Pikoli books and stories free download online pdf in Marathi

पिकोली

पिकोली

मनीष गोड़े

“बस्स... खूप झालं तुझं प्राजक्ता..!” मी जवळ जवळ ओरडलोच होतो तिच्यावर..! एरवी न बोलणारी प्राजक्ता, आज खुप आक्रामक मुडमधे होती. रडत रडत ती बेडरुममधे गेली आणि धाडकन दार आतुन बंद केले तिने... माझ्याकडे ड्रॉईंग-हॉलमधे झोपण्याखेरीज़ दुसरं उपाय उरलं नव्हतं. झोप येत नसल्यामुळे मी टी.वी. लावुन बसलो, डोळे स्क्रीनवर आणि बोटं चैनल सर्फ करण्यात मग्न होते. सहज एका गाण्याच्या चैनलवर हाथ थांबला... एक तरुणी फुलपाखरामागे स्लो-मोशन मधे धावत होती, आणि तो फुलपाखरु एका फूलावरुन दुसर्या फूलावर जाऊन बसत होता... आवाज म्युटवर असल्यामुळे काहीच ऐकू येत नव्हतं, पण तो गाणं ऐकण्यासारखं असेल, असे वाटत होते. थोड्यावेळानी आपोआप डोळे बंद झाले आणि मी तसाच रिमोट हातातघेऊन झोपी गेलो...!

“ऐ... ऊठनं..,” कुणीतरी माझ्या नाकाला स्पर्शुनगेले..! मी हळुच डोळे उघडले, तर बघतो काय, तोच फुलपाखरु माझ्या नाकाजवळ फडफडत होते... मी खुश झालो... “अरे वाह.., हा तर तोच फुलपाखरु आहे... गाण्यामधला.., काय नाव आहे गं तुझं..?” मी विचारलं.

“पिकोली..” ती हसत म्हणाली..! ती खूप सुंदर दिसत होती, तिचे पंखांवरचे रंग खुप मोहक आणि कलात्मक होते. “का रे भांडत होतास तू प्राजक्ताशी..?” पिकोलीने विचारले.

“अगं मी नाही भांडत होतो तिच्याशी.., तिच हट्ट धरुन बसली आहे..!”

“समजावुन सांगशिल का, काय झालयते..?” पिकोलीनी डोळे टवटवले.

“प्राजक्ताशी माझे लग्न होऊन सात वर्ष झाली तरी अजुन आम्हाला बाळ होत नाही आहे, आणि होण्याची शाश्वतीही नाही आहे, असं डॉक्टरांचे म्हणने आहे. तर तिचे अजुन थांबुया, या हट्टापोटी रुसुन बशने कितपट योग्य आहे?” मीच पिकोलीला विचारले...!

मी आणि प्राजक्ता, आमचे दोघांचे राजा-राणींचे संसार, ना सासु-सासरे, ना नणद-भावजयी, दोघे नोकरी करणारे, चांगल्यापदावर कार्यरत आहोत. ऊणीव आहे ती फक्त एका बाळ-गोपालाची. सात वर्षापासुन डॉक्टरांचे घर भरने सुरु असताना, मीच तिला एकदिवस सुचविले, “प्राजक्ता, आपण एक बाळ दत्तक घेऊया का?” “नाही..!”, तिने चक्क नाकार दिला. “कशाला दुसर्याचे बाळ आपल्या घरी..? लोकांना उशीरा होत नाही का बाळ..? मला नको आहे असलं काही...” तिने आपलं टोकाचा निर्णय सांगुन टाकलं. “त्यापेक्षा मुग्धाशी लाऊन देते तुझे लग्न...”

“आता ही मुग्धा कोण..?” पिकोलीने विचारले.

“माझी मेहुणी, प्राजक्ताची लहान बहिण..!” मी म्हणालो, “ती एकटी आई सोबत, पुण्याला राहते, फाईनल ईयर गायनिकला आहे ती. बाबा लहानपणीच मरण पावले, पण या तिघीनसाठी उदरनिर्वाहची संपुर्ण सोय करुन गेले होते. गडगंज माणसं होते ते. प्राजक्ता, माझ्या कॉलेजची मैत्रिण...! शाळेतुन कॉलेज पर्यंत सोबत शिकलो, घरी येणं-जाणं असल्यामुळे, प्राजक्तासाठी माझ्यापेक्षा योग्य स्थळ मिळणार नाही, म्हणुन आमचे दोघांचे लग्न पक्कं करुन, मी एम.बी.ए. साठी परदेशी निघुन गेलो. परत आल्यावर मुंबईला एका एम.एन.सी. मधे नोकरी आणि प्राजक्ता, दोघी सोबतच मिळाल्या. आता सात वर्षाहून जास्त काळ लोटल्यावर सुद्धा बाळासाठी ती वाट पाहत आहे. बाळ दत्तक घेण्यापेक्षा मुग्धाला घरी आणुया, अश्या चुकीच्या निर्णयावर ती ठाम दिसत होती. आता तूच सांग, मी काय करु..?” मी पिकोलीला निराश मनाने विचारले.

“बस्ससस...! इतनी सी बात..? किती तरी मार्ग़ आहेत यावर..!” पिकोली म्हणाली. मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतच राहलो..! “मार्ग निघेल, फोन करा मुग्धाला...!” पिकोली मझ्या कानाजवळ येऊन पुटपुटली.

***

“फोन करा मुग्धाला...!”

“अगं, येतोये ऐकु मला..! कान फोडशील का आता..!” मी ओरडलो.

“कर्म फुटले माझे... उठा, चहा घ्या आणि फोन करा मुग्धाला...!” अचानक पिकोलीचा आवाज प्राजक्ताशी कसा बदलला..? माझ्या मनात शंका आली..!

“उठा आता..!” डोळे उघडले, तर प्राजक्ता माझ्या जवळ उभी होती चहाचा कप घेउन..! अरेच्चा... स्वप्न बघितलं होय मी...! मी मनाशी पुटपुटलो. रिमोट खाली पडलेला, टि.वी. सुरुच होता रात्रभर वाटते..! मी फ्रेश होवायला बाथरुमकडे निघुन गेलो..! फोन तर करावच लागेल तिला.., देव जाणे मुग्धा काय रिएक्शन देणार.., अशे अनेक प्रश्न एका मागे एक गिरक्या घालत होते डोकयात. तास दिडतासा नंतर ऑफिस मधुन मुग्धाला फोन लावला, इंटरकॉमवर थोडावेळ थांबल्यावर तिचा सुमधुर सुर ऐकायला आला, “हाय जिजू.., आठवण आली का माझी..?” ती मेडिकल कॉलेजच्या ओ.पी.डी. मधे होती कदाचित. “अगं तुला भेटायचे आहे, रविवारी येऊका पुण्याला..?” मी पटकन म्हणालो.

“बाप रे, पळून बिळून जायचे नाही आहे न आपल्याला, मला बाई नाही जमणार रविवारी, मंदाची डिलीवरी होत नाही आहे, म्हणुन सिजेरियन करायची आहे त्या दिवशी..!” ती मसकरीच्या मूड मधे होती.

“अगं, मी सुद्धा दुपारी एक्सप्रेस हाईवेनी निघालो तरी चारच्या आदि पोहचू शकत नाही,..!” मी म्हणालो. “ठिक आहे, या, पण रात्र होईल जायला..!” मुग्धा चिंतित वाटत होती. “तू काळजी करु नको, आय विल मैनेज..!” मी म्हणालो.

***

रविवारी पुण्याला निघताना मी प्राजक्ताकडे मुकदृष्टीने परत एकदा विचारले, खरच जाऊ पुण्याला..?

“निघा आता लौकर, म्हणजे परतीचा प्रवासाला वेळ लागणार नाही, आणि एकदाचे फाईनल करा तुमचे..”

प्राजक्ता मला एकामागंएक अश्या सुचनांनचा जणू वर्षावचं करीत होती.

मी निर्विकार भावाने गाडीकडे निघालो... मन मानत नव्हता, प्रेमविवाह केलेली बायको असताना, दुसरी सोबत लग्न...? छे... विचार पटत नव्हता, ते सुद्धा बायकोच्या सहमतीने...!! फक्त एका बाळासाठी..? या जगात कितीतरी निराधार मुलं आहेत, ज्यांना आपल्या आधाराची गरज़ आहे, चांगल्या शिक्षणाची, राहणीमानाची नितांत आवश्यक्ता आहे. मागे मी एका गोंडस मुलीबद्दल चौकशी सुद्धा करुन आलो होतो, प्राजक्ताला सांगितल्यावर ती जाम भडकली होती...! अशे अनेक विचार करता करता कधी पनवेल क्रॉस झाला, कळलच नाही. गाडी आता एक्सप्रेस हाईवेवर, माझ्या विचारांच्या सुसाट वेगाने धावत होती..! मुग्धाला भेटुन तिला नकार द्यायला सांगणार.., किंव्हा काहीतरी नवीन संशोधन वगैरे लागला असेलतर त्याचा वापर करायला सांगणार...! पण हे लग्न बिग्न नको...! छे... काही कळेनासा झाले आहे, वैतागलो बूवा मी, या दोघींच्या मधात..! सगळे नीट सुरु असताना, आमच्या सोबतच असं का बरं होतोय..? मेंदु बधीर झाल्यासारखे वाटत होते...!

देहु रोड कधी आले, कळलच नाही..!! बी.जे. मेडिकल कॉलेज कडे गाडी वळविली, आणि गेटच्या बाहेरुनच मुग्धाला फोन केलं...! रिंग जात होती, पण ती फोन उचलत नव्हती, कदाचित बिझी असेल, असं स्वतःला समजवत मी गाडीच्या बैक मिरर मधे स्वतःला निरखुन पाहलं, तर मागुन कुणीतरी हाथ हालवित होती..! ग्लास खाली करुन मागे वळुन बघितलंतर मुग्धा होती...! “हाय जिजू...” करित ती समोरच्या सीटवर येऊन बसली.

“मुग्धा... किती बदललिस गं तू...!!” मी तिच्याकडे बघतच राहलो..! जिंस-टॉप आणि ग़ॉगल... पोनी मधे सुरेख दिसत होती. “हे असलं अलाऊड आहे का ऑपरेशन थियेटर मधे..?” मी तिला विचारलं.

हा-हा-हा... ती हसत होती... “दांडी मारली आज... दुसर्या डॉक्टरची ड्युटी लावली... आज तुम्ही येणार होते नं म्हणुन... ताई साहेबांचा आदेश आहे... हा-हा-हा.., चला कुठेतरी... जाम भुक लागली आहे मला...!” मुग्धा ग़ॉगल वर करुन केसांमधे खोचत आग्रह करित होती...!मी ब्लु-नाईल रेस्टॉरंट कडे गाडी वळवली..! ती काहितरी बोलत होती आणि मला हाथवारे करुन सांगत होती, पण माझं डोकं दुसरंच् काही विचार करित होता...!

“वेलकम सर, वेलकम मँम..!” दरबान म्हणाला, आम्ही दोघे आत जाउन जागा शोधित रिकाम्या खुरच्यांवर बसलो..! “काय घेणार मुग्धा..?” मी विचारले, तिने ऑर्डर केले आणि मी मुद्यावर आलो.

“मुग्धा, मी फक्त बाळासाठी आणि तुझ्या ताईच्या हट्टापोटी तुझ्याशी लग्न करणार नाही आहे..” मी एका श्वासात माझ्या मनातलं बोलुन गेलो..!!!

तिनी डोकं वर केलं आणि पाणी पीत बोलली, “आईसक्रिम मागवा पटकन...!”

मला काही कळेनासा झाले होते..., दोघी बहिणी मला पिंग-पॉंग बॉल सारखे नाचवित होत्या..! तिचे खाउन झाल्यावर आम्ही बिल देउन बाहेर आलो आणि गाडित बसलो. मुग्धा माझ्याकडे तोंडकरुन बोलली.., “जिजू, मी तुमच्या बाळाची आई बनायला तैयार आहे.., दचकू नका अशे...” ती बोलत होती आणि माझ्या कपाळाहुन घाम वाहायला लागला... टप, टप, टप...!

“काय हो तुम्हीपण... घाबरट कुठले... अहो मी तुमच्या बाळा ला ‘सरोगेट’ करणार आहे, IVF पद्धतीने, मी तुमचे बीज आपल्या पोटात वाढविणार आहे. आणि योग्यवेळी मी तो बाळ तुम्हाला आणि ताईला डिलीवर करणार आहे..,

चला आता मला होस्टेलवर सोडुन द्या...”

मी तिच्याकडे आश्चयाने बघत राहिलो...! इतके सोपे पण किती कठीन मार्ग आहे हा..! तिचा चेहरा मला एखाद्या दैविक स्त्रीचा वाटत होता..! नऊ महिणे ती आमचं बाळ घेउन सगळीकडे फिरणार होती, लग्न न करता...!

“आर यू मँड..?” मी विचारले, “तुझ्याशी नंतर कोण लग्न करणार...?”“त्याची पण सोय केली आहे मी, डॉ. विलास करणार आहे माझ्याशी लग्न... IVF स्पेशालिस्ट, आमच्या हॉस्पिटल मधेच काम करतात...!”

आता फक्त तिचे पाय धुवून तिर्थ घेणे बाकी होते...!

“थांबा...” ती ओरडली...! “होस्टेलचं गेट मागे गेला की...” ती खाली उतरली आणि मला बाय करुन गेटकडे निघाली... उडत उडत... या फूलावरुन त्या फूलावर...! सगळयानां पल्लवित करित... या फुलाचे परागकण त्या फुलाला पोहचवित, सर्वानां आत्मिक आनंद देत.., ‘पिकोली’ सारखी..!

पिकोली... आमच्या जिवनात आनंद आणनारी, प्राजक्ताच्या फुलाला सुगंधानी भरणारी..., तिला स्त्रीत्व देणारी, माझ्या स्वप्नाला पुर्ण करणारी... माझी... पिकोली...!!!

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED