Raatrani - 13 books and stories free download online pdf in Marathi

रातराणी.... (भाग १३)

तसा विनय हसू लागला. " काही नाही तसं ... छान वाटते तिच्याशी बोलताना... थंड हवेची झुळूक वाटते ती.. आणि तिची smile बघितली नाही... काय फील होते .. ते नाही explain करू शकत. " विनय वेगळ्याच जगात गेलेला बोलताना.
" तसं काही नाही माहित आहे. पण दिक्षा आणि तुझ्यात .. नक्की काही सुरु आहे... तसा तू आता पूर्ण ऑफिसचा हिरो झाला आहेस.. सर्व मुली तुझ्यावर फिदा असतात.. तुझ्यामुळेच , हे सर्व सुरु झालं हे सुद्धा मान्य... तरी .... दिक्षा तुला like करते आणि तुलाही ती आवडते .. हे मला कळते... छान सुरु आहे ... असच राहू दे... " म्हणत चंदन निघून गेला. विनय सुद्धा खुश होता.


finally , तो दिवस उगवला. सकाळपासूनच खूप लोकं आलेली ऑफिसमध्ये... तयारी सुरु होती. कोणी रांगोळी काढत होते, फुलांची तोरणं बांधत होते. रंगीबेरंगी कंदील लावले होते. अनुजा , दिक्षा सकाळीच आलेल्या. सोबत अवि , हेमंत होतेच. सर्व कसोशीने लक्ष घालत होते. कुठे काही राहायला नको म्हणून. इतक्या दिवसांनी काही होतं होते. मग, तसंच झालं पाहिजे ना काहीतरी.. सेलेब्रेशन... विनय जरा उशिराने येणार होता. त्यामुळे ज्यांनी तयारी केलेली होती, त्या मुली... त्याच्याच येण्याची वाट बघत होत्या.. फोटो काढायचे होते ना सोबत..


दिक्षा आज छान दिसतं होती. इतक्या दिवसांनी... नाही, इतक्या महिन्यांनी आज ऑफिसमध्ये काहीतरी function होतं होते. ठेवणीतली साडी नेसली होती तिने. फिक्कट पिवळा रंग... जरासा फिक्कट पांढरा रंग बोललात तरी चालेल. त्याला सोनेरी रंगाची किनार होती. पिवळ्या रंगाच्या रेघांनी आणि त्यावर मध्ये मध्ये असलेल्या मोरपंखानी सजली होती साडी ती. त्यात ती साडी " दिक्षा " ने नेसली होती ना... अधिक उठावदार दिसतं होती. कदाचित तिच्यामुळेच त्या साडीला उठाव आला असावा. मेकअप चा भडकपणा तिला आधी पासूनच आवडायचा नाही. त्यामुळे साधेपणात किती सौंदर्य असते ते तिला बघूनच कळत होते. सारेच तिची स्तुती करत होते... करणारच ना... दिसतं होती तशी...


पण तिचे लक्ष कुठे होते..... शोधत होती कोणाला तरी... बोलता बोलता ऑफिस भर फेरी झाली तिची. कोण कोण आले आहे ते बघत. जवळपास सर्वच आलेले. बाकीचे काय बोलतात हे तिला नको होते.... तिला फक्त " त्याला " कशी वाटते मी आज, हे ऐकायचे होते.... " त्याची " comment पाहिजे होती तिला. काही ५ -६ जण सोडले तर... बाकी सर्वच नटून आलेले. मुलांनी सदरा, कुर्ता ... जे शोभेल ते परिधान केलेलं. मुलींनी तर साडीलाच पसंती दिली होती. व्वा !! सगळेच छान दिसतं आहेत.. दिक्षाची अजून एक प्रदक्षिणा झाली... पण "तो " कुठे दिसला नाही तिला. ज्यासाठी एवढं सकाळपासून तयारी केली... तो तर दिसतच नाही. आलाच नाही का... ?? येणार होता ना.... काल विचारलं असते तर त्याला... समोरून चंदन येताना दिसला....
" चंदन ... ऐक ना... आला नाही का तो ... " , दिक्षाच्या बोलण्यात चिंता होती. चंदनला जरासा हसायला आले.
" तो म्हणजे कोण... " हसला चंदन. दिक्षाने त्याच्या पाठीवर चापटी मारली...
" विनय ... विनय नाही आला का... असं विचारते आहे मी... माहित असून सुद्धा... " ,
" काही बोलला नाही... नसेल येणारं... " चंदनच्या या वाक्यावर तिची घालमेल वाढली. चुळबुळ करू लागली. चंदनाला पुन्हा हसू आलं ..
" किती वाट बघत आहेत माणसं .. कोणाची तरी... " ,
" गप्प रे... सगळा मूड ऑफ झाला.." ,
" अगं ... मग कॉल कर ना त्याला... नंबर तर असेल ना... त्याचा... " ,
" त्याने दिला होता .... मीच save करून घेतला नाही... काय करू... तू करतोस का कॉल.... बोलावं ना त्याला.. " दिक्षाचे डोळे भरत आले होते...
" रडू नकोस ग... नाहीतर मेकअप खराब होईल.... येतो आहे विनय ... मस्करी केली तुझी... " चंदन जोरात हसला. दिक्षाने पुन्हा त्याच्या पाठीवर चापटी मारली. आणि हसू लागली.
" तुझ्या डोळ्यात दिसते हा सगळं .. " चंदन बोलून गेला.


विनय आलंच शेवटी ... आल्या आल्या कामाला सुरुवात केली. तरी आधीच बरीचशी तयारी झालेली, त्यामुळे त्याला जास्त काही करावं लागलं नाही. बाकी सर्व आलेत का ते पाहू लागला. पण मुली सोडतात का त्याला. फोटो... सेल्फी सुरु झालं त्याच्यासोबत.


किती आखडतो आहे आज.... १०-१५ मिनिटे झाली याला येऊन.... एकदाही बघितलं नाही माझ्याकडे याने.... दिक्षा एका कोपऱ्यात उभी राहून विनयकडे कधीची बघत होती. विनय सोबत बाकीच्या मुली फोटो काढत होत्या ना.... त्याला कोणी सोडतच नव्हते.... लाडका झाला होता ना सर्वांचा आता... त्याने सुद्धा छान कुर्ता घातला होता आज. " हिरो , handsome ... " हि विशेषणे जरी त्याला लागू होतं नसेल तरी तो होता तसाच... सगळ्यांची मने जिंकली होती त्याने.


दिक्षा तशीच उभी अजून. " जळण्याचा वास येतो आहे का तुला.... " चंदन दिक्षा जवळ येतं म्हणाला.
" नाही... " तिने अगदी सहज उत्तर दिलं...
" नक्की ना वास येतं नाही.. " चंदनने पुन्हा विचारलं. तेव्हा तिला कळलं...
" नालायका... गप्प ना... मी का जळू... " ,
" नाही... कोणाचा हक्क फोटो काढायचा.... आणि कोण काढते आहे... " चंदन हसला परत.
" जातोस का आता ... कि मारू ... " दिक्षाने हात उगारला मारायला त्याला. तसा तो पुढे पळून गेला. जाताना मात्र त्याने विनयच्या कानात काही सांगितलं.


विनय इथे- तिथे बघू लागला. एका कोपऱ्यात त्याला दिक्षा उभी दिसली. आणि.... आणि बघतच राहिला तिच्याकडे.... किती सुंदर !! डोळ्याचे पारणे फिटले. त्या फोटोत त्याला रस नव्हता आता. तिथे उभा असला तरी त्याचे लक्ष फक्त दीक्षाकडे होते. दिक्षाला सुद्धा कळलं ते. तशी ती तिथून दुसऱ्या ठिकाणी निघून गेली. विनय सुद्धा तिच्या मागोमाग... गाठलं त्याने दिक्षाला.
" Hi .... " विनयने थांबवल तिला. " येणार नव्हतीस ना आज ... काल तर बोलली होतीस तस.. " .
" जाऊ का परत मग... घर तसं जवळच आहे माझं... " ,
" तस नाही ... but thanks ... आलीस म्हणून... " ,
" हम्म... झाले का फोटो काढून.. आज काय तुला खूप demand आहे... " , विनय हसला त्यावर.
" नको काढू का फोटो... त्याच बोलतात फोटो काढू... तू बोलतेस तर नाही काढत... " विनयच्या या वाक्यावर दिक्षा बघू लागली त्याकडे.


" कधी पासून ऐकतोस माझं... " ,
" हेच तर... तुला कधी समजत नाही हे.. किती गोष्टीत बदल केला आहे मी तुझ्यासाठी... कधी कळणार तुला.. " ,
" का बदलतो आहेस स्वतःला... आणि आधी का नाही सांगितलं... " ,
" या गोष्टी सांगायच्या नसतात मॅडम....समजून घेयाच्या असतात मनातून.. " हे दोघे बोलत होते तर दिक्षाला घेऊन गेल्या तिच्या मैत्रिणी फोटो साठी. विनयने दुरुनच बघत होता. खरच आज किती छान दिसते आहे ना दिक्षा... काही आले होते त्याच्या मनात.. बोलणार तर कसं तिला.... सगळ्या मुली एकत्र उभ्या होत्या... काही सोडले तर सगळेच होते तिथे.. किती उठून दिसते ना या सगळ्यात दिक्षा... उन्हात सुद्धा चांदणे दिसावे असे... सोनेरी झळाळी आली आहे तिच्या चेहऱ्यावर... गालावरती गुलाबी लाली दिसते आहे... किती खुश आहे ना... काय comment देऊ हिला..


काही वेळाने सगळे पांगले. छान झाला कार्यक्रम. विनय अजूनही दिक्षाला बघत होता. जास्त बोलणे झालेच नाही.. काही विचार करून विनय तिच्या जवळ आला.
" थोडे चालूया का एकत्र ... " ,
" कुठे ? " ,
" असच ... खाली.... पार्किंग मध्ये.. ये खाली ... मी वाट बघतो " विनय आला सुद्धा खाली. दिक्षाला गंमत वाटली. खाली आली तेव्हा विनय होता वाट बघत तिची. ती आली तस त्याने त्याचे कपडे ठीकठाक केले. दिक्षा हसली...
" तू हसू नकोस ग.... कसली भारी smile आहे तुझी... " विनय पट्कन बोलून गेला.
" हो का... मग बाकीच्या मुलीची तारीफ करून झाली.... मला काहीच बोलला नाहीस... " ,
" काय बोलू सांग... काहीच सुचत नाही तू समोर आलीस कि... आणि तुला माहित आहे मी काय बोलणार ते... " ,
" तरी बोल ... मला ऐकायचे आहे... " ,
" ठीक आहे... ऐक... रातराणी सारखी दिसते आहेस आज... सगळ्यात वेगळी... रातराणी कशी नाजूक असते.. तरी स्वतःचे अस्तित्व दाखवून देते ती... तशी वाटते आहेस... किंवा एखादी गजल... सुंदर अशी... सारखी सारखी मनात गुणगुणावी अशी... खरं सांगू का... जमलं असतं ना... तर मिठीच मारली असती तुला... आणि सोडलं नसतं... " ,
"बापरे !! " दिक्षाला हसू आलं...
" फोटो काढूया ना.. " विनयने विचारलं...
" चालेल.. " ... तिच्या मनातलं पूर्ण झालेलं...
" चल निघूया.. वर वाट बघत असतील ना... " दिक्षा बोलली...
" थांब जरा... " विनयने थांबवलं.. " एक मनात होते... तुझ्या गालाला स्पर्श करायचा आहे मला... " ,
" का रे ... " ,
" स्वप्न !! ... किती मऊ असतील ना ते... please ... एकदाच... " , " हम्म .. " दिक्षा समोर उभी राहिली पुन्हा त्याच्या... हळूच त्याने तिच्या गालाला स्पर्श केला.तेव्हा एक थंड हवेचा झोत या दोघांकडे झेपावला . दिक्षाचं शहारून गेली. विनय सुद्धा तसाच तिच्याकडे पाहत... लाजली दिक्षा... तशीच पळत पळत ती वर ऑफिसमध्ये आली. हसत हसत....


-------------------------- क्रमश: ------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED