अविवाहित आई - 7 manasvi Manu द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अविवाहित आई - 7

भाग सात ( अंतिम भाग ) 

अनघा ने डायनिंग टेबल वर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतल पाणी ग्लासात घेतलं आणि एका दमात पीऊन गेली ग्लास खाली ठेऊन ती सोफ्यावर बाळा जवळ येऊन बसली . आणि तिने बोलायला सुरुवात केली.... 

" ट्रिप वरून आल्या नंतर मी माझा जॉब सुरू केला . मला तिथे काम करताना खूप बरं वाटतं होतं . एके दिवशी आमची एक महत्वाची मिटिंग त्याच बिल्डिंग मधे होती जिथे आपलं ऑफिस आहे . मी ती मिटिंग संपवून बाबांना भेटायला म्हणून सहज त्यांच्या ऑफिस मधे गेले तर बहुतेक स्टाफ घरी निघून गेलेला होता . मी बाबांच्या केबिन च दार उघडायला हात पुढे केला तेवढ्यात माझ्या कानावर नंदिनी च्या रडण्याचा आवाज आला मी लक्ष देऊन ऐकू लागले ... 

" सर !! असं नका बोलू सर .. तुम्ही तेव्हा बोलला होतात ना की तुम्ही मला काहीच होऊ देणार नाही . पण आता मी गरोदर झाले . तर तुम्ही माझ्या पासून पिच्छा सोडवत आहात . माझ्या मागे पुढे कोणी नाही मी अनाथ आहे सर . हे  बाळ घेऊन मी कुठे जाईन . हां समाज एका अविवाहित आई ला कशी वागणुक देतो हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. सर ...मला आसरा द्या ...सर .... असं करू नका. " 

" गप्प बस ... उगाच चे आरोप माझ्यावर करू नकोस . तू जे काही केलं त्या साठी मी तुझ्यावर बळजबरी केली नव्हती . तू स्वखुशीने तयार झाली होती . मग आता का रडतेय . हे घे ...हे पैसे उचल , चांगल्या डॉक्टर कडे जा आणि मोकळी हो . " 

" सर .... मी गेले होते पण खूप उशीर झाला आहे आता काहीच करता येणार नाही असं डॉक्टर बोलले . मला वाचवा सर .... मला आसरा द्या ... नाही तर ... नाही तर मी सगळ्यांना तुमच्या बद्दल सांगेन . मी अख्ख्या जगाला ओरडून सांगेन तुम्ही कुठल्या वृत्ती चे आहात . " 

" खबरदार ... जर तू कुठे तोंड उघडलं तर तुझा जीव घ्यायला मला दोन मिनिटे सुध्दा लागणार नाही . आणि तसंही तुझ्या पुढे मागे रडणार कोणीच नाही ... कळलं ना ... आता उचल हे पैसे आणि चालती हो ." 

मी जेव्हा हे सगळं ऐकलं तेव्हा मी अगदी बधीर झाले होते मला कळत नव्हतं काय करू आणि काय नको . मी ऑफिस च्या बाहेर आले तेवढ्यात मी नंदिनी ला बाहेर पडताना बघितलं तिची अवस्था खूप वाईट होती . तिला चक्कर आली आणि ती पडली . मी तिला माझ्या मैत्रिणीच्या बहीणी च्या दवाखान्यात घेऊन गेले . बाबांची धमकी मला आठवली आणि मी पेशंट च्या जागी स्वतः च नाव टाकलं. त्या डॉक्टर ने सुद्धा तेच सांगितले जे नंदिनी ने सांगितले होते . तिला शुद्ध आल्यावर मी तिला म्हणाले... 

" नंदिनी ...तू बाबांच्या विरोधात तक्रार नोंदव मी तुझ्या सोबत आहे तू काळजी करू नकोस . माझा मित्र IPS  ट्रेनिंगसाठी गेला आहे आपण त्याची मदत घेऊ . " 

" नको अनघा मॅम तुम्ही ऐकलंत ना सर काय बोलले ते मला जिवे मारतील आणि मी अनाथ कोणाच्या भरवशावर लढू . " 

" अगं पण मग तू आता काय करशील . " 

" मला खरंच काही सुचत नाहिये . " 

" बरं ठीके तू मला थोडा वेळ दे मी बघते काय करायचं ते . पण आता तू तुझ्या घरी राहू नकोस मी तुझी सोय करते . " 

मी तिची सगळी सोय केली आणि घरी आले . मला काही सुचत नव्हतं काय करू ... माझे बाबा ... मला हे सहन होत नव्हत कोणाला सांगू कळत नव्हतं . शेवटी मी सगळं आत्या ला सांगितलं . जेवण व्यवस्थित नसल्याने मला ऍसिडिटी चा त्रास झाला आणि तेव्हाच बाबांच्या माणसाने मी गायनिक कडे गेल्याच सांगितलं . 

बाबांचं बोलणं माझ्या पथ्य वर पडलं मी नंदिनी ला माझ्या सोबत फार्महाऊसवर ठेऊन घेतलं तिची काळजी घेतली . पण दुर्भाग्या ने बाळाला जन्म देताना ती हे जग सोडून गेली . खर तर ती ह्या बाळा ची आई होती . ती होती एक अविवाहित आई . पण ती जाता जाता मला ह्या बाळा ची अविवाहित आई करून गेली . 

मला फरक नाही पडत माझ्या. बद्दल कोण काय म्हणेल . मी ह्या बाळाला वाढवेन , शिकवेन चांगले संस्कार देईन . ह्याच्यावर तुमची सावली ही पडू देणार नाही . पण बाबा मला लाज वाटते की तुम्ही माझे वडील आहात . स्वतः ची मुलगी अविवाहित आई होणार हे कळलं आणि तुमचा तळमळाट झाला . पण तुमच्या मुळे कोणी एक मुलगी अविवाहित आई होणार हे तुम्ही खुशाल पचवलं बाबा ... का ... तर ती अनाथ होती .... तिच्या पुढे मागे कोणी नव्हतं म्हणून ... 

जसं आई वडिलांना चे पुण्य मुलांच्या कामी येतात... तसेच आई वडिलांचे पाप देखिल मुलांना भोगावे लागतात बाबा ... मला लाज वाटतेय की मी तुमची मुलगी आहे . आज मी शेवटची ह्या घरात आले कारण मला तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं . आज पासून तुमचा माझ्याशी काहीच संबंध नाही . तुम्ही वडील आहात माझे म्हणून मी तुमच्या विरोधात तक्रार करणार नाही पण आज पासून तुम्हाला तुमची मुलगी मेली . हा खरंतर माझा भाऊ आहे . पण मी ह्याला माझा मुलगा म्हणून वाढवेन ... आणि जर मला आजन्म अविवाहित आई म्हणून जगावं लागलं तरी मी तयार आहे . चल आत्या आता इथे आपलं काहीच नाही . " 

इतकं बोलून अनघा ने बाळाला आपल्या कुशीत घेतलं आणि मीना ताईं सोबत घरातून बाहेर पडली . 

दूसर्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात ठळक बातमी छापून आली... " शहरातील नामवंत बिझनेस मॅन श्री अजित नाईक ह्यांनी स्वतः ला गोळी घालून आत्महत्या केली . कारण ... अज्ञात . 

समाप्त 

>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>