धर्म, जात, रंग आणि ह्यात फसलेली मैत्री अगदी जिवाभावाची तिला कशाचीही झळ नाही. एक अतूट मैत्रीचं नात नात्यात बांधलेल्या प्रेमाची अतूट गाठ कॉलेज जीवनानंतर मैत्रीच्या रिग्नातुन बाहेर पडलेल्या मित्रांना बांधून ठेवणारी दुवा ठरते . संकताट एक दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारे हात . लग्नानंतर इथला प्रत्येक झण एक दुसऱ्याला समजून न घेता संशयाच्या ओझ्याखाली जगत असतो . पण काही तरी ह्या नात्यात दडलेलं लपलेलं असते ते एक दुसऱ्यासाठी जगत असतात .
Full Novel
लाईफझोन ( भाग -1)
रेवाने मलाच मेल करून का कळवलं असेल हे . मी तिच्या खूप दूर राहते म्हणून की खूप जवळची मैत्रीण म्हणून . कामाच्या व्यापात किती दिवस झाले ना ! जवळ जवळ पाच सहा महिने लोटलेत बोलणं झालं नाही आणि रेवा तिनेही आपल्याला कॉल करून विचारलं नाही ह्याच काळात काही घडलं असावं . तेव्हाच तिने असा टोकाचा निर्णय घेतला . मी अनुरागला कॉल करून विचारते . नाही नको उगाच त्याला विचारलं तर तो म्हणेल तुला सांगून तिने मला फसवायचा कट रचला आणि आत्महत्या केली . पण , ती कुठे आहे कसं माहिती करायचं जावं तर मला त्याच्याच घरी लागणार आहे . त्याला कॉल करेल तेव्हाच मी त्याचा घरी पोहचूशकेल ती त्याच्या घरी असावी की काकूंकडे त्यांना रेवा बद्दल माहिती नसणार तर उगाच टेंशन घेतील . ...अजून वाचा
लाईफझोन ( भाग - 2)
सुट्टी झाल्यानंतर तो घरीजाताना उंच डोंगराची सैर करून आणत होता . आकाशात मुक्त विहार करणारे पक्षी तो वर मान निरखून बघायचा . उंच गगनचुंबी भरारी घेणाऱ्या पक्षाचा त्यालावेध होता . अभय डॅन ह्या दोघांची सतत आपसात कुजबुज व्हायची एखाद्या शुल्क कारणावरून ते चिडत असायचे तेव्हा प्रद्युमन त्यांना समज घालून देत मैत्रीने राहायचं सांगत होता . अभय तसा स्वभावाला नम्र होता डॅन त्याची मस्करी करायचा तेच त्याला आवडत नव्हते .केतकी माझी खूप जिवलग मैत्रीण होती बालपणापासून मॉमने सांगितलं होतं आमचा दोघीचा जन्मही एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच वॉर्डात एकाच दिवशी झाला ह्याचे मलाएखाद्या चमत्कारापेक्षाही अप्रूप वाटते .सँडी ही ...अजून वाचा
लाईफझोन ( भाग - 3)
प्रद्युमनचा स्वभाव मला कधी उलगडला नाही . त्याच वागणं मला दुर्लक्षीत वाटायचं . कधी त्याच चर्च मध्ये सँडी जाणं आणि तिथे जाऊन सुरेल संगीतात सहभागी होणं . तर कधी प्रत्यक्षात चर्चमध्ये तो स्वतःच संगीत सादर करीत असे . जेव्हा प्रद्युमन माऊथ ऑर्गन वाजवायचा तेव्हा चर्च मध्ये उपस्थित सर्व मंडळी मन एकाग्र करून प्रद्युमनच्या वाजवण्याकडे लक्ष केंद्रीत करून ऐकायची . एकदा सँडी कडून मी त्याची स्तुती ऐकली आणि मला राहवलं नाही म्हणून मी तिला म्हणाली , " मला पण प्रद्युमनच संगीत ऐकायला चर्च मध्ये घेऊन ...अजून वाचा
लाईफझोन ( भाग -4)
सँडी जवळ जवळ महिन्याभऱ्यानंतर परतली . मला तुम्हाला आज भेटायचं आहे वेळ ठिकाण माहिती नाही पण , भेटणं खूप आहे काहीतरी संगायच तिला रडवलेल्या स्वरात ती बोलतं होती असं अभय मला कॉल करून बोलला . ब्नॉर्मनच्या बेटा शेजारी आम्ही सारे जमलो . सँडीला यायला उशीर होतो आहे ह्याची अप्रत्यक्ष कणव लागतच डॅन म्हणाला , " काही तरी भयाण घडलं असावं असं वाटतं छे छे ! ती आज कुठे कॅलिफोर्नियावरून इंडिया मध्ये परतली आहे काही तरी आपल्यासाठीसरप्राईज असावं . " अरुंद रस्त्याकडे बघत प्रद्युमन म्हणाला , "अरे ती बघा सँडी येत आहे ...अजून वाचा
लाईफझोन (भाग -5)
कातरवेळच्या रम्य संध्याकाळी मनात निर्माण झालेल्या वादळाने मला वेडावून घेतलं . का कोण जाणे ? जीवन मरण ह्यातलं गूढ दोन दिवसाआधी रस्त्याने जाताना वाटेत आमची भेट झाली ती शेवटचीच . नैराश्याच्या गर्देत मी गुरफटून गेले होते कळतं नव्हतं धाय मोकळून आज मी कुणाजवळ रडू ?? मी ज्या मनस्थितीतुन जात आहे त्याच मनस्थितीतुन सँडी , प्रद्युमन आणि डॅन जात असावे कदाचित .... पण , आज नैराश्याने मला खूप पोखरून घेतलं असं वाटतंय दुःख आणि क्षणिक वाटायला येणारा आनंदतो आनंद की दुःखावर सांत्वन ? माझा पाठलाग कायम करणार का ही संकट ?नाही ...अजून वाचा
लाईफझोन ( भाग -6)
एड्स ..... एड्स ..... म्हणजे मृत्यूला आमंत्रण ! अभयला एड्स झाला ...... हे प्रद्युमन कडून कळताच पार हादरून गेले . पण अभय तसा नव्हता अरे कसं शक्य आहे त्याच्या सारख्या मुलाला एड्सनेग्रासले ?" काही उपचार नाही आता तो लास्ट स्टेजवर आहे जगण्याशी लढून राहिला तोतिथे . जेव्हा अभयला डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबद्दल तपासून एड्स झाले असल्याचे सांगितले , त्यावेळी त्याला झालेले दुःख नियतीचा कट म्हणून पचवून घेतले होते .कुणालाच काही दोष न देता , स्वतः च्या नशिबाला बोल न लावता अभय मला शेवटी एवढंच बोलून गेला माझे कोणत्याच मुली सोबत शारीरिक संबंध नव्हते हे माझ्या ...अजून वाचा
लाईफझोन ( भाग -7)
खूप जीव होतांना अभयचा आमच्यात . त्याच्या अंतविधीवरून येऊनहीविश्वास बसत नव्हता तो आम्हाला सोडून खूप दूर निघून गेला म्हणून मी अजूनही तो आम्हाला भेटायला येईल म्हणून वाट बघत होती ... रात्रभर मी हताश मनाने पलंगावर पडली होती . आयुष्यात पहिल्यादाच आज एवढीनिराश होती मी ... केतकीचा माझ्या हातून निसटून जाणारा हात आठवत होते . तिचा तो शेवटचा चेहरा आणि अभय रस्त्याने शेवटी जातांना ज्या दिवशी बाय म्हणतं निघून गेलेलात्याचा तो हसरा चेहरा . पूर्णपणे खचून गेली होती मी .... किती अभागी आहे मी ! जगातील सगळ्यात दुर्दैवी आहे मी ! ...अजून वाचा
लाईफझोन ( भाग -8 )
अभय शांतपणे मला समजवत होताअभयच बोलणं ऐकून माझ्याचेहऱ्यावर मंद स्मित पसरले पण अचानक त्याचा आवाज किंचित बदलला ....' निराशा वांझोटी आहे रेवा , जी कधीच फलश्रुती देत नाही ... सृजनात्मक शक्तीच्या आसपासही ती आपल्याला भरकटू देत नाही . तुझीही निराशा कळते अगं मला , मी दोन वर्षे तुम्हाला भेटायला आलेलो नाही हो ना ! अगं मी दोन वर्षे माझ्या घरचाना तरी कुठे म्हणून भेटलो मी माझ्या कार्यात पूर्णपणे गुंतलो होतो अगदी कात्रीत सापडलो होतो .मला त्यातून बाहेरही पडता येत नव्हतं .. तिथे मी पहिल्यावर्षी एका सामाजिक संस्थेलाही जॉईन झालो स्टडी आणि अनाथ मुलांना शिकवायला जाणं त्यांच्या गरजा ...अजून वाचा
लाईफझोन ( भाग -9)
निराशेच्या खाईतून बाहेर येत आम्ही स्वतः ला सावरत जगू लागलो ...अभय आमच्यातच आहे असं वाटून घेत ! त्याच्या हळव्या आठवणी ताज्या होताना हृदयात तो नसल्याची सल दाटून येते .ते हसणं बागडण शालेय जीवनापासून कॉलेजचं अर्धजीवन मैत्रीच्या दुनियेत व्याप्त झालं होतं .पक्षी जसे सकाळी घरट्यातून उडून अवकाशात भरारी घेतांना दूर दूर उडून जातात आणि काहीच क्षणात दिसेनासे होतात तेव्हा त्यांच्या मिलनाची समाप्तीही वियोगातच होते .... ते मनुष्यालाही लागू होतं !हो ...... जगणं खूप सुंदर आहे पण त्या जगण्यातला गोडवा चाखता आला तर ,प्रत्येक क्षण सुखाचा असतो ,आपण कोणत्या घटनेला कस हाताळतो तेही आपल्याच भावनांवर निर्भय ...अजून वाचा
लाईफझोन ( भाग -10)
तसं बघितलं तर आपण ह्या निसर्गाचाच घटक अहो त्या निसर्गाशी संलग्न साधायलाआपल्याला काही त्राण नाही . सकाळी रोज पहाटे उठून अर्धकाळोखात विलीन झालेल्या , चांदण्याचा पहुडलेला तो अवकाश लखलखुन टाकणारा सडा .... चंद्र आणि सोबतीला काळोख त्या प्रसंगी एवढा शुकशुकाट आणि शांतता विस्तारलेली असते . बहुतांश भविष्याची कितीतरी स्वप्न मी ह्याच प्रांगणात रोज सकाळी चारला बाहेर पडूनअवकाशाकडे वर मानेने उघड्या डोळ्यांनी बघितलेली आहे .... माझा पूर्ण विश्वास आहे ते खरेही होतात . ती हवा आपल्या बाहुपाशात एक वेगळीच ऊर्जा शक्ती आणि बळ आपल्याला देऊनजाते . एकदा करून बघा खूप आनंद होईल .... आणि हे एकदा नाही तर रोज रोज ...अजून वाचा
लाईफझोन ( भाग -11)
सर्व आपल्या आपल्या कामात व्यस्त होते . आमच्यात डॅनच लग्न लवकर झालेलं .प्रद्युमन आणि सँडीचा सध्यास लग्न करायचा काही नव्हता . प्रद्युमन तर लग्नाच्यानावाने नाकतोंडच मुरडायला लागायचा .प्रद्युमनने मानववंशशास्त्रात प ...अजून वाचा
लाईफझोन ( भाग - 12)
संध्याकाळच्या त्या कातरवेळी मी बालकनीत उभी होते . दूरवरून डॅन मला येतानादिसला . मी काही क्षणांसाठी स्तब्धच झाले . अचानक इकडे माझ्याकडे कसा ?सर्वकाही ठीक असेल ना ह्यांच्यात ?? असे एक ना अनेक प्रश्न मनात घर करून गेले .डॅन समोर आला तो आपला निरागस चेहरा घेऊनच .' काय रे काय झालं , असा चेहरा का पडलेला दिसतो ? 'तो माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन एकदम ओक्साबोक्शी रडायलाच लागला . त्याला असपहिल्यादाच मी रडतांना बघत होते .' डॅन काय झालं ? सांगशील का ? असा रडू नको अरे .... '' जिनी सोडून गेली मला ...... घटस्फोट घ्यायचं ठरवलं ...अजून वाचा