एक पाऊल दिसायचं स्वप्नात अर्ध पाण्यात अर्ध रेतीच्या किनाऱ्यात गोरी गुलाबी टाच.. अन नाजूक चंदेरी पैंजण पाण्यावर लहरत असायचं... पाण्याची लहर यायची पाऊल चढायची, अन ओसरली कि, सूर्य उगवल्यासारखी टाच उघडी टाकत तळव्याखालून वाळू ओढून न्यायची... कित्येक वर्ष ते स्वप्न मी पाहिलंय.. पण.. कधी? ती सोबत असताना.. तिने टाकलं मला तेव्हा.. तेव्हा माझ्या आयुष्यातून बाहेर पडलं ते पाऊल.. आता स्वप्नात फक्त रेतीवरचा खोल ठसा येतो.. पण तो ठसा जातानाचा दिसतोय.. परतीचा नाही.. मी वाट पाहतोय आता.. तो परतीच

1

कोंदण पर्व एक - भाग 1

समर्पण मैत्री अन प्रेमातलं.. 🍁🍁 ...अजून वाचा

2

कोंदण पर्व एक - भाग 2

सुनी तशी जगन्मित्र होती. तिच्या खूप मैत्रिणी होत्या. ती त्यांची लीडर असल्यासारखीचं वावरायची. सगळ्या तिच्या मागे मागे. त्यावेळी मुलींना वैगरे असण्याचा प्रकार तसा अपवादात्मक असायचा. मी सुनीच्या आयुष्यातला अपवाद होतो. ती माझ्याशी तितकीच मोकळी असायची जितकी एखाद्या मैत्रिणीशी. त्याचं कारण म्हणजे मला असं वाटत होतं कि, मी तिचं सगळं ऐकायचो. स्वतःची बुद्धी स्वतःसाठी फार न वापरता. तीने सांगितलेलं करण्यात खर्ची घालायचो.शिवाय घराजवळ रहात असल्यामुळे अगदी बालवाडीपासूनच आम्ही एकत्र होतो. पण मोठे होत चाललो तरीही आमच्यातल्या लिंगभेदाने आमच्या मैत्रीत कधीही दुरावा आणला नाही. उलटं तो बंध एकमेकांच्या संगतीमुळे आणखी दृढ होत गेला.त्या वर्षी सातवीच्या परीक्षा संपून निकाल लागला. मला आठ्याहत्तर ...अजून वाचा

3

कोंदण पर्व एक - भाग 3

राम: रामौ रामा: प्रथमारामन रामौ रामान द्वितीया...अशा तर्हेने आमचं संस्कृत अध्ययन सुरु झालं. ती सुभाषिते पाठ करने, रूपं चालवणे. परस्मैपद, उभयपद यातली अंतरे. त्या सुंदर भाषेच व्याकरण बारिकशा क्लिष्ट अशा नक्षीत घडवलेल्या दागिण्यासारखेच क्लिष्ट होते. ते पुस्तक नुसतंच वाचणं म्हणजे सुद्धा जिभेला कवायत होती. तिथं पाठांतर वैगरे डोक्याला ताप होत होता. आणि संस्कृतला पाठांतरशिवाय पर्याय नाही हे माहित होतं. हौसेच रूपांतर जराशा त्रासात झालेलं मी पहिल्यांदा अनुभवत होतो. मला त्याची भीतीच वाटू लागली पहिल्यांदा.मग नेहमीप्रमाणे मी सुनीशी या विषयावर बोललो." सुने संस्कृत घेतलं तर खरं. पण एवढी सोपी, खायची गोष्ट वाटत नाहीये ग. कायच्या काय नियम आहेत त्यां भाषेला. ...अजून वाचा

4

कोंदण पर्व एक - भाग 4

" परत असला प्रकार घडला तर आम्हाला कडक कारवाई करावी लागेल. हुशार आणि गुणी मुलगी म्हणून नाव आहे तुमच्या तिने असं वागावं असं अपेक्षित नाहीये. त्या मुलाच्या आई वडिलांना झाला प्रकार व्यवस्थितपणे सांगितला आहेच आम्ही. पण तुम्ही सुनेत्राला देखील समजावून सांगा. परत हे क्षम्य नसेल. " प्राचाऱ्यांच्या ऑफिसमध्ये माझे वडील आणि सुनीचे वडील आमच्यासमोर उभे राहून प्राचाऱ्यांची बोलणी खात होते.पहिल्यांदाच तक्रार ऐकण्यासाठी तिच्या बाबांना बोलवण्यात आलं होतं. कारणं सुनीने प्रकारच असा केला होता. तिच्याकडून अशी कृती माझ्या कल्पनेपलीकडची होती... शिवाय.. ते तिने केलं त्याला कारण मी होतो... सुनीने क्षणात माझ्या मनातल्या भीतीचे निराकरण केले होते. माझ्या इतकं महत्वाचं तीला ...अजून वाचा

5

कोंदण पर्व एक - भाग 5

"सुनेत्रा!"ट्युशनवरून येताना एक मुलाचा आवाज मागून आला. सुनी आणि मी वळलो. मला विश्वासच बसेना. तो सचिन होता." हं!? " एवढाच उच्चार निघाला."जरा काम होतं." तो म्हणाला. माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करत तो पूर्णपणे तिच्याकडेच बघत होता." माझ्याकडे? काय? " सुनी शांत स्वरात बोलली." संस्कृतच्या क्लासला जातेस ना तू? मला नाही जायला मिळत. कामे असतात इतर घरातली .. तर.. मला रविवारच्या दिवशी अभ्यासासाठी तुझी क्लासची वही मिळेल का? इतर कोणाची घेतली असती पण तू वर्गात पाहिली असतेस.. म्हणून तूला विचारलं. जमेल का?" एका खेपेत तो म्हणाला."देऊ शकते.. पण परत मला सोमवारी सकाळी वर्गात परत हवी." ती म्हणाली. तिने चक्क होकार दिला ...अजून वाचा

6

कोंदण पर्व एक - भाग 6

क्लास सुटला होता. मी आणि सुनी चालत थोडंच पुढं आलो तसं आम्हाला नेहमीची त्या सचिनच्या सायकलीची खडखड ऐकू आली." सुनी माझ्याकडे बघत हसत म्हणाली." एकदम वेळेवर हा सचिन!! अजिबात चुकत नाहीस तू!" सुनी म्हणाली.तो जवळ येऊन थांबला. सुनीने ने तिच्या बॅग मधून वही काढली आणि त्याच्यासमोर धरली." thanks गं.. तुझ्यामुळे खूप सोपं झालंय मला हे सगळं. " तो म्हणाला. त्याने वही घेण्यासाठी हात पुढे केलाच होता.तेवढ्यात मला काही सुचलं.. अचानक..."मी आज काहीच लिहीलं नाहीये क्लास मध्ये. सुने तुझी वही हवीये मला आज." छातीतल्या वाढलेल्या धडधडीला दुर्लक्षित करत मी त्या दोघांच्यात निर्लज्ज होत नाक खुपसलं.दोघे चमकून माझ्याकडे बघू लागले. मग ...अजून वाचा

7

कोंदण पर्व एक - भाग 7

सदावर्ते विद्यालयाच्या प्राथमिक विभागासमोर छोट्या व्हरांड्यात मला सुनी दिसली होती. बालवाडीचा पहिलाच दिवस आणि माझी आई मला शाळेत घेऊन समोर पाहतोय तर अंगणात खेळत दिवस काढलेले आम्ही बालमित्र मैत्रीण एकाच शाळेत असण्याचा उलगडा मला झालेला.मी खुश होऊन ओरडलो होतो."थुनी..!! ""जालू..ss!!" तिने मला बघताच तिचे डोळे चमकले आणि तीही हसून टाळ्या पिटत आनंदाने ओरडली.आम्ही दोघांनी धावत येऊन एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. आमच्या आया आमच्याकडे पाहून खूप हसत होत्या. वर्ग सुरु झाला. एवढं स्पष्ट आठवत नाही आता, मात्र काही वेळाने सुनी मला खिडकीच्या गजात तोंड खुपसून उभी असलेली दिसली. जवळ जाऊन बघितलं तर डोळे मिटून रडत होती. गालावरचे ओघळ तिच्या ...अजून वाचा

8

कोंदण पर्व एक - भाग 8

गणपतीनंतर शाळेत चाचणी परीक्षेचे वातावरण होते. त्यामुळे सचिन आणि त्याच्या ग्रुपने तशी शांतताच ठेवली होती. मी पण त्यांच्याशी अंतर होतो. सचिन सुनी आधीसारखेच थोडं थोडं बोलत होते. पण मला माहित होतं. हा सचिन नक्कीच काही ना काही करणार.चाचणी परीक्षा उरकल्या होत्या. यावेळी मी तीन विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पाडले होते. गुणांमध्ये सुनीच्या अगदी जवळ येऊन ठेपलो होतो. माझी अजिबात तिच्याशी शर्यत नव्हती. पण ती मला म्हणाली होती. तू खूप मोठा होशील. तीला जर तशी अपेक्षाच आहे तर मग, मी माझ्या क्षमतांचा विकास करायला हवा असं मला वाटू लागलं. मग कंटाळ्याची धूळ झटकत मी माझ्या सुस्त मेंदूला थोडीच चालना दिली ...अजून वाचा

9

कोंदण पर्व एक - भाग 9

सहामाही परीक्षा येऊ घातल्या होत्या. सुनी आणि मी अभ्यासाला लागलो होतो. Time table मिळाले तसे सुनी आणि मी गडप दोघे आपल्या आपल्या घरी अभ्यासात बुडालो. ह्यावेळी माझा आलेख मला चढता ठेवायचा होता. त्यामुळे मी शाळेतून आलो कि अभ्यासात असायचो.. सुनी आणि माझी धावती भेट व्हायची.तिने मला सांगून ठेवलं होतं."जाडू मन लावून अभ्यास कर हा.. यावेळी आणखी पुढे यायला हवाय तू."बस एवढं प्रोत्साहन मला पुरे होतं. बीजगणित आणि भूमिती दोघे माझे मित्र झाले होते तर, इंग्लिश माझं विना अभ्यास चांगलं होतं. व्याकरण करुन गेलं कि पुरे व्हायचं. विज्ञान आणि समाजशास्त्र सोबती होते.. कारण नुसतीच वर्तमानपत्र नाही तर वैज्ञानिक मासिके.. जगाच्या ...अजून वाचा

10

कोंदण पर्व एक - भाग 10

सुनीचे आईबाबा संध्याकाळी घरी आले होते. काकूंनी मला जवळ घेत माझं खूप कौतुक केलं." मला तुझ्याबद्दल जे वाटत होतं अगदी तसाच आहेस. नेहमी अपेक्षाना खरा उतरतोस तू.. आपल्या या गुणी पोरांना दृष्ट लागायला नको कोणाची." माझ्यावर मायेची उधळण करत त्या म्हणाल्या.सुनीचं पण माझ्या आईबाबांनी कौतुक केलं. माझ्या पाठीशी नेहमी असण्याबद्दल आधीच त्यांना तिचं कौतुक होतं. तिचा माझ्यावरचा जीव माझ्या आईबाबांना चांगलाच माहित होता.बाबांनी मला त्याचवेळी surprize दिलं. नवी कोरी त्याकाळी खूप फेमस असणारी "hercules MTB Canon barrel" cycle दुकान वाल्याने आमच्या घरी आणली. मी त्यांना मागितली नव्हती. मी म्हणालो पण तसं त्यांना.पण बाबा म्हणाले, " तू मागत काहीच नाहीस. ...अजून वाचा

11

कोंदण पर्व एक - भाग 11

शाळेत येताना रामदास भेटला. सायकल चालवत बोलत आम्ही येत होतो." यार तू भाषणकार आहेस खरंच. काय बोललास रे तू. वाटत नव्हतं आठवीतला आहेस. या वर्षी दोनदा प्राचाऱ्यांची शाबासकी मिळवलीस तू. खतरनाक. " तो म्हणाला." अरे एवढं काही नाही. थोडी डेरिंग केली की सगळं जमतं. तू पण करू शकतोस." मी म्हणालो." नाही पण सगळ्यांना सगळं जमतच असं नाहीये. तूझ्याकडे ते आहे बाबा. मी करूच शकेन असं नाहीये. " रामदास म्हणाला." का चांगला हुशार आहेस की, इतकी वर्षे नंबर काढतोयस ते का कमीये? " मी त्याला म्हणालो." अरे पण तू कुठे होता इतके दिवस?? असं बघ... त्या स्पर्धेला खूप मुलांचे आईवडील ...अजून वाचा

12

कोंदण पर्व एक - भाग 12

स्फूर्ती"जे आपल्याला करता येत नाही, ते करायला पडणारे प्रयत्न आपले खरे शत्रू असतात, असं मला वाटायला लागलं होतं."गड किल्ले वैगरे माझ्याच्यानी त्यावेळी फारसं झालं नव्हतं. माझं खेळणं पण माझं यथातथाच होतं. शिवनेरीचं चढणं तसं फार काही अवघड नव्हतंच. पण ती चढाची वाट, माझी वाट लावायला पुरे होती. अतिरिक्त वजनामुळे माझा श्वास सारखा फुलत होता. गडाचा अर्धाच भाग चढून झाला होता. शेवटी शेवटी तर मला अगदीच नको झालं.मग मी आमच्या PT च्या सरांना विनंती करुन जिथे होतो तिथेच थांबलो. आमच्या सोबत आलेले एक उप- प्राचार्य त्यांनाही पुढं पुढं श्वसनाचा त्रास होऊ लागला. मग मी आणि ते तिथंच बसलो. सगळे निघून ...अजून वाचा

13

कोंदण पर्व एक - भाग 13

यत्नस्वतःची सुस्तावस्था सोडून काही करायला जाणं हे किती कठीण काम आहे याचा प्रत्यय मला यायचा होता.मी मनावर तर घेतलं सुस्तता सोडून आता मी सकाळी लवकर उठून पळायला जाणार होतो. असं ठरवलंही होतं. पण...मी सकाळी उठून खिडकी बाहेर डोकवायचो. बाहेरचा अंधार आणि थन्डी ही प्रतिकूल परिस्थिती बघायचो. घरातली उब बघता परत अंथरून जवळ करायचो. सगळं स्फूरण मातीत जाऊ लागलं होतं. मग दिवसभर चुटपुट लागून रहायची. त्या स्थितीत आठवडा वाया गेला.सुनी आली होती घरी त्यादिवशी संध्याकाळी." जाडू..!! मी लाठी काठी संपूर्ण शिकले. आता मला गुरुजींनी फक्त प्रॅक्टिस करायला सांगितलंय. लाठी मारता येते, अडकवता येते आणि बचाव पण करता येतो.. टॉईंग कण ...अजून वाचा

14

कोंदण पर्व एक - भाग 14

द्वेष" तुझ्यात जरासा बदल झाल्यासारखा दिसतोय हल्ली. " रामदास म्हणत होता." अरे आपलं वय वाढीच आहे. बदल तर होणारच " मी म्हणालो." नाही.. तू काहीतरी करतोयस. धडपड कसलीतरी.. वजन उतरल्यासारखं वाटतंय तुझं जरा. पण जे काही असेल चांगलं आहे." तो म्हणाला." सतत असं राहायचा कंटाळा आलाय मला आता. म्हणून चालू आहे थोडंफार, बाकी काही नाही. " मी म्हणालो. मला माझं" भारी रे. कर कर.. सगळीकडून सुधारणा करत आहेस हे मस्तच. " तो म्हणाला.असं संभाषण मला रामदास कडून मिळालं.पल्लवी पण म्हणाली. "जरा रोडावलायस. आजारी होतास की काय? "आणखी एक दोन जणं सुद्धा बोलले. म्हणजे बदल घडत होता. प्रयत्न दिसू लागले ...अजून वाचा

15

कोंदण पर्व एक - भाग 15

उजेडदुखणं.. मग ते कुठलंही असू द्या.राग.. मग तो कशाचाही असू द्या..आपल्या मानसिक पडझडीला हे कारणीभूत असतात.मला ती होऊ द्यायची शांत होत आलो तसं माझं विचारचक्र सुरु झालं. सुनीला त्याने गुलाब दिलाय.. किंवा आणखी काही. आपल्याला काय? सुनी त्याला काय म्हणालीये कुठे माहित आहे आपल्याला?त्या सचिनने तीला थांबवण्यावरून काहीही गैरसमज करुन घेत लगेच इतकं टोकाचं वागणं चुकीचं आहे. शांतपणे आणि विचारीपणाने ही गोष्ट हाताळणे गरजेचे आहे.सुनिकडे पाहता ती तर स्थिर होती. नेहमीसारखंच तिचं वागणं होतं. मी विचारात पडलेला पाहून तीन माझ्याकडे बघत मला डोळ्यांनी "काय रे?" असं खुणावलं पण.. मी काही नाही.. अशा अर्थाने मान हलवली. तशी ती माझ्याकडे पाहून ...अजून वाचा

16

कोंदण पर्व एक - भाग 16

"विरह""अरे बटणच सापडत नाहीत मला. F आणि J वर बोटे ठेवायची. पण मग जर बाकीची बटणं दिसलीच नाही तर न बघता कशी दाबायची?" पल्लवीचे निर्बुद्ध बडबडने गेले आठवडाभर मला सहन करावे लागत होते आणि पुढले तीन आठवडे पण तेच सहन करावं लागणार होतं.तिने पण कॉम्प्युटर चा क्लास जॉईन केला होता.आमचा गाव तसा बऱ्यापैकी बरा आधुनिक होता. सगळ्या सोई हळूहळू वाढत होत्या. कॉम्प्युटर क्लास उघडून दोन वर्षे झाली होती. मला interest होताच. पण मागल्या वर्षी उन्हाळ्यात नातेवाईकांमध्ये असणाऱ्या दोन जवळच्या लग्नामुळे पुढे ढकलला आणि या वर्षी लावून टाकला.पहिल्यादिवशी मी क्लास मध्ये आलो. सरांनी मला एका कॉम्प्युटरवर बसवले. त्यावेळी Ms Dos ...अजून वाचा

17

कोंदण पर्व एक - भाग 17

"मिलाप"Results लागले. मी आणि सुनीने आमची पोजिशन जपली होती. सचिनचा मामा आला होता result घ्यायला. चेहऱ्यावरून आनंदी दिसला म्हणजे आणखी प्रगती केली होती. पल्लवी मला अभिनंदन करताना नको इतकी हसत होती. किंवा लाजत होती. मलाच कळेना काय ते.. सगळ्या शिक्षकांनी माझी पाठ थोपटली.सुनीच्या बाबांनी माझ्यासोबत येऊन तिचा result घेतला. घरी येताना पहिला आल्याबद्दल मला त्यांनी icecream खाऊ घातलं.आई बाबांना पुन्हा आनंदाच्या क्षणाचे भागीदार बनलेले बघताना मला आभाळं ठेंगणे झाले होते.Result नंतर एक आठवड्याने मी सुनीच्या दारात हजर झालो."काकू!! सुनी कुठंय?" मी म्हणालो."अरे!! ये.. किती वेगळा दिसलास एकदम, मी म्हणाले कोण आहे सुनी म्हणून विचारणारे? व्यायाम जोरात सुरु आहे वाटतं? ...अजून वाचा

18

कोंदण पर्व एक - भाग 18

स्फ़ोटशाळा भरली. माझा नववीचा नवा वर्ग तिसऱ्या मजल्यावर होता. हवेशीर आणि प्रकाशित. मला जाम आवडला. मी बसायला मधल्या ओळीत बेंचवर होतो. सुनी माझ्या शेजारच्या ओळीत पहिल्या बाकावर बसली होती. सर्वच मुलांमध्ये खूप बदल झाले होते. उंची, रंग, आवाज जरा जरा बदलले होते.माझ्यातही झालाच होता. आता मी सुनीसाठीच जाडू होतो. इतरांसाठी नाही. सचिनला मी माझ्याकडे तीन चार वेळा निरखून बघताना पहिला होता. माझ्यात झालेला बदल त्याला अस्वस्थ करत होता असं मला वाटत होतं.सगळीकडून नंबरांची आणि मार्कांची चौकशीवजा बडबड होतं असल्यामुळे मला कळले की, तो यावेळी पहिल्या दहामध्ये आला होता. त्याची मेहनत दिसत होती. तो मधल्या सुट्टीत सुनीचं अभिनंदन करुन आला. ...अजून वाचा

19

कोंदण पर्व एक - भाग 19

लाघव"आजपासून तू ग्राउंडवर यायचं नाहीस. तूला फार मस्ती आहे. गरीब पोरावर जोर दाखवतोस. तो त्याचा मेहनत करुन वर जायला तर तूझ्यासारखे लोकं पाय खेचतात. तुझे वडील मोठ्या कपंनीत कामाला आहेत ना? म्हणून तुमच्यासारख्या लोकांना फार माज असतो. परत तोंड नको दाखवूस मला. जा इथला." खोत सर मला बोलवून ओरडत होते. सचिन तिथेच होता. त्याच्यासमोर त्यांनी मला झापले. तो बारीक हसत होता. मला त्यांनी मार्गदर्शन द्यायचं बंद केलं.वर्ग एखाद्या गावासारखाच असतो. इकडचं तिकडं पसरायला वेळ लागत नाही. सचिनला मी मारल्याचं सगळ्यांना समजलं तसं सगळेजण एकमेकात मला पाहून कुजबुजताना दिसत होते. ती पल्लवी उगाच केसांना कानामागे सारत माझ्याकडे बघून बारीक हसत ...अजून वाचा

20

कोंदण पर्व एक - भाग 20

यशसुनी आणि मी एका off पिरियडला अंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेची तयारी करत होतो. सुनीने मला भाग घ्यायला भाग पाडलं होतं."मेरे मे टॉपर है तो.. दुसऱ्या कोणाला कशाला घेऊ सोबत?"असं तिचं म्हणणं पडलं.तर.. त्या पिरियडला कोणीच शिक्षक आले नव्हते. पण शेजारच्या वर्गातल्या कावरे ताई येऊन दंगा करू नका म्हणून तंबी देऊन गेल्या होत्या. 96-97 चं GK चं पुस्तक होतं आमच्याकडे, ज्याचा आम्ही फडशा पाडला होता. 97-98 चं शाळेच्या लायब्रेरितून आणण्यासाठी सुनी उठली आणि गेली. "मग पाचेक मिनिटांनी मला लक्षात आलं की भूगोलाच दहावीच पुस्तक पण आणायला सांगायचं विसरलो तीला. त्या आठवड्यात मला आणि तीला लायब्रेरितून काय हवं ते उचलण्याची परवानगी प्रचार्यांनी ...अजून वाचा

21

कोंदण पर्व एक - भाग 21

वेदनाचिंतामणी, समर, राजेश, गणेश आणि मी, असे पाच जणं आम्ही एका ग्रुप मध्यें होतो. समर ब तुकडीतला आधीपासूनचा स्टार त्याला हरवणं म्हणजे सुद्धा माझ्यासाठी आव्हान होतं. कारण आधीपासून तो हे करत आलेला. ते वातावरण त्याच्यासाठी नवं नव्हतं. पण माझी सुनिसोबतच्या पकडापकडी वाल्या सोडल्या तर ही पहिलीच रेस होती. सरांनी आम्हाला पोजिशनचा स्टॅन्स घ्यायला लावला. मी जसं posture शिकलो होतो त्याप्रमाणे माझा स्टॅन्स ठेवला."अरे ए समर!! त्याचं बघ जरा कसं केलंय त्याने. नीट घे की पोजिशन!!" खोत सर समरला ओरडले. त्याने मला पाहिलं.शर्यतीची शिटी वाजली आणि आम्ही सुटलो. मला फक्त धावायचं माहित असल्यामुळे मी समोर बघून धावू लागलो. शिकल्या गोष्टींचा ...अजून वाचा

22

कोंदण पर्व एक - भाग 22

विदारकघरी आलो. फ्रेश होऊन सुनिकडे पळालो." काकू? सुनी? " घरात पाऊल ठेवतंच मी विचारलं." अरे ती तिच्या बाबांसोबत शहरात त्यांचं काही काम होतं. हिने हट्ट केला मी पण येते. मग नेलं त्यांनी. " काकू म्हणाल्या." किती वाजेपर्यंत येतील? " मी विचारलं." रात्र होईल यायला त्यांना. का रे? काही अर्जंट काम होतं का? " त्यांनी विचारलं." नाही!! असंच. " म्हणून मी सटकलो.सुनीने आजचा दिवसच टाळला होता. मला तर ती कधी एकदा भेटतीये असं झालं होतं. पण बहुतेक आज शक्य नव्हतं. खूप आठवण येत होती तिची. काल तिच्यावर ओरडलो त्याचा मला त्रास होत होता आता. मला जे करायचं होतं ते करुन ...अजून वाचा

23

कोंदण पर्व एक - भाग 23

जोडप्रार्थना झाल्यावर मी वर्गात येऊन बसलो. सुनीपण येऊन तिच्या जागेवर बसली होती. तिने माझ्याकडे बघितलं मी बारीक हसलो. तिने पुढे बघितलं. तिचा फुगा झालेला.सरांनी शिकवायला सुरुवात केल्यावर मात्र मी माझ्या ज्ञान ग्रहण करायच्या कोषात गुरफटून गेलो. पनामा कॅनॉलबद्दल शिकवून झाल्यावर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. कुठल्या दोन समुद्राना जोडतो? उपयोग काय? वैगरे.. मी 2-3 प्रश्नाची उत्तरे दिली. सुनी माझ्याकडे जरा कपाळाला आठी पाडून बघत होती. मला कळेना हिला नेमकं काय वाटतंय?पुढले तीन पिरियड झाले आणि मधल्या सुट्टीची घन्टा झाली. सगळे डबे घेऊन उठले. सुनी जागेवर बसून होती. पल्लवी, स्नेहा तीला चल म्हणाली तर, ती नाही उठली. मी ही बसून ...अजून वाचा

24

कोंदण पर्व एक - भाग 24

ताण" तुमचा समीकरणाचा तास झाला का या आठवड्यात? तू वर्गसमीकरणं सोडवलीस का बीजगणितातली?" रामदास विचारत होता." हो केलीत की. रे? " मी म्हणालो." अरे खूप मुलांच्या डोक्यावरून गेलं सर शिकवताना. तूला जमलं?? " त्याने विचारलं." हो जरा प्रॅक्टिस केली घरी जाऊन. जमलं. थोडं फास्ट होण्यासाठी आणखी प्रॅक्टिस लागेल. " मी बोललो. कारण या वर्षी त्रिकोणामिती आणि वर्गसमीकरणे जरा किचकट डोकं खाऊ होतं."आणखी एक गोष्ट आहे.. मी कधीही या विषयावर बोललो नाही तुझ्याशी. पण बोलावं वाटलं." तो म्हणाला."ती कोणती रे?" मी न कळून विचारलं." गेले काही दिवस मी पाहतोय. म्हणजे गैरसमज नको करुन घेऊ. पण तुझी मैत्रीण सुनेत्रा डान्सची तयारी ...अजून वाचा

25

कोंदण पर्व एक - भाग 25

उपायरामदास बोललेलं वाक्य आठवत होतं मला." सुनीने त्या सचिनच्या नादाला लागणं तीला सूट करत नाही."त्याला मी अंतरबाह्य ओळखला होता. प्रयत्न तिच्या जवळ जाण्यासाठी आणि तिलाही स्वतःच्या रंगात रंगवण्याचे होते. सिनेमाला एकत्र जाने वावगे नाही. ते कोणीही मित्र करू शकतात. पण घरच्यांना न सांगता?? तेही अशा मुलासोबत ज्याचा आगा पिच्छा तिच्या घरातल्याना ठाऊक नाही. आपलं वय नाही हे सगळं करण्याचं. धीट पणा, आत्मविश्वास, नवं काही करण्याची वृत्ती सगळं ठीक. पण कुठं? त्या थिएटरच्या आसपास चे वातावरण मला ठाऊक होते. आपली क्षमता आहे का एखादा चुकीचा प्रसंग समोर आला तर हाताळण्याची हे सुनीला आणि स्नेहा, पल्लवीला कळायला नको? सचिनच्या भरवशावर तिथे ...अजून वाचा

26

कोंदण पर्व एक - भाग 26

दुसरी बाजू"जा!! आलाय तो.. मी इथेच आहे." मी सुनीला म्हणालो."जाडू.. कशाला नको ना रे!!" सुनी म्हणाली."जा सुने.. माझ्यासाठी जा.. " मी म्हणालो.ती गेली. मी सायकल स्टॅंडला लागून असणाऱ्या शाळेच्या इमारतीमागे थांबलो होतो. ती निघताच मी पळत इमारतीला वळसा घालून सचिनच्या पाठीच्या बाजूला आलो आणिसुनी तोवर त्याच्यापर्यंत पोहोचली होती. मी अगदी सात आठ फुटावरच उभा राहिलो. आज सुनीच्या डान्स तालमीचा शेवटचा दिवस होता. ती निघाली की हा पण निघणार, ठरलेलं होतं. सायकल स्टॅंडमध्ये वर्दळ नव्हती. मी एका अशोकाच्या जाड बुंध्यामागे थांबलो. तिथून त्यांचं बोलणं ऐकू येत होतं."सचिन आपलं त्यादिवशी सिनेमाला जाण माझ्या अंगलट आलंय रे. " ती म्हणत होती."का? काय ...अजून वाचा

27

कोंदण पर्व एक - भाग 27

दुःखह्या वर्षी पण नेहमीप्रमाणे सुनीचा डान्स अप्रतिम झाला. सुनी कुठल्याही पेहरावात सुंदरच दिसते. तशीच दिसत होती. सर्वानी तिचं भरभरून केलं. ग्रुप डान्स असला तरी ती लीड असल्यामुळे तिचं उठून दिसणं स्वाभाविक होतं. मी सुद्धा तीला कौतुकाची दाद दिली. सुनीचं असं गुणप्रदर्शन बघताना सुनी फार वेगळी वाटायची.गॅदरिंग झाल्या नंतर चार पाच दिवस झाले असतील. दुपारच्या सुटीत सचिन आणि सुनी कुठेतरी गेलेले मी बघितले. मी काही माग वैगरे काढणार नव्हतो. पण येताना तिच्या हातात एक वही होती. एवढंच निरीक्षण मी नोंदवलं. ती सांगतीये किंवा नाही या कडेही मी लक्ष देणार नव्हतो. शेवटी घट्ट मित्र असलो तरी तिच्या खाजगीत डोकवायची माझी कक्षा ...अजून वाचा

28

कोंदण पर्व एक - भाग 28

निचराछातीत जळता निखारा घेऊन शांत कसं राहायचं?ज्याने घाव दिलाय त्यालाच बघून कसं हसायचं?माझं दुखलंय हे त्याला सांगून चिंतेत कसं माणसाला राग राग करुन दूर कसं लोटायचं?सगळे प्रश्न माझ्या मेंदूत थैमान घालत होते.शाळेत सुनी समोर येणार होती, बोलणार होती, हसणार होती. आपण ते सगळं खरं मानून चालायचं होतं.आता स्वतःला दुय्यम समजून वागायचं होतं. ठीके...!!पण मग मी सुद्धा तीला तशीच वागणूक द्यावी का?नाही नाही.. तसलं शक्यच नाय आपल्याला...सुनी आहे ती.मी स्वतःला तिच्यासाठी कायम असण्याचं वचन दिलंय. तिच्याबाबतीत कोरडेपणा, तुसडेपणा मी सहज दूर करू शकतो. मन स्थिर करणं जमायलाच हवं.तिच्या आईने सगळ्यांना समान वागणूक द्यायला हवी. अशी तिची ईच्छा अगदीच काही चूक ...अजून वाचा

29

कोंदण पर्व एक - भाग 29

अंतर्नाद"गारवा... वाऱ्यावर भिर भिर भिर पारवा.. "ह्या अल्बम ची गाणी कानावर पडली आणि मी तल्लीन झालो.बाबांनी नवा टेपरेकॉर्डर आणला काही भक्तीगीते, मराठी भावगीते आणि नव्या मराठी अल्बमच्या कॅसेट्स पण आणल्या होत्या. त्यातलं सौमित्रने लिहिलेल्या गारवा मधल्या गीतांच वेड मला लागलं होत.कवी कल्पना आणि त्यांच्या शब्दांचे खेळ कसे अचंबित करणारे असतात. ते शोधण्याचा मला नाद लागला होता. मराठी च्या पाठय पुस्तकातल्या कविता मला आवडायच्या पण त्यांचं रूप खूप अलंकारिक आणि जड शब्दांनी सजलेलं असायचं. हे वेगळं होतं. साध्या सोप्या शब्दात पण तितकंच प्रभावी."आकाश सारे मांडून तारेआता रुपेरी झालेत वारे "हे ऐकलं कि वाटायचं या उपर ते काय? पण पुढं परत.."कधी ...अजून वाचा

30

कोंदण पर्व एक - भाग 30

कपटआमच्या शाळेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक वयस्कर असे मेम्बर वारले. शाळा त्यादिवशी दोनच तासात सोडण्यात आली. रामदासने मला गाठले. त्याच्यासोबत चल म्हणून लागला. मला काही अडचण नव्हती मी त्याच्यासोबत निघालो. रामदासचे घर तिनेक किलोमीटर लांब होते. वाटेत एक कॅनॉल लागत होता. आम्ही कॅनॉलच्या कडेने असलेल्या कच्च्या रस्त्यावरून चाललो होतो. कॅनॉलला पाणी होतं. कठडा नव्हता. रस्ता कच्चा आणि खड्ड्यानी भरला होता. हळूहळू सायकल चालवत, बडबडत आम्ही निघालेलो. वाटेत फारसं कोंणी नव्हतं. एका बाजूला उसाची शेती आणि एका बाजूला तो कॅनॉल. मधून तो कच्चा गाडीमार्ग होता.मला थोडं दुरून कॅनॉलच्या काठाला एक सायकल आडवी पडलेली दिसली. थोडं पुढं गेल्यावर आम्हाला ओरडल्याचा आवाज आला." ...अजून वाचा

31

कोंदण पर्व एक - भाग 31

सुनीत्यावर्षीची आमची वार्षिक परीक्षा दहावीच्या परीक्षेचा पाया होती.माझा नववीचा अभ्यास नीट उरकल्यामुळे मला पेपर परीक्षेत उत्तम गेले. यावेळी तर पैकीच्या पैकी पडतील असा माझा आत्मविश्वास होता. आमचे निकाल लगेचच लावण्यात आले. यावेळी मी तिसरी आले होते आणि रामदास दुसरा. जाडू परत अव्वल आला होता.. सचिनने खूप अभ्यास करतं आणि ठरवलेले गुण मिळवत सरपंच तालीम संघाच्या शिष्यवृत्तीसाठी स्वतःला पात्र केले होते. त्यावर्षी कोणीही कुठेही जाणार नव्हते कारण, दहावीचे उन्हाळी वर्ग सुरु झाले होते.बालपण संपून आम्ही सगळे आता किशोरवयाकडे वाटचाल करत होतो. शारीरिक आणि मानसिक बदलाबरोबरच सगळेजण आता आपलं आपलं ध्येय गाठण्यासाठी धावायला सुरुवात करणार होते.हो.. मी सुनी.आतापर्यन्त आमचं सगळंच जाडूच्या ...अजून वाचा

32

कोंदण पर्व एक - भाग 32

तीउन्हाळी तास सुरु असताना शाळेत फक्त दहावीची मुले येत होती. त्यामुळे शाळा अशी मोकळी मोकळी वाटायची. जाडू आणि मी एकत्रच निघायचो आणि घरी पण एकत्रच जायचो. दोन आठवडे झाले होते तास सुरु होऊन सकाळी साडे नऊला पाच दहा मिनिटे कमी असताना जाडू माझ्याकडे यायचा. मग मी त्याच्यासोबत निघायचे.त्यादिवशीही तो आला. पण एकटा नाही."सुने! ही श्वेता. आपल्या शाळेत यावर्षी ऍडमिशन घेतलंय. बाबांच्या ऑफिसमध्ये हिचे बाबा बदली होऊन आलेत. आपल्या घराजवळच आलेत हे सगळे रहायला. पहिला दिवस आहे म्हणून माझ्यासोबत आलीये. आणि हो.. आपल्या क्लास मधेच ऍडमिशन बरं का. आधी पण संस्कृत असल्यामुळे preference मिळाला तीला." जाडू सायकलवर बसून म्हणाला.मी श्वेताकडे ...अजून वाचा

33

कोंदण पर्व एक - भाग 33

झुळूकमला श्वेताशी खडुसपणाने वागण्याची ईच्छा अजिबात होत नव्हती कारण ती तशी होती खूप छान. तिचं वागणं, बोलणं खूप खेळकर तितकंच समजूतदारपणाचंही असायचं. जणू जाडूचीच लेडी आवृत्ती असल्यागत. पण ती काही जाडू नव्हती. मला त्रास याचा होतं होता कि जाडूचा वेळ ती खात होती आणि जाडू तीला वेळ पुरवत होता. आठवडा झाला सुनी दुक्यात विरल्यासारखी झाली होती त्याच्यासाठी.श्वेता जाडूसोबत बऱ्याचदा रहायची. त्याचं ऐकून घेणं आणि मोजकं बोलणं हे गुण त्याच्यात कोणालाही गुंतवण्याची क्षमता ठेऊन आहेत. हे मला चांगलं ठाऊक होतं. इतर मुलं श्वेताशी बोलायला बघत होते. पण ती फार कोणाशी जास्त बोलताना दिसायची नाही. जणू त्यांच्या कोणाशीच तिच्या लेव्हलच संभाषण ...अजून वाचा

34

कोंदण पर्व एक - भाग 34

भडाग्नी" श्वेता!! काल निघून गेलीस लवकर? " मी तीला चेक करण्यासाठी सहज विचारलं. तास सुरु व्हायला दहा मिनिटे अवकाश म्हणून आम्ही बोलत होतो."हो अगं. तुम्हाला वेळ लागत होता ना. मग मी निघाले." श्वेता म्हणाली." हो.. ते जरा बोलत थांबलो म्हणून मग उशीर झाला. " मी म्हणाले." हो.. म्हणूनच मी पण निघाले... आणि?? कशी झाली तुमची पिकनिक?? टेकडीवर गेला होता ना दोघे? हा म्हणाला मला काल संध्याकाळी. " ती म्हणाली." जाडुने तूला सांगितलं? " मला शॉक होता हा." हो.. मी घरी गेले होते संध्याकाळी त्याच्या. तेव्हा बोलला मला." ती मला म्हणाली."असं कसं पण यार..? हा जाडू पण ना.. विचार करतं ...अजून वाचा

35

कोंदण पर्व एक - भाग 35

द्विधा" नेत्रा!! निघालीस? " सचिन म्हणाला." हो!!" मी जरा वैतागलेल्या सुरातच म्हणाले." थोडा वेळ आहे??" सचिनने विचारले." सचिन आत्ता मूड नाहीये. तेव्हा प्लिज मला थांब म्हणू नको." मला शांतता हवी होती."ठीके." तो म्हणाला. पण त्याच्या चेहऱ्यावर पण उदासीचे ढग स्पष्ट दिसत होते. मी हल्ली सतत त्याला rude सारखं वागवणं मलाच बरोबर वाटलं नाही." चल मला घरी सोड." मी म्हणाले. आम्ही चालत निघालो." thanks! काय झालं गं..? चेहरा पडलेला वाटतोय तुझा. " तो जरा उजळला आणि म्हणाला."चं!! काय सांगू अरे! ती पल्ली आणि ती स्नेहा मूर्ख पोरीं आहेत. काहीही बरळतात. माझं डोकं फिरवलं त्यांनी.. म्हणून मग तूला उगाच rude सारखं ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय