Raatrani - 4 books and stories free download online pdf in Marathi

रातराणी.... (भाग ४ )

" by the way... दिक्षा काय काम करते. " जेवता जेवता विनयने विचारलं.
" हा रे .... तुला माहीतच नाही ना... कोण कोण काय करते ते... दिक्षा, आपले सर्व graphics चे काम असते ना... ते करते... तो ग्रुप आहे ना ... designer चा... तिथे असते ती. मोठ्या पोस्ट वर नाही तरी तिचे designing sence छान आहे म्हणून तिचेच विचार घेतात सर्व.. त्यानंतर अव्या... अव्या आपल्या sales department मध्ये आहे. " चंदन बोलत होता.
" अविनाश आणि sales मध्ये... कसं possible आहे... " ,
" त्याच्या भाषेवर नको जाऊ.. तो मराठीत तसाच बोलतो सर्वांशी.. आणि त्याचे इंग्लिश ऐकलंस ना.. चाट पडशील... खरं सांगायचे झाले तर तो आहे म्हणून आपला sale वाढला आहे... " विनयला समजलं.
" ४ मधले २ तर भेटले... बाकी दोघे कुठे आहेत... " विनय विचारतच होता, तर त्याला समोरून एक मुलगा येताना दिसला. तिथे जेवत असलेल्या सर्वांचे लक्ष त्याकडे गेलं. विनयच्या लक्षात आलं ते. तोही त्याकडे बघू लागला. उंच गोरापान , घारे डोळे... perfect dressing... त्याला साजेसे पायात शूज... आणि साजेशी उंची... एकदा मॉडेल यावा अशी त्याची entry झाली. विनय भारावून गेला.
" काय personality आहे यार ... " विनय चट्कन बोलला.
" आहेच तसा तो... " चंदनही त्याकडे पाहत म्हणाला.
" म्हणजे असं अचानक मनात आलं त्याकडे बघून ... आपण काहीच नाही रे त्यामानाने... बघ ना.... जेवण सोडून सगळेच त्याकडे बघत आहेत.. " विनयने उसासा टाकला.
" तिसरे पात्र... हेमंत... राजबिंडा .... राजाच म्हणू शकतोस... मार्केटिंग मध्ये आहे.. ऑफिस मधल्या बऱ्याच मुली मरतात याच्यावर... हे बघूनच कळलं असेल ना तुला... पहिले अव्या आणि हेमंत ... एकत्र काम करायचे. रोज एकत्र यायचे हि ऑफिसला... ती भांडणे झाली आणि यांचे बोलणे कमी झाले... मित्रच होते घट्ट ... हा हेमंत, त्याच्या लुक मुळे आणि बोलण्यामुळे... समोरच्याला मोहवून टाकतो.. अव्या आणि हा... दोघांनी किती नवीन प्रोजेक्ट मिळवून दिले... कसला भारी बोलतो हा.. तरी गर्विष्ठ खूप... कारण काय... त्याचे रूप... अशी personality कोणालाही भुरळ घालते. तरी जास्त बोलत नाही कोणाशी... अव्या सगळ्यांशी बोलतो.. हेमंत , त्याचे काम असेल तरच बोलतो... मुलींना आवडत असला तरी त्याचा attitude नाही आवडत. even , मुलींना देखील complex निर्माण करतो हा.. " चंदन विनयकडे पाहत बोलला.


" मला झाला बाबा complex ... खरंच , solid आहेत सर्व... " विनयने चंदनच्या पाठीवर थाप मारली.
" आणखी एक बाकी आहे... ",
" कोण ? " ,
" दिसेल बघ तुला... वीज आहे... दिसेल तेव्हा डोळे दिपून जातील.."


===========================================================


विनयला आज काम नव्हतं. infact , कालच त्याचे काम झालेलं. मग काय करणार, ऑफिसमध्ये असंच बसून सुद्धा कंटाळा आला. " मी जाऊन येतो खाली .. " विनयने चंदनला सांगितलं आणि तो खाली आला. त्याच्या bike वर येऊन बसला. बघितलं तर कोणीच नव्हते तिथे.... बरं झालं, निवांत गाणी ऐकूया. कानाला हेडफोन लावले आणि आवडीची गाणी सुरु केली मोबाईलवर. छान , मंद वारा वाहत होता. पावसाचे काही रेंगाळलेले ढग, उगाचच आभाळभर फिरत होते वाऱ्यासोबत. थंड हवामान... एकंदरीत , खूपच छान वातावरण होते. त्यात मोबाईल वर त्याच्या आवडीच्या गजल सुरु होत्या.


अश्यातच एक scooty आली. एक मुलगी त्यावर. विनयचं लक्ष गेलं तिच्यावर. तोंडावर स्कार्फ बांधलेला. चेहरा दिसतं नव्हता. पण डोळे... अहाहा !! काय डोळे होते ते.. एखाद्याने नजरेचे बाण चालवावे आणि ते आपण काही तक्रार न करता झेलावे , तसं झालं विनयचे. बघतच राहिला त्या डोळ्यात. तिने त्याच्या पासून काही अंतरावर scooty पार्क केली. नकळत तिची नजर विनयच्या नजरेला भिडली..... क्षणभरासाठीच... आणि विनयच्या मोबाईल वर गाणे लागले.... " होशवालों को खबर क्या.... ,बेखुदी क्या चीज़ है..... ,इश्क कीजिये फिर समझिये, ज़िन्दगी क्या चीज़ है.... " ... अगदी कमाल ना... अद्भुत होते ते काहीसं... filmy situation.. !!


तिने मग विनयकडे पाठ केली आणि तिची scooty सरळ उभी केली. हळूच चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला. अजूनही पाठीमोरीच ... बरं का... , विनय कधीचा बघत होता तिला. फिक्कट निळ्या रंगाचा ड्रेस तिचा. महागातला असणार नक्की. पायात सॅंडल सुद्धा भारी. हवेचा झोत आला तिच्या दिशेने. तिच्या perfume चा सुगंध... विनयच्या नाकातून थेट मनात शिरला. व्वा !! शहारून सोडलं हिने तर... सगळं slow motion मध्ये सुरु आहे असंच विनय ला भासत होते.


हळूच ती मागे वळली..केसांच्या बटा चेहऱ्यावर आल्या त्या वाऱ्यामुळे. एक हलकासा झटका देतं तिने ते केस मागे नेले. दिसला पूर्ण चेहरा तिचा. डोळ्यांनी तर आधीच वेड लावलं होतं. त्यात भर पडली ती त्या आखीव -रेखीव चेहऱ्याची... गोरी.. उजळ चेहरा... विनय तर गपगार झाला ते सौंदर्य बघून .. त्यात कानात ते कातिल गाणे सुरु होते... ती हलके हलके पावलं टाकत विनयच्या बाजूने गेली. जाता जाता एक कटाक्ष टाकला तिने विनय वर... नजरानजर झालीच पुन्हा.. त्यावेळी सुरु असलेली गाण्याची ओळ विनयच्या कानात सामावून गेली.... " उनसे नज़रें क्या मिलीं.... , रौशन फिज़ाएँ हो गयीं... , आज जाना प्यार की... जादूगरी क्या चीज़ है... " ... विनयचा जीवच गेला तिथे. कोणी बघा किंवा बघू नका... मी माझं अस्तित्व दाखवणारच... , असा attitude तिचा... गेली पुढे ती, विनय तर ती पार नजरे आड होईपर्यत बघत होता. एका क्षणाला ती आत वळली. वाकून बघता बघता bike वरून तोल गेला विनयचा. पडता पडता सांभाळलं स्वतःला त्याने.


विनय थोड्यावेळाने जागेवर येऊन बसला. आणि बसला तो बसलाच. कितीतरी वेळ तसाच बसून होता तो.
" काय झालं रे.. " चंदनने विचारलं.
" विचारू नकोस... काय बघितलं ते सांगता येणार नाही.... " चंदनला हे विचित्र वाटलं.
" सकाळी सकाळी भूत बघितलंस कि काय... " ,
" नाही रे... एक मुलगी दिसली खाली... मला तिचे वर्णन करता येणार नाही... म्हणजे काहीतरी जबरदस्त होती ती... डोळे दिपून गेले. " चंदन समजून गेला.
" हि होती का... " त्याने मोबाईल मध्ये असलेला एक फोटो दाखवला.
" हीच... हीच होती ती... पण तुला कसं कळलं हे सुद्धा " विनय सावरून बसला.
" बोललो होतो ना.. वीज आहे ती ... दिसेल तेव्हा डोळे दिपून जातील... तसेच झाले ना.. " ,चंदन हसत म्हणाला .
" म्हणजे .... अनुजा... " चंदनने होकारार्थी मान हलवली.
" yes my friend .... HR आहे ती आपल्या ऑफिसमध्ये... काही दिवस सुट्टीवर होती... आजच पुन्हा जॉईन करणार होती.. तेव्हाच तुला दिसली आज.. इतक्या उशिरा... नाहीतर ती ९ ला हजर असते. " ,
" HR ...HR बोललास का.. " ,
" हो, HR आहे ती... त्यामुळे जरा सांभाळून वाग तिच्याशी.. " ,
" तापट आहे का .. चेहऱ्यावरून तर वाटत नाही... " ,
" आधी माझे बोलणे तर पूर्ण होऊ दे रे... " ,
" सॉरी सॉरी... बोल तू.. " ,
" तापट नाही... पण तिला कसे सर्व perfect लागते. चुका केलेल्या आवडत नाहीत. शिस्तप्रिय आहे खूप. मोजकेच बोलते. परंतु त्या हेमंत सारखा attitude नाही हा.... बडबड अजिबात आवडत नाही. काम एके काम... तुला ती अशीच.. उगाच कुठे बोलत उभी दिसणार नाही... फिरताना दिसणार नाही... पण मला वाटते, तुझ्याशी पटेल तिचे... ",
" कस काय .. " ,
" तीही कविता करते... तू सुद्धा.. " ,
" वा !! तुला हे हि माहित आहे तर ... मी कविता करतो ते... " ,
" मला सगळे कळते रे... कविता करतोस ... गाणी गातोस... गिटार वाजवायचे वेड आहे.. तिचे सुद्धा हेच छंद आहेत.. " ,
" तरी किती भारी दिसते ना ती.. तो हेमंत कसा handsome आहे... त्यापेक्षा सुद्धा किती सुंदर आहे हि.. " ,
" हेच आवडत नाही तीला... तिची स्तुती...ऑफिसमधल्या प्रत्येक मुलीचा एकच विषय ... अनुजा... फक्त दिक्षाच आहे, जी तिच्या समोर उभी राहू शकते. बाकी कोणालाच जमत नाही ते. घाबरत नाहीत तरी एक प्रकारचा दरारा आहे तिचा. नजर बघितली ना तिची.. काहीतरी feel झालं असेल नक्की... " ,
" अरे .... फील बोलतोस... थेट हृदयाला भिडली ती नजर.. अजूनही जाणवते आहे मला. भेदक नजर. त्यात ती दिसायला सुंदर. बघ.. आताही शहारा आला अंगावर. " .....विनय...
" तिला वीज का बोललो ते समजलं असेल तुला.. बरेच जण, फक्त तिला बघायला येतात ऑफिसमध्ये.. . तुला माहित नाही.. तिचा time ठरलेला आहे... बरोबर सकाळी ९ वाजता येते ती... त्या पार्किंग पासून आपल्या ऑफिसच्या लिफ्ट पर्यंत मुलं उभी असतात... तिला बघायला फक्त. आणि हे सर्व तिलाही माहित आहे.. पण ती कोणाला भाव देतं नाही... हेही तितकंच खरं.... तर जरा सांभाळून .. बरं का... " चंदन पुन्हा कामाला लागला. विनयने त्याचे काम सुरु केलं तरी त्याच्या डोळ्यासमोरून अनुजा जातंच नव्हती.

" म्हणजे एक कळलं " विनय थोड्यावेळाने बोलला. चंदन त्याकडे वळला... " सगळेच ग्रेट आहेत... " ,
" बोललो होतो आधीच.. हे चार जणं या ऑफिस वर राज्य करतात. आपले मोठे सर आहेत बॉस म्हणून.. तरी हे आहेत म्हणून ऑफिस आहे. आणि म्हणूनच हे ४ होते त्या टीम मध्ये... घट्ट मित्र चौघेही... आता फक्त कामापुरतेच बोलतात. " ,
" त्यात तुही होतास ना.. " ,
" होतो.. अजूनही आहे... पण हे चौघे खूप छान मित्र होते.. एकत्र जेवण.. एकत्रच निघायचे घरी. यात एकी होती म्हणून हे सर्व ऑफिस छान आनंदी होते... आता बघ कस शांत शांत असते.. ",
" एकत्र आणू यांना.. ",
" सोप्प नाही ते... पाहिलंस ना... किती जबरदस्त आहेत ते... ते एकत्र होते ती देवाची कृपा... पुन्हा एकत्र येतील का माहित नाही... प्रत्येकाला सांभाळणे ... खरच कठीण आहे.. " ,
" मी करतो प्रयन्त... " विनय मनापासून बोलला.
" कर try .. पण बघ... सांभाळून जरा... "


-------------------------- क्रमश: ------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED