Radha aani nani books and stories free download online pdf in Marathi

राधा आणि नानी

१ बालकथा :

नानीची आईसक्रिम

राधा, आपल्या नानीची लाडकी नात होती. खरं तर राधा हा नाव सुद्धा नानीनिच् तिला दिलं होतं. जन्माच्या आदिपासुनच्, राधा आईच्या पोटात असतानांच् नानी तिची काळजी घेत होती. दोघींना एकामेका शिवाय करमत नव्हतं. राधा, हा नाव किती प्रेमळ आणि उर्जेनी भरून आहे, नाही? राधा... नावाचं उच्चारण केलं कि एका अश्या स्त्रीचं स्मरण होते, जीला स्वतः नारायणानी आपलं नाव दिलं, मान दिला आणि तिला अजरामर केलं..! अशिचं रुआबदार आणि प्रखर व्यक्तिमत्वाची धनी होती, नानीची राधा..! सरळ नाकी डोळे, बाणाकार भुव्या, उंच आणि सळपातळ होती, 6 वर्षाची राधा..! तिचं सुद्धा तितकाच जीव होता नानीवर. दोघींचं एकामेका वर खूप प्रेम होतं.

राधा, मम्मी पप्पाची पण इतकिच लाडाची होती. मम्मी पप्पाची एकुलतीएक असल्यामुळे ती सर्वांची आवडती होती, पण याचा तिला कधीच गर्व नव्हता. तिनी कुठल्याही वस्तुसाठी कधीही हट्ट किव्हां आग्रह धरला नाही, कारण म्हणायच्या आधीच् तिला सगळ मिळुन जायचं. सर्वांना हवी हवीशी होती राधा..!

नानी एकटिच राहत होती, शाळेला सुटी असली कि नानी राधाला आपल्याकडे ठेवुन घ्यायची आणि मग दोघींचं दिवस कधी संपायचं, ते पप्पा राधाला घ्यायला यायचे, तेव्हांच् कळायचं. घरी जातानां नानी तिला लौकर परत येण्याचं वचन घ्यायची आणि दोघी जणु पक्य्या मैत्रीणी सारखे एकामेकाचं निरोप घ्यायचे.

घरी आल्यावर नानी तीन-तीन वेळा फोन करुन तिच्याशी बोलत बसायची. अशी होती नानीची राधा..! एकदा उनाह्ळयाच्या सुट्यामधे नानीला आईसक्रीम खायची ईच्छा झाली, पण तिला डॉक्टरांनी ठंड्या वस्तु खायला मनाही केली होती. तिनी राधाला आपली ईच्छा सांगीतली, राधा म्हणाली, “नानी, पप्पा रागवतील ना तुला..!” पण नानीला काही केल्या थांबवेना, वृद्धावस्था आणि बालपण किती कठीण असतो हे भोगल्या शिवाय कळत नाही. राधाला काहिच् सुचत् नव्हतं, नानीला कशी आईसक्रीम खाऊ घालायची, याची युक्ती शोधत होती. “नानीची आईसक्रीम...” हा एकमेव अतिसंवेदनशिल मुद्दा तिच्या डोक्यात गिरक्या घालित होता, कशी खाऊ घालायची, नानीला आईसक्रीम..?

काही दिवसांनी राधाचा वाढदिवस आला, राधा पप्पाला म्हणाली, “पप्पा, नानीला माझ्या वाढदिवसाला घरी बोलवायचं का..?” पप्पाकडुन होकार मिळाल्यावर तिनी एक योजना आखली, नानीला आईसक्रीम खाऊ घालायची..! ठरल्या दिवशी राधाचं वाढदिवस साजरा केल्या गेलं, मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या खाऊ आणि आईसक्रीमचा वेगळा टेबल लावल्या गेला होता. सगळे खाण्यात गुंग होते, पण राधाचं लक्ष मात्र नानी आणि आईसक्रीमचा संगम कसं घालुन आणायचं, याच्याकडे होता.

सगळयां समोर नानीला आईसक्रीम खाऊ घालणे अवघडचं नव्हे तर अशक्य होते. राधानी एक आईसक्रीमचा कप फ्रिजमधे लपवुन ठेवला आणि योग्य वेळेची प्रतिक्षा करु लागली. रात्र झाली, तिनी नानीला घरीच थांबवुन घेतले. घरचे बरेच् मंडळी गच्चीवर पत्ते खेळत बसले. दहा वाजुन गेले पण पत्ते खेळनं काही बंद होत नव्हतं. राधा झोपेला आली होती, ती जांभळ्या घेत मम्मी च्या माण्डीवर झोपुन गेली. अचानक रात्रीच्या दोन वाजता तिला जाग आला... अरेच्या, मी बेडरूम मधे कशी आली..? ती स्वतःशी बोलली..., नानी कुठे दिसत नाही आहे...! रात्रीच् घरी गेली कि काय..! राधाचा जीव धाडकन झाला...! अंधारात हॉलमधे तिचे डोळे नानीला शोधत होते...! ती एका हातात आईसक्रीमचा कप घेउन हळु आवाजात पुटपुटली, “नानी...!” तिला एका कोपर्यात नानी झोपलेली दिसली..! ती लगेच तिच्या जवळ गेली आणि नानीला उठविले, तिच्या हातात आईसक्रीमचा कप दिला आणि म्हणाली, “नानी, हे घे तुझी आईसक्रीम...”

नानीच्या डोळ्यात पाणि आलं..., “बाळा, तु माझ्यासाठी इतक्या रात्री आईसक्रीम आणली...!! तुझी ईच्छा नाही झाली खाण्याची..?” “नाही नानी..” राधा म्हणाली..! “तुझ्या साठीच ठेवली होती फ्रिज मधे..!” नानीला आपल्या स्वादेंद्रियांचा तिरस्कार आला..! एका लहानग्या मुलीनी तिची ईच्छा नेहमी करिता पुर्ण केली..! आता कधीच् आईसक्रीमची आकांक्षा करणार नाही, अशे मनात प्रण करुन ती राधाला आईसक्रीमचा एक-एक घास भरवु लागली..!!!

***

२ बालकथा :

माजरीचं पिल्लू

उन्हाळयाच्या सुट्यांमधे राधा नानीकडे राहायला आली होती. एके दिवशी, राधा धावतच नानीकडे आली, आणि मोट्ठे मोट्ठे डोळे काढत, जवळ जवळ ओरडली.., “नानी, माग्च्या गल्लीत मांजरीचं पिल्लू बसला आहे.., बिचार्या कडुन बोलनंसुद्धा होत नाही आहे.., एकदम सुस्त आणि लुस्त वाटत आहे तो... ए चलनं त्याला बघायला.., नानी चलनं..!” अशी म्हणत राधा, नानीला जवळ जवळ ओढत गल्लीत घेऊन गेली..!

नानीचा जेमतेम डोळा लागला होता, उन्हाळयात बाहेर निघनं किती जिवावर येतनं..! थंडगार कूलरच्या हवेत नानी घरचे कामं आवरुन बिछान्यावर जराशी पडली नाही कि राधाच्या ओरड्णानी तिची झोपमोड झाली...! पण राधाच्या आग्रहाखातर ती कशीबशी उठली आणि तिच्या बरोबर मागच्या गल्लित धडपडत गेली, तर बघतेकाय, एक काळा-सावळा मांजरीचं पिल्लू अंत्यावस्तेत पडला होता... तिचं फक्त तोंड उघडत होतं, पण आवाज मात्रं निघत नव्हता..! नानीला परिस्थितीची जाणीव झाली आणि तिनी पटकन एका वाटित पाणि राधाच्या हातात दिलं आणि तिच्या जवळ ठेवायला सांगितले..! राधा घाबरत घाबरत त्या पिल्लू कडे निघाली... पण तो मांजरीचं पिल्लू इतका बेजार झाला होता कि त्याला माणसाच्या पिल्लूची सुद्धा भिती वाटत नव्हती...! गरजेच्या वेळेच शत्रुकडे सुद्धा याचना करायला प्राणीसुद्धा मागेपुढे पाहत नसतो... नाही का..!

त्या पिल्लूनी थोडसं पाणी चाटलं आणि मान खाली घातली..! राधाच्या डोळयात पाणि आलं..! “नानी, काय झालंगं याला...” ती म्हणाली, नानी तिला सांत्वनादेत म्हणाली, “काही नाही गं... झोपला असेल तो... तु चल बरं आता आत, खुप ऊन आहे बाहेर...”

राधा कशीबशी आत आली खरी, पण तिचं मन मात्र त्या मांजरीचं पिल्लू मधे अडकुन होत..! नानीनी तिला जवळ घेउन थोपटत झोपविण्याचां प्रयत्न केलं, तिनी नानीखातर डोळे बंद केले खरे पण मन लागत नव्हतं..! संध्याकाळ झाली आणि राधा त्या पिल्लूला बघायला गल्लित जाऊन बघतेकाय तर तो पिल्लू जरासा सावरला होता... ती परत धावत आली आणि नानीला थोडीशी दुध-पोळी कालवुन मागितली आणि त्या पिल्लूजवळ नेऊन ठेवली. तो पिल्लू आता तिला घाबरत नव्हता आणि तो दुध-पोळी खाऊ लागला, राधानी परत पाणि आणुन ठेवले..!

दुसर्या दिवशी सकाळी सकाळी राधाला त्या मांजरीच्या पिल्लूचं आवाज दारा जवळ आला, डोळे कुचकरत तिनी दार उघडला, तर तो मांजरीचं पिल्लू तिच्या पायाशी लोळायला लागला, राधा जराशि दचकली, इत्क्यात तिला आवाज आला... म्याऊ...!!! “ए नानी, हा बघ ना कसा करतोय...” राधानी नानीला आवाज दिला..! “अगं, काही नाही करत तो... तुझा लाड करित आहे... कदाचित थैंक्स म्हणत अश्णार..” नानी म्हणाली. “हो..?” राधा म्हणाली, आणि दोघांची छान गट्टी जमली..! आता तो मांजरीचं पिल्लू घरी येत-जात असे आणि राधा सोबत खेळत असे..! राधानी जणु आपले प्राण वाचविले, अशे कदाचित तो पिल्लू भास करुन देत असावा..!

***

३ बालकथा :

राधाची मैत्रिण

एके दिवशी राधाला सकाळी सकाळी एक मोट्ठा ट्रका दिसला, तो नानीच्या दोन घर पलीकडच्या घरी उभा झाला. त्यातुन काही लोकं उतरले आणि पटं-पटं सामान उतरवायला लागले. राधा उत्सुकतेनी गैलरी मधुन डोकावुन पाहत होती, ती नानीकडे आली आणि तिला म्हणाली, “नानी... आपल्या शेजारी कुणीतरी राहायला आलं गं...” “हो गं...” नानी म्हणाली, “त्यांनी तो घर विकत घेतलं आहे आणि आता ते राहायला आले अश्णार..” राधा पुन्हा त्या ट्रककडे आणि त्या लोकानंकडे बघायला बाहेर आली..! तिला तो मोट्ठा ट्रक आणि त्यातलं सामानांची जास्त उत्सुकता होती, “किती सारं सामान आहे यांच्याकडे..!”, ती पुट्पुटली.

छोट्या मंडळीनां तर असतेच, मोठे सुद्धा या उत्सुकतेच्या आहारी गेलेले असतात, नाही का..? असो, तितक्यात एका गाडीतुन एक जोडपं उतरलं, कदाचित ते नविन घरमालक असावे, त्यांच्यासोबत एक गोड मुलगी पण होती. राधाच्या वयाचीच असेल ती... राधा तिला बघुन हसली, तिनीपण स्माईल दिली..! राधाला आपल्या नविन मैत्रिणीला भेटण्याची खुप उत्सुकता झाली.

दुसर्या दिवशी राधाला त्यांच्या घरासमोर एक मंडप दिसला.., “अरेव्वा, कार्यक्रम आहे वाटतं त्यांच्याकडे... आपल्याला जायला मिळणार... मी नविन फ्रॉक घालणार... ती नानीनीं दिलेली नविन सैंडिल पण घालणार, किती मजा येइल नाही का..?” ती मनातल्या मनात स्वप्न रंगवु लागली..!

छोटे मुलं असो कि वयोवृद्ध, यांना आपल्या स्वादेंद्रियांवर नियंत्रण नसतं, आणि शेजारी एखादं कार्यक्रम असेल तर विचारुच नका... असं वाटतं आपल्याचं घरी कार्यक्रम आहे कि काय..! किती गंमत असते नाही..?

रात्रिपासुनचं रोशनायी असते, लाऊड-स्पीकरवर गाणे लागतात, सामानांची देवाण-घेवाण सुरू असते, “अहो राधाची नानी, लाटणं-पोळपाट देताका जरा, खुरच्या पाठवता का?” अशे एकामागं एक कामं लागले असतात... आणि मधे मधे खमंग पकवानांचा पण सुगंध येत जात असतं, हंम्म्... खवा भाजत अश्णार, काय करणार बरं, गुलाब-जामुन कि बर्फी..? कधी तिखटाची खेस सुटते तर कधी कढी चा आंबट वास येतो..! घरी किव्हां अवती-भवती कार्यक्रम असेल तर किती गंमत असते नाही..?

राधाचीपण भुक आणि उत्सुकता हळु हळु वाढत चालली होती..! राधा संध्याकाळ पासुनचं तैयार होऊनी बसली होती..! नानीला सगळं कळत होतं, पण अजुन बोलावणे आले नव्हते, माहितपडलं कि घरच्या घरीच कार्यक्रम आहे आणि शेजारच्यांना बोलणार नाही आहे..!! नानीची मात्र कोंडी होत होती, आपल्या नातीनला कसं समजवणार कि बेटा, आपल्याला बोलविले नाही आहे..! ती तर आरस्या समोर स्वतःला इकडुन तिकडुन निहारत होती..!

आठ वाजले... राधा नानीला आपण कधी जाणार, विचारून विचारून रडकुंडी झाली होती..! नानी कसंतरी तिला समजवत होती, पण नाईलाज होता तिचा, न बोलवता जाणं योग्य वाटत नव्हत, इकडे राधाचा धिंगाणा सुरु होता, जाण्यासाठी..!!

कसं करायचं, काही कळत नव्हत नानीला..! तिनी एक प्रेझेंट पैक केलं आणि राधाला घेऊन त्यांच्या घराकडे निघाली, नानीला जरी चुकचुक वाटत होती, तरी आपल्या नातीन साठी, वाट्टेल ते अपमान सहन करायला ती तैयार होती..! गेट जवळ येऊन त्या दोघी थबकल्या..! तितक्यात घरून त्यांची तिच् छोटी मुलगी बाहेर आली आणि राधाचं हाथ पकडुन दोघींना आत नेले आणि आपल्या आईला म्हणाली, “आई, बघ हिच ती मुलगी मी सकाळी बघितली होती ती..,” “सॉरी हं... मी कामामुळे येऊ शकले नाही, तुम्हाला बोलवायला..” त्या बाईंच्या चेहर्यावर दिलगिरीचे भाव उमटले. नानी त्याना शांत करित म्हणाल्या, “काही हरकत नाही हो, गेलं असेल राहुन... जावुद्या की..”

त्या लगबगिने या दोघींसाठी प्लेटस सजवुन आणते... राधा तिच्या नविन मैत्रिणी सोबत हसुन हसुन बोलत होती आणि जेवणावर ताव मारीत होती..! नानीला मात्र राधाकडे तिला जेवतानां बघुनचं पोट भरल्यासारखं वाटत होतं..!! नानीच्या चेहर्यावर आता समाधानाचे भाव उमटले होते...!!!

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED