अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी

(50)
  • 78.6k
  • 89
  • 37.5k

अ सब्जेक्ट ऑफ रिवोल्युशन             खूप दिवस झाले मिस्टर वाघला भेटून. त्याच्या घरी जाण्याची माझी काही हिंमत होत नाही (कशी होईल? हा घरात विषारी साप पाळतो). तोच येतो अधून मधून माझ्याकडे. पण बरेच दिवस तो माझ्या घराकडे फिरकलाच नाही. पण काल येऊन गेला.            ते एक बरे आहे, की आई घरी नसतानाच हा येतो. नाही तर माझे अशा माणसाशी संबंध आहेत म्हंटल्यावर तिला खूप धक्का बसेल, काळजीत पडेल ती... ही मला वाटणारी भीती त्याला जाणवली असावी कदाचित. म्हणूनच तो कधी आई असताना येत नाही, पण तसे त्याने कधी स्पष्ट सांगितले नाही. ब्लॅक ब्लेझर,

Full Novel

1

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी

अ सब्जेक्ट ऑफ रिवोल्युशन खूप दिवस झाले मिस्टर वाघला भेटून. त्याच्या घरी जाण्याची माझी हिंमत होत नाही (कशी होईल? हा घरात विषारी साप पाळतो). तोच येतो अधून मधून माझ्याकडे. पण बरेच दिवस तो माझ्या घराकडे फिरकलाच नाही. पण काल येऊन गेला. ते एक बरे आहे, की आई घरी नसतानाच हा येतो. नाही तर माझे अशा माणसाशी संबंध आहेत म्हंटल्यावर तिला खूप धक्का बसेल, काळजीत पडेल ती... ही मला वाटणारी भीती त्याला जाणवली असावी कदाचित. म्हणूनच तो कधी आई असताना येत नाही, पण तसे त्याने कधी स्पष्ट सांगितले नाही. ब्लॅक ब्लेझर, ...अजून वाचा

2

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 2

बाबाराव देसाई फ्रीडम फायटर आणि सक्रिय समाजसेवक होते. यामुळे त्यांचे खूप लोकांशी संबंधही यायचे. त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात काही नाही. नवखा ऑफिसर मध्येच बोलून गेला तसा मिस्टर वाघने त्याला एक जळजळीत कटाक्ष टाकला. मिस्टर वाघचे म्हणणे धुडकावण्याची हिंमत कोणी करत नाही, जरी ते कोणाला पटले नाही तरी. आणि हे या नवीन ऑफिसरला माहीत नव्हते. मिस्टर वाघचे त्याच्याकडे असे पाहणे कमिशनरच्या लक्षात आले आणि त्याने दटावून त्या ऑफिसरला गप्प केले. नवीन खाडे, जरा शांत बसा. मिस्टर विजय वाघ कधीच चुकत नाहीत. पण सर मी फक्त त्यांच्या तर्कांतील कमजोर दुवा सांगितला. बाबाराव देसाई स्वातंत्र्य सेनानी व समाजसेवक जरी नसते, एक साधारण व्यक्ती असते, तरी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने भेटायला बोलावणे इतके काही अवघड नाही... ...अजून वाचा

3

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 3 - अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी

चेसिंग दि फॅमिली त्यांनंतर पुढचे काही दिवस मिस्टर वाघ बाबाराव देसाई यांच्या कुटुंब पाठलाग करू लागला. कधी त्यांच्याशी भेटून चौकशी करायचा. बाबाराव गेली ७ - ८ वर्षे त्यांच्या नातीच्या मुलीकडे प्रभाकडे राहायचे. परिस्थिती खूपच गरीब. प्रभाचा नवरा शेखर एमआयडीसीतील एका फौंड्रीवर कामाला होता. फौंड्रीचा मालक दहादहा - बाराबारा तास काम करून घेऊन कधी कधी ओव्हर नाईटही राबवून घ्यायचा. पण पगार मात्र कधीच वेळेवर नाही. दिला, तर तो ही तुटपुंजा. हे आधीच त्रिकोणी कुटुंब प्रभा, शेखर आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी संस्कृती. कुटुंब ...अजून वाचा

4

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 4

फ्यू मोअर डेथ्स् मध्यरात्री कधी तरी विरेन मरण पावला होता. आता हे प्रकरण जास्तच चिघळत जात होते. म्हणून कार्तिकने निर्णय घेतला, की विरेनची पोस्टमार्टम इथेच डेंटल हॉस्पिटलमध्ये होईल. त्याला जॉ सर्जरी साठी इथे आणण्यात आले होते. शुद्धीवर आल्यावर र्मालाही इथेच आणले गेले होते. चीफ सर्जन, डीन, चेअरमन, हॉस्पिटल ओनर सर्वांनीनी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना दटावून, धमकी देऊन, भीती घालून गप्प केले गेले. त्यांनाही शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हताच. कारण त्यांनी जास्तच आडवे लावले असते, तर त्यांची ओथेरिटी किंवा लायसेन्स कॅन्सल होण्याची भीती होतीच. शेवटी युद्ध पातळीवर हे प्रकरण हाताळले जात होते. आणि पंतप्रधानांपासून मुख्यमंत्रींपर्यंत सर्वच यात लक्ष ...अजून वाचा

5

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 5

द सस्पेक्ट्नवीन एका व्यक्तीला एका मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये भेटला. तोही त्याच्या सोबत गाडीतच बसलेला होता. काचा बंद.'काही अपडेट्स?' त्याने काहीच नाही. पण मला त्या विजय वाघवर मला खूप दाट संशय आहे.''तसा मला पण आहे. पण तो केस बाबत जास्त सिरीयस नाही. त्यामुळे मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीये.''त्याचे या केस बाबत सिरीयस नसणे हेच तर चिंतेचे कारण आहे. तो पहिल्या पासून ऑफिशियली या केसमध्ये इनवॉल्व्ह आहे. तरी तो इतका निष्काळजी कसा काय आहे? इजन्ट इट सस्पिशियस?''गेस यू आर राईट! नजर ठेव त्याच्यावर!''येस सर!'पण यांना हे कुठे माहीत होते, की मिस्टर वाघच त्यांच्यावर नजर ठेवून होता."एक मिनिट! म्हणजे हा नवीन ...अजून वाचा

6

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 6

डिगिंग् अप्आतापर्यंत मृत झालेल्या सर्व लोकांच्या अटॉप्सीज् होऊनही त्यांच्या बॉडीज् त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आल्या नव्हत्या. ही लोकं जोडलीच होतीत अशा कॉन्स्पिरसी सोबत, की त्यांना जावू देणे कोणालाच हितावह नव्हते. बाबाराव देसाईंच्या ऐवजी कोणी दुसरी व्यक्ती असती, तर कोणीच त्याला इतके सिरियस्ली घेतले नसते. पण बाबाराव यांचा समाजावर एक प्रभाव होता. लोक त्यांना आदर्श मानायचे. त्यांच्या अशा प्रकारे जाण्याने जनसमुदाय खवळला होता. त्यामुळे ही केस लवकरात लवकर मार्गी लावण्याकडेच सर्वांचे लक्ष होते. पण ते काही केल्या होत नव्हते. दरवेळी कोणा नवीनच व्यक्तीचा खून व्हायचा आणि या प्रकरणाला फाटे फुटायचे व मूळ तपासाला बगल व्हायची. त्यामुळे ...अजून वाचा

7

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 7

डेव्हिल्सेस् गेट - टुगेदरऑल डेव्हिल्स व्हेअर गॅदर्ड ऑन द सेम टेबल अगेंस्ड मिस्टर वाघ! पण याचा खरंच काही उपयोग होता का?...'मला अगदी पहिल्यापासून त्या वाघवर संशय आहे. जिथे - जिथे गुन्हा घडलेला असतो, तिथे - तिथे हा आधीच हजर असतो!' नवीनने बोलायला सुरुवात केली.'मीही सहमत आहे. त्याने नेलेल्या इलेक्ट्रोड्सचा रिपोर्ट क्लिअर आलाय.' वरुण बोलला.'सॉरी टू से. मी ऑफेन्ससाठी बोलत नाही, पण तो तसा तुम्ही नेलेल्या लेक्ट्रोड्सचाही आला आहेच ना? शंका नको म्हणून विचारतोय.' कार्तिक बोलला.'पण त्याने तेथील इतक्या वस्तू सोडून इलेक्ट्रोड्सच का उचलावीत? शंकेला जागा आहे, की नाही?' वरुणने त्याचा तर्क सांगितला,'त्याला त्याबद्दल आधीच काही माहीत होते का? त्याचे ...अजून वाचा

8

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 8

दि लास्ट मूव्ह्किती दिवस झाले बाबाराव देसाईंची केस चालू आहे याची गणती नव्हती. आणखी किती दिवस चालू राहील याचा नव्हता... तशात हे आणखी... मरून पडलेल्या व्यक्तीच्या पोटात सूरा खुसून खून केला गेला होता. बाबारावांच्या मरणानंतर इतक्या दिवसांत नवीनने पहिल्यांदाच एवढी साधारण मर्डरची केस पहिली होती. ही केस जाता - जाता सॉल्व्ह होईल अशी त्याला आशा होती... पंचनामा झाला. डेडबॉडी हलवण्यात आली. पोस्टमार्टम करण्यासारखे काही नव्हते. तरी अटॉप्सी ऑपरेट करण्यात आली. काही विषेश सापडले नाही. खून सूरा खुपसूनच झाला होता. ७.२५ इंच खोल व ...अजून वाचा

9

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 9

एन एन्काऊंटर विथ द डेथ गॉड् 'वाघ जाऊन मध्ये दोन तीन दिवस गेलेत. पण कशातच मन लागत नाहीये...'मी मिस्टर वाघने सांगितलेली ही घटना लिहून काढत होतो...'त्याने या लोकांना का मारले हा प्रश्न अनुत्तरीतच होता. शिवाय ते गिल्टी होते म्हणजे नक्की काय? असा काय त्या सगळ्यांनी गुन्हा केला होता, की मिस्टर वाघने इतके मोठे हत्याकांड रचले? आणि कसे? नवीन, कार्तिक, वरुण सगळे त्याच्यावर नजर ठेवून होते. त्यांच्याकडे फिट केलेल्या ट्रान्समीटर्सचे काय? त्याने हे कसे जुळवून आणले? आणि माऊसर...''शॅ! काहीच टोटल लागत नाही! मी जीभ आवरायला हवी होती. तो नाराज झाला आणि ...अजून वाचा

10

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 10

"मग प्रभा यांचे काय झाले?""शी वॉज फौंड डेड इन हर हाऊस!""त्या गोळीत असं काय मिक्स केलं होते?""मण्यारचे विष!""ती मेल्याच कोणी पोलिसात नाही गेलं?"तो हसला,"जायला शिल्लक कोण होतं? शेजारच्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले.""आणि पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलेच असते तर?""तर काय? त्यांना काहीच सापडले नसते. अटॉप्सी रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू बंगारस केरुलेअस म्हणजे मण्यारच्या न्यूरोटॉक्सिक पॉइसनमुळे झाल्याचे आढळले असते."तुला माहिती आहे, मण्यारच्या विषाने किती भयंकर मृत्यू येतो ते! तहान लागते, पोटदुखी, श्वसनाचा त्रास होतो. काही वेळाने रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन प्रणाली बंद पडून मृत्यू होतो."हे ऐकून माझ्या अंगावर तर काटा उभा राहिला. पण अजून काही प्रश्न मनात झुरत होते..."रवी ...अजून वाचा

11

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 11

दि रॅवेलेशन ऑफ द ट्रूथआता तुझ्या मगासच्या प्रश्नाचे उत्तर, की मी रवी पवार, मोहन पाटील आणि शेखरच्या न्यूरॉलॉजिस्टला खोट्या रिपोर्ट्स द्यायला कसे भाग पाडले. त्यांना कसे कॉन्टॅक्ट्स केले; तर ते काम समर नकातेचे!" त्याने आणखी एक बॉम्ब फोडला.'बास!!!' माझा मेंदू ओरडत होता...हे सगळं सहन होण्यापलिकडचे होते. पण मला गप्प बसवत नव्हतं."म्हणजे समर नकाते तुमच्यासाठी काम करत होता?""नाही. तो त्याचे काम घेऊन माझ्याकडे आलेला.""कसलं?""शक्ती शुक्लाला संपवण्याचं!""ते कसं?""मी एका वेगळ्या केसवर काम करत होतो. त्यावेळी समर एक समाजसेवक म्हणून पोलिसांकडे आला होता. त्या केसमध्ये वापरली गेलेली '३१५ बोअर देसी कट्टा' ही गन शक्ती शुक्लाने ...अजून वाचा

12

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 12

फायनली ट्रूथ वॉज् रिविल्ड्दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये, निकम फौंड्रीचे मालक सुशांत निकम हे 'घोणस' या अत्यंत विषारी जातीचा साप घरी मृत आढळले... या मथळ्याची ही भली मोठी बातमी. मी समजून चुकलो. काल मिस्टर वाघने माझ्यासमोरून जी पेटी नेली, त्यात 'घोणस' होती...! अजूनही बरीच प्रश्न अनुत्तरीत होते. एक तर त्याने बाबाराव देसाईंना का मारले? ते तर समाजासाठी काम करायचे. त्यांनी कोणता गुन्हाही केला नव्हता. दोन, त्यांच्या नातेवाईकांचे काय अपराध होते, की त्याने एवढे मोठे हत्याकांड घडवून आणले. आणि तीन म्हणजे बाबारावांवर चालवलेली माऊसर समर नकातेकडे सापडली. त्याच्याकडील ...अजून वाचा

13

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 13

रात्रीची ९:१७ ची वेळ. पार्क रिकामे होते. बाबाराव पार्कच्या मध्यभागी घनदाट झाडीत कोणाची तरी वाट बघत थंडगार बाकावर बसले थोड्या वेळाने एक व्यक्ती तेथे आली. झाडी पार करून एक मंद प्रकाश झोत त्या व्यक्तीवर पडला. आलात तुम्ही विजय वाघ! बाबारावांनी वर पाहत तो मिस्टर वाघ असल्याची खात्री करून घेण्यासाठी विचारले. होय सर. मीच आहे! बोला ना काय काम होतं? मी तुमचं खूप नांव ऐकून आहे. सामाजिक कार्य करत असताना अनेकदा पोलिसांशी संबंध येतो. सगळ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपल्याच नांवाची चर्चा ...अजून वाचा

14

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 14

'उपहास बघ. एकेकाळचा इतका श्रीमंत माणूस आज त्यांच्यावर ही वेळ यावी?! बाबाराव देसाईंसारखा धाडसी, महान आणि समाजाला आदर्श असणारा आत्महत्येला प्रवृत्त व्हावा ही गोष्ट जर समाजाला कळली असती, तर त्यांच्या प्रतिमेला तडा गेला असता. म्हणून मी माझे निर्दोषत्व सिद्ध करणारी ती चिठ्ठी नाहीशी केली. आणि म्हणूनच मला हा सारा प्रपंच रचावा लागला. हा एक एवढा मोठा खेळ...'एका व्यक्तीचा स्वाभिमान टिकवण्यासाठी याने संपूर्ण देश ढवळून काढला होता...'बाबारावांच्या नातेवाईकांचा इतका मोठा काय गुन्हा होता, की मी या सगळ्यांना मारले असे तुला वाटते होय ना? 'एका म्हाताऱ्याला सांभाळणे या लोकांना इतके जड झाले होते, की त्या म्हाताऱ्याला मरणाची इच्छा व्हावी?'हे असे लोक जगत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय