मित्रानो आपण बऱ्याच प्रेम कथा वाचल्या असेल, पहिल्या असेल आणि ऐकल्याही असेल पण ही प्रेम कथा जरा वेगळी आहे. या कथेतील पात्रांसाठी प्रेमाबद्दल असलेले वेगळे रंग, प्रेमाबद्दल असलेल्या वेगळ्या भावना, त्यांचे दृष्टिकोन आणि ध्येय हे या प्रेमकथेला जरा वेगळं बनवत. wait.. wait.., मी तुम्हाला एवढ का बोर करत आहे चला सुरु करूया आपण या प्रेम कथेला.
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1
एक प्रेम कथा अशीही भाग 1मित्रानो आपण बऱ्याच प्रेम कथा वाचल्या असेल, पहिल्या असेल आणि ऐकल्याही असेल पण ही कथा जरा वेगळी आहे. या कथेतील पात्रांसाठी प्रेमाबद्दल असलेले वेगळे रंग, प्रेमाबद्दल असलेल्या वेगळ्या भावना, त्यांचे दृष्टिकोन आणि ध्येय हे या प्रेमकथेला जरा वेगळं बनवत. wait.. wait.., मी तुम्हाला एवढ का बोर करत आहे चला सुरु करूया आपण या प्रेम कथेला. " शेवटी तुझा निर्णय तरी काय? " हे शब्द अभिमन्यूने फोनवर ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे धुके जमा झाले.. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. जीवनात एवढ्या लवकर ही वेळ येईल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. कॉफीचा कप घेऊन तो ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 2
एक प्रेम कथा अशीही.... भाग 2 भाग 1 वरून पुढे अभिमन्यू आणि अनिकेत हे दोघेही हॉस्टेलमध्ये ऍडमिशन करून घेतात. त्यांना खोलीही एकच मिळते. ऋतुजा मॅडम तर तिथल्याच मुळच्या रहिवासी असतात पण थोडं स्वछंदी जीवन जगावं. आपल्या कॉलेजच्या दुनियेत मुक्तपणे वावरावं म्हणून तीसुद्धा होस्टेलला ऍडमिशन करून घेते आणि घरी काय सांगतेय मला शिस्त लावून घ्यायचीय.. खरंच शिस्तच ना. अभिमन्यू आणि अनिकेत चालतच कॉलेजला पोहचतात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कॉलेजमध्ये थंडगार असे वातावरण होते. कॉलेजच्या मुख्य द्वारावर असलेल्या पिंपळाच्या झाडावरून टप.. टप. करत पाण्याचे तुषार अभिमन्यूच्या अंगाला स्पर्शून जात होते. थंडगार वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करीत होती. ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 3
एक प्रेम कथा अशीही.... भाग 3भाग 2 वरून पुढे. बाहेर कसल्यातरी कर्कश्य आवाजाने अभिमन्यू भानावर आला. कॉफीचा कप तर थंड झाला होता. "छे ! साला हे जगही काही काळ एकांत भेटू देणार नाही वाटतं" अभिमन्यू स्वतःशीच म्हणाला. खिडकीच्या बाहेर असलेल्या जगाला तो न्याहाळत होता." दुसऱ्याच्या जीवनात काय सुरु आहे.... ते कुठल्या टप्यावर येऊन पोहचलंय याच काही एक घेणं -देण नाही या जगाला. म्हणजे बघा ना रोजच सकाळी पुष्पे उमलणार, पेपर टाकणारा दूध टाकणारा रोजच येणार, तेच ते चित्रपट त्यांच त्या मालिका, तिच भेसूर वाटणारी दुपार.... काही वेळ झाल्यावर शांतपणे येणारी सायंकाळ आणि शेवटी या सगळ्याला संपवून निद्रिस्त करुण टाकणारी ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 4
एक प्रेम कथा अशीही... भाग 4 भाग 3 वरून पुढे. ऋतुजा पहाटेच हॉस्टेलवरून घरी जायला निघाली होती. वनस्पतीशास्त्राची जात असल्याने तिला बरीच तयारी करायची होती. कित्येक दिवसानंतर आज तिने घरी पाऊल ठेवले होते. आपल्या लाडक्या आई वडिलांना भेटल्यावर तिच्या दुविधा मनाची पालवी पल्लवित झाली होती. तिने लवकर लवकर सर्व आवरायला सुरवात केली. अंघोळ करून झाल्यावर केस सुकविण्यासाठी ती आरश्यासमोर उभी होती. आरश्यात आपले रूप न्याहाळून बघत होती आणि तिथूनच सुरु झाला तिच्या चंचल द्विमनाचा खेळ.पहिलं मन :- कॉलेजमध्ये पहिल्यांदाच नजरेला नजर भेटली... तो आवडला... आम्ही ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 5
एक प्रेम कथा अशीही... भाग 5 भाग 4 वरून पुढे डोंगराच्या उजव्या बाजूला एक ग्रुप वनस्पतीचे वर्गीकरण करीत होता डाव्या बाजूला दुसरा ग्रुप वर वनस्पतीचे निरीक्षण करण्याची जवाबदारी होती. अभिमन्यू आणि अवनी एक एक वनस्पतीला योग्यपणे न्याहाळत होते आणि त्याची योग्य माहिती डायरीत लिहत होते. वरुण सर्वांचे मोबाईल मध्ये फोटो टिपण्यात दंग होता. अनिकेत आणि ऋतुजा तिथे दिसणाऱ्या फुलांचे फ्लोरल रचना वहीत नमूद करीत होते. दूरवरून ऋतुजाची नजर अभिमन्यू आणि अवनीवर पडली. हसत -हसत ते सर्व माहिती डायरीत लिहत होते आणि अतिशय जवळ येऊन काहीतरी हितगुज करीत होते. क्षणातच ऋतुजाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. तिच्या कपाळावर ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 6
एक प्रेम कथा अशीही..... भाग 6भाग 5 वरून पुढे खिडकीच्या काचेवर साचलेल्या थेंबाला ऋतुजाने हळुवारपणे स्पर्श केला. " किती असतात ना हे थेंब काही क्षण या काचेवर व्यतीत करतात आणि दुसऱ्याच क्षणी ते काचेवरून घसरुन जमिनीत विलीन होतात पण जमिनीशी एकरूप होतांना त्या थेंबाना काचेची आठवण येत असेल का? " ऋतुजा स्वतःशीच म्हणाली. या प्रश्नामुळेच कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ते वनस्पतीशास्त्राच्या सहलीपर्यंतचा संपूर्ण आठवणींचा उजाळा झाला होता. त्याची ती पहिली नजर... पहिल्या नजरेतच मनाला आवडलेला तो, स्मितहास्याचा लपंडाप, त्याच्यासोबत केलेला पहिला कपल डान्स सर्व... सर्व.. काही परत अनुभवतेय असेच तिला भासत होते." काय झालं गं ऋतू? काही दिवसापासून बघतेय खूप ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 7
एक प्रेम कथा अशीही.... भाग 7 बाहेर असलेल्या पक्षांच्या किलबिलाटाने अभिमन्यूचे डोळे उघडले. खिडकीतून उन्हाचा एक छोटासा त्याच्या पलंगावर येऊन बसला होता जणू तो ही त्याला निद्रेतून जागे होण्यास सुचवीत होता. अभिमन्यूने घडाळ्यात पहिले. सकाळचे 9 वाजले होते. एक लांब जांभई देऊन आळस घालविण्याचा तो अपुरा प्रयत्न करीत होता. रविवार असल्यामुळे आज त्याची मनसोक्तपणे झोप झाली होती आणि आता वेध लागला होता एका गरमा गरम चहाच्या कपाचा. डोळे चोळत त्याने सर्व आवरायला सुरवात केली. सकाळची सर्व आवरा आवर करून अनिकेत आणि अभिमन्यू होस्टेलच्या बाजूला असलेल्या टपरीवर चहा प्यायला निघाले. रविवार असल्यामुळे आज कसलीही घाई नव्हती. नेहमीचा वर्दळीचा ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 8
एक प्रेम कथा अशीही.... भाग 8 भाग 7 वरून पुढे " मग तुला तर ती दुसऱ्याच दिवशी भेटली ना? "अनिकेतच्या त्या प्रश्नांनी हिरव्यागार बांबूच्या बनात काही काळ तरी अंधारात बुडून गेलेला अभिमन्यू भानावर आला." नाही नंतर तिचा काही थांगपत्ताच लागला नाही. दुसऱ्या दिवशी माझे पाय आपोआपच तिच्या घराकडे वळले पण समोरच दृष्य पाहून माझा हिरमोड झाला. तिच्या घराला भलंमोठं कुलूप लावलं होत. अचानकपणे ती कुठे गायब झाली याच उत्तर तर फक्त तिच्याकडेच आहे. तिच्या प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन ती कुठे गेली आहे या प्रश्नांनी मी त्यांना भांडावून सोडल पण कुणालाच या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं. कितीतरी रात्र तिच्या ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 9
एक प्रेम कथा अशीही... भाग 9 भाग 8 वरून पुढे सूर्य पश्चिमेकडे सरकू लागला होता. आजूबाजूलचा परिसर तांबूस प्रकाशाने न्हाहून निघाला होता. जणू अस्ताला जाणारा सूर्यहि सोने उधळीत असावा असेच भासत होते. अधूनमधून सुंदर असे राघू, मैनेचे थवे आपल्या घरट्याकडे परतत होते. हलक्या हलक्या वर्षासरी वरुणच्या नेत्राला मोरपंखी स्पर्श करीत होत्या. " कही दूर जब दिन ढल जाये सांझ कि दुल्हन बदन चुराये... " कुठेतरी रेडिओवर सुरु असेलेले जुने गाणे त्या सायंकाळचे सौंदर्य अधिकच खुलवत होते. एका हातात गुलाब पुष्पाला अलवार स्पर्श करीत वरुण त्याच्या घराच्या समोर असलेल्या बागेत उभा होता." अरे मित्रा नक्कीच पार्टी करू.. ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 10
भाग 9 वरून पुढे' डुबा डुबा रहता हू आँखो मे तेरी दिवाना बन गया हू मै चाहत मे तेरी दिन गुजरते नही राते कटती नही ..' हॉस्टेलमध्ये सुरु असलेल्या कर्णकर्कश्य स्वरांनी अभिमन्यूची निद्रा भंग पावली. रूममध्ये मुलांचा एकच गोंधळ सुरु होता. सकाळी सकाळीच मुलांनी रूममध्ये दंगामस्ती करायला सुरवात केली होती. एकजण ओढणी अंगावर घेतल्यासारखी मुलींची नक्कल करीत होता. मुलांच्या दंगामस्तीचा जोरही भयंकर वाढत होता .खरंतर अभिमन्यूला अंथरुणातून उठायची जराही इच्छा होत नव्हती; परंतुत्याच्या निरागस श्रुतीला आज तो बघणार या कल्पनेने तो चांगलाच सुखावला होता आणी तेच नाव त्याला अंथरुणातून उठवण्यास पुरेसे होते. प्रेम ही भावनाच मुळी जरा वेगळी आहे ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 11
भाग 10 वरून पुढे श्रुती आणी माझ्यातही जे दोन वर्षामध्ये गैरसमजुतीचे धुके पसरले आहे...खरंतर गैरसमजुतीचे धुके म्हणणं अतिशयोक्तीचे ठरेल जे खूप मोठ्या कालावधीमुळे अबोलपणाचे धुके पसरले आहे ते लवकरात लवकर दूर व्हावं एवढीच इच्छा आहे ' अभिमन्यूच्या मनात बऱ्याच गोष्टी दाटून आल्या होत्या.कानात इअरफोन लावून तो त्याच कॉलेज मागे टाकत समोर समोर सपासप चालत होता. पाऊले आता ज्ञानभारती कॉलेजकडे वळली होती. योगायोगाने त्या पावसाळी वातावरणात गाणंही अगदी साजेस वाजत होत.' पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा पाऊस दाटलेला ,माझ्या घरावरी हा दारास भास आता , हळुवार पावलांचा हळुवार पावलांचा ,पाऊस दाटलेला 'गाणं ऐकता ऐकता तो कधी ज्ञानभारती महाविद्यालयात पोहचला हे ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 12
भाग 11 वरून पुढेश्रुती आणी अभिमन्यू कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पोहचतात. कॅन्टीनमध्ये जराही गर्दी नव्हती. श्रुती दोन कप कॉफीची ऑर्डर देऊन स्मितहास्य देत अभिमन्यूसमोर येऊन ती बसते. चेहऱ्यावर आणलेलं उसनं स्मितहास्य ओळखायला अभिमन्यू जराही चुकला नाही. समोर वाफाळलेले कॉफीचे दोन कप आले होते." हल्ली कॉफि प्यायला आवडत नाही मला. बालपणात म्हणजेच दहावीपर्यंत कॉफी प्यायला फार आवडायचं आणी त्याला कारण म्हणजे तेव्हा सर्व गोष्टी अगदी प्रमाणबद्धपणे सुरळीत होत्या ; पण आता बऱ्याच आवडीनिवडी बदल्याय. कॉलेजमध्ये नव्या ग्रुपसोबत राहून राहून चहा प्यायची सवय झालीय मला .त्यातच ऋतुजाला चहा जास्तच आवडतो ना " मृदू स्वरात अभिमन्यू म्हणाला. त्याच्या बोलण्याचा नक्की उद्देश काय होता हे ...अजून वाचा