धा त्या तरुणाला पुन्हा बघते. तो अजूनही फक्त तिलाच बघत असल्याचे तिला कळते. मुग्धा तिची खास मैत्रिण स्नेहलला हळूच इशाऱ्याने त्या मुलाकडे खुणावते. स्नेहलचे त्याच्याकडे लक्ष जाताच तो मुलगा गांगरून तिथून निघून जातो. टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने त्या दोघी (मुग्धा आणि स्नेहल) मैत्रिणींच्या ग्रुप मधून बाहेर निघतात. मुग्धा घडलेला सगळा प्रकार स्नेहलला सांगते. "मुग्धा, अंग हा तर हर्ष !" स्नेहल म्हणाली."काय !! तू या मुलाला ओळखतेस ? " मुग्धा ...अजून वाचा

3

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ३)

आज मुग्धाला शाळेत जायला थोडा उशीरच झाला. तिच्या सगळ्या मैत्रिणी पुढे निघून गेल्या. ती घरातून बाहेर पडली आणि एकटीच दिशेने निघाली. थोड्याच अंतरावर पोहचताच नेमका हर्ष त्याच्या बिल्डिंग मधून बाहेर आला. मुग्धाचे अचानक लक्ष गेले आणि दोघांची नजरानजर झाली. दोघांमध्ये फक्त एक - दोन फुटाचे अंतर असल्यामुळे एकमेकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट दिसत होते. त्याला पाहताच मुग्धाच्या तोंडावर बारा वाजले तर तिला इतक्या जवळून पाहता आले म्हणून हर्षचा चेहरा खुलला होता. तिला न्याहाळून हर्ष मान खाली घालून शाळेच्या दिशेने निघून गेला. पण मुग्धा मात्र तिथेच स्तब्ध उभी राहिली. काही अंतरावर तो पुढे गेल्याची खात्री झाल्यावर मुग्धा पुन्हा चालू लागली. चालताना ...अजून वाचा

4

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची… (भाग - ४)

आज मुग्धाला खूपच अस्वस्थ वाटत होते. तिला सतत हर्षचे शब्द आठवत होते. आताच कुठे त्या दोघांच्या मैत्रीला छान सुरुवात होती. तिला त्या दोघांची मैत्री खूप आवडायला लागली होती. पण हर्ष मधेच असं काही तिला बोलेल याचा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. मुग्धाला शाळेत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण परीक्षा लवकरच सुरु होणार असल्याने तिला अभ्यासाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नव्हते. म्हणून नाईलाजाने ती शाळेत जाण्यास निघाली. तर इकडे हर्षचीही अवस्था फार काही वेगळी नव्हती. मुग्धाच्या नकारामुळे तो पूर्ण खचला. त्याला खूप उदास वाटायला लागले. घडलेल्या प्रकारामुळे मुग्धा आता कधी त्याच्याशी बोलेल कि नाही याची त्याला भीती वाटू लागली. आपण मुग्धाला ...अजून वाचा

5

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ५)

(नमस्कार रसिक वाचकहो!!! सर्वप्रथम माझ्या कथेला छान प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच ज्या वाचकांनी वेळात वेळ काढून प्रतिक्रिया केल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. अशीच साथ कायम असु द्या. काही तांत्रिक कारणामुळे गेल्या शनिवारी कथेचा भाग प्रकाशित करू शकले नाही त्यामुळे क्षमस्व.)बघता बघता दहावीची परीक्षा दोन दिवसांवर आली. हर्षने स्वतःला अभ्यासात पूर्ण झोकून दिले. दिवसरात्र तो फक्त आणि फक्त अभ्यास करू लागला. केवळ विरंगुळा म्हणून पाच - दहा मिनिटांसाठी तो बाहेर फेर फटका मारून यायचा. तर इकडे मुग्धाची स्तिथी फार बैचेन होऊ लागली. तिला केवळ एकच प्रश्न सतावत होता "हर्षने मला बघूनही न बघितल्यासारखे का केले ?" शाळेत जाताना, ...अजून वाचा

6

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ६)

घराच्या दिशेने जाताना अचानक मुग्धाची पाऊले थांबली. हृदयाची जलद गतीने होणारी धडधड तिला तीव्रपणे जाणवू लागली. जणू हर्ष इथेच जवळपास आहे, असे तिचे मन तिला सांगू लागले. खरंतर असे का होत आहे, याचे उत्तर तिच्याकडेही नव्हते. पण मनातील शंका दूर करण्यासाठी तिचे डोळे मात्र चोहीकडे भिरभिरू लागले. ती हर्षला शोधू लागली. जसजशी ती एक एक पाऊल पुढे टाकत होती तसतशी हृदयाची धडधड तीव्र होऊ लागली. थोड्याच अंतरावर गेल्यावर तिला दोन चार मुलांची उन्हात पडलेली सावली दिसली. ती अगदी निरखून त्या सावलीकडे पाहू लागली आणि अचानक घाबरून तिने तिची पाऊले मागे घेतली. हो. ती तीच सावली होती ज्याची तिला अपेक्षा ...अजून वाचा

7

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ७)

(नमस्कार, रसिक वाचकहो...!साहित्य क्षेत्रातील "चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची" ही माझी पहिलीच प्रेमकथा आहे. आज खूप दिवसांनी अर्धवट राहिलेली कथा पुन्हा लिहायला सुरुवात करत असल्यामुळे मनात भीती, खूप साऱ्या शंका आहेतच शिवाय तुम्हा सगळ्यांना कथा आवडेल कि नाही, याचा ही थोडाफार ताण आहे. कथेची पुन्हा सुरुवात करणे माझ्यासाठी खरच सोप्पं नाही आहे. तरीही प्रामाणिकपणे मी प्रयत्न करत आहे आणि मनातील कथा शब्दांमध्ये उतरवण्याचा पुरेपूर संघर्ष करत आहे. काही चूक भूल झाली असल्यास क्षमा करावी. आणि तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया आणि रेटिंग्सने माझा उत्साह वाढवावा ही नम्रविनंती. धन्यवाद!!!)बघता बघता दहावीची परीक्षा संपली तर एकीकडे नववीची परीक्षा तोंडावर आली. मुग्धाच्या मनात मात्र ...अजून वाचा

8

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ८)

प्रेमाचे वर्णन करावे कसेजणू सप्तसुरांतील सूर भासेव्यक्त न करण्याजोगे सख्या, तुझे अन् माझे हे प्रेम असे 'प्रेम' ही भावनाच खूप अल्लड असते. प्रेमात बेधुंद होऊन कधी नाचावेसे वाटते तर कधी लहान मूल होऊन आनंदाने बागडावेसे वाटते. कधी मन थोडं खट्याळ होत खोड्या करते तर कधी कधी आवडीच्या व्यक्तीवर रुसूनही बसते. कधी मन समजूतदार होते तर कधी त्याच व्यक्तीवर रागावते. कधी आपल्याला हसवते तर कधी दुःखाच्या खोल दरीत ढकलते. कधी त्या व्यक्तीच्या सतत जवळ राहावेसे वाटते तर कधी त्याच्या सुखासाठी आपल्याला आपोआप दूर करते. असं म्हणतात प्रेम आंधळं असतं. प्रेमात काय चूक - काय बरोबर , काय चांगलं - काय ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय