भाग पाच
" काल संध्याकाळी तू गायनॅकॉलॉजिस्ट कडे गेली होती..."
अजित राव पुन्हा मोठ्या ने ओरडले . अनघा तिच्या बाबांच्या चेहऱ्या कडे टक लावून बघत होती . तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते . अजित रावांच्या डोळ्यात आग दिसत होती . ते खूप चिडले होते .
" काय विचारतोय मी.... उत्तर दे . " ते पुन्हा ओरडले .
अनघा ने फक्त मान हलवून होकार दिला . अजित रावांनी आपला मोर्चा अर्चना ताईंकडे वळवला .
" हे फालतू चे धंदे बंद करा आणि जरा घरा कडे लक्ष द्या . तुला माहीत तरी आहे का की ही गायनिक कडे कधी आणि का गेली होती दिवसाचे बारा तास तुझा मोबाईलवर वेळ जातो, पण मुलीच्या आयुष्यात काय घडतंय, हे तुला कळत नाही का?" . " अजित राव खूप रागात होते .
" अजित !! आता काय ती शाळकरी मुलगी आहे का तिच्या कडे लक्ष ठेवायला मोठी झाली ती आता . तिला तिचं बरं वाईट कळायला नको का ... प्रत्येक गोष्टीसाठी मला जबाबदार धरू नका," अर्चना ताई उलट अजित रावांवर ओरडल्या .
" अगं मूर्ख बाई ... तुला इतकी साधी गोष्ट कळत कशी नाही . आई सोड... पण एक बाई आहेस ना तू . तुला या गोष्टी च गांभिर्य कळायला नको . ही ....ही तुझी मुलगी , लग्ना आधीच गरोदर आहे . कळतंय का तुला...?? जीला तू मोठी झाली म्हणतेस, तिनेच आपल्या घराची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे." अजित राव कडाडले .
" कायssss हे तुम्ही काय बोलताय अजित . कसं शक्य आहे. माझी अनघा असं कधीच करू शकत नाही . " अर्चना ताई आश्चर्यचकित झाल्या . त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
" काय गं अनघा हे सगळं खरं आहे . कोण आहे तो मुलगा . हे ... हे तू काय करून बसलीस . तुला ... तुला कल्पना तरी आहे का....एका अविवाहित आई ची आपल्या सोसायटी मधे काय किंमत असते ती . अगं जगणं कठीण होऊन बसेल तुझं . तुझं करियर , तुझं फ्युचर सगळं ... सगळं मातीमोल होईल गं ...अनघा हे ...हे काय करून बसली तू ...लोक आपली थट्टा करतील, आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मला सांग ... कोण ... कोण आहे तो मुलगा ... अगं बोल .... कोण आहे तो मुलगा अनघा ...??? " अर्चना ताई अनघा वर ओरडल्या .
" दुसरा कोण असणार .... नक्कीच हा तो भिकारडा अमोल असणार . तरी मी सारखा सांगत होतो त्याच्या पासून लांब रहा पण या कार्टी ने माझं ऐकलं नाही . आता भोगा कर्माची फळं ... " अजित राव सोफ्यावर हात आपटत बोलले . त्यांचं मन जणू त्या अपमानाने भरून आलं होतं.
अनघा मुकाट्याने मान खाली घालून सगळं ऐकत होती .तिच्या अंगातलं त्राणच जणू निघून गेलं होतं. तिच्या डोळ्यातून सारखं पाणी वाहत होतं . तिने आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळून घेतल्या होत्या,जणू ती काही दुःख साठवण्याचा प्रयत्न करत होती. . मीना ताई अनघा ला धरून उभ्या होत्या .
" काय हो मीना ताई ....अनघा च्या लहानपणापासून सगळी जबाबदारी मी तुमच्या वर सोपवली होती ना . मग हे सगळं झालं तेव्हा तुमचं लक्ष नव्हतं हिच्या कडे . " अर्चना मीना ताईंना बोलल्या .
"आत्या ला बोलायची काहीच गरज नाही आई . मी चुकले ना मग मला बोल जे काही बोलायचे असेल ते . पण आत्या ला काही बोलू नकोस . " अनघा ने रडत रडत वर बघितलं आणि धीरगंभीर आवाजात अर्चना ताईंना बोलली .
अजित रावांनी पुढे येऊन एक जोरदार फटका अनघा च्या गालावर दिला . तो तडाखा इतका जोरात होता की अनघा एका बाजूला कलंडली.
" ह्या सगळ्या गोष्टींचा विचार शेण खाताना नाही आला . तुला कल्पना तरी आहे का अविवाहित आई हे केवढं मोठं कलंक आहे जे तू आमच्या घराण्याला लावलं आहेस . तुला लाज नाही वाटली आमच्या नावाला काळ फासताना . इतकं सगळं करून सावरून पुन्हा आमच्या समोर तोंड वर करून बोलतेय..... निर्लज्ज मुली .... मला तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही . तू आज च्या आज हे घर सोडून निघून जायचं . मला तू माझ्या डोळ्यासमोर नकोय.... मीना ताई .... तुम्ही तुमचं आणि हिचं सामान बांधा आणि जोवर हिची डिलिव्हरी होत नाही तोवर हिला घेऊन आपल्या फार्महाऊसवर जाऊन रहा . इथे माझ्या सर्कल मधे माझी रेप्यूटेशन आहे , माझ्या बिझनेस सर्कल मधे माझं नाव आहे तिथे हिच्या अश्या अविवाहित आई होण्या मुळे त्याला बट्टा नको लागायला . हिची डिलिव्हरी झाली की मग बघू त्या बाळा च काय करायचं ते . आम्ही आमच्या सर्कल मधे सांगू हिला परदेशात पाठवलं आहे . आज च्या आज निघायची तयारी करा ... "
अजित राव इतकं बोलून जाण्यासाठी वळले तेवढ्यात मीना ताई बोलल्या ...
" पण दादा साहेब ...या अश्या अवस्थेत तिला तिथे ठेवायचं...."
"No more discussion.... मी जे सांगितले ते करा . सामान भरायला घ्या . " अजित राव तिथून निघाले.
" पण दादा साहेब ...." मीना ताईंनी त्यांना अडवण्यासाठी हाक मारली , पण अनघा ने त्यांच्या हाताला धरून नाही म्हणून मान डोलावली.
अर्चना ताई अनघा जवळ आल्या आणि बोलल्या...
" अनघा ... आत्ता बाबा जे म्हणतात तेच कर तेच योग्य आहे . एकदा का तू मोकळी झाली की मग तुला मी परत घेऊन येईन . आणि तिथे मी तुमची सगळी सोय व्यवस्थित करून देईन . फार्महाऊसवर जे देखरेख करतात ते मीना ताईंचे मानस भाऊ च आहेत ते काळजी घेतली सगळी . तुझ्या अकाउंट ला पैसे ट्रान्स्फर करू आम्ही . तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही . तुम्ही आवरून घ्या मी ड्रायव्हर ला सांगते तुम्हाला न्यायाला . "
अनघा आणि मीना ताईंनी एकमेकिंकडे बघितलं आणि काहीही न बोलता आपापल्या रूममध्ये निघून गेल्या . त्यांनी आपल्या बैगा भरल्या आणि , गाडीत बसून फार्महाऊसवर निघून गेल्या .
क्रमशः
>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<