तोच समुद्र किनारा..... तोच निळाशार पसरलेला अथांग सागर... पायाखाली असंख्य शंख -शिंपले.... आणि .... आणि रातराणीचा सुगंध.... तेच स्वप्न... विनयला जाग आली कसल्याश्या आवाजाने.. हळूच डोळे उघडले त्याने. बाजूला चंदन होताच, " बाहेर पाऊस पडतो आहे का रे.. " " नाही ...आता कसा पाऊस.. हिवाळा सुरु आहे... पावसाळा संपून २ महिने झाले... झोप तू... तूला भास झाला असेल.. " ," नाही रे... अजूनही आवाज येतो आहे पावसाचा मला... माझ्या कानात घुमतो आहे आवाज त्याचा... सरींचा... पागोळ्यांचा... पानावर पडणाऱ्या थेंबांचा... " चंदनला गहिवरून आलं. " झोप शांत... नको करुस विचार... " विनय तसाच उघड्या डोळ्यांनी छताकडे बघत होता. चंदन बघत होता त्याच्याकडेच. कसा होता

Full Novel

1

रातराणी.... (भाग १ )

तोच समुद्र किनारा..... तोच निळाशार पसरलेला अथांग सागर... पायाखाली असंख्य शंख -शिंपले.... आणि .... आणि रातराणीचा सुगंध.... तेच स्वप्न... विनयला जाग आली कसल्याश्या आवाजाने.. हळूच डोळे उघडले त्याने. बाजूला चंदन होताच, " बाहेर पाऊस पडतो आहे का रे.. " " नाही ...आता कसा पाऊस.. हिवाळा सुरु आहे... पावसाळा संपून २ महिने झाले... झोप तू... तूला भास झाला असेल.. " ," नाही रे... अजूनही आवाज येतो आहे पावसाचा मला... माझ्या कानात घुमतो आहे आवाज त्याचा... सरींचा... पागोळ्यांचा... पानावर पडणाऱ्या थेंबांचा... " चंदनला गहिवरून आलं. " झोप शांत... नको करुस विचार... " विनय तसाच उघड्या डोळ्यांनी छताकडे बघत होता. चंदन बघत होता त्याच्याकडेच. कसा होता ...अजून वाचा

2

रातराणी.... (भाग २ )

दुपारी जेवताना दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. " हे फोटो २ वर्षांपूर्वीचे आहेत.. तेव्हा शेवटचा सण... नाताळ साजरा झाला होता. ... गेल्यावर्षी ... एकही सण ... काही celebration झालेलं नाही या ऑफिसमध्ये... ", " पण व्हायचे ना .... celebration... आता का होतं नाही... " ," व्हायचे... म्हणजे नुसता धिंगाणा.. असायचा ऑफिस मध्ये... आता कस शांत वाटते.. बिलकुल नव्हतं असं ... गजबजलेलं असायचं... प्रत्येक दिवस छान असायचा... दर friday ला दुपारनंतर काहीतरी कार्यक्रम असायचा. आता काहीच होतं नाही... काही गैरसमज झाले... भांडणं झाली... याला एक वर्ष झालं... सगळं बंद झालं... " , " कोणामध्ये भांडणं झाली... " ," एक टीम होती आमची... म्हणजे ...अजून वाचा

3

रातराणी.... (भाग ३ )

चंदन आला १० मिनिटांनी, " कुठे गेला होतास... एक मॅडम बडबडून गेल्या तुझ्यामुळे... " ," कोण आलेलं ? " नावं नाही सांगितलं... तुला मेसेज करून ठेवते असं बोलून पुढे बोलल्या , फोन वाजला कि receive करायचा... तुझा फोन मी कसा उचलणार... बरोबर ना... " विनयने सगळी हकीकत सांगितली. " अशी बोलली का ... बरं " चंदनने मेसेज बघितला. " व्वा !! चांगलीच व्यक्ती भेटली तुला.. " ," का ... काय झालं... ".... विनय ... " आधी सांग... तिला मॅडम वगैरे काही बोललास का.... " ," हो रे ... पण तुला कसं कळते सगळं... " ," तिला आवडतं नाही.... एकेरी बोलायचे तिच्याशी... तुला ...अजून वाचा

4

रातराणी.... (भाग ४ )

" by the way... दिक्षा काय काम करते. " जेवता जेवता विनयने विचारलं. " हा रे .... तुला माहीतच ना... कोण कोण काय करते ते... दिक्षा, आपले सर्व graphics चे काम असते ना... ते करते... तो ग्रुप आहे ना ... designer चा... तिथे असते ती. मोठ्या पोस्ट वर नाही तरी तिचे designing sence छान आहे म्हणून तिचेच विचार घेतात सर्व.. त्यानंतर अव्या... अव्या आपल्या sales department मध्ये आहे. " चंदन बोलत होता. " अविनाश आणि sales मध्ये... कसं possible आहे... " ," त्याच्या भाषेवर नको जाऊ.. तो मराठीत तसाच बोलतो सर्वांशी.. आणि त्याचे इंग्लिश ऐकलंस ना.. चाट पडशील... खरं सांगायचे झाले ...अजून वाचा

5

रातराणी.... (भाग ५)

विनयच्या डोळ्यासमोरुन गेला हा सर्व सिनेमा. काय दिवस होते ना ते.... मंतरलेले दिवस अगदी. किती प्रयन्त केले या सर्वांना आणण्यासाठी. पण सुरुवात झाली ती ... त्या दिवशी. " चंदन .... तू सगळ्यांना मेल करू शकतोस ना एकाचवेळी... " ," सगळे म्हणजे कोण ? " ," पूर्ण ऑफिसला.. " ," का... आणि कसला मेल " ," अरे आज दुपारी ४ वाजता मी एक कार्यक्रम ठेवला आहे. मी गाणी गाणार आहे. " चंदन हसला त्यावर.... " कोणी permission दिली... " , " मोठ्या सरांनी... " ," हो हो... विसरली मी.. तुझी ओळख मोठ्या केबिन मधली आहे... तरी , माझ्या मित्रा... तुला आजच एक ...अजून वाचा

6

रातराणी.... (भाग ६)

" मला माहित आहे, मी नवीन आहे इथे.. तरी बोलतो... दिवसाचे २४ तास, त्यातले झोपेचे ८ तास सोडले तर १६ तासातले.... जवळपास १० तास आपण इथे ऑफिस मधे असतो. घरी गेल्यावर सुद्धा घरातल्याशी इतके बोलणे होतं नाही , जेव्हडे आपण इथल्या लोकांशी बोलतो. एक प्रकारचे कुटुंबच आहे ना हे सगळे.. आणि कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस आपणच साजरा करणार ना.. माहीत आहे तुम्ही कामात सतत बिझी असतात.. म्हणून ... जास्त नाही... फक्त १०-१५ मिनिटांसाठी वेळ काढा... थँक्स.. " म्हणत विनय निघून गेला. विनय निघून गेला तरी अनुजा तिच्या बोलण्याचा विचार करत होती. ...अजून वाचा

7

रातराणी.... (भाग ७)

विनयला सगळं आठवतं होते. दोन महिने झाले ना आज. आपण हॉस्पिटल मधेच आहोत. सगळे येतात चौकशी करायला. हे चौघे अधूनमधून .... अव्या रोज येतो डब्बा घेऊन दुपारचा. दिक्षा, मी सकाळी जागे होण्याआधी रातराणीची फुलं घेऊन येते. अनुजा फार कमी वेळेस येते. हेमंत तर येतोच , दर २ दिवसांनी... सुरुवातीला खूप विचित्र होता ना... पण नंतर चांगला बोलायला लागला. नेहमी कसा राग राग करायचा माझा. तशीच एक भेट आठवली त्याला. त्यादिवशी, विनय ऑफिसच्या आवारात असलेल्या बागेत काही करत होता. चंदन आणि अव्या होता तिथेच. हेमंत आला गेटमधून. विनयला बघितलं त्याने. मुद्दाम हसला त्याला बघून. " हेच होणार होते... सारखा पुढे ...अजून वाचा

8

रातराणी.... (भाग ८)

" excuse me ... अनुजा miss.. " विनयने हाक मारली. " तुम्ही कविता करता ना..." अरेच्या !! याला कसे .. अनुजा विनय जवळ आली. " तुम्हाला कसं कळलं ते... " ," मला माहित आहे... शिवाय तुम्ही गाता आणि गिटार सुद्धा वाजवता ना... बरोबर ना... " याला कसे माहित हे सर्व... अनुजाच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह.. " का बंद केलंत ... तुम्ही तर ऑफिसमध्ये सुद्धा गायचा ना... मग आता का बंद केलंत सारे... " यावर मात्र अनुजाकडे उत्तर नव्हते आणि तिला तो विषयही नको होता. तशीच वळली आणि चालू लागली. विनय काही बोलू लागला मोठयाने. " कोण आहेस तू... सकाळी डोळे उघडल्या वर पहिल्यांदा ...अजून वाचा

9

रातराणी.... (भाग ९)

विनयने त्याची गाडी वळवली ती हॉस्पिटलच्या दिशेने. काही "काम" होते त्याचे. काही रिपोर्ट्स घेऊन निघाला तसे त्याला एक ओळखीचे भेटले. त्यांच्याशी गप्पा मारत उभा राहिला. अचानक, भांडणाचा आवाज येऊ लागला. " आलोच " विनयने त्या डॉक्टरांचा निरोप घेतला आणि आवाजाच्या दिशेने गेला. बघतो तर हेमंत भांडत होता. " अक्कल आहे का जरा तरी ... तिथे माझ्या भावाला धड उभं राहता येत नाही. आणि तुम्ही बोलता , रांगेत उभे रहा. " हेमंत चढ्या आवाजात बोलत होता. " हो सर.... तरी सुद्धा तुमच्या पेशंट साठी बेड availble नाही करू शकत इतक्या जलद.... " , " इतके मोठे हॉस्पिटल आहे... आणि एकही बेड नाही... ...अजून वाचा

10

रातराणी.... (भाग १०)

आदल्या दिवशीच , विनयने काही ठरवलं होते. तशीच तयारी करून तो निघाला ऑफिसच्या दिशेने. वाटेत दिक्षा दिसली चालताना. बुलेट समोरच थांबवली. " काय मॅडम ... कधी पासून हाक मारतो आहे.. एवढं काय लक्ष नाही तुझं... " दिक्षाने पाहिलं त्याच्याकडे आणि कानातले इअरफोन काढले. " हे होते ना कानात .... बोल... काय बोलत होतास ... " ," मी बोललो .... ऑफिस मध्ये चालली आहेस ना.. बस मागे... जाऊ एकत्र... " तिने एकदा विनयकडे पाहिलं आणि नंतर बुलेटकडे. " नको ... राहू दे... चालत जाऊ शकते मी... " दीक्षाने पुन्हा इअरफोन लावले कानात आणि चालू लागली. विनयने पुन्हा गाडी सुरु केली , तिच्या पुढयात ...अजून वाचा

11

रातराणी.... (भाग ११)

" हो ... आदल्या दिवशीच तर परीने या दोघांना बोलताना ऐकलं. "..... अनुजा " थांब अनुजा ... मी सांगतो हेमंतला एक लहान भाऊ आहे हे इथे फक्त चंदन , अवि आणि आता मला माहित आहे. पूर्ण ऑफिस मध्ये कोणालाच माहिती नाही याची. तो लहान आहे आणि सारखा आजारी असतो. हेमंत सुट्टीवर असतो कधीतरी त्याचे कारण तेच... त्यादिवशी सुद्धा , त्याकाळात हेमंत हॉस्पिटल मधेच होता. आधीच tension मध्ये, त्यात इकडचे celebration ची तयारी... तरी आलेला मीटिंगला. आता त्याचे आणखी एक surprise होते. ते अवि सांगेल. आणि हेमंत मिटिंग मध्ये काय बोलला ते सुद्धा सांगेल. " विनयने अविला बोलायला सांगितले. " हेमंतला ...अजून वाचा

12

रातराणी.... (भाग १२)

विनयला सुद्धा छान वाटले. संद्याकाळ पर्यंत ऑफिस मधले वातावरण सुद्धा बदलले. हे सगळे पुन्हा एकमेकांशी बोलायला लागले, हि बातमी सर्व ऑफिस भर पसरली. विनय निघतच होता घरी, आणि दिक्षाचा मॅसेज आला PC वर... " भेटूया का ऑफिस खाली.. " विनयला हसायला आलं. त्याने रिप्लाय केला. " मी घरी निघतो आहे.... तू सुद्धा निघत असशील तर तुला सोडतो घरी... वाटेत बोलू.. " तिचा लगेच रिप्लाय... " ठीक आहे... मीही निघते आहे.. पार्किंग मध्ये उभा राहा.. येते मी... " विनय १० मिनिटांनी खाली आला. " हा बोल.. काही बोलायचे होते तुला... " विनय दिक्षा समोर उभा राहिला. " इथेच बोलूया का... ".... ...अजून वाचा

13

रातराणी.... (भाग १३)

तसा विनय हसू लागला. " काही नाही तसं ... छान वाटते तिच्याशी बोलताना... थंड हवेची झुळूक वाटते ती.. आणि smile बघितली नाही... काय फील होते .. ते नाही explain करू शकत. " विनय वेगळ्याच जगात गेलेला बोलताना. " तसं काही नाही माहित आहे. पण दिक्षा आणि तुझ्यात .. नक्की काही सुरु आहे... तसा तू आता पूर्ण ऑफिसचा हिरो झाला आहेस.. सर्व मुली तुझ्यावर फिदा असतात.. तुझ्यामुळेच , हे सर्व सुरु झालं हे सुद्धा मान्य... तरी .... दिक्षा तुला like करते आणि तुलाही ती आवडते .. हे मला कळते... छान सुरु आहे ... असच राहू दे... " म्हणत चंदन निघून गेला. ...अजून वाचा

14

रातराणी.... (भाग १४)

विनय वरती येतंच होता. तेव्हढयात अनुजाचा फोन आला. " कुठे आहेस ? " ," मी खाली आहे.. येतोच आहे ", " wait !! मी येते खाली.. थांब... " तिने फोन कट्ट केला. अरेच्या !! तिच्याकडे लक्षच नाही आज. सारखा दिक्षाकडेच बघतो आहे. हिला राग तर आला नसेल ना... विचार सुरु होते आणि अनुजा आली. डोळे दिपून गेले पुन्हा... तिनेही साडीच नेसली होती. जराशी हिरवी छटा.. त्यात गुलाबी रंग मिसळलेला... कडेला सोनेरी रंगाचे आवरण... पाठीवर एक मण्यांची माळ रेंगाळत होती. त्यात दिसायला आधीच सुंदर .. मग काय ... भान हरपून जावे असे ते रूप.. तरीच सगळे वेडे होतात , हिच्यासाठी. ...अजून वाचा

15

रातराणी.... (भाग १५)

पावसाचा पहिला दिवस आणि त्यात दिवस भर मिटिंग. बाहेर पावसाळी वातावरण होते तरी पाऊस पडला नव्हता. दिक्षाचा मूड सकाळ रोमँटिक होता. त्यात पहिला पाऊस...पहिलं प्रेम ... आणि मिटिंग मध्ये विनय सुद्धा होताच कि... " propose तरी करणार आहेस का कधी " , दिक्षा विनयकडे पाहत मनातल्या मनात बोलली. त्याच क्षणाला विनयने चमकून दिक्षाकडे पाहिलं. बापरे !! याला ऐकायला गेले कि काय ... सहज तिच्या मनात विचार आला. हट्ट !! असं असते का कुठे, त्याला कस जाईल ऐकायला ..... येडू कुठली... दिक्षा स्वतःशीच हसली. एका मोठ्या मीटिंग रूम मध्ये, या दोघांसोबत आणखी खूप जण होते. कसलेसे presentation होते. दिक्षा एका ...अजून वाचा

16

रातराणी.... (भाग १६)

असाच एक दिवस... जोराचा पाऊस होता. ऑफिसमध्ये त्यावेळी फक्त चंदन आणि हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच माणसं... अश्या पावसात विनय ऑफिस मध्ये. पण चंदनला नेहमी पेक्षा वेगळा वाटला. आला तोच खुर्चीवर बसला पट्कन. केवढा दम लागलेला त्याला. १०-१५ मिनिटे झाली तरी श्वासावर नियंत्रण आले नव्हते. काम सुरु केले विनयने त्याचे. आणखी काही मिनिटे गेली. " चंदन ... चंदन !! " विनयने चंदनला जोरात हाक मारली. जोरा -जोराने श्वास घेत होता विनय. " काय..... काय झालं विनय.... विनय... " चंदन घाबरला. काही बोलायच्या आतच विनय बसल्या जागी बेशुद्ध झाला. धावपळ करत चंदन आणि काही सहकाऱ्यांनी विनयला त्याच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय