आशीर्वाद बंगला नंबर १० . शहरातल्या एका उच्चभ्रू वस्तीत दिमाखात उभा असलेला हा एक मोठा प्रशस्त बंगला. बंगल्याची भव्यता, त्याची देखणी रचना आणि समोरची सुंदर बाग. त्याला बघून च कल्पना येते की हा कुठल्या मोठ्या बिझनेस मॅन चा किंवा तत्सम व्यक्ती चा बंगला असावा , आणि तो होता ही त्या शहरातील मोठ्या बिझनेस मॅन श्री अजित नाईक ह्यांचा बंगला .या बंगल्यात श्री अजित नाईक त्यांच्या पत्नी सौ अर्चना नाईक आणि त्यांची मुलगी अनघा नाईक रहात असत . अनघा लहान असताना तिला सांभाळायला म्हणून गावाकडून अजित रावांची लांब ची बहीण जी खूप कमी वयात विधवा झाली होती आणि समाजात आणि नात्यात पदोपदी होणारी अवहेलना सहन करत भाऊ भावजय वर उगाचच ओझं झाली होती. अशा वेळी अजितरावांनी त्यांना आपल्या घरी आणले आणि मानाचे स्थान दिले. त्या दिवसापासून ती आलेली होती ते आजतागायत इथेच ह्यांच्या सोबत रहात असत .

1

अविवाहित आई - 1

भाग एकआशीर्वाद बंगला नंबर १० . शहरातल्या एका उच्चभ्रू वस्तीत दिमाखात उभा असलेला हाएक मोठा प्रशस्त बंगला. बंगल्याची भव्यता, देखणी रचना आणि समोरची सुंदर बाग. त्याला बघून च कल्पना येते की हा कुठल्या मोठ्या बिझनेस मॅन चा किंवा तत्सम व्यक्ती चा बंगला असावा , आणि तो होता ही त्या शहरातील मोठ्या बिझनेस मॅन श्री अजित नाईक ह्यांचा बंगला .या बंगल्यात श्री अजित नाईक त्यांच्या पत्नी सौ अर्चना नाईक आणि त्यांची मुलगी अनघा नाईक रहात असत . अनघा लहान असताना तिला सांभाळायला म्हणून गावाकडून अजित रावांची लांब ची बहीण जी खूप कमी वयात विधवा झाली होती आणि समाजात आणि नात्यात ...अजून वाचा

2

अविवाहित आई - 2

भाग दोनअनघा सध्या रिकामीच होती , कॉलेजची फायनल इयरची परीक्षा नुकतीच संपली होती. पेपर्स तर खूप छान गेले होते, आता रिझल्ट यायला अजून महिना-दीड महिन्याचा कालावधी बाकी होता. तोपर्यंत घरात बसून करायचं काय? हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. रोजचा तोच तोच दिनक्रम आणि तोच कंटाळवाणा वेळेचा प्रवास! शेवटी या रिकाम्या वेळेचा काहीतरी चांगला उपयोग करावा आणि मस्त एन्जॉय करावं . म्हणून अनघा आणि तिच्या मित्र मैत्रिणी ने फिरायला जायचं ठरवलं होतं . आज ती अमोल ला भेटून याच संदर्भात बोलणार होती .सगळ्यांची संमती झाली होती, पण ग्रुपमधला महत्त्वाचा दुवा असलेला अमोल अजून या बेतात सामील झाला नव्हता. तो सध्या ...अजून वाचा

3

अविवाहित आई - 3

भाग ३अजित रावांच्या आलिशान ऑफिसमध्ये असलेल्या केबिनमध्ये बाहेरच्या गजबजाटाचा एकही आवाज पोहोचत नव्हता. अनघा समोरच्या लेदरच्या खुर्चीवर बसली होती, पाय उत्साहाने हलत होते. तिने काही दिवसांपासून प्लॅन केलेल्या माऊंट अबूच्या सहलीची बातमी बाबांना सांगण्यासाठी ती आत आली होती. तिच्या डोळ्यांत स्वप्नांची चमक होती."कोण, कोण जाणार आहे, तुझ्यासोबत?" अजित रावांनी फाईलवरची नजर न हटवता प्रश्न विचारला. त्यांचा आवाज नेहमीप्रमाणेच थंड आणि शिस्तबद्ध होता, ज्याने अनघाच्या उत्साहावर नकळत विरजण पडले."बाबा, माझा पूर्ण ग्रूप जाणार आहे. वैभवी, सौम्या, तरुण, किशोर, अमोल आणि मी," अनघाने शांतपणे पण आत्मविश्वासाने माहिती दिली.अनघा सगळ्यांची नावं घेते, तेव्हा अजित राव एक महत्त्वाची फाईल बघत असतात. पण ती ...अजून वाचा

4

अविवाहित आई - 4

भाग ४खोलीतील एकटेपणा अनघाला आता टोचू लागला होता. काहीवेळ ओक्साबोक्सा रडल्यावर, तिने डोळ्यांत साचलेले अश्रू पुसले आणि ती ताडकन बाथरूममध्ये गेली. आरशात स्वतःच्या प्रतिबिंबेकडे पाहताना तिला स्वतःचीच ओळख पटत नव्हती. चेहऱ्यावरचा मेकअप विस्कटला होता, डोळे सुजले होते. तिने गार पाण्याचे हबके तोंडावर मारले. आरशातल्या त्या थकलेल्या प्रतिमेकडे बघून ती पुटपुटली,"असं नाही होऊ शकत .....हे ...हे कसं होऊ शकत... नाही ... नाही हे ...हे खरं नाहिये ... "तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं. तिने आपला फोन शोधला आणि कातर झालेल्या स्वरात अमोलचा नंबर डायल केला. फोनची रिंग वाजत होती, पण पलीकडून कोणीही उचलत नव्हतं. 'ट्रिंग... ट्रिंग...' असा तो आवाज अनघाच्या काळजाचा ...अजून वाचा

5

अविवाहित आई - 5

भाग पाच" काल संध्याकाळी तू गायनॅकॉलॉजिस्ट कडे गेली होती..."अजित राव पुन्हा मोठ्या ने ओरडले . अनघा तिच्या बाबांच्या चेहऱ्या टक लावून बघत होती . तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते . अजित रावांच्या डोळ्यात आग दिसत होती . ते खूप चिडले होते ." काय विचारतोय मी.... उत्तर दे . " ते पुन्हा ओरडले .अनघा ने फक्त मान हलवून होकार दिला . अजित रावांनी आपला मोर्चा अर्चना ताईंकडे वळवला ." हे फालतू चे धंदे बंद करा आणि जरा घरा कडे लक्ष द्या . तुला माहीत तरी आहे का की ही गायनिक कडे कधी आणि का गेली होती दिवसाचे बारा तास तुझा ...अजून वाचा

6

अविवाहित आई - 6

भाग सहामीना ताई आणि अनघा फार्महाऊसवर येऊन पोहोचल्या . ती चांगली प्रशस्त जागा होती . सगळ्या सुख सोयी तिथे . अनघा आणि मीना ताईंनी तिथे रहायला सुरुवात केली . सुरवातीला अनघा ऑफिस ला जायची पण मग हळूहळू तिने ऑफिस ला जाणं बंद केलं .दिवस सरत होते . इथे अजित रावांनी आणि अर्चना ताईंनी त्यांच्या ओळखी च्या लोकांना , त्यांच्या सर्कल मधे हेच सांगितले की , अनघा ला त्यांनी काही दिवसांसाठी परदेशी पाठवले आहे तिथे त्यांच्या मित्राची कंपनी आहे तिथे अनघा शिकायला गेली आहे . काही दिवसांनी ती परत येईल आणि मग अजित रावांचा बिझनेस सांभाळेल .दिवस जात होते आणि ...अजून वाचा

7

अविवाहित आई - 7

भाग सात ( अंतिम भाग )अनघा ने डायनिंग टेबल वर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतल पाणी ग्लासात घेतलं आणि एका दमात गेली ग्लास खाली ठेऊन ती सोफ्यावर बाळा जवळ येऊन बसली . आणि तिने बोलायला सुरुवात केली...." ट्रिप वरून आल्या नंतर मी माझा जॉब सुरू केला . मला तिथे काम करताना खूप बरं वाटतं होतं . एके दिवशी आमची एक महत्वाची मिटिंग त्याच बिल्डिंग मधे होती जिथे आपलं ऑफिस आहे . मी ती मिटिंग संपवून बाबांना भेटायला म्हणून सहज त्यांच्या ऑफिस मधे गेले तर बहुतेक स्टाफ घरी निघून गेलेला होता . मी बाबांच्या केबिन च दार उघडायला हात पुढे केला तेवढ्यात ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय