Shraddha Suman books and stories free download online pdf in Marathi

श्रद्धा सुमन

श्रद्धा सुमन

मराठी कविता संग्रह

मनीष गोडे

  • समर्पित्
  • ही पुस्तक माझ्या स्मृतीशेष कवियत्री आईला एक आदरांजली स्वरुप भेंट..!
  • स्व. (डॉ.) कमल गोडे

    B.A., M.A., Ph.D. (हिन्दी साहित्य)

    जन्म : १३/०७/१९४५ देहावसान : २२/०५/१९८२

  • आभार
  • मी सर्वप्रथम आभारी आहे माझ्या स्मृतीशेष आईचा, जिच्या आशिर्वादामुळे, मी काही ओळ्या लिह्ण्यात समर्थ झालो.
  • श्रींच्या क़ृपेने ह्या ओळ्या पुस्तक स्वरुपात प्रकाशित होत आहे, याचा आनन्द तर आहेच, तरी सुद्धा माझी अर्धांगिनी, सौ. सुषमा गोडे, हिच्या मदती शिवाय, माझ्या सार्ख्या नवोदित लेखकाच्या लेखनीला वळन आले नसते, हे विशेष..! प्रत्येक कविता व लेख, यांच्यातल्या व्याकरणचुका, सम्पादन आणि समालोचन, ती निश्काम भावाने पुर्ण करित असते, या बद्दल मी तिचासुद्धा आभारी आहे.

    मी आभारी आहे माझ्या एका सोशल मीडीया ग्रुप आपला परीवार यांचा, ज्यानीं मला लिहायला प्रेरित केले आणि त्याचीच परिणिती म्हणुन ही पुस्तक आज प्रकाशित होत आहे..!

    मी सर्व वाचकांचा सुद्धा आभारी आहे, ज्यांनी माझ्या लिखणाला पसंत केले, वाचुन योग्य तो मान दिला, त्या बद्दल मी आपण सर्वांचा ऋणी आहे..!

  • मनीष गोडे
  • ***

  • मी ...!
  • मी, माझ्या, स्वतःला शोधीत आहे,शोधीत आहे माझ्या अस्तित्वाला..!मी, माझ्यातलं 'मी' शोधत् आहे..!!

    मी जर ते शोधू शकलो, तर तो माझा,

    सर्वात खास दिवस ठरणार आहे..!ज्या दिवशी मी माझे स्वास्तित्व शोधू शकलो,

    त्याच दिवशी मी तो कायमचा सोडणार आहे..!!

    कारण, माणूस जो पर्यन्त आपल्यातले,

    'मी' सोडणार नाही, तो पर्यन्त माणुस माणसांच्या,

    कामत येणार नाही, माणुसकी जपनार नाही..!

    हे मी केले, ते माझ्या मुळे झाले,

    मी आहे तो पर्यन्त तुम्ही सुखी,

    मी गेलो कि तुम्ही दुःखी..!!

    कसे समजवायचे यांना, जो पर्यन्त तुमच्यात

    प्राण आहे, तो पर्यन्त तुमचे अस्तित्व आहे..!ज्या दिवशी तो निघुन जाईन, सगळे इथेच राहून जाईल..!!

    मग मी काय, की तुम्ही काय, सगळे हवेत

    विलीन होऊन जाईन... !

    सगळे जागच्या जागीच राहून जाईन...!!जागच्या जागीच राहून जाईन..!!!

  • माणूस ...!
  • माणूस हा पाण्यासारखा शुद्ध,

    आणि बेरंग जन्माला येतो...!ज्याच्या घरी येतो, तिथले रंग घेतो,

    ज्या क्षेत्रात येतो, तिथली भाषा शिकतो,

    आणि ज्या देशात येतो, तिथले नागरिकत्व घेतो...!!

    जर बेरंग पाण्यामधे केसरी रंग टाकला,

    की तो रंग घेतो, साखर टाकली की चव घेतो,

    आणि प्यालात ओतले की आकार घेतो..!

    तर मग लहान-मोठे, श्रीमंत-गरीब,

    गोरा-काळा, हा भेद भाव कशासाठी..?कशासाठी जीवाचे राण, कोणासाठी

    आणि किती, याची सुद्धा मर्यादा नाही..!!

    पाणी सुद्धा स्वतःची स्तुती करीत नाही,

    की गुणगान ही करीत नाहीं, मग माणूस

    का बरं स्वतःवर इतका अहंकार करतो..?का बरं वर्णभेद, जातीभेद,

    भाषाभेद वर राजनीती करतो..?

    खुप प्रयत्न केले पण उत्तर सापडले नाही...!तुम्हाला सापडला तर मला सांगाल का...?

    आई …!

    रोज पहाटे,

    माझ्या खिड़कीतुन...,एक तारका...

    सहज माझ्याकड़े बघत असते...!

    डोळे उघडले कि मी तिला बघतो...,अनं ती मंद मंद हँसते...!

    हँसत हँसत मावळते...

    पुन्हा दुसर्या दिवशी,

    माझ्याकड़े लपून-छपुन बघायला...!!

    बघायला, माझ्या बाळाला झोप तर लागली ना?

    आणि मी उठल्यावर,

    ती निवांतपने झोपी जाते..!!!

  • बाबा ...!
  • भेदतात मला त्यांचे डोळे,

    प्रश्न विचारतात, “का हे म्हातारपण..?”हाथ हळूच जुड़तात त्यांचे,

    कठिन होतो मला समजायला...हा नमस्कार की याचना...?

    वाटते कधी, हा शेवटचा निरोप तर नव्हे..?किती कठिन असतो हा म्हातारपण..!मी दिसलो की हळूच उठतात,

    किंबहुना उठण्याचे प्रयत्न करतात,काहीतरी करण्याचा, करत राहण्याचा भास करून देतात...!!

    मी गेल्यावर परत शून्यात चालले जातात..,डोळे वाट पाहतात, “कधी मला एकदाची सुटका मिळेल..!”काल जो माणूस घराचा मालक होता,

    आज अंथरून भरवतो म्हणून,

    घराबाहेर राखनदाराचा जीवन जगतो...!!

    असे वाटते...

    आपले नाते, आता आपले राहिले नाही..!

    आपले जीवन, आता आपले राहिले नाही..!!

    आता... आपले राहिले नाही..!!!

    वासरु …!

    खुशखबर...! खुशखबर...!!

    एका वासरांनी जन्म घेतला,

    या जगात प्रथम श्वास घेतला,

    आणि आपल्या पूर्वजन्मानुसार,

    कर्म भोगायला,

    स्वतःला त्रास द्याला सज्ज झाला...!

    त्याच्या आईने पुनः निःस्वाश सोडला...

    त्यांच्या मालकाला परत काही लीटर दूध,

    रोज़ द्यायचा आश्वासन दिला...!!

    कारण फुकटचे खायला,

    फक्त माणसालाच जमते,

    जनावर आपल्या हिस्याचा चारा,

    माणसाच्या बाळाची भूख मिटवायला,

    आपल्या रक्ताचे पाणी करतात,

    गोड दूध परत करून,

    अजून काही दिवस स्वतः जगण्यासाठी,

    जीवन उसने घेतात...!!

    एकदा का गायी दूध देणे बंद करणार,

    तर ती कुठल्या कत्तलखान्यात पोहचणाऱ,

    तिचे तिलाच माहीत नसणार...!!

    एके दिवशी एक फोर-व्हीलर आला

    आणि गोठ्या जवळ उभा झाला,

    माझे मन आशंकित झाले...मी धावतच बाहेर आलो..!

    आणि धड़धड़त्या छातीने

    विचारले त्या गायवाल्याला...

    "गाय विकत आहे का...?"

    "नाही" तो म्हणाला, "वासरु विकला,

    साडे पाँच हजारला...!"मी त्याच्याकड़े बघतच राहीलो...

    किती सहज बोलून गेला हो हा गडी...!!

    माणुस विकू शकतो काहो आपला लेकरु...

    साडे पाँच हजाराला...?बरं झाले ती गाय आहे...

    लौकरच सगळे विसरणाऱ आणि

    पुन्हा एका नवीन वसराला जन्म देणार...!!

    तुम्ही तिच्याशी कशेपण वागा, चारा द्या,

    नका देऊ, ती आपली माणुसकी नाही विसरणाऱ...!विसरला तो माणूस, आणि माणूस आता,

    खर्या अर्थाए जनावर झाला...!!

    पेपरात रोज़ वाचयला मिळतो..,

    कि माणुस आता जनावर झाला..!

    माणुस आता... जनावर झाला...!!

  • ती …!
  • ती अबोल झाली...!दिवसरात्र बोलणारी पोर,जणू बोलनच विसरली...!!रामप्रहरी उठून, झाडून, शेण-सड़ा टाकून,आम्ही उठायच्या आधीच, ती कामाला लागायची..!!!

    प्रेमाने प्रांगण स्वच्छ करून, गाईंना चारापाणी द्यायची..!!बाबा तिचे दूध दोहायचे आणि घरो-घरी विकायचे..!हिच त्यांची दिनचर्या, हाच त्यांचे पोटभरण्याचे साधन..!!कालांतराने तिचे लग्न ठरले, सगळेजन खुश होते..!देणे-घेणे, पाहूणचार, सगळ थाटात उरकले..!!

    देखण्या नवर्या सोबत, ती आपल्या सासरी निघुन गेली...!बघता-बघता दोन-तीन महीने निघुन गेले..!!एके दिवशी सहज़ तिचा आवाज़ ऐकू आला...

    मी विचारले, ती आली का?"हो..." म्हणुन सगळे आपल्या कामाला लागले...!"जावई दिसत नाही आहे..?" मी विचारले...

    परत इकडचे-तिकडचे उत्तर मिळाले..!!

    एके दिवशी बायको म्हणाली, "ती तर पँद्रहा दिवसा पासून माहेरीच आहे..!"ऐकुन डोके सुन्न झाले...!!

    अनेक प्रश्न एका मागे एक गिरक्या घेऊ लागले..!

    सगळे तर व्यवस्थित पार पडले, मागीतले ते दिले...!!

    मग पोर का बरं परत आली..?

    नंतर कळले, मुलगा देखणा, घरचा गड़गंज होता..!

    हे बघुनच काहीही चौकशी न करता, तिला दिल्या गेले..!!

    कळले... रोज़ पिऊन यायचा आणि तिला मारायचा..!शेवटी सगळे सोडून पोर माहरी परत आली,

    आणि जणू तिची वाचाच गेली..!!

    ती आता काहिच बोलत नाही..!

    काहिच तिला उमळत नाही...!!ती आता अबोल झाली,

    आता ती अबोल झाली...!!!

  • जीवनात …!
  • सहज होणे हे खुप कष्टकर...

    आणि असहज/अवघड़ होणे हे सुखकर...!

    सहजा-सहजी होणारी गोष्ट, आपण करतो अवघड़... !!

    आदी पत्र लिहून मनातल्या भावना कळत होते सहज...!आता स्टिकर्स आणि स्माईलीस वापरून सुद्धा,

    जीवन झाले आहे अवघड़...!!

    आदी प्रेम व्यक्त करणे होते किती सहज...!आता डेटिंग करून सुद्धा जीवन झाले आहे अवघड़...!!

    आदी चांदण्याबघणे होते किती सहज...!आता मास्ट-लाईटमुळे तेही झाले आहे अवघड़...!!

    आदी सकाळी झोप उघड़ने होते किती सहज...!आता अलार्म लावून सुद्धा, उठने झाले आहे अवघड़...!!

    आदी लग्न-समारंभात वाजंत्री मिळत होते सहज...!आता डीजे शिवाय कार्यक्रम करने झाले आहे अवघड़...!!

    आदी घरोघरी, मिष्टान्न बनत होते किती सहज...!आता पूरण-पोळी बनविणे सुद्धा झाली आहे अवघड़...!!

    आदी घरोघरी, बाळंतपण होत होते सहज...!आता बाळ थांबने सुद्धा झाले आहे अवघड़...!!

    आदी तप करून, देव सुद्धा भेटत होते सहज...!आता अनेक जन्म घेऊन सुद्धा,

    मिळने झाले आहे अवघड़...!!

    आदी मित्रांना भेटता येत होते सहज...!आता एफ-बी वर सुद्धा भेंट झाली आहे अवघड़...!!

  • मोक्ष …!
  • एके दिवशी ती म्हणाली, "मला तुझ्या सोबत,

    सात जन्म राहायचे आहे..!"मी म्हणालो, "हाच आपला सातवा जन्म समझ..!"

    ती रुसली, "म्हणुनच का माझ्या मागे यायचे..!मला पत्र लिहायचे,

    भेटून गेल्यावर परत फोन करायचे..!!

    तासंतास बोलत राहायचे..!माझ्या शिवाय तुला करमत नाही, म्हणायचे..!!

    आम्ही माहेरी गेलो कि लगेच दुसर्या दिवशी

    घेयायला यायचे..!तुमच्या शिवाय कसे जगणार, असा म्हणायचे..!!

    आता तुझे माझ्या वर प्रेम नाही..!व्हॉटस्एप्, फेसबूक शिवाय तुला काही सुचत नाही..!!"

    मी हसलो... आणि म्हणालो, "म्हणुनच का

    मी इतक्या दुरुन आलो, आणि तीन वर्ष

    वर-वधु सुचक पुस्तकात, तुला शोधीत बसलो..!अगं, तुला भेटायला देवानी मला पाठविले आहे...!!

    या जीवनाच्या चक्रातुन तुला काढायला सांगितले आहे...!!!"

    आपल्याला आता वर्लड-टूरवर नव्हे...

    युनिवर्स-टूरवर जायचं आहे..!

    जिथे फक्त तू आणि मी आश्णार,

    तिथे जाऊँन राहायचं आहे..!!

    याच जन्मी जगुया साता जन्माचे जीवन..!

    मोक्षकड़े करुया वाटचाल, करुया स्वतःला अर्पण...!!करुया स्वतःला अर्पण..!!!

  • व्हॅनवाला …!
  • एरवी, व्हॅनवाला आणि आपल्या पाल्यांमधे,

    नकळत एक नातं गुम्फुन जातो..!त्याचे आपल्या मुलान सोबत एक नातं जुडून जातो..!!

    त्याचे एकामेका सोबत बोलणे, भांडने,

    ओरडंने, सगळे सुरळीत रित्या सुरु असते..!

    ना त्याचा आपल्याला राग येतो,

    ना त्या व्हॅनवाल्याला..!वेळ प्रसंगी आपली बाजू निभवुन घेतो,

    पैशे उशीरा दिले तरी अड्जेस्ट करून घेतो..!!

    अश्या प्रकारे वर्ष निघुन जातो आणि

    शेवटच्या दिवशी तो मुलांना ट्रीट देतो..!कधी चॉकलेट, बिस्किट तर कधी समोसे,

    आणि ज्याला जमले, त्याच्या घरी बनतात दोसे..!!

    अशी गुम्फते प्रेमाची ही चंगड़, दुसर्या वर्षी

    पुन्हा सुरु होते, व्हॅनवाल्याशी भानगड़..!एके दिवशी बायकोच्या शाळेत एक फ़ोन आला...

    तिच्या वर्गातल्या मुलांचा व्हॅनवाला,

    अचानक मरण पावला..!!

    मुलं होते छोटे, पण कळत होते त्यांना सगळं,

    एक मुलगा तिच्या कुशीत, राडायला लागला..!मैडम.., आता तो कद्धी नाहीं येणार?

    मग रोज़ आम्हाला कोण नेणार..??

    मन दाटुन आले तिचे, कसं समजवणार..!व्हॅनवाला आणि मुलांचे नाते काय असतात,

    हे आपल्याला कधीच नाही उमजणार...!!

    आपल्याला कधीच नाही समजणार...!!!

  • माझं गाँव …!
  • आठवतय मला मझं गाँव...!तिथले कवलारु घरं, घरातून निघनारं धूर,पाण्याच्या खिराड्या, रुंद रस्ते,

    बैलबंड्या, अंगणात तुळस,विहिरी आणि पाण्याचे कळस..!!

    आठवतय मला मझं गाँव...!तिथली नदी, नदीवरचे पूल,

    पुलावरुन उड्या घेत मुले,नदीवर कपडे घूत बाया,आणि नदी काठी विटेच्या ठिया..!!

    आठवतय मला मझं गाँव...!तिथली एकमजली शाळा,शाळासमोर गुळाच्या कांडया,चारं-बोरं पिंगर पिपरमिंट,आणि संतराच्या गोळ्या..!!

    आठवतय मला मझं गाँव...!तिथले मारुतीचे मंदिर,मंदिरात रात्रीचे किर्तन,सकाळी राम मंदिरची आरती,आणि संध्याकाळी मशिदीची अज़ान..!!

    आठवतय मला मझं गाँव...!तिथली रोजची गुजरी,कांदे-भजीचे दूकान, गुळाच्या भेल्या,तेलाच्या घान्या, प्रिंटिंग प्रेस,चाहाची टापरी आणि आठवडी बाजार..!!

    आठवतय मला मझं गाँव...!विहिरीच्या पाण्यानी आंघोळ,गरम चाहा आणि डबल रोटी तोस,थैलीत पुस्तके, कड़ीचा डबा,हाफ-प्यान्ट आणि प्लास्टिकची चप्पल..!!

    आठवतय मला मझं गाँव...!संक्रांतित पतंगीचा मांजा,पोळ्यात बैलांची पंगत,दिवाळीत गाईनचे नाँच,आणि होळीत पळसांचे रंग..!!

    आठवतय मला मझं गाँव...!कुद्दूस की चाल, बहिरा बूढ़ी,पडाये मेंबर, गोटे खात सकर्या,त्याचे भुस्याचे पोते,आणि फ़कीर बाबांचा भिक्षा पात्र..!!

    आठवतय मला मझं गाँव...!तिथली गोटमार, पंचशील टॉकिज़,माझा पहिला चित्रपट, महाराजचे समोसे,गुलाबचे चने, सन्तर्यांच्या मंड्या,आणि कापसाच्या जिनिंग मिल..!!

    पण आता कुठे राहिले माझे गाँव..?बदलून गेले आहे लोकं, बदलून गेले गाँव,पण माझ्या बालमनातले गाँव,अजुन ही साठवून ठेविले आहे...मी... माझे गाँव...!माझ्या आठवणीतले गाँव..!!

  • नेत्रहिन …!
  • आपण आणि नेत्रहीन व्यक्तिनमधे खुप फरक असतो..!तो न बघता सगळे काही बघु शकतो,आणि आपण बघुनसुद्धा न बघण्याचे सोंग करतो...!!

    एक फरक अजुन असतो...!तो न बघता खरं बोलतो,आणि आपण सारे बघुनसुद्धा खोटी साक्ष देतो...!!

    नेत्रहीन व्यक्ति कधीच आपला मार्ग विसरत नाही,आणि आपण नेहमी आपला मार्ग विसरतो...!!

    त्याचं कधीच कुनाशी भांडन होत नाही,

    कि शिव्या ही देत नाही,आणि आपल्या बोलण्याची सुरुवातच,

    शिव्या दिल्या शिवाय करीत नाही...!!

    आता मला सांगा, खरे नेत्रहीन कोण..?ते, ज्यांना डोळे नाही की ते,

    ज्यांना डोळे असून सुद्धा दिसत नाही..??

  • बार बाला …!
  • तिला...तिच्या मुलाला खूप शिकवायचे होते..!शिकवून साहेब बनवायचे होते..!!

    लज्जा, अब्रु, रात्रं-दिवस,

    कश्याची ही फिकर न करता,

    ती आपल्या कामत बेधुंद असायची..!

    ध्यास फक्त एकच, आपल्या पोराला,

    साहेब बनवायचे..!त्याला मानाचा आयुष्य द्यायचे..!!

    एकट्या आईला, आपल्या बाळाला मोठे करणे,

    खुप कठिन असते..!त्यातुन एका असभ्य कामाला जाणार्या आईला,

    तर फारच कठिन असते..!!

    पण पोटाची खड्गी भरायला,

    देव सुद्धा साथ देत नाही..!अन बिनबापाच्या पोराचे स्वपनं,

    पूर्ण करण्यासाठी सुद्धा,माणूस सुद्धा साथ देत नाही..!!

    अशेच ते दोघे जगत होते एक एक दिवस..!एके दिवशी, अचानक तीला,

    कामावरुन काढण्यात आले..!

    डांस-बार बंद होत आहे,

    सरकार कडून एक वटहुकुम आले..!!

    आता काय करणार, कुठे जाणार,

    कोण काम देणार..!

    मुलाला साहेब कसे करणार,

    अश्या लाख प्रश्न गिरक्या घालत होते..!!

    उत्तर कही सापड़ेना,

    काम कोणी देयीना..!जगणे झाले होते कठीन,

    त्याहुन मरणं झाले होते कठीन..!!

    दहा वर्षानी परत डांस-बार सुरु होणार,

    माहीत झाल्यावर..!ती हसली... पाण्याचे दोन थेंब,

    खाली घसरले तिच्या गालावर...!!

    स्वप्नातुन बाहेर आली आणि

    परत गल्ली-बोळीतला कचरा...वेचायला लागली...!

    आणि तीचा साहेब, त्याच हॉटेलात,वेटरचा काम करीत...!!आई कड़े बघत होता,आपल्या आईकड़े बघत होता..!!!

  • वांझोटी …!
  • एखाद्या झाड़ाला फळं येत नसेल,तर तो उपडुन फेकता येतं..!

    एखाद्या माणसाकडून काम होत नसेल,तर त्याला कामावरुन काढता येतं..!

    एखाद्या पशुला पिल्लं होत नसेल,तर त्याचा सुद्धा त्याग करता येतं..!

    पण, एखाद्या स्त्रीला बाळ होत नसेल,तर तिचा सुद्धा त्याग कराल..?की पुरुषालाला जवाबदार धराल..?

    प्रश्न फार मार्मिक आहे...!उत्तर सापडत नाही आहे..!!

    किंबहुना प्रयत्न होत नाही आहे..!उत्तर आपल्या हाती आहे..!!

    एखाद्या अनाथाला नाथाची गरज़ आहे,एखाद्या पोरक्याला माय-बापाची गरज आहे..!

    करा आपलं मन मोठं,द्या आसरा एका गरजूला..!पकड़ा तिचे बोट,सजवा आपल्या घराला..!!

    देवकी पेक्षा नेहमी यशोधा धनी,समझुनघ्या हि बाब आपल्या मनी..!घ्या दत्तक मुलीला...!! द्या तिला आसरा...द्या तिला निवारा...!!!

  • शरदाचं चांदनं …!
  • शरदाचं चांदनं...पुन्हा उगविलं आज,घेउनिया...स्वप्नांचं साज़..!
  • आला आहे घेऊन...जुन्या आठवणी...तुझ्या माझ्या..!

    काही, दुधा सारखे गोड...!तर काही, चिवड्या सारखे तिखट...!!

  • दान …!
  • पूर्वी, दान देणारा आणि दान घेणारा,

    अशे दोनच् वर्ग होते..!हल्ली, एक तीसरा वर्ग अस्तित्वात् आला आहे...!!आणि तो म्हणजे दान मागणारा...!!!

    दान करा, दान पेटीत पैशे टाका,अशे सर्रास म्हंणारे लोकं दिसतात..!

    दान देणारा व् दान घेणारा हे समाजामधे,

    सामंजस्य साधणारे, अशे दोन वर्ग होते..!!

    तर मग, दान मागणार्याला काय म्हणायचं ..!!!

  • गृहिणी …!
  • बर्याच गृहिणींचे आयुष्य,

    हा फेसबुक सारखे असते..!दर दिवाळीला डी.पी. बदलते...स्टेटस मात्र तेच असते..!!

    घर संभाळते, घरच्यांची सेवा करते..!वेळ मिळाले तर आरश्यात बघते ...मागच्यावर्षी पेक्षा, यावर्षी,काही केस जास्त पिकले..!!

    ती हसून टाळून जाते ...आपल्या केसानपेक्षा,नवर्याच्या केसांना ...मेहँदी लावून देते ..!!

    वर्षानुवर्ष तिचा हाच स्टेटस असते..!स्वतःपेक्षा, नवर्याच्या पोस्टस् लाईक करते...मात्र स्वतःच्या चेहर्याच्या सुरकूट्या ...मेकअपनी झाकत जाते ...!

    बर्याच गृहिणींचे आयुष्य ...हे फेसबुक सारखे असते ...!डी.पी. बदलते, पण...स्टेटस मात्र तेच असते..!! ..!!!

  • भाऊवीज …!
  • दिवशी भाऊवीजी,समझुनी मनोभाव..!

    भाऊ विनविते,तुझीया अभाव..!!

    वाट पाहतो भाऊ,घेउनिया ओवळनी...!

    ताई, आवडी प्रेमभाव,ताई, आवडी प्रेमभाव...!!

  • मृत्यु …!
  • एकदा मला कुणी प्रश्न विचारले...काय आहे मृत्यु..? मी म्हटले,

    "जीवनाचा उद्गम आहे मृत्यु...जगण्याला कारक आहे मृत्यु...!

    देवाला भेटण्याचे द्वार आहे मृत्यु...!चूका दुरुस्त करण्याचे माध्यम आहे मृत्यु..!!

    शाश्वत सत्य आहे मृत्यु...शिव आहे, सूंदर आहे मृत्यु...!!!"

  • छावा...!
  • दोन टपोरे डोळे त्याचे,मिश्या मोठी मोठी..!

    नाक त्याची होती दबली,कान छोटी छोटी..!!

    एके दिवशी बघुन दचकला,पाण्यात् प्रतिबिम्ब..!

    डोळे, पट्या दिसू लागल्या,मोठा झाला टिम्ब..!!

    अभिमानी, झाला तो थोडा,पंजा सरसावला पुढे..!

    तितक्यात, एक आवाज़ आला,थांब, जाऊ नको पुढे..!!

    अजुन शिकायचे आहे तुला,जंगलातली रीत..!

    सांभाळ लेकरा प्रत्येक पाऊल,गाऊ लाहनगे गीत..!!

    गरजे शिवाय मारू कुणाला,नकोस् देऊ त्रास..!

    गरजे पेक्षा जास्तीचे,नकोस् अट्टाहास..!!

    ऐकुनी, स्मित हास्य करीत,थांबला त्याचा आव्हान..!

    मोठा होऊनी, मी पण होणार,बाबान् सारखे सामर्थ्यवान..,शक्तिशाली व महान..!!!

  • प्रश्न …!
  • किती प्रश्न पडतात...कसं बोलायचं..!

    समजून घे सखी...माझ्या मनातलं..!!

    किती प्रश्न पडतात...कसं लिहायचं..!

    उमजुन घे सखी...माझ्या मनातलं..!!

    सावरुनी घे.. सांभाळूनी घे,सखी... माझ्या मनातलं..!!!

  • मुलगी वाचवा, मुलगी शिकवा …!
  • स्वप्नांच्या दुनियेतुन येणार मी,

    आनंदी आनंद तुम्हा देणार मी..!

    सगळयांची लाडकी होणार मी,

    जीवन हा अर्पण करणार मी..!!

    शिकुन नाव कमविणार मी,

    उज्वल हा नाव करणार मी..!

    आयुष्याची होड जिंकणार मी,

    रडण्याराला हाशनं शिकविणार मी..!!

    एक नाही, दोन घरं सजविणार मी,

    सगळयांचं साथ निभविणार मी..!

    फक्त एकच कराल उपकार मझ्यावर,

    आईला सतविणार ना त्रास देणार तुम्ही..!!

    नाहीतर रुसुन बशणार मी,

    येण्या आधीच् निघुण जाणार मी..!

    मग कधीच नाही परतणार मी,

    नाही कधीच परत... येणार मी..!!

  • भेट आणि दुरावा …!
  • ती भेट, भेटच कशी..!

    ज्यात दुराव्याचा दुःख नाही..!!

    तो दुरवा, दुरावाच कसा..!

    ज्यात भेटण्याचं सुख नाही..!!

    ते चालणं, चालणंच कसं..!

    ज्यात थांबण्याचं भास नाही..!!

    ते थांबणं, थांबणच कसं..!

    ज्यात चालण्याचं आभास नाही..!!

    तो अंधकार, अंधकारच कसा..!

    ज्यात प्रकाशाचा आवेग नाही..!!

    तो प्रकाश, प्रकाशच कसा..!

    ज्यात अंधकाराचा समावेश नाही..!!

    ती आत्मा, आत्माच कशी..!

    जिच्यावर शरीराचा आवरण नाही..!!

    तो शरीर, शरीरच कसा..!

    जिच्यातुन आत्म्याचा निर्गमन नाही..!!

  • दिप …!
  • दिप, तूच आहेस मार्गदर्शक या मनाचा..,

    तूच तर आहेस, रक्षक या देहाचा..!

    दिप, तूच आहेस पथप्रदर्शक या उपवनाचा..,

    तूच तर आहेस, शासक या जीवनाचा..!!

    दिप, तूच आहेस भाग्यविधाता या चितवनाचा,

    तूच तर आहेस, नायक मझ्या अन्तर्मनाचा..!

    दिप, तूच आहेस शाश्वत सत्य या जगाचा..,

    तूच तर आहेस, शिव, शंकर सगळ्या जणाचा..!!

  • चारोळ्या …!
  • तु म्हणतोस, तुझ्यात काही खोट नाही,
  • एकदा, आर्शयात निरखुन बघ तर खरा..!
  • तु म्हणतोस, तुझ्यासारखा कोणी सज्जन नाही,
  • अरे, एकदा स्वतात डोकावुन बघ तर खरा..!!
  • किती नशिबवान आहे मी...
  • कि सोन्या-चांदीने भरुन आहे माझे ताट..!
  • सकाळी सुर्याचा प्रकाश आणिरात्री चांदण्यानी भरलेला हा आकाश..!!
  • धन-त्रयोदशी …!
  • का मागु मी तुला धन..?

    जेव्हा तुच आहे मझ्या सोबत..!

    का मागु मी तुला ऐश्वर्य..?

    जेव्हा तुच आहे मझ्या सोबत..!

  • बालपन …!
  • सकाळची ऊन, बेधुंद हवा...

    कोकिळेची कुक, पक्षिंचा थवा..!आंब्याचे बाग, बोरीतले बोर...नारळाची केर, मधमाश्यांचे पोळ..!

    आंबट त्या चिंचा, करवंदाचे कचपन,सुटला हो मागे, माझा तो बालपन...!!

    साईकिलचे टायर, इब्बी अन डंडा...गायीचे दूध आणि कोंबडीचे अंडा..!!पतंगीचे मांजा, घानीतले तेल...बैलांची बंडी, पटरीवर रेल..!

    मुल्लाची दाड़ी, काज़ीची अचकन,सुटला हो मागे, माझा तो बालपन...!!

    सुटले त्या वाटा, तुटले ते स्वप्न...तो घर - तो दूकान, राहलानं माझे...!त्या गल्ली, त्या बोळींनी बघितले

    माझा तो बालपन..

    सुटला हो मागे, माझा तो बालपन...!!

  • सूर्य तुला नमन …!
  • स्वर्णालंकारीत किरणांच्या रथावर अग्रसर,या सृष्टिच्या प्रत्येकाच्या अन्तर्मनावर..!प्रतिबिंब आपला उमटवायला तत्पर...हे, सूर्य तुला नमन..!!

    पाहाटे, आईच्या मायेनी उठविणारे,अंधकारातुन प्रकाशाकडे जाण्याकरिता..!बियाला अंकुरित करायला तत्पर...हे, सूर्य तुला नमन..!!

    भर दुपारी, ऊष्माचा संचार करुनी,समृधीचे मुकुटे, प्रत्येकाच्या डोक्यावर..!ठेवण्याकरीता तत्पर...हे, सूर्य तुला नमन..!!

    संध्याकाळी, मोठा लाल टिळा लावुनी,पाखरं पश्चिमेला, घराकडे निघालेली..!भुख त्यांची भागवण्याकरिता तत्पर...

    हे, सूर्य तुला नमन..!!हे, सूर्य तुला त्रिवार नमन..!!!

  • धागे दोरे …!
  • काही विणले, काही विणता, विणू लागलो,

    जीवनाचे धागे-दोरे..!

    काही रंगले, काही रंगता, रंगू लागलो,

    जीवनाचे धागे-दोरे..!

    काही स्पर्शले, काही स्पर्शिता, स्पर्शू लागलो,

    जीवनाचे धागे-दोरे..!

    काही विळघळले, काही विळघळता,

    विळघळू लागलो,

    जीवनाचे धागे-दोरे..!

    विळघळले माझे अहंकार,

    स्पर्शिले तुझे मन..!

    रंगले माझे कैनवास,

    विणले तुझे सपन..!!

    अशेच बनतात आहे.. !.जीवनाचे धागे-दोरे..!

    माझ्या जीवनाचे धागे-दोरे..!

    माझ्या जीवनाचे धागे-दोरे...!!

  • प्रतिद्वंद …!
  • मी आहे, या जगाचा बादशाह,

    गरजला मानव एके दिवशी..!पृथ्वी, आकाश, पाण्यावर,राज करीन मी एके दिवशी..!!

    तोड़ले पहाड़, रस्ते बनविले,जोडल्या नद्यां, नहर बनविले..!चंद्र, मंगल, राहु-केतु पर्यंत,फिरुन येइल मी एके दिवशी..!!

    जंगलं कापले, शेत बनविले,धन-धान्याचे ढिगं लाविले..!अथाह समुद्राच्या ओटी मधुनी,मोती आणिन एके दिवशी..!!

    ऐकुन धरणी, माती बोलली,लाख कमवुनी घे सोणे-चांदी..!लाख जमवुनी घे हिरे-मोती,ज्या दिवशी भरेल वेळ तुझी..!!

    येशिल सगळं तिथेचं सोडुनिया,मला भेटायला एके दिवशी..!मला भेटायला एके दिवशी..!!

  • अँधार वाटा …!
  • काय कारण आहे कि अमेरिकेत,

    शाळेत जातात मुले सातव्या वर्षी..!

    आणि आपल्या भारता मधे,

    लाईन लावतात दुसर्या वर्षी..?

    कारण त्यानां बनायचे आहे,

    सुख उपभोगणारा फक्त एक मालक..!

    आणि आपल्या मुलानां,

    बनायचं असते एक चांगला सेवक..!!

    चांगला सेवक बनण्याखातर,छडी मास्तरची खात राहिले..!मुलं आपुले शाळेत जावुनी,यंत्र मानवच् बनत राहिले..!!

    लिहुन, वाचुन, शाळेत जावुनी,चांगले मजुरच् बनत राहिले..!समझा, विचार करा, नष्ट करा,वेळ राहता या सिस्टम ला..!!

    नाहितर एक दिवशी, मुले आपले...!भटकत राहतील या अंधार वाटा..!!

    भटकत राहतील या अंधार वाटा..!!!

  • स्क्रॉल …!
  • कुठे राहले वेळ हो इतका,

    कि वाचू लिहू मी आयुष्यभर..!

    सुरु केले नाही कि संपुनी गेली

    एका स्क्रॉल मधे ही जिन्दगी..!!

    कुठे वेळ आहे थांबायला जेव्हा,

    लोड होत असते, चित्रध्वनि..!

    जीवनाचा पान पलटत आहे,एका स्क्रॉल मधे ही जिन्दगी..!!

    कुठे वेळ हो इतका माझा कि,

    स्वतःवर टाकु एक नजर..!

    घे, चालची संस्क़ृती आपली,

    एका स्क्रॉल मधे ही जिन्दगी..!!

    वेळ संपविन्या आदि आठव तू,

    काय सुटले या जीवनी..!

    काळचक्र हा फिरवत राहणार,

    एका स्क्रॉल मधे ही जिन्दगी..!!एका स्क्रॉल मधे ही जिन्दगी..!!!

  • इंटरवल …!
  • इंटरवलात् जगण्यारांनो...ट्रिंग ट्रिंग नी सुरु होवुनी,ट्रिंग ट्रिंग वर संपणार कधी..!हे जाणुनघेण्या आदिच्...सुरु होते एक नवीन फिल्म..!!

    कुणी घेतो पिज़्ज़ा बर्गर,तर कुणी घेतो आइसक्रीम..!कुणी घेतो चुटरमचारा,तर कुणी पितो कोल्डड्रिंक..!!

    असाच् संपवुनी जातो आयुष्य,येता-जाता इंटर मधे..!लक्ष कुठे हो असतो आपला,खाता-पीता इंटर मधे..!!

    घे समझ रे मानवा आता,आयुष्याचा इंटरवल..!हि वेळ असते भोग मागच्या जन्माची,अकर्म राहुणी शोध घेऊया, आपल्या देवाची..!!

    हाच आहे जीवनाचा इंटरवल..!हाच आहे जीवनाचा इंटरवल..!!

  • नाव …!
  • मि. शेक्सपीयर सांगुनी गेले...

    नावात काय ठेवले आहे...?अहो, भारतात तर नावातच राम आहे,

    भाषणात नाव, राशनात नाव,इलेक्शनात नाव, सिलेक्शनात नाव,

    मार्कशीटवर नाव, सैलरीशीटवर नाव,वोटवर नाव, नोटवर नाव,

    घराचे नाव, दूकानाचे नाव,गाडीचे नाव, साड़ीचे नाव,

    जातीचे नाव, कूळाचे नाव,धर्माचे नाव, मज़हबचे नाव,

    सगळी कडे नावच नाव..!नाव, सर्वनाव, उपनाव...!!

    पण..... ,माझ्यातर कामातच नाव आहे..!माझ्या कामातच राम आहे..!!

    खरंच सांगुनी गेले..,मि. शेक्सपीयर...!नावात काय ठेवले आहे...?

    नावात काय ठेवले आहे...??

  • बेधुंद हिवाळा …!
  • पाहटे उशीरापर्यंत झोपुन राहणे,

    दारातुन बाहेर बघणे आणि पटकन बंद करणे,

    बायकोकडे, एक नजर प्रेमाची टाकुन,

    चाहाचा पातीलं ग्यासवर मांडला..!

    कि समझा आला रे हिवाळा..!!

    हूँ - हूँ करत, हाथांना घासणे,

    स्वेटर- टोपराला शोधुण ठेवणे,

    “आज शर्दी थोडी जास्त आहे,

    म्हणत वर्तमानपत्र घेतला..!

    कि समझा आला रे हिवाळा..!!

    सकाळी सकाळी कुडकुडत लहान,

    मुलांना शाळेकडे जातानां बघणे,

    आजीच्या हातातुन बदाम अखरोट

    घेउन, तोंडातुन धुंआ निघाला..!

    कि समझा आला रे हिवाळा..!!

    संध्याकाळी खिडकीतुन बघणे,

    अंधार इतक्या लौकर कसा झाला,

    म्हणत, घरी फोन करणे,

    आज स्वेटर विसरलो, असे म्हटले..!

    कि समझा आला रे हिवाळा..!!

    बेधुंद, मदमस्त असा हा हिवाळा..!!!

  • ऋणानुबंध…!
  • देवा... वावराकड़े जाशील,तर माझा एक निरोप देशील..?

    सांगशील त्या धरणी मातेला,तुझ्या कृपेने, तुझे हे पोरं...पोट भरत आहे, आनंदाने नांदत आहे..!कृपा आहे तुझी, कशे फेडू हे ऋण..?

    सांगशील त्या अन्नदाते ला,आमच्या वर तुझी कृपा, अशीच् राहू दे..!विहिरी, तलाव, नदया, तुझ्या मायेनी भरू दे..!!आलेले संकट, आपल्या सावलित असू दे..!!!

    देवा... तू भिऊ नकोस,खचू ही नकोस..!कारण तू जर खचलास,तर सारे जग उपाशी राहील..!!

    मातेचे ममत्व, मुलांसाठी कधीचकमी पडत नाही..!मुलांकडून झालेल्या चुका,आपल्या पदरी घे..!!

    पुन्हा एकदा, कृषीक्रांती घडू दे,पुन्हा एकदा, कोठया गोदमं भरू दे,या वेळेस, मात्र झालेल्या चुका,पुन्हा होणार नाही,याची खंत असू दे..!

    देवा... वावराकड़े जाशील,तर माझा, हाच निरोप देशील,माझा, हाच निरोप देशील..!!

  • होळी रे …!
  • लाल, हिरवा, पिवळा, शेंदरा,

    गुलाल, रंग टाका रे...!

    आली आहे परत एकदा,

    होळी, रंग टाका रे...!!

    राग-द्वेष तुम्ही मनातले,

    सगळे, धूवुनी टाका रे..!

    आली आहे परत एकदा,

    होळी, रंग टाका रे...!!

    प्रथा-कूप्रथा समाजातले,

    सगळे, पेटवुनी टाका रे..!

    आली आहे परत एकदा,

    होळी, रंग टाका रे...!!

    यथामहत्व या सणाचे,

    तुम्ही, समझूनी टाका रे..!

    आली आहे परत एकदा,

    होळी, रंग टाका रे...!!

  • रान …!
  • मी आहे रान..,

    जंगल, तळागळातला..!

    नाही उरलय काही आता,

    झालो मी निर्जान..!!

    मी आहे रान...!

    त्रास होत आहे,

    श्वास घ्यायला..!

    अवयव सारे कापले माझे,

    झालो मी बेजान..!!

    मी आहे रान...!

    पक्षी, राजे, पाण्यासाठी,

    फिरतात राना राण..!

    माणुस, चूली सावली साठी,

    झाले दाना दान..!!

    मी आहे रान...!

    वय आता झाले माझे,

    साम्भाळ माझ्या लेकरा..!

    रानमेवा, पाऊस, पाणि,

    दिसेल सगळे भयाण..!!

    मी आहे रान...!

  • धारा …!
  • नाजुक, एक धारा...

    पाण्याची..,

    वेड्या-वाक्ड्या वाटातून...

    पहाडातून, जंगलातून...

    खोलवर दर्यातून...

    निघाली ती भेटायला...

    अपुल्या लेकरांची...

    तहान भागवायला...!

    साजुक, एक धारा...

    पाण्याची..,

    किती निश्चल...

    किती निश्चिंत...

    किती विश्वास होता तिला...

    वापर होणार तिच्या...

    प्रत्येक थेंबाचा...!!

    विसरलो आपण...

    अपुले वचन...

    करतो आहोत आपण...

    पाण्याचे हनऩ...

    १% पाण्याची सुध्दा...

    करतो आहोत उत्खनऩ...

    बेशिस्त, बेजवाबदारपणे,

    सर्रासपणे पाण्याचा...

    करतो आहोत निर्गमन...!!!

    या, आपण सगळेजण...

    घेउया, एक वचन...

    पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा...

    करुया तिचे जतन..!

    करुया तिचे जतन..!!

  • धरा …!
  • कसे विसरलो आपल्या मातेला..?

    जिच्या मातीत मी मोठा झालो,जिच्या पाण्यानी आपली तहान भागविली,जिच्या कुशीत जाऊन निवांत झोपलो,जिच्या छातीवर पाय ठेऊन चालायला शिकालो..!

    जिथुन अन्न, फळ, फुले प्राप्त केले,जिच्या अंगावर आपले घर बांधले,जिथे विहीर खोदून पाण्याची भगीरथी प्राप्त झाली...!!

    कसे विसरलो मी..!कसे विसरलो मी..!!

  • जननी …!
  • शोधीसी तुला मझं सावली,दिसे नाही मझं माऊली.!

    लेखनीत मझं अवतरली,विविध रुपे तुझं दिसली..!!

    आहेच तुझं आशीर्वाद आज ही,दिसतो परिणामी गजवजली..!

    प्रभामंडल तुझं आहे पसरुनी,रूप बघतो तुझे, लेकीच्या मुखी..!!

    ***

    इतर रसदार पर्याय

    शेयर करा

    NEW REALESED